महाराष्ट्रातील युवकांचा सर्वांगीण विकास हा उद्देश्य डोळ्यासमोर ठेवून करिअर कट्टा उपक्रम गेल्या काही वर्षांपासून हजारो विद्यार्थ्यांच्या जीवनात बदल घडवून आणणारे व्यासपीठ ठरत आहे. करिअरच्या वाढत्या संधी आणि जागतिक विचारांची जडण-घडण आणि विद्यार्थी यांची सांगड घालण्याकरिता अतिशय व्यस्तता असताना सुद्धा विद्याथ्यांना जागतिक करिअरच्या दिशेने प्रेरित करण्याकरिता करिअर कट्टा उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांना दिशादर्शक असणारे महाराष्ट्राच्या परभणी भूमीतील सुपुत्र मा. डॉ. तुषाबा शिंदे सर यांची मा. यशवंत शितोळे सर (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र) यांनी घेतलेली मुलाखत येथे शब्दबद्ध करीत