मा. आनंद गानू अध्यक्ष, गर्ने मराठी ग्लोबल, अमेरिका
वर्तमान काळात, समस्यांवर नाविन्यपूर्ण आणि प्रभावी उपाय शोधण्यासाठी इनोव्हेशन (Innovation), आयडिएशन (Ideation) आणि डिझाईन थिंकिंग (Design Thinking) या संकल्पना अत्यंत महत्त्वाच्या ठरल्या आहेत. हे तीन घटक एकमेकांशी जोडलेले असून, ते केवळ उत्पादने किंवा सेवांमध्येच नाही, तर सामाजिक आणि शैक्षणिक समस्यांवरही मानवकेंद्रित उपाय
आपण स्टार्टअपशी निगडित अशा बारा वेगवेगळ्या व्हर्टिकल्सवरती विचार करणार आहोत आणि काळजीपूर्वक त्यातून काय शिकलात? काय उब्दोध घेतला यातून तुमच्या प्रतिक्रीया प्रत्येकांच्या मिळाव्यात ही अपेक्षा आहे. जो आपला लेख आहे तो आपण इनोव्हेशन, आयडिएशन आणि डिझाईन थिंकिंग यांचा काय उपयोग होतो आणि त्याचा स्टार्टअप सिस्टीममध्ये काय अर्थ आहे हे समजून घेण्यासाठी आपण करणार आहोत. तुम्हाला लक्षात असेलच की, पहिल्यापासून मी सांगत आलेलो आहे कुठलाही बिझनेस वा स्टार्टअप करणं किंवा एखादा प्रोजेक्ट फायनान्स घेऊन करणं म्हणजे स्टार्टअप म्हणता येणार नाही. स्टार्टअपची जी बेसिक आयडिया आहे ती म्हणजे प्रॉब्लेम सॉल्विंग, प्रॉब्लेम आर यू मेकिंग समथिंग अशा सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही विचार करू शकलात तर मी आता परत परत स्टार्टअप म्हणजे काय यांच्याकडे जाणार नाही.
स्टार्टअपमध्ये इनोवेशनचा अर्थ काय आहे हे बघू. इनोवेशनचा अर्थ असा आहे की, असं काहीतरी बनवणं किंवा बनवून ते डिलिव्हर करणे की जे नवीन आहे आणि हे एखाद्या उद्योगधंद्याला खरोखर उपयुक्त आहे किंवा आत्ताचे उद्योग आहेत त्यांना ते ग्रोथ सोल्युशनसाठी किंवा उत्पादन वाढीसाठी उपयोगाचं आहे. स्टार्टअप प्रक्रियेतील नावीन्यपूर्ण कल्पना, सेवा व्यवसाय, मॉडेल्सच्या बाबतीतील वास्तविक समस्या काय म्हणतात? काय चालतंय, काय नाही आणि त्याचा मार्केटवरती परिणाम काय आहे तसेच आत्तापर्यंत झालेल्या गोष्टीपेक्षा वेगळं काय आहे? हेही त्या इनोव्हेशनमध्ये आलं पाहिजे. त्याच्यामध्ये नॉर्मली व्यत्यय शब्द वापरला असाल तर व्यत्यय चा अर्थ काय की, आत्ता जे चाललंय, जे इंडस्ट्रीमध्ये ऑपरेट झाले ते वेगळ्या वेगळ्या पद्धतीने करणे किंवा जे आहे ते कमी रिसोर्स मध्ये करता येणं. कमी रिसोर्स मध्ये करताना स्वीकार करणे की, आहे ते सिस्टीम बरोबर असं करता येणं म्हणजेच इनोवेशन आहे.
इनोव्हेशन म्हणजे केवळ नवीन कल्पना (Ideas) तयार करणे नव्हे, तर त्या कल्पनांना व्यवहारात आणणे आणि त्यांच्याद्वारे मूल्य (Value) निर्माण करणे. इनोव्हेशन म्हणजे जुन्या पद्धती, उत्पादने किंवा सेवांमध्ये सुधारणा करणे किंवा पूर्णपणे नवीन काहीतरी तयार करणे, ज्यामुळे ग्राहकांना किंवा वापरकर्त्यांना फायदा होतो.
इनोव्हेशनचे प्रकारः
१. उत्पादन इनोव्हेशन (Product Innovation): नवीन किंवा सुधारित वस्तू किंवा सेवा बाजारात आणणे.
२. प्रक्रिया इनोव्हेशन (Process Innovation): उत्पादन किंवा सेवा पुरवण्याच्या पद्धतीत सुधारणा करून कार्यक्षमता वाढवणे.
३. व्यवसाय मॉडेल इनोव्हेशन (Business Model Innovation): संस्था ज्या पद्धतीने मूल्य निर्माण करते, वितरीत करते आणि मिळवते त्या पद्धतीत बदल करणे.
इनोव्हेशनचे महत्त्वः
बाजारात टिकून राहण्यासाठी आणि स्पर्धात्मक फायदा मिळवण्यासाठी.
वापरकर्त्यांच्या गरजा प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी.
संस्थेची वाढ आणि नफा वाढवण्यासाठी.
