Author
'Be Job Givers - Not Job Seekers'
मा. मिलिंद प्रल्हाद कांबळे
संस्थापक अध्यक्ष DICCI. सुप्रसिद्ध उद्योजक धोरण समर्थक

मा. मिलिंद कांबळे यांनी दलित (अनुसूचित जाती) आणि (अनुसूचित जमाती) समुदायांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे या उद्देशाने दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) ची स्थापना केली. ते दलितांना नोकरी शोधणाऱ्यांऐवजी नोकरी देणारे उद्योजक बनण्यास प्रोत्साहित करतात. DICCI ने स्टैंड अप इंडिया सारख्या योजना प्रस्तावित केल्या आहेत आणि त्यांना पाठिंबा दिला आहे. व्यापार आणि उद्योगातील योगदानाबद्दल मा. मिलिंद कांबळे यांना २०१३ मध्ये "पद्मश्री" हा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. करिअर कट्टाच्या व्यासपीठावरून मा. मिलिंद प्रल्हाद कांबळे यांची महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे यांनी घेतलेली ही मुलाखत शब्दांकन केलेली आहे.
मा. यशवंत शितोळे: सर्वप्रथम नमस्कार, उद्योजकीय क्षेत्रातील महत्त्वाचं नाव ज्यांनी औद्योगिक क्रांती घडवून आणली असे मा. पद्मश्री श्री. मिलिंद कांबळे सर, आपण व्यावसायिक व्हावं? असा विचार कधी जन्माला आला? तेथेपासून डिक्कीच्या (DICCI) निर्मितीचा जो प्रवास आहे हा महाराष्ट्रातील तरुणांना माहिती व्हावा यासाठी थोडं विस्तृतपणे सांगावं.
मा. मिलिंद कांबळे : सगळ्यांना नमस्कार, मी १९९७ साली नांदेडमधून सिव्हिल इंजिनियर झालो आणि माझ्या वडिलांनी
मराठवाड्यातील उद‌गीर तालुक्यामध्ये २५ वर्षे शिक्षक म्हणून नोकरी केलेली होती. त्यामुळे आमचं आता जे घर आहे ते उदगीर मध्येच आहे. माझे शिक्षण नांदेडमध्ये पूर्ण झाले आणि त्या काळात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आरक्षणामुळे मी पीडब्ल्यूडी किंवा इरिगेशनमध्ये नोकरीसाठी सहज जरी अर्ज केला असता तरी ज्युनिअर इंजिनियर म्हणून मी नक्कीच नोकरीला लागलो असतो. माझ्यासोबत शिकलेले जे मित्र आहेत, ते चीफ इंजिनियर नोकरीला आहेत. मराठवाड्यामध्ये 'दलित पँथर' ही त्या काळात मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे आणि माझे चुलते स्वतः पँथरचे अध्यक्ष असल्यामुळे मला हा वारसा मिळालेला होता. या दरम्यान मी चळवळीमध्ये होतो. तुम्हाला माहिती असेल, मराठवाड्यामध्ये नामांतराची चळवळ फार मोठ्या प्रमाणात होती. माझे चुलते आणि वडील शिक्षक असल्यामुळे, शासकीय सेवेत असल्यामुळे ते चळवळीत फार सक्रियपणे कार्य करू शकत नव्हते, बऱ्याचदा आंदोलन व्हायची तेव्हा ते भाग घ्यायचे नाहीत. तेव्हा मीही वयाने लहानच होतो आणि माझ्या त्या लहान वयाने जिज्ञासेपोटी प्रश्न निर्माण व्हायचा की, हे सगळे आंदोलनामध्ये का येत नाहीत? आणि यात सगळ्यांना अटक का होते? ते नंतर कळालं की, शासकीय नोकरीमध्ये तुम्ही असलात तर तुम्हाला हे सगळं करता येत नाही. मग हे सगळं झालं तर आपल्याला नोकरीसाठीचा धोका निर्माण होतो. त्यामुळे ही सगळी मंडळी आंदोलनापासून लांब राहायचे पण ते मला सपोर्ट करायचे. मग याच विचारांच्या आधारे मी असं ठरवलं की, आपण जर नोकरी करत असू तर आपल्याला हे सगळं करता येणार नाही आणि आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण असंच करूया शासकीय नोकरीत आपल्याला जायचं नाही.
मग १९८७ नंतर दोन-तीन वर्ष छोटी-मोठी काम केली आणि साधारणतः १९९० पासून मी करिअरला सुरुवात केली. इंजीनियरिंग शिकत असताना जे काही आपण शिकतो ते थेअरी असतं आणि जगामध्ये जेव्हा प्रॅक्टिकल स्तरावर आपण उतरतो, तेव्हा हे जग फार वेगळं असतं. व्यावहारिक ज्ञान आलं पाहिजे म्हणून मग तीन-एक वर्ष पुण्यामध्ये नोकरी केली. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये दोन वर्ष काम केलं. मंत्री कन्स्ट्रक्शन, म्हाळगी बिल्डर्समध्येही काम केलं. यांच्याकडे नोकरी केल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की, मार्केट कसं ऑपरेट होतं? एक बिल्डिंग बांधायची असेल, तर त्याला काय लागतं? त्याच मटेरियल काय असतं? त्याचा कंपोनंट किती असतो? लेबर किती असतात? आणि हे सगळं कुठे मिळतं? ही जी मार्केटची तोंडओळख असते ती फार आवश्यक असते. ती झाल्यानंतर मग मी असं ठरवलं की, आता आपल्याला आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आणि 'मिलिंद कांबळे, सिव्हिल इंजिनियर आणि कॉन्ट्रॅक्टर' माझं रजिस्ट्रेशन केलं. तेव्हा पीडब्ल्यूडीकडे सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर्सना पीडब्ल्यूडी लायसन मिळत होतं. त्याकाळी मंत्री नितीन गडकरी यांनी ती मर्यादा एकदम वाढवली, याच कालावधीमध्ये मी प्रायव्हेट काम सुरू केलं. मराठवाड्यामध्ये कुठल्याही शिक्षकाच्या घरातील वातावरण म्हणजे एकदम कडक असतं, शिस्तीच असतं. माझ्या वडिलांची अशी इच्छा होती की, मी सरकारी नोकरीत जावं. सरकारी नोकरी, लग्न, मुलं असं सगळे साधारण प्रत्येक पालकांच आपल्या पाल्यांविषयीचे मत असतं. पण मी त्या वेळेला ऐकलं नाही आणि वडीलांना म्हणालो, तुम्ही मला शिकवण्याचं तुमचं काम केलेलं आहे. आता मी पुढे माझा निर्णय घेतो. मला पुढे काय करता येईल? हे एवढे तुम्ही मला स्वातंत्र्य द्या. हे ऐकून वडील थोडे रागावले. त्यामुळे मला त्यांचं सहकार्य मिळेल, हा काही प्रश्नच नव्हता आणि मग मी माझा व्यवसाय सुरू केला.
