Author
स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात ऊर्जा टिकवण्याचे महत्त्व
मा. डॉ. अमित भोळे
संचालक, महसूल विभाग, वित्त मंत्रालय भारत सरकार, पायाभूत सुविधा / प्रकल्प वित्त. SYDENHAM खाते नियंत्रक जनरल

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या समस्त विद्यार्थी मित्र-मैत्रिणींना माझा नमस्कार.
या लेखन प्रपंचात आपण आतापर्यंत 'UPSC परीक्षेमध्ये निबंध लेखनाचे महत्त्व' केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला जाताना घ्यावयाची दक्षता', 'वैकल्पिक विषयाची निवडः एक विश्लेषण' आणि 'वेळेच नियोजन' या विविधांगी विषयावर चर्चा केलेली आहे.
या अशा नानाविध विषयांवर चर्चा करताना एक महत्त्वाचा विषय आज आपण हाताळणार आहोत तो म्हणजे कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असताना एक वेळ अशी येते की जेव्हा उमेदवाराची ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह हे न्यूनतम पातळीवर येत असतात. 

खरं तर, स्पर्धा परीक्षा म्हणजे दीर्घकालीन धैर्य,
सातत्य आणि मानसिक शिस्त याची खरी कसोटी असते. यशस्वी विद्यार्थी हे केवळ बुद्धिमत्तेच्या जोरावर नव्हे तर नियोजन, मनः शांती आणि ऊर्जा व्यवस्थापनेच्या कौशल्यवरही पुढे जात असतात. हा एक भाग असला तरीही काही कारणाने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची ऊर्जा, प्रेरणा आणि उत्साह न्यूनतम पातळीवर जात असताना आपण बघत असतो तेव्हा अशा प्रसंगी विद्यार्थ्यांनो आपण खचून न जाता किंवा वेळ न दवडता आपण काय करायला पाहिजे? किंवा अशी वेळ येऊ नये म्हणून आपण काय करायला हवे? याविषयी आज थोडक्यात चर्चा करणार आहोत. तर, सर्वप्रथम आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सर्वच उमेदवार हे एक मनुष्य प्राणी असतात. प्रत्येक मनुष्य प्राण्याला प्रत्येक गोष्ट सातत्याने करीत असताना कंटाळा हा येणारच तेव्हा, अशा प्रसंगांच्या वेळी आपली ऊर्जा किंवा आपल्यातील जी क्षमता असते आणि जी मोटिवेशनची लेवल असते ती कमी होऊन जाते आणि यासाठी काही विशेष कारण नेहमीच घडणं हे आवश्यक नसते बरेचदा कारणे असतात देखील पण बऱ्याचदा विनाकारण
देखील असं होतं, हे बघण्यात आलेल आहे, तेव्हा आपण जे निर्णय घेतो किंवा आपण जो अभ्यास करतो तो आपल्या फार कामी येत नाही, कामी न येण ही एक गोष्ट आहे आणि तो Counter Productive होणं म्हणजे तो नुकसानदायी होणही एक दुसरी फार भयावह गोष्ट आहे. हे टाळता येण्याजोग आहे आणि त्यातही सगळ्यात पहिल्यांदा तर आपण हे मान्य केलं पाहिजे की, ही एक नैसर्गिक अवस्था आहे की, जेव्हा आपण एखादी गोष्ट वारंवार करतो तेव्हा ती गोष्ट सतत केल्याने आपल्यात एकसुरीपणा येतो तेव्हा आपल्याला अभ्यासाचा कंटाळा येऊच शकतो आणि मग आपली ऊर्जा ही कमी-कमी होत असते, तेव्हा आपण यातून बाहेर कसं निघायचं आहे याच्यावर आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
