मा. प्रा. दिनेश विजया भारत पवार
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त
महाविद्यालयीन जीवनात करिअरचे ध्येय ठरवून विद्यार्थ्यांनी सुरुवात केल्यास विद्यार्थ्यांना सहजपणे यश मिळू शकते. इयत्ता दहावी, बारावी, पदवी अशा पात्रतेवर अनेक नोकऱ्या उपलब्ध असतात, नोकरीमध्ये सरळसेवा पध्दतीने व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने निवड परीक्षा घेतल्या जातात, एखाद्या परीक्षेत निवड झाली की नेमणूक राज्यसरकार करत असते, या लेख मालिकेतून आपण सरळसेवा व महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या विविध नोकरी संदर्भात माहिती घेत आहे. मागील लेखात तलाठी भरती, पोलीस भरती याविषयी सविस्तर माहिती आपण घेतली आहे. या लेखात आपण वन विभागाच्या अंतर्गत सरळसेवा पध्दतीने भरण्यात येणाऱ्या वनरक्षक या पदाविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत.
वनरक्षक (Forest Guard) भरती म्हणजे राज्य शासनाच्या वनविभागामार्फत केली जाणारी एक महत्त्वाची स्पर्धा परीक्षा आहे. यातून उमेदवारांना थेट वनरक्षक पदावर नियुक्त केले जाते. या पदासाठी लेखी परीक्षा व मैदानी चाचणी आशा दोन्ही स्वरूपात चाचणी घेऊन निवड केली जाते, याविषयी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे
पदाचे स्वरूप
पदाचे नाव : वनरक्षक (Forest Guard)
गट : गट-क (Class-C)
कामाचे स्वरूप : वनसंवर्धन, वनक्षेत्रातील गस्त, झाडे लावणे, प्राणीसंवर्धन, अवैध वृक्षतोड व शिकारी रोखणे इ. जबाबदाऱ्या. पर्यवरण संतुलन, संवर्धन यासाठी हे पद खूप महत्वपूर्ण कामगिरी करू शकते, सद्यस्थितीत वनांचे संवर्धन, वन लागवडीसाठी क्षेत्र वाढवणे, त्याचे जतन करणे काळाची गरज आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने किमान इ. १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक. काही वेळा विज्ञान शाखा/गणित/भूगोल/कृषी विषयास
वनरक्षक भरती संपूर्ण अभ्यासक्रम
व स्वरूप
प्राधान्य.
महाराष्ट्र राज्यातील स्थानिक भाषा (मराठी) ज्ञान आवश्यक
वयोमर्यादा
सामान्य प्रवर्ग : १८ वर्षे ते २७ वर्षे
इतर मागास प्रवर्ग/SC/ST/NT/VJNT/SBC : १८ वर्षे
ते ३२ वर्षे
दिव्यांग : १८ वर्षे ते ४५ वर्षे (काही प्रमाणात बदल शकतो)
(अचूक मर्यादा भरती जाहिरातीनुसार)
शारीरिक पात्रता
पुरुष
उंची : किमान १६३ से.मी.
छाती : ७९ से.मी. (फुगवून किमान ८४ से.मी.)
धावणे : ५ किमी
महिला
उंची : किमान १५० से.मी.
वजन : किमान ४५ किलो
धावणे : ३ किमी
निवड प्रक्रिया
१. लेखी परीक्षा (ऑनलाईन / ऑफलाईन स्वरूपात) सदर परीक्षा १२० गुणांची घेतली जाते. यामध्ये मराठी व्याकरण ३० गुण, इंग्रजी व्याकरण ३० गुण, अंकगणित व बुद्धिमत्ता ३० गुण, सामान्यज्ञान (जनरल नॉलेज) व चालू घडामोडी ३० गुण आशा स्वरूपात ही परीक्षा घेतली जाते, सदर परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी एकूण ४० गुण किमान मिळवणे आवश्यक असते. सध्या ही परीक्षा संगणकावर ऑनलाइन पद्धतीने घेण्यास सुरुवात झाली आहे, या परीक्षा अभ्यासक्रमाविषयी सविस्तर माहिती खालील प्रमाणे - मराठी भाषा - मराठी व्याकरण यामध्ये वर्णमाला, वर्णमाला उगमस्थान, शब्दांच्या जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, शब्दयोगी अव्यय, अभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, लिंग, वचन, काळ, विभक्ती, समास, संधी, प्रयोग, शब्दसिद्धी अशा विषयी प्रश्न विचारले जातात.
इंग्रजी भाषा- या विषयात वरील प्रमाणे घटक असून यावर प्रश्न विचारले जातात.
सामान्य ज्ञान (इतिहास, भूगोल, विज्ञान, अर्थशास्त्र, राज्यघटना, पंचायतराज, संगणक, पर्यावरण, चालू घडामोडी) या विषयावर प्रश्न विचारले जातात.
चालू घडामोडी या घटकामध्ये राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रश्न विचारले जातात, यामध्ये क्रीडा, शिक्षण, संस्कृती, शासकीय, निमशासकीय, बँकिंग, संशोधन, सामाजिक, चित्रपट, व्यापार, कृषी आशा घटकांवर प्रश्न विचारले जातात, या विषयाची तयारी सविस्तरपणे करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दररोज वृत्तपत्र वाचन करणे महत्वाचे आहे.
बुद्धिमत्ता चाचणी या घटकामध्ये अक्षरमाला,
अंकमाला, वेन आकृती, घडयाळ, नातेसंबंध, विसंगत घटक, आकृती ओळखणे, दिशा आशा घटकांवर प्रश्न विचारले जातात, उमेदवार किती लवकर बौद्धिक कौशल्ये वापरून प्रश्न सोडवू शकतो याचा विचार करून हे प्रश्न विचारले जातात. (Reasoning)
अंकगणित / गणित या विषयावर संख्या ओळख, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, लसावी, मसावी, शेकडेवारी, अपूर्णांक, सरासरी, नफा, तोटा, वेग, वेळ, अंतर आशा घटकांवर प्रश्न विचारले जातात.
लागणारी कागदपत्रे -
इयत्ता १० वी, १२ वी गुणपत्रक, प्रमाणपत्र
शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड
जात प्रमाणपत्र (असल्यास)
राहिवासी प्रमाणपत्र
आधारकार्ड
संगणक प्रमाणपत्र
अलीकडच्या काळातील पासपोर्ट फोटो
अर्ज प्रक्रिया
भरतीची जाहिरात महाराष्ट्र वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते.
सरळसेवा अंतर्गत घेण्यात येणाऱ्या या वनरक्षक पदासाठी विद्यार्थी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत असतात, ही भरती वेळोवेळी शासकीय स्तरावर घेतली जाते, या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी सतत मैदानी सराव व लेखी चाचणी सराव करत राहणे खूप गरजेचे आहे, पोलीस भरतीची तयारी करणारे बहुतांशी विद्यार्थी या वनरक्षक पदासाठी अर्ज करतात, फक्त इंग्रजी विषय सोडला तर सर्व पध्दत दोन्ही पदाची एकच असल्याने, विद्यार्थी यासाठी प्रयत्न करतात, लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस भरती जाहीर होत आहे तर लगेचच वनरक्षक भरती सुद्धा जाहीर होत आहे. दोन्ही पदांच्या निवड चाचणीत बऱ्यापैकी साम्य असल्याने विद्यार्थी मित्रानो अगदी मनापासून प्रयत्न सुरू ठेवा यश नक्कीच मिळेल, सर्व होतकरू, जिद्दी विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मनापासून शुभेच्छा !