Author
उच्च शिक्षण विभागामध्ये करिअर कट्टाकडून संपन्न झालेले उपक्रम
-
-

मा. डॉ. शरयू व. तायवाडे प्राचार्या, तायवाडे कॉलेज महादुला कोराडी

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र । माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने । करिअर कट्टा अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२५ या वर्षातील । सप्टेंबर महिन्यात संपन्न झालेल्या विद्यार्थी संवाद उपक्रमाची माहिती खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

करिअर कट्टा कार्यशाळेत विद्यार्थ्यांशी संवाद व करिअर मार्गदर्शन

चंद्रपूर जिल्हा १ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दि.०१ सप्टेंबर २०२५ रोजी चंद्रपूर जिल्ह्यातील सरदार पटेल महाविद्यालय येथे अंदाजे १०० विद्यार्थ्यांसोबत मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी संवाद साधला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, विभागीय समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक, करिअर संसद || पदाधिकारी व इतर प्राध्यापक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित || होते.

|| गडचिरोली जिल्हा - २ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र || माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू | | असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दि.०२ सप्टेंबर २०२५ । । रोजी गडचिरोली जिल्ह्यातील भगवंतराव कला व विज्ञान । । महाविद्यालय एटापल्ली येथे अंदाजे ६० विद्यार्थ्यां सोबत मा. । । यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता ।। केंद्र यांनी संवाद साधला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे । । प्राचार्य, प्राचार्य प्रवर्तक, जिल्हा समन्वयक, महाविद्यालयीन ।। समन्वयक, करिअर संसद पदाधिकारी व इतर प्राध्यापक वृंद ।। मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गोंदिया जिल्हा ०३ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र

माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू । असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दि.०३ सप्टेंबर २०२५ । । रोजी गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे । । नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज ऑफ आर्टस् अँड । । कॉमर्स, गोंदिया एज्युकेशन सोसायटीचे धोटे बंधू सायन्स ।। कॉलेज येथे अंदाजे ४५० विद्यार्थ्यांसोबत मा. यशवंत शितोळे । । अध्यक्ष महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी संवाद।। साधला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, ।। महाविद्यालयीन समन्वयक, IQAC समन्वयक, करिअर संसद।। पदाधिकारी व २० हून अधिक प्राध्यापक उपस्थित होते.

भंडारा जिल्हा - ४ सप्टेंबर २०२५

11

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र।। माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू ।। असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दि. ०४ सप्टेंबर २०२५।। रोजी भंडारा जिल्ह्यातील गोंदिया एज्युकेशन सोसायटीच्या जे.।। एम. पटेल कॉलेज भंडारा, किसनराव खोब्रागडे एज्युकेशन सोसायटीचे यशवंतराव चव्हाण आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज लाखांदूर, गोंदिया एज्युकेशन सोसायटी चे एम. बी. पटेल, आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, साकोली, कै. निर्धन पाटील वाघाये कला, वाणिज्य आणि विज्ञान। महाविद्यालय लाखनी येथे ८५० हून अधिक विद्यार्थ्यांसोबत ।। मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान। सहाय्यता केंद्र यांनी संवाद साधला. या कार्यक्रमास ।। महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राचार्य प्रवर्तक, जिल्हा समन्वयक, ।। विभागीय सह समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक, । । करिअर संसद पदाधिकारी व इतर प्राध्यापक उपस्थित होते. । ।

वर्धा जिल्हा ८ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र ।। माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू ।।

असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दि. ८ सप्टेंबर २०२५ रोजी वर्धा जिल्ह्यातील बजाज विज्ञान महाविद्यालय, गो. से. वाणिज्य महाविद्यालय, कुंभलकर कॉलेज ऑफ सोशल वर्क येथे ४०० हून अधिक विद्यार्थ्यांसोबत मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी संवाद साधला. या कार्यक्रमास महाविद्यालयांचे प्राचार्य, जिल्हा समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक, करिअर संसद पदाधिकारी व इतर प्राध्यापक उपस्थित होते.