दुसरा जो भाग आज आपण चर्चा करतोय तो म्हणजे आयडीएशन. एक व्यवसाय मॉडेल बनण्यासाठी सामान्यतेची कल्पना करण्याची प्रक्रिया आणि कल्पना विकसित करणे. जर नीट खोलवर विचार करायचा म्हटला तर आयडीएशनच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत आणि त्यावरती सोल्युशन काय करता येईल याच्याविषयी ते विचार करतात. यावर गुंतवणूक करण्याच्या अगोदर ते एखादा मॉडेल बनवतात. जे सांगतोय ते सिद्ध करता येतील याचाच अर्थ आयडीएशन आहे.
तिसरा जो भाग आहे तो म्हणजे डिजाईन थिंकिंग. विचार कर की, एखादी सर्विस क्रिएट करण्यासाठी किंवा बिझनेस मॉडेल बनवण्यासाठी डिजाईन थिंकिंगचा उपयोग होऊ शकेल किंवा तुमचे जे ग्राहक आहेत, त्यांच्यासाठी, त्यांच्या गरजेसाठी आपल्याला डिजाईन थिंकिंगचा वापर करता येईल. त्याचप्रमाणे आपण झालेल्या गोष्टींचं टेस्टिंगही करू शकतो म्हणजे आता हे सगळं करताना यु आर गोइंग द बिजनेस.
तुम्हाला याच्यावरती निरनिराळे फ्रेमवर्क तयार करावे लागतात. आयडिएशन हा डिझाईन थिंकिंग प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जिथे परिभाषित केलेल्या समस्येवर (Defined Problem) संभाव्य उपायांची जास्तीत जास्त संख्या निर्माण केली जाते. हा टप्पा सर्जनशीलतेला (Creativity) प्रोत्साहन देतो आणि 'चौकटीबाहेर' विचार करण्यासाठी (Thinking out of the Box) लोकांना उद्युक्त करतो.
आयडिएशनचे स्वरूपः
यात विचारमंथन (Brainstorming), स्केचिंग (Sketching), माईंड मॅपिंग (Mind Mapping), आणि स्कॅम्पर (SCAMPER) यांसारख्या तंत्रांचा वापर केला जातो.
या टप्प्यात गुणांपेक्षा संख्या (Quantity over Quality) महत्त्वाची असते. सुरुवातीला कोणतीही कल्पना वाईट किंवा अव्यवहार्य मानली जात नाही.
उद्देश हा आहे की, समस्येचे निराकरण करण्यासाठी असंख्य आणि विविध पर्याय उपलब्ध व्हावेत, ज्यातून नंतर सर्वोत्तम उपाय निवडता येईल.
आता डिझाईनसाठी मी सांगतो की, तुम्हाला एक ह्यूमन सेंटर घ्यावा लागेल. त्याचप्रमाणे तुम्हाला त्याच्या वेगवेगळ्या स्टेजेस आहेत त्या वेगळ्या स्टेजेस मध्ये डिफाइन करायचं आहे, आयडिया करून त्याचा प्रोटोटाइप बनवायचा, टेस्ट करायचं आणि ते सगळं करून ज्यांना तुम्ही मदत करता त्यांचं स्टार्टअप त्यांच्यातल्या ज्या अनिश्चितता आहेत त्या कमी करणे किंवा नाहीशा करणे आणि वापरकर्त्यांची गरज काय आहे याच्यावरती फोकस करून त्यांना सोल्युशन देण म्हणजे डिझाईन थिंकिंग. डिझाईन थिंकिंग ही एक मानवकेंद्रित (Human-Centric) आणि पुनरावृत्तीवर आधारित (Iterative) समस्या सोडवण्याची पद्धत आहे. यात वापरकर्त्यांच्या (Users) गरजा आणि त्यांच्या समस्या सखोलपणे समजून घेऊन, सर्जनशील उपाय तयार करण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. हे आर्किटेक्ट आणि डिझाईनर्स वापरत असलेल्या विचारप्रक्रियेवर आधारित आहे.
डिझाईन थिंकिंगचे पाच टप्पे (Five Stages of Design Thinking):
१. सहानुभूती (Epmathize):
वापरकर्त्यांच्या गरजा, भावना आणि अनुभव समजून घेणे. त्यांच्या जागी स्वतःला ठेवून विचार करणे.
कुठल्याही स्टार्टअप सिस्टीममध्ये कुठली गोष्ट नवीन करायची ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तुमच्याकडे कदाचित सगळे स्किल्स् नसतील व जर तुम्ही टीम तयार केली असेल तर तुमच्या टीममध्ये त्या प्रॉब्लेम्सच्या उपायाबाबत तुम्ही एकमेकांमध्ये चर्चा करू शकता आणि कदाचित उपाय अशक्य असेल, काहीतरी कमी वाटत असेल तर अशा सुद्धा गोष्टींचे सोल्युशन तुम्ही करू शकाल. म्हणजे सायन्स पेक्षाही सोपे वाटेल असे सोल्युशन तुम्ही क्रिएट करू शकाल. आता शोध लावून क्रिएट केलेले सोल्युशन प्रत्यक्षात आणता येईल की नाही. म्हणजे आपण डोळे उघडे ठेवून सतत विचार डोक्यामध्ये ठेवून जर प्रॉब्लेम शोधत राहिलो त्याच्यावरती आपल्याला आपला मेंदू जागरूक ठेऊन शोधत राहिलो आणि त्याच्यातनं आपण प्रॉडक्ट कसे बनवायचे आणि ह्या सगळ्या मूलभूत गोष्टींवर जो तुम्ही स्टार्टअप करता तो नेहमीच यशस्वी होईल.