महाराष्ट्रात पीडब्ल्यूडीमध्ये, इरिगेशनमध्ये, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विशेषतः रेल्वेमध्ये कन्स्ट्रक्शन अशा वेगवेगळ्या प्रकारची सगळी कामे सुरू केली. हे करत असतानाच मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांचं रिसर्च सुरू केल. त्यांचे प्रत्येक पुस्तक थोडं वाचलं मग माझ्या लक्षात आलं की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर खरं तर, ही वॉज अ ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया आणि त्यावर माझी पहिली वेबसाईट मी ६ डिसेंबर २०११ रोजी सुरू केली. तेव्हाचे पंतप्रधान अटल बिहारी बाजपेयी दिल्लीमध्ये असताना त्यांच्या कार्यालयामध्ये त्या वेबसाईटचे रीतसर उद्घाटन झालं, त्याची खूप चर्चा झाली. त्यानंतर मी अनेक ठिकाणी विद्यापीठ स्तरावर, वेगवेगळ्या व्यासपीठावर 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आर्थिक विचार' यावर बोलायला लागलो आणि भाषण द्यायला लागलो. पण हे सगळं करत असताना माझ्या लक्षात आलं की, अरे केवळ भाषण देऊन काहीही होणार नाही, आपल्याला काहीतरी कृती करावी लागेल आणि म्हणून २००५ साली मी एक उद्योजक असल्यामुळे धोरण ठरविण्याच्या बाबतीमध्ये सरकारसोबत चर्चा करेल असा उद्योजकांसाठीचा एखादा प्लॅटफॉर्म बनवूया या विचाराला एक तात्विक बैठक दिली. यातूनच पुण्यातून १४ एप्रिलला दलित इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) चा हा प्रवास सुरू झाला आणि आज २०२५ मध्ये या प्लॅटफॉर्मला वीस वर्षे पूर्ण झाली. या वीस वर्षाच्या प्रवासामध्ये ही संस्था फार मोठी झाली. संस्थेच्या कारकिर्दीत वीस वर्ष म्हणजे फार मोठी नसतात पण माझ्या लक्षात आलं की, ही संस्था इतकी मोठी कशी झाली? व्यवसाय करत असताना लक्षात येईल की, डिमांड आणि सप्लाय हा रेशो महत्वाचा असतो. आत्ता इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये संस्था-संघटना आहेत की डिमांड नसला तरी सप्लाय मात्र आहे, 'इट वॉज अ कम्प्लीट व्हॅक्युम', मग डिक्कीमध्ये सगळ्यात वेगळं काय आहे तर इकॉनॉमिक लीडरशिप उभी राहिली आहे आणि त्यामुळे इतक्या झपाट्याने त्याचा विस्तार झाला आणि ही पोकळी भरून काढता आली. आपल्या देशातला अनुसूचित जाती-जमातीचा युथ आमच्याशी जोडला आहे, ज्यांच्यासाठी आम्ही काम करतोय, कारण त्यांचे जे अॅस्पिरेशन आहेत ते ऍड्रेस करणे फार महत्त्वाचं आहे, आता ट्रेड, कॉमर्स, इंडस्ट्री यामध्येही काम आहे आणि म्हणून हा प्लॅटफॉर्म त्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
डिक्की हा उद्योजकांचा प्लॅटफॉर्म आहे. मी उद्योजक होतो आणि आहेही या माध्यमातून मी भरपूर कामं केली आहेत. २००५ ते २००६ साली चांदणी चौक ते लवासा अतिशय सुंदर रोड आम्ही बनवला. भुगावच्या इथे एक टोल होता, काही गावकऱ्यांनी त्यावर आक्षेपही घेतला आणि मग आम्ही सरकारकडे गेलो. लोक आम्हाला पैसे देत नाहीत, हे आता तुम्ही बघा. त्यातही या परिस्थितीमध्ये सरकारने आम्हाला मोकळ केलं. गारमेंटच्या क्षेत्रामध्येसुद्धा मी बरंच काम केलं आणि पुन्हा मग माझे कन्स्ट्रक्शनचे जे काम होतं ते केलं. आपल्या मधली बलस्थान काय आहेत? हे तुम्हाला ओळखता आलीच पाहिजे. मला काय करता येतं आणि मी काय करू शकतो याचा विचार करायचा. पुन्हा २०१६ साली मी कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायामध्ये बिल्डर आणि डेव्हलपर्स म्हणून काम सुरू केलं. मुंबईलगत पनवेल-गोवा हायवे वरती योगक्षेम् रेसिडेन्सी या नावाची साईट तयार केली, हाऊसिंग कॉम्प्लेक्स तयार केले. तिथे १६०० वरून १८०० फ्लॅट्स तयार होतील. दुसरा म्हणजे पुणे मुंबई हायवेलगत ३७एकरमध्ये ५००० फ्लॅट्स, मॉल, हॉटेल, स्कूल्स, हॉस्पिटल्स अशी Maximus City, Panwel या नावाने आमचा दुसरा प्रोजेक्ट सुरू आहे म्हणजे जवळजवळ सहा मिलियन स्क्वेअर फुट रेसिडेंशिअल स्पेस आणि एक मिलियन स्क्वेअर फुटमध्ये कमर्शियल स्पेस काम सुरू केलं. जवळ-जवळ पाच मिलियन डॉलरचे काम म्हणता येईल. १२ ते १३ कोटीचे हे प्रोजेक्ट सुरू आहेत. त्यामुळे मी इन्फ्रामध्ये कन्स्ट्रक्शन सगळे बघत असतो. मी मूळ व्यावसायिक उद्योजकच आहे.

मा. यशवंत शितोळेः ज्या वयात तुम्ही घडला त्यावेळेला नेमकी नामांतराची चळवळ असणे, पँथर घरात असणे हे
व्यवस्थेच्या विरोधात बंड करून उभे राहते तेव्हा संघर्ष करणारी पिढी तुम्ही बघितली. त्या वेळेला काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करण्यासाठी तुम्ही या तरुणांना एकत्र करण्याबाबत काही विचार केला का? तसेच तुम्ही उल्लेख केल्याप्रमाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्थशास्त्रीय विचार तुम्ही वाचले तेव्हा तुमच्या लक्षात आलं की इथे स्पेस आहे. पण या वाचनाबरोबरच अजून कोणत्या गोष्टींची प्रेरणा तुम्हाला त्यावेळेला होती म्हणून तुम्हाला असं वाटलं की रस्त्यावरच्या संघषपिक्षा मुलांनी उभे राहणे आणि इतरांना उभे करणे गरजेचे आहे?
मा. मिलिंद कांबळेः जसं मी या आधी म्हणालो की, सरकारी नोकरीमधले लोक प्रत्यक्ष आंदोलनामध्ये, लढाईमध्ये समोर नसायची आणि जी मुलं होती त्यांना पुढे शासकीय नोकऱ्या मिळू शकल्या नाहीत. तेव्हा माझ्या लक्षात आलं की, आपणाला आपला स्वतःचा मार्ग निवडायला पाहिजे आणि तो स्वतःचा मार्ग हा उद्योजकतेचा मार्ग असू शकतो. हा संघर्ष आहे हे जरी सत्य असलं, तरी तुम्ही व्यवस्थेच्या विरोधात किती काळ रस्त्यावरची लढाई लढणार आहे? हा एक भाग असला तरी राजकीय संघर्ष आहे, सामाजिक संघटना आहेत हे सगळं आपापलं काम करतायत आणि मग त्यावेळेला मला वाटलं की, आपण याही पुढे जाऊन थोडंसे कन्स्ट्रक्टिव्ह काम केलं पाहिजे जेणेकरून अनुसूचित जाती-जमातीतील तरुणांना एक व्यासपीठ मिळेल. हा समाज विकासाच्या मुख्य प्रवाहात आला पाहिजे, म्हणजे केवळ व्यवस्थेशी फटकून वागणे बरोबर नाही, कुठलाही पूर्वग्रहदूषितपणा न ठेवता या प्रवाहात प्रत्यक्ष उतरून काम करण्याची त्यावेळी गरज होती आणि हेच काम मी डिक्कीच्या माध्यमातून करीत असतो. केवळ संघर्ष आणि संघर्ष वातून फार काही हाताला लागत नाही पण तरीही मी म्हणत असतो की, या चळवळीतील पहिली आणि दुसरी पिढी जी आहे ती संघर्ष करत होती, याबाबतीत एक सामाजिक लढा जो होता तो त्या काळामध्ये आवश्यकही होता. ती त्यांनी लढली आणि त्यामुळे एक चांगलं वातावरण ज्याला आपण भक्कम पायाभरणी म्हणतो ती त्यांनी केली आणि त्यावरच ही डिक्की नावाची संस्था स्थापन झाली. विद्यार्थ्यांना एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की, व्यवस्थेशी फटकून वागला तर तुमचा विकास होत नाही. जर आपला आर्थिक विकास करायचा असेल तर तो समन्वय साधून करावा लागतो. हा मार्ग आम्ही स्वीकारला आणि मग व्यवस्थेशी डायलॉग करणे, डिबेट करणे, डिस्कशन करणे, इंटरवेशन करणे त्यातून हे सगळं घडत गेलं, तर हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा मला या ठिकाणी सांगावासा वाटला.
पूर्वा वानखडेः भारत हा पाच मिलियन डॉलरची इकॉनॉमी बनत आहे आणि एवढं मोठा आकडा आपल्यासमोर येत असताना आमच्या मनात प्रश्न येतो की आमचं as a youth म्हणून तिथे योगदान काय आहे? आणि आम्हाला त्याचा फायदा नक्की काय आहे? डिक्की याकडे कसं बघत आणि एक छोटा उद्योजक म्हणून काय मिनिंगफुल स्टेप्स असू शकतात? याबाबत आपण काय सांगाल.