बरेचदा असं बघण्यात आल आहे, उमेदवाराची एक मानसिक स्थिती असते की, आपली ऊर्जा कमी झाली आहे, आपली प्रेरणा कमी झाली आहे असं ते मान्य करायलाच तयार नसतात तर, अभ्यासाच्या वेळी किंवा परीक्षेचा सराव करताना अशी स्थिती का येते? हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा अशा स्थितीच्या वेळी आपण हे टाळण्यासाठी किंवा ही स्थिती येऊ न देण्यासाठी काय केलं पाहिजे आणि तिसरा मुद्दा आता ही स्थिती आपल्याबरोबर होऊन गेलेली आहे तर, आता आपण ते Counter productive होऊ नये किंवा त्यातून आपण कसे उभे राहावे किंवा तो गेलेला वेळ आपण कसा भरून काढावा ह्या याविषयी आपण चर्चा करणार आहोत. अशी स्थिती का येत ? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जेव्हा कोणत्याही परीक्षेचा किंवा स्पर्धा परीक्षेचा विशेषतः आपण केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला भरमसाठ अनेकप्रकारच्या विषयांना हाताळावे लागते. त्यांचा अभ्यास सतत सखोलपणे करावा लागतो आणि सर्वच विषय काही आपल्या आवडीचे नसतात. जसे की बरेचसे विषय आपल्या निगेटिव्ह झोनमधले असतात. बरेचदा विद्यार्थी म्हणतात की हा विषय माझ्या आवडीचा नाही, हे मी वाचणारच नाही, हे मला कळतचं नाही. असं आपण आपल्याला न आवडणाऱ्या विषयांच्या बाबतीत बोलत असतो. त्यातही काही उमेदवार म्हणतात की, मी एक पर्टिक्युलर विषय घेऊनच परीक्षेची तयारी करणार आहे मग ते सायन्स असू देत किंवा प्रीलियमसाठी इतिहास हा विषय असू देत व पॉलिटिकल सायन्स हा विषय असू देत, हा मी बघणारच नाही किंवा या विषयाचा अभ्यास मी फार कमीच करेन. कारण माझी कम्फर्ट लेव्हल या विषयाबाबत नाही आहे तर अशा स्थितीमध्ये आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जर आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर ती एक निगेटिव्हिटी आपल्यामध्ये तयार होते. हे टाळण्यासाठी आपण सर्वप्रथम तर, आपण खूप ऑब्जेक्टिव्ह राहिलं पाहिजे. अभ्यास करताना हे लक्षात घेऊया.
आता ऑब्जेक्टिव्ह कस राहायचं तर मी यापूर्वीच्या लेखांच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं आहे की, जेव्हा आपण प्रश्नपत्रिकांचं अॅनालिसिस करतो, सिलॅबसच अॅनालिसिस करतो तेव्हा प्रत्येकाला हे कळतं की आपल्याला साधारणतः एका विषयाला किती गुण किंवा किती वेटेज दिलेल आहे. मग तुम्ही प्रीलियमचा अभ्यास करत असू देत किंवा मेन्सचा अभ्यास करत असू देत आपल्याला एक साधारणतः ऑब्जेक्टिव्ह फिगर किंवा एक संख्या मिळते किंवा किती परसेंटेज आहे हे कळत, त्यामुळे आपल्याला पॉलिटिकल सायन्स मध्ये २२ % प्रश्न्न येतात किंवा २३% मार्क पॉलिटिकल सायन्स या विषयाला डेडिकेटेड आहेत. GS मधले किंवा तत्सम अशा गोष्टींचे एक अॅनालिसिस केलं पाहिजे आणि तेवढा आपल्याला कमीत कमी वेळ आपल्या अभ्यासाचा हा त्या विषयासाठी दिलाच गेला पाहिजे मग तो विषय तुम्हाला आवडत असो किंवा नसो. एक ऑब्जेक्टिव्हिटी आपल्या अभ्यासामध्ये येईल, तेव्हाच
एखाद्या विषयाबद्दल असणारी ही निगेटिव्हिटी येणारचं नाही. आता माझंच उदाहरण या संदर्भात सांगायचं झालं तर, मी एक इंजीनियरिंगचा विद्यार्थी असून देखील मी सायन्सचा फार कमी अभ्यास करायचो कारण हीच एक निगेटिव्हिटी माझ्यामध्ये होती की आपण सायन्सला जास्त वेळ दिला तर आपले बाकीचे विषय आपल्याकडून अभ्यासले जाणार नाहीत. बाकीचे सगळे विषय नवीन आहेत, आपल्याला त्यामुळे सायन्सला जास्त वेळ नाही दिला तरी चालणार आहे. याबाबतीत माझे थोडे विचार चुकीचे होते, काही गैरसमज होते परंतु मेन्सच्या परीक्षेमध्ये सायन्स टेक्नॉलॉजी हा विषय असतो. आता त्याला किती गुणांचे वेटेज आहे ते बघितलं तर आपल्या लक्षात येईल की, किती वेळ आपण आपल्या अभ्यासाचे तास त्याला डेडिकेट केले पाहिजे. असं केलं तर ही निगेटिव्हिटी आपल्यापर्यंत पोहोचणार नाही, तिला आपण दूर ठेवू शकतो.