नागपूर जिल्हा - ९ ते ११ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दि. ९ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर जिल्ह्यातील अमर सेवा मंडळाचे कमला नेहरू महाविद्यालय, मथुरदास मोहता विज्ञान महाविद्यालय, एल. ए. डी. कॉलेज, डॉ. आंबेडकर कॉलेज दीक्षाभूमी, दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर जिल्ह्यातील नूतन आदर्श महाविद्यालय उमरेड येथे महिला कला महाविद्यालय, नूतन आदर्श महाविद्यालय व रणधीरसिंह भदोरिया महाविद्यालय, उमरेड, ग्राम विकास शिक्षण मंडळाचे राणी इंदिराबाई भोसले महाविद्यालय, कुही, भिवापूर महाविद्यालय भिवापूर, दि.११ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर जिल्ह्यातील वैदर्भीय महिला संस्था चे वुमन्स कॉलेज ऑफ आर्टस् अँड कॉमर्स, श्री सच्चिदानंद शिक्षण संस्था द्वारा संचलित तायवाडे महाविद्यालय, महादुला कोरडी, भालेराव विज्ञान महाविद्यालय सावनेर, धनवटे नॅशनल कॉलेज, शिवाजी सायन्स कॉलेज काँग्रेस नगर येथे २५०० हून अधिक विद्यार्थ्यांसोबत मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी संवाद साधला. या कार्यक्रमास महाविद्यालयांचे प्राचार्य, जिल्हा समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक, करिअर संसद पदाधिकारी व इतर प्राध्यापक उपस्थित होते.

करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दि.११ सप्टेंबर २०२५ रोजी नागपूर जिल्ह्यातील शिवाजी सायन्स कॉलेज काँग्रेस नगर येथे १४ महाविद्यालयातील ९० हून अधिक करिअर संसद पदाधिकाऱ्यांसोबत सोबत मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, संलग्नित महाविद्यालयांचे प्राचार्य व समन्वयक यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. या बैठकीस मा. श्रीपाद अपराजित, निवासी संपादक, महाराष्ट्र टाइम्स, नागपूर आवृत्ती अध्यक्ष स्थानी लाभले. तसेच याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मा.

डॉ. ओमराज देशमुख, विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. शरयू तायवाडे, सह विभागीय समन्वयक डॉ. वर्षा वैद्य, करिअर संसदेचे सचिव डॉ. एस. डी. देशभ्रतार, डॉ. प्रवीण लामखेडे, करिअर कट्टा समन्वयक मा. कुलदीप सोनकुसरे, महाविद्यालयीन समन्वयक डॉ. शाहीन सय्यद, विभागीय नियोजन समिती समन्वयक उपस्थित होते.

रायगड जिल्हा १७ व १८ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दि.१७ सप्टेंबर २०२५ रोजी रायगड जिल्ह्यातील कोकण ज्ञानपीठ वाणिज्य व कला महाविद्यालय उरण, वीर वाजेकर आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज फुंडे उरण, दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी रायगड जिल्ह्यातील शिवाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पोलादपूर, हिरवळ एज्युकेशन ट्रस्टचे कॉलेज ऑफ सायन्स (कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी) महाड, द. ग. तटकरे महाविद्यालय, टिकम भाई मेहता कॉमर्स कॉलेज माणगाव येथे अंदाजे ६५० हून अधिक विद्यार्थ्यांसोबत मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी संवाद साधला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, जिल्हा समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक, करिअर संसद पदाधिकारी व इतर प्राध्यापक उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्हा १८ व १९ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दि. १८ सप्टेंबर २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील ज्ञानदीप कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मोरवंडे बोरज, दि.१९ सप्टेंबर २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील आय. सी. एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खेड, भारत शिक्षण मंडळाचे देव-घैसास-कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, सह्याद्री शिक्षण संस्थेचे शरदचंद्रजी पवार कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चरल येथे २५०० हून अधिक विद्यार्थ्यांसोबत मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी संवाद साधला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, जिल्हा समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक, करिअर संसद पदाधिकारी व इतर प्राध्यापक उपस्थित होते. करिअर संसद पदाधिकाऱ्यांसोबत बैठक ही संपन्न झाली.

सिंधुदुर्ग जिल्हा - २३ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉ. दादासाहेब बराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा, पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय शिरगाव, भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी अंदाजे ५२० हून अधिक विद्यार्थ्यांसोबत मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी संवाद साधला. या कार्यक्रमास कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, जिल्हा समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक, करिअर संसद पदाधिकारी व इतर प्राध्यापक उपस्थित होते.