मा. मिलिंद कांबळे : खरं म्हणजे भारताची पाच ट्रिलियन डॉलरकडे किंवा तिसरी मोठी जगातली अर्थव्यवस्थेकडे वाटचाल
सुरू आहे. या सगळ्या वाटचालीमधे जर तुम्ही बघितलं तर जी ग्रोथ आहे ती इन्क्लुसिव डेव्हलपमेंट आहे. आज मी ज्या क्षेत्रामधे काम करतोय विशेषतः फायनान्शियल आणि सोशल इन्क्लुजनच्या ज्या स्कीम्स आहेत, ज्या योजना बनवणं आहे, त्याचं इंप्लिमेंटेशन करणं आहे, या सगळ्यांमध्ये भारत सरकारच्या सोबत आणि सगळ्या राज्य सरकारांच्या सोबत आम्ही काम करतो. आता खरं म्हणजे उद्योजकांसाठी किंवा युथसाठी 'धिस इज द बेस्ट टाइम फॉर अ युथ, टू गो फॉर अ स्टार्टअप.' आपल्या भारतातल्या युवकांसाठी हा सर्वोत्तम काळ आहे आणि भारतातले युवक इतक्या मोठ्या प्रमाणात कमाल करताहेत, आज आपल्याकडे रजिस्टर्ड स्टार्टअपची जी संख्या आहे त्यामधील सव्वाशे स्टार्टअप्स हे बिलिनियर झालेले आहेत. आज रोज एक नवा बिलिनियर भारतामध्ये जन्माला येतोय. रुचिर शर्मा नावाचे एक इंटरनॅशनल बँकिंग आणि इन्वेस्टमेंट बँकर आहेत. त्यांनी खूप सारी पुस्तके लिहिलीत. 'राइज अँड फॉल ऑफ नेशन्स' म्हणजे एखाद्या देशाचा राइज आणि फॉल हा कसा असतो ? कसा होतो? तर त्याच्यामधे त्यांनी असं लिहिलंय की तुमच्या देशामध्ये काहीच मुठभर मंडळी श्रीमंत होत आहेत? का रोज नवे बिलिनियर्ज जन्माला येतात किवा किती बिलिनियरची संख्या वाढते? त्याला क्रोनी कॅपिटॅलिजम असं म्हटलं जाईल. कारण काहीच लोकं बिलिनियर म्हणजे श्रीमंत, अधिक श्रीमंत होताहेत आणि बाकी काही होत नाहीय, तर या देशामध्ये असं नाही. आज एक वायब्रेट इकोसिस्टम आपल्या देशात आहे आणि त्या वायब्रेट इकोसिस्टमचा उपयोग करून रोज नवा बिलिनियर जन्माला येतोय ही स्थिती आहे.
आता ती इकोसिस्टम काय आहे? भारत सरकार पंचवीस टक्के तुमच्या उद्योजकांकडून खरेदी करतंय, अठरा टक्के जनरल कॅटेगरीमधल्या एसएमईकडून, चार टक्के एससी-एसटी एसएमईकडून तर तीन टक्के महिला उद्योजिका यांच्याकडून. तुम्ही याच्यासाठी एक 'एमएसएमई संबंध' नावाचं पोर्टल आहे. त्या पोर्टलवरती गेलात तर तुम्हाला कुठल्या वर्गाकडून किती खरेदी केलेली आहे याचा डॅशबोर्डचं आहे. सगळ्या पीएसयूज आणि सगळे त्याच्यावरती ऑनबोर्ड आहे. त्यामुळे तुमच्यासाठी एक मार्केट मोठ्या प्रमाणामध्ये क्रिएट झालेला आहे, त्याचा आपण फायदा घेऊ शकतो. त्यानंतर जेमसारखी व्यवस्था आहे. त्या जेमवरून इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी करताय. ५६ हजार एससी-एसटी उद्योजक आम्ही जेमवरती नोंदवलेले आहेत. मागच्या फायनान्शियल इयरमध्ये एससी-एसटी उद्योजकांकडून ९८०० कोटींची खरेदी आणि एमएसएमई संबंधीत पोर्टलवरुन ३५०० कोटींची खरेदी झाली आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तर आज छोट्या उद्योजकांसाठी जे आवश्यक आहे त्यांच्यासाठी आज एक मोठं मार्केट हे क्रिएट झालेलं आहे. दूसरा, फायनान्शियल सपोर्ट बघितलं, अतिशय सक्सेसफुल स्टैंड अप इंडिया स्कीम आहे. आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी इट इज माय ब्रेनचाइल्ड अँड डिक्की एज़ अ नॅशनल लेवल एनेबलर एजन्सी म्हणून आम्ही त्याच्यासोबत काम केलं. आता ती १० लाखांपासून १ कोटीपर्यंत विनातारण कर्ज, म्हणजे आज ही क्रांती आहे. ज्या काळात असं कुठलंच काहीच नव्हतं तेव्हा भारतामध्ये आम्ही बँकेकडून विनातारण कर्ज घेऊन अधिकाधिक व्यवसाय सुरू केला. यामध्ये ७० हजार अनुसूचित जाती-जमार्तीच्या युवकांना उद्योगासाठी लोन मिळालेलं आहे, १.५ लाख महिलांना यामध्ये लोन मिळालेलं आहे.
जनरल कॅटेगरीतल्या महिलांनी तर यातूनच सक्सेसचं इन्स्पिरेशन घेऊन नवी स्टैंड अप इंडिया प्लस जाहीर केली. ही योजना ५ लाख नव्या लोकांना २ कोटींपर्यंत सपोर्ट करणार. हे वेंचर कॅपिटल फंड आहेत, फंडिंग एजन्सीज आहेत हा एक सपोर्ट सिस्टम आहे. तर त्यामुळे म्हणून मी काय म्हणालो की आज स्टार्टअपसाठी भारत सरकार असेल, स्टेट गवर्नमेंट असतील, हे मदत करणारे इतके प्लॅटफॉर्म आहेत आणि या भारतातला जो तरुण आहे, हा मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्या अॅक्टिविटीमध्ये गुंतलेला आहे.
तुम्हाला एक गंमत सांगतो की, आपल्या सगळ्यांना माहिती असेल मुद्रा नावाची एक स्कीम आहे. आत्ताच भारत सरकारमधले एक अॅडिशनल सेक्रेटरी त्यांना कुठे तरी प्रेझेंटेशनला जायचं होतं, तर मी प्रेझेंटेशन करून पाठवलं होतं. तर ही जी मुद्रा स्कीम आहे ना ही जगातली सगळ्यात मोठी फायनान्शियल इन्क्लूजनची स्कीम आहे. नॅनो एंटरप्रिनर्सला म्हणजेच रेडीपटरीवाले पासून अशा विविध प्रकारचे जे सगळे उद्योजक आहेत त्यांना ५० हजारापासून ते १० लाखापर्यंतचं लोन मिळतं, मागच्या फायनान्शियल ईयरमध्ये मुद्रामधून ४५ कोटी लोकांना २७ लाख कोटींचं लोन दिलं गेलंय. ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनुसूचित जाती-जमातीचे २३ टक्के लोक आहेत म्हणजेच ८-९ कोटींच्या आसपास लोकांना ५ लाख कोटी रुपयांचं लेंडिंग झालेलं आहे. म्हणून मी असं म्हणतो की, उद्योजकांसाठी आजचा हा सर्वोत्तम काळ आहे आणि तुमच्या हातामध्ये जो मोबाईल आहे, ते प्रचंड ताकदीचं यंत्र आहे. आमची पिढी अशी आहे की, 'आम्ही काहीच नाहीपासून एकदम आत्ता हायटेक सगळी यंत्रणा' अशी आमची 'ट्रान्जिशन पिढी' आहे. सो यू आर व्हेरी लकी की, तुमच्या हातामध्ये एक अत्यंत पावरफुल इन्स्ट्रूमेंट आहे, त्यामुळे तुम्ही या सगळ्याचा उपयोग करू शकता. करिअर कट्टा मार्गदर्शनाला आहेच आहे आणि आमच्यासारख्या संस्था ज्या विद्यार्थ्यांना उद्योजक व्हायचंय, त्याच्यासाठी आम्ही आहोतच.
पूर्वा वानखडे : आपल्या संवादातून भरपूर गोष्टी माहिती झाल्या. काही स्कीमविषयी माहिती झाली. आपले ग्रामीण विद्यार्थी आहेत किंवा ग्रामीण शेतकरी कुटुंबातून येणारे विद्यार्थी आहेत. त्यांच्यासमोर नेहमी हा प्रश्न असतो की घरी शेतजमीन भरपूर आहे पण त्याचा योग्य तो वापर कसा करावा? म्हणजे अॅग्रिटेक आणि फूड प्रोसेसिंग यांचा उपयोग आपल्याला तिथे कसा करता येईल? आणि एक PQH meaningful चळवळ या मधून कशी निर्माण होईल ?
मा. मिलिंद कांबळेः हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. भारतातलं पन्नास टक्के पॉप्युलेशन हे अॅग्रिकल्चरवरती अवलंबून आहे.
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की, अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये फार मोठ्या प्रमाणात इन्वेस्टमेंट, इनोव्हेशन होण्याची गरज आहे. भारत सरकारने आधी तो एक प्रयास केला होता, पण त्यांना दोन पावलं मागे घ्यावी लागली. मित्रांनो, स्टार्टअपच्या कॅटेगरीमध्ये अॅग्रिटेक आणि फूडटेक इतक्या मोठ्या प्रमाणामधले स्टार्टअप्स आहेत आणि तो कल वाढत चाललेला आहे. म्हणजे मला असं वाटायचं की, हातात स्मार्टफोन आहे, त्यामुळे मग तो स्मार्टफोन स्क्रीनला टच करायचा आहे, त्यामुळे शेतात काम केलं, माती लागली तर मग ते स्क्रीन कसा बघणार? तो खराब होईल, तर अशी स्थिती नाहीय, अॅग्रिकल्चरमध्ये खूप सगळे स्टार्टअप्स निर्माण होत आहेत. हे खरं आहे की आपल्याकडची जी शेती आहे ही दिवसेंदिवस डिव्हाईड होत जात आहे. त्यामुळे लैंड होल्डिंग जे आहे हे कमी-कमी होत चाललंय. महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात फार्मर प्रोड्युसर कंपन्या, ज्याच्या माध्यमातून फार्मिंग करणं जे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये म्हटलेलं होतं की, भारतातली शेती ही पावसावरती अवलंबून आहे आणि आपल्याकडचा पाऊस हा लहरी पाऊस आहे. त्यामुळे 'सामूहिक शेती करणं' ही तेव्हा बाबासाहेबांनी एक थिअरी मांडली होती, ती फारशी लोकांना पसंत पडली नाही. पण आता लक्षात येतंय की, आपल्याकडे शेतकऱ्यांची आत्महत्या हा जो मोठा विषय आहे आणि अतिशय दुर्दैवी आहे, तर तो का होतोय? तर हे जे लैंड होल्डिंग आहे पिढी दर पिढी कमी होत गेल्यामुळे त्या छोट्या शेतीच्या तुकड्यांमध्ये इन्वेस्ट करणं शेतकऱ्याला अवघड होत आहे आणि व्यावसायिक विचार करता, इन्वेस्टमेंट आणि रिटर्न ऑन इन्वेस्टमेंट हे त्या शेतकऱ्याला मिळत नाही. आता तुम्हाला सामूहिक पद्धतीने शेती करणं आणि त्यातून उत्पादन वाढवणं हे करावं लागेल. नव्या टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागेल. प्रगतशील शेतकऱ्यांची अनेक उदाहरणं आहेत की, एकदम माळरान होतं आणि मग त्या माळरानावरती पाणी नाही, काही नाही तरी इतकी मोठी शेती फुलवली. त्याच्यामध्ये फळं निर्माण केली, भाज्या निर्माण केल्या अशी अनेक उदाहरणं देता येतील.
परंतु तुम्ही जे म्हणालात ते ग्रामीण भागामध्ये आता ग्रामीण अर्थव्यवस्था ही सक्षम झाली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला केव्हीआईसीचे उदाहरण सांगतो. खादी व्हिलेज इंडस्ट्रीजचा दीड लाख कोटीचा टर्नओव्हर झालेला आहे. हा टर्नओवर आला कुठून ? तुम्ही बघा केव्हीआईसीचा टर्नओवर किती झालेला आहे? कारण खादी रिलेटेड म्हणजे रुरल भागातले रिलेटेड प्रॉडक्ट्स उत्पादन करणं, छोट्या-छोट्या सहकारी संस्था त्यांच्याकडून ते सगळे प्रोडक्ट घेतात. हे केव्हीआईसीवाले त्यांना फंडिंग करतात आणि त्यांना मार्केट उपलब्ध करून देतात. हे सगळं वाढत चाललंय. 'ट्रायफेड' हा ट्रायबलमधून निर्माण होणारे प्रॉडक्ट बनवतात. ट्रायबल क्षेत्रामधील फार्मर्स, प्रोड्यूसर्स सेमी फिनिश प्रॉडक्ट त्याला परत प्रोसेस करून विकतात. केव्हीआईसी सारख्या अनेक वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांच्या माध्यमातून रुरल इकोनॉमीला (ग्रामीण उद्योजकतेला) चालना मिळाली पाहिजे व त्यांना मदत झाली पाहिजे म्हणून पूर्णतः एक इकोसिस्टम आहे आणि त्याचा उपयोग हा सगळ्यांनी करून घेतला पाहिजे, असं मला वाटत.
पूर्वा वानखडे: सर, मागील वर्षी आम्ही तुमच्यासोबत दिल्लीला भेटलो आणि आम्हाला भरपूर स्कीम्सबद्दल माहिती मिळाली.
आजही त्याबद्दल माहिती मिळत आहे, याचा खरोखर खूप आनंद होतोय. youth बद्दलच्या या सगळ्या गोष्टींमध्ये डिस्कशन चालू असताना मनात सारखे प्रश्न निर्माण होतात. तर पुढचा प्रश्न म्हणजे आम्हा तरुणांच्या मनामध्ये खूप सगळ्या आयडियाज येतात म्हणजे आजूबाजूला बघत असताना असं वाटतं की, ह्या प्रॉब्लेमवर सोल्युशन निघू शकतं आणि आपण त्यात काहीतरी करू शकतो. पण जेव्हा या गोष्टीसाठी आम्हाला फंडिंगची गरज असते, आम्ही इन्वेस्टरकडे जातो. तो इन्वेस्टरपर्यंत जाण्याचा मार्ग आणि तिथून पुढे स्टार्टअप उभं करणं हे फार किचकट आहे असं वाटतं आणि मग कुठे तरी आयडिएशन स्टेजमध्ये जे enthusiasm असतं ते कमी झालेलं दिसतं. ज्याप्रमाणे आपले स्टार्टअप तिथे उभे राहायला पाहिजे होते तेवढे राहत नाही. तुम्ही एक वेंचर कॅपिटॅलिस्ट आहात आणि भरपूर स्टार्टअपला तुम्ही फंड पण केलं आहे. तर एका उद्योजकामध्ये तुम्ही काय बघता ? कोणत्या non negotiable skills त्याच्याकडे असल्या पाहिजेत आणि एका इन्वेस्टरला एक विद्यार्थी म्हणून आम्ही कसं पिच केलं पाहिजे so that जे काही स्टार्टअप आमचं आहे, त्याला त्या आयडिएशन स्टेजमधून to a completely growing start up मध्ये बदलेल तर याबद्दल काय सांगाल सर आपण ?
मा. मिलिंद कांबळेः एकदम अकॅडेमिक प्रश्न आहे. खरं म्हणजे मी वेंचर कॅपिटॅलिस्ट नाहीये. मी स्वतः २०१३ साली सेबीकडे
रजिस्टर करुन वेंचर कॅपिटल Fund स्थापन केला होता. पण Now it is Dying its Own Death. त्याला मी सोडून दिलेलं आहे. पण आम्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला सुचवल्यानंतर त्यांनी Venture Fund बनवले. आसिम सारखी Scheme बनवली ज्याचा उपयोग होतोय. मी गेली पाच-सहा वर्ष एका इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (आयआयएम) जम्मूचा चेअरमन आहे आणि दुसरं गेली दहा वर्षे (ईडीआयआय) अंट्रेप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, अहमदाबाद याचा मी अध्यक्ष होतो. त्यामुळे अंट्रेप्रिन्योरशीप आणि बिजनेस या दोघांशी अॅकॅडमिकली रिलेटेड खूप जवळून माझा संबंध आहे, उद्योजक जो आहे ना हा सगळ्यांचा चिंतेचा विषय आहे. काय झालंय की, मी नेहमी बोलत असतो की, Mortality Rate of Startup, It's a Very High आता हा काय आहे? येस ऑफ कोर्स, सगळ्यांना स्टार्टअप सुरू करण्यासाठी एक खूप पेंशन असावी लागते आणि आज आपल्या तरुणांमध्ये ती पेंशन एकदम मोठ्या प्रमाणामध्ये आहे, पण तो स्टार्टअप आयडिएशनपासून Success होण्यापर्यंतचा एक मोठा कालावधी आहे. त्याला उद्योजकीय भाषेत Gestation पीरियड असं आम्ही म्हणतो आणि या Gestation पीरियडच्या दरम्यानच Mortality रेट मोठा आहे, तरुणांमध्ये स्टार्टअप्स सुरू करण्यासाठी जशी पेंशन आवश्यक आहे तसं तो Successful होण्यासाठी Patience ही अत्यंत महत्त्वाची आहेत. Each आणि Every Stage ला म्हणजे आज तुमची पिढी इतकी सुदैवी आहे, कारण आज भारतामध्ये डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे (TBI) १२० च्या आसपास टेक्नॉलॉजी बिजनेस इनक्युबेटर्स आहेत. आता पुण्यासारख्या शहरामध्ये पाच सहा टीबीआय आहेत. अटल इन्क्युबेशन मिशनच्या माध्यमातून दीडशेच्या आसपास (एआयसी) अटल इन्क्युबेशन सेंटर आहेत. हे तर झाले भारत सरकार state level, वरती सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये इनक्युबेशन सेंटर्स आहेत. सगळ्या कॉलेजेसमध्ये आज (ईडीसी) अंट्रेप्रिन्योरशिप डेव्हलपमेंट सेल आहेत. उद्योजकांसाठी एंजेल इन्वेटर्स आहेत. जो इन्होवेटर आहे, त्या इन्होवेटरनी योग्य मार्गदर्शकाची मदत घेणं फार आवश्यक आहे. त्याला ज्या लेवलला अडचण येतेय, तिथे मदत करण्यासाठी इनक्युबेशन सेंटर्स आहेत. ही सगळी सपोर्ट सिस्टम भारत सरकार आणि सगळ्या राज्य सरकारांनी आपली स्वतःची उभी केलेली आहे. त्याचा फायदा उद्योजकांनी घेतला पाहिजे. कुठल्याही प्रकारे over confidence मध्ये राहता कामा नये, you have to be open all the time. Yes, मला ही अडचण येतेय, I will go and speak to my mentors. आता mentor आणि mentee हा एक मोठा प्लॅटफॉर्म आपल्याकडे नाहीये. मा. शितोळेजी याच्यावरती सुद्धा आपणाला सर्वच स्तरावरती काम करावं लागेल. पण (बीआयएसटी) भारतीय युवा शक्ती ट्रस्ट नावाची एक संस्था आहे, जी सीआयआय सोबत काम करते सगळ्यांसोबत काम करते. आमचाही त्यांच्यासोबत MOU झालेला आहे आणि त्यांच्याकडे सव्वा लाख रजिस्टर्ड मेंटर्स आहेत. आता हे डिसिमिनेशन of information ही फार मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे. इतकं मोठं नेटवर्क आहे जे आमच्या काळामध्ये कधीच नव्हतं. ह्या सगळ्या परिभाषा या पंधरा वर्षांच्या काळातल्या आहेत. पण त्या आज उपलब्ध आहेत. लोकांना पिचपासून, आयडीयापासून मार्केटपर्यंत नेणं हा मोठा कालावधी आहे. त्यामुळे सगळे तरुण आणि नवीन नवीन स्टार्ट अप करणारे उद्योजक होणे हे फार आवश्यक आहेत, एवढंच मी म्हणेन. 'व्हाई स्काय इज द लिमिटेड' एकदा आमच्याकडे आम्ही एक भाषण ठेवलं होतं 'व्हाय यु आर लिमिटिंग युवरसेल्फ अप टू?' आकाशाला गवसणी घालता आली पाहिजे. इथिक्सनी व्यवसाय करणं हे फार आवश्यक आहे, असं मला वाटतं.
पूर्वा वानखडे : सर, मी निश्चितच तुमचं एक भाषण ऐकलं आणि त्यामध्ये स्केल अप हा तुमचा मोठा अजेंडा आहे हे त्यातून जाणवलं. यामधून आपण जसं तुम्ही सांगितलं या पूर्वीच्या प्रश्नामध्ये की स्टार्टअपला फंडिंग कशी मिळवायची या प्रोसेस आम्हाला माहिती पडल्या. पण आता हे जे स्टार्टअप मिळलेलं आहे बाला अगदी एमएनसी लेवलपर्यंत, अगदी कॉर्पोरेट लेवलपर्यंत कसं नेता येईल याबद्दलचं मार्गदर्शन जर मिळालं असतं तर अतिशय आनंद झाला असता आणि निश्चितच तो मिळेल, याची शाश्वती आहे.
मा. मिलिंद कांबळे हे बघा काय आहे, काही एक निश्चित कालावधी आहे. म्हणजे 'इन अ फाइन मॉर्निंग' काय होत नाही.
त्याला एक पिरयड जो आहे तो द्यावा लागतो आणि तुम्हाला कंसिस्टन्सी जी आहे ना, यश किंवा अपयश दोन्ही गोष्टी जरी आल्या तरी विचलित न होता ध्येयाक्रमण करावं लागतं. तुम्हाला सांगतो की, खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझं तो इंटरव्यू पण उपलब्ध असेल. पूर्वी रवीश कुमार फील्ड रिपोर्टिंग करायचे नंतर ते वेगळं करायला लागले. २०१० साली त्यांनी डिक्कीवरचा एक रिपोर्ट केला होता. त्यांनी माझ्या कंस्ट्रक्शनच्या ज्या साईट्स होत्या तिथे व्हिजिट केली आणि बिल्डरकडे जो सॅम्पल फ्लॅट असतो तो बघितला आणि त्यावर खूप चर्चा केली. खूप लोकं अशी अॅम्बिशन ठेवून असतात, मला टाटा बनायचंय, अंबानी बनायचंय किंवा फलाना बनायचंय वगैरे वगैरे. तसं त्यांनी मला प्रश्न विचारला की, "आपको क्या बनाना है?" मी तेव्हा उत्तर दिलं होतं की, "मुझे और कुछ कोई नहीं बनना, मुझे मिलिंद कांबळे बनना है." त्यामुळे आमच्या व्यवसायाचा जो ग्रोथ आहे तो आत्ता ज्या स्थितीत आहे (बारा तेरा हजार कोटींचे प्रोजेक्ट्स) तो अधिक राहिला असता पण मला त्याचं काही गिल्ट नाहीये. माझी जी काही स्टडी, टाईम आणि एनर्जी ती सगळी मी डिक्कीकडे अप्लाय केल्यामुळे ती आत्ता या स्थितीत आहे, व्हाट आइ अम डिलिव्हरिंग विद दिस पॉलिसी क्रिएशन. आपण लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला आपण बनायचंय, पूर्वा वानखेडे बाँट टू बिकम एन पूर्वा वानखडे, आय डॉट बांट टू बिकम अनब दिस, अनब देंट. मला त्याला अनब देंट करायचं असेल तर त्याला वेळ लागेल हे लक्षात ठेवलं पाहिजे. हा एक जनरल भाग झाला, पण तुम्हाला जर कंपनी मोठी करायची असेल तर तुम्हाला राइट पीपल चूज करणं आणि प्लेस करणं यायला पाहिजे.