आता ही स्थिती येऊ नये याच्यासाठी आपण अजूनही बरेच प्रयत्न करू शकतो. साधारणतः सोप्या सोप्या गोष्टी असतात.
उदाः अभ्यास करताना आपण छोटे-छोटे ब्रेक घेतले पाहिजे किंवा अभ्यासाचं शेड्युल आपण असं बनवल पाहिजे की त्याच्यामध्ये एकसंधता नसेल तर, विविधता असली पाहिजे, म्हणजे अगदीच काटेकोर पद्धतीने सांगायचं झालं तर, समजा आपण इतिहासाच्या अभ्यासाला एक आठवडा दिला तर याचा अर्थ असा आहे का पूर्ण सात दिवस आपण सकाळ ते संध्याकाळ पर्यंत इतिहास हा विषय अभ्यासणार आहोत, तर असं जर करणार असाल किंवा असं ठरवलं असेल तर यामध्ये कंटाळा येण्याचे चान्सेस हे जास्ती असतात. याच्यापेक्षा जर आपण साधारणतः दोन आठवड्यांमध्ये इतिहास आणि पॉलिटिकल सायन्स करणार आहोत तर ते अल्टरनेटिव्ह आपण तो करू शकतो. दररोज दिवसाचा अर्धा भाग इतिहास विषय आणि अर्धा भाग हा पॉलिटिकल सायन्स विषय असा अभ्यासला तर मला वाटतं की, हा कंटाळा आपल्याला अभ्यास करताना येणार नाही किंवा ते टाळले जाऊ शकेल.
दुसरा म्हणजे वेळेच्या नियोजनाबद्दल, आपण या आधीच्या लेखांमध्ये या संदर्भात बोललेलो आहोतचं, त्यामध्ये आपण आपला जो वेळ आहे तो अभ्यासाच्या सोबत आपण सेल्फ मॅनेजमेंटला सुद्धा दिला पाहिजे मग त्यामध्ये योगा, प्राणायाम आणि दररोजचा व्यायाम असू देत रनिंग किंवा ठराविक वेळ आपल्या छंदासाठी दिलेला असाबा, तर हा सुद्धा भाग आहे. हे सगळ आपण आगदी काटेकोरपणे पाळल पाहिजे. ह्याने काय होतं की, अभ्यासात येणारा जो एकसुरीपणा आहे तो आपण निश्चितच टाळू शकतो आणि एकाग्रतेने आपण आपला अभ्यास करू शकतो. आता अभ्यासाच्या या क्षणाला आपल्या लक्षात आलं की, हा वेळ माझ्या अभ्यासाचा होता परंतु काही अपरिहार्य कारणाने आपण अभ्यास करू शकलो नसेल किंवा आणखी काही कारणाने माझे दोन आठवडे वाया गेले किंवा एक आठवडा बाया गेला तर आता मी काय करावं तर, हरकत नाही जे गेले ते विसरून जाऊन आता आपण नव्या जोमाने परत आपल्या वेळेचे नियोजन आखायला पाहिजे, एक ताळेबंदपणा बांधायला पाहिजे. जेणेकरून मर्यादित वेळेमध्ये जो अभ्यास आपल्याला संपवायचा आहे, त्याचे वेटेज प्रत्येक दिवसाला, प्रत्येक आठवड्याला दिले गेले पाहिजे. ज्याचं एक निश्चित शेड्युल नियोजित केलं पाहिजे आणि मागची जी वेळ आपली वाया गेलेली आहे त्याचा विचार करता, येणाऱ्या दिवसांमध्ये आपण आपल्या अभ्यासाचं कसं नियोजन करू शकू यावर जास्त एकाग्रतेने विचार केला पाहिजे.