मुंबई जिल्हा - २४ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी मुंबई जिल्ह्यातील क. ज. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स विद्याविहार, सेंट झेवियर्स कॉलेज, के. जे. सायन्स आणि कॉमर्स महाविद्यालय, श्री. नारायण गुरू कॉलेज ऑफ कॉमर्स, चेंबूर येथे अंदाजे ६०० विद्यार्थ्यांसोबत मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी संवाद साधला. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, जिल्हा समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक, करिअर संसद पदाधिकारी व इतर प्राध्यापक उपस्थित होते.

करिअर कट्टा उपक्रमांतून मराठवाड्यातील पूरपिढीतांना आर्थिक मदत

करिअर कट्टा उपक्रमांतून मराठवाड्यातील पूर परिस्थितीमुळे आलेला दुष्काळ आणि आणि संकटाला सामोरे जाताना तेथील नागरिकांची तरुणांची उडालेली तारांबळ आणि त्यामुळे झालेले आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान याची जाणीव ठेवून या तरुणांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी एक पाऊल पुढे यावे आणि मदतीचा हात द्यावा ही भूमिका घेऊन निधी संकलनासाठी महाविद्यालयातील करिअर संसदेचे सर्व पदाधीकारी, विद्यार्थी व करिअर कट्टा समन्वयक, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक यांनी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी वर्ग यांना जमेल तशी मदत करण्याचे आवाहन

केले. एवढेच नव्हे तर रॅलीच्या माध्यमातून महाविद्यालयातुन सुरू केलेली रॅली गावातून फिरून, मार्केटमधील दुकानांमध्ये जाऊन या परिस्थितीची जाणीव करून देत जमेल तशी मदत करण्यासाठी विद्यार्थ्यांनी नागरिकांना आवाहन केले. मानवी वेदनेची कळ संवेदना म्हणून जेव्हा जागी होते तेव्हा त्या वेदनेची दाहकता कमी करण्याच्या जाणीवेने लोक पुढे येतात आणि मोठ्या मनाने या समाजातील एक नागरिक म्हणून आणि विद्यार्थ्यांनी जागविलेल्या या संवेदनातून, या प्रेरणेतून अनेक लोकांनी एक हात मदतीचा पुढे केला सर्व विद्यार्थ्यांमध्ये ही सामाजिक भावना जागृत व्हावी कुठेतरी आपल्यासारख्या शिक्षण घेणाऱ्या भावांचे, बहिणींचे नुकसान होत आहे याची जाणीव ठेवून या रॅलीद्वारे परिसरातील नागरिकांनी सकारात्मक सहभाग दर्शवावा यासाठी विद्यार्थ्यांनी त्यांच्या जाणिवा जागृत करून मदतीसाठी आवाहन केले. 'एक हात मदतीचा देऊ या पूरपिढीतांना मदत करू या' या घोषवाक्याने सर्व परिसरात मानवी भावना, संवेदना जागृत करण्याचे कार्य विद्यार्थ्यांनी केले.

मराठवाड्यातील पूरग्रस्तांच्या संकट निवारण्यासाठी करिअर कट्टाने सहकार्याची प्रबळ भावना उराशी बाळगून तत्परतेने शैक्षणिक मदत करण्यासाठी विभिन्न उपक्रम राबविले. या उपक्रमांच्या माध्यमातून निधी संकलनाच्या प्रभातफेरीतून गोळा केलेला ८,०३,८१८/- रुपयांचा दाननिधी सोलापूरला त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे.

तद्वतच मुंबई येथील के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स विद्याविहार या महाविद्यालयाने वही, पेन, पेन्सिल, स्केल, रबर, शॉपनर, खडू, कंपास, पाऊच, रंगीत पेन्सिल, स्केच पेन या वस्तूंनी भरलेली १००८/-रुपये किंमतीची एक शालेय बॅग याप्रमाणे ५४२ बॅग जालना, अहिल्यानगर, नांदेड, उमरगा, गेवराई, बीड, कडा, अष्टी आणि सोलापूर तर नांदेडमध्ये ६० व धाराशीवमध्ये ३७ या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी देण्यात आल्या. सामाजिक उत्तरदायित्व जपण्याच्या दृष्टिकोनातून करिअर कट्टाने साकारलेल्या या जबाबदारीपूर्ण कार्याला संस्था, महाविद्यालय, विद्यार्थी आणि समाजातील लोक यांनी मदत केल्यामुळे अप्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांच्या मनात समाजजागृतीची भावना सजग करण्यास करिअर कट्टाची सामाजिक जाणीव चित्तवेधक ठरली आहे.