आता परवा नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रमामध्ये एक स्पीकर अलाँग विद मी अॅज ए पॅनेलिस्ट ते म्हणाले की, धीरूभाई अंबानींचे शिक्षण किती आहे? दहावी. १७ वर्षी ते एका पंपावरती तेल भरत होते. ठीक आहे ना. त्यांना या परिस्थितीमुळे त्यांना जावं लागलं. मात्र आज त्यांचं केवढं मोठं रिलायन्स उभं राहिलं आणि त्यांच्या दोन मुलांनी एकाने खूप मोठं केलंय, एकाने पार डब्यात घातलं. ते ठीक आहे, तो त्यांचा त्यांचा भाग आहे. पण मूळ धीरूभाई अंबानी सक्सेस का झाले? त्यांच्या सक्सेस गुपित काय? ते खूप मोठे शिकलेले होते का? का त्यांनी पेट्रोकेमिकल इंजिनियरिंग केलं होतं? किंवा हॉवर्डमधून डिग्री घेतली होती काय? असं काही नव्हतं. जामनगरचा प्लांट त्यांनी ज्या पद्धततीनं उभा केला त्यामध्ये त्यांनी राइट पीपल चूज करून त्याला राइट प्लेसला नेमलं आणि थिंग्स टू बी गेट इट डन अॅज अ मॅनेजर. तो एक बिजनेसमन असतो, ही इज अ मॅनेजर अँड ही हॅब टू मॅनेज ऑल शोज, हे सगळे शो करत असतानाच तुम्हाला तुमचा स्टार्टअप स्केलअप करायचा आहे, मोठा करायचा आहे. यासाठी तुम्हाला राईट पिपल्सचं सिलेक्शन करणं, त्यांची टीम बिल्ड करणं, त्या टीमकडून एक्झिक्युशन करून घेणं, गोल्स, टारगेट्स अचिव्ह करणं या सगळ्या मोठ्या गोष्टी आहेत, त्या सगळ्या होत राहतात. सक्सेसचा जो बेस आहे ना, तुमची कंपनी मोठी होण्याचा, चॉईस ऑफ राईट पिपल्स अँड प्लेसिंग इट अॅट राइट प्लेस इज दी सक्सेस. तुम्ही मोठे होऊ शकता धीरूभाई झाले, तुम्ही का नाही होऊ शकणार? ठीक आहे, पण आपणाला आपण पूर्वा व्हायचंय किंवा साक्षी व्हायचंय किंवा वेदिका व्हायचंय ते तुम्ही ठरवा. मला काय व्हायचंय हे आपण ठरवायचं बाकी कोणी नाही. जसं मी ठरवलं मला मिलिंद कांबळे व्हायचंय बस मला बाकी कोणी व्हायच नाहीये. 'सो घिस इज द सिंपल आउट ऑफ लेस मॅनेजमेंट.'
मा. यशवंत शितोळे : भारत हा महासत्ता होईल स्वप्न ज्या वेळेला राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी मांडल तेव्हा आणि आजच्या कालावधीमध्ये किंवा पुढच्या २० वर्षांमध्ये २०४७ पर्यंत भारतामध्ये तरुणांच्याकडून काय अपेक्षित आहे?
मा. मिलिंद कांबळेः भारतातला जो तरुण आहे, त्याच्याकडून आमच्या सगळ्यांच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या
अपेक्षांवरती तो खरा उत्तरतोय. आपल्या समोर २०४७ साली विकसित भारताचं जे एक टार्गेट आपले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी ठेवलं, ते कोणाच्या समोर आहे? तर ते युवकांच्या समोर आहे. भारतातली ही जी युवकांची शक्ती आहे, तीच या देशाला विकसित भारत करू शकते. तुमच्यामध्ये एवढी ताकद, एवढी उर्जा आहे की तुम्ही ते स्वप्न साकार करू शकता. शेवटी गव्हर्नमेंट काय करणार आहे तर, तुम्हाला एक इकोसिस्टम प्रोवाईड करणं, प्लॅटफॉर्म प्रोवाईड करणं, सपोर्ट सिस्टम क्रिएट करणं आणि हे सगळं सरकार करत आहे. कारण सगळ्यांना नोकऱ्या तर कोणीच देऊ शकत नाही. त्यामुळे सरकार काय करू शकतं? एक सपोर्ट सिस्टम क्रिएट करू शकतं आणि त्या सपोर्ट सिस्टमचा उपयोग तरुणांनी योग्य दिशेला आपली शक्ती चैनलाइज करण्यासाठी केली पाहिजे. भारतातल्या तरुणांना उंचवण्यासाठीचाच प्रयत्न सुरू आहे. भारतातला जो GenZ आहे हा अलीकडे कंस्ट्रक्टिव्ह गोष्टींमधे गुंतलेला आहे. म्हणून मी म्हटलं की, तुमच्याकडे इतका पावरफुल इन्स्ट्रुमेंट आहे, तुमच्या हातामध्ये... दिस इज व्हेरी पॉवरफुल इन्स्ट्रुमेंट, याचा उपयोग करा आणि भारताला विकसित बनवण्यासाठी प्रयत्न करा. हे तुमच्याच हातामध्ये आहे "यु आर द फ्युचर ऑफ इंडिया."