स्पर्धा परीक्षेच्या तयारीत ऊर्जा टिकवण्यासाठी विद्यार्थ्यांनी मानसिक स्पष्टता, शारीरिक शिस्त आणि प्रेरणादायी वातावरण यांचा समतोल साधणे अत्यावश्यक आहे.
विद्यार्थ्यांना ऊर्जा टिकवण्यासाठी खालील काही उपाय उपयुक्त ठरू शकतात,
मानसिक ऊर्जा टिकवण्यासाठी उपाय :
स्पष्ट उद्दिष्ट ठेवाः कोणती परीक्षा द्यायची आहे, तिचा अभ्यासक्रम आणि स्वरूप समजून घ्या. यामुळे गोंधळ कमी होतो आणि लक्ष
अभ्यासाकडे केंद्रित होतं.
आधी ध्येय छोट्या स्वरूपाचे ठेवाः मोठ्या अभ्यासक्रमाऐवजी दररोज छोटे टार्गेट पूर्ण करा यामुळे यशाची भावना निर्माण होते
आणि आत्मविश्वास हळूहळू वाढायला लागतो.
प्रेरणादायी साहित्य वाचणे यशस्वी विद्यार्थ्यांचे अनुभव प्रेरणादायी लेख किंवा व्हिडिओ बघणे ऊर्जा वाढवते.
स्वतःशी संवाद साधाः "मी हे करू शकतो" असा सकारात्मक वाक्यांचा पुनरुच्चार कायमस्वरूपी करत रहा.
शारीरिक ऊर्जा टिकवण्यासाठी उपाय
नियमित व्यायाम: योग, प्राणायाम किंवा चालणे यामुळे शरीरातील थकवा कमी होतो आणि मेंदू ताजातवाना राहतो.
योग्य आहार घेणे पौष्टिक आणि हलका
त्याचप्रमाणे सात्विक आहार घेणे, जास्त साखर किंवा जंक फूड खाणे टाळावे.
झोपेची शिस्त : दररोज सात ते आठ तासाची शांत झोप आवश्यक आहे. झोपेचा अभाव एकाग्रता कमी करतो.
अभ्यासातील ऊर्जा टिकवण्यासाठी उपाय :
वेळेचे व्यवस्थापनः दिवसाचे वेळापत्रक तयार
करा. कठीण विषयांसाठी जास्त वेळ राखून ठेवा आणि विश्रांतीचाही त्यात
समावेश ठेवावा.
नोट्स तयार कराः महत्त्वाच्या मुद्द्यांची संक्षिप्त नोट्स तयार करा सरावासाठी फार उपयुक्त ठरतात.
अभ्यासात विविधता ठेवाः एकाच पद्धतीने अभ्यास न करता व्हिज्युअल्स, ऑडिओ, ग्रुप डिस्कशन यांचा आपला अभ्यासात
समावेश करा.
तर विद्यार्थी मित्रांनो याबद्दल जर आपल्याला काही शंका असतील तर, आपण माझ्या इमेलवर मला संपर्क करू शकता. तिथे मी
आपल्या शंकांचे निश्चितच निरसन करेल.
आपल्या वेळेच योग्य नियोजन करीत, आपल्यातील ऊर्जेचा समतोल राखत यशाचा संकल्प करा.. आणि आपली ऊर्जा
टिकवण्याची कला ही आत्मसात करा. तेव्हा, माझं प्रत्येक विद्यार्थ्याला हेच सांगणं असेल की,
'थकवा आला तरी थांबू नकोस,
स्वप्नांची वाट चालत राहा..
एकाग्रतेच्या दीपात आत्मविश्वासाच तेल टाकत रहा..
परीक्षा ही क्षणिक आहे, ध्येय मात्र अमर असतं, ऊर्जेच्या झन्यातून यशाचं झाड फुलवत रहा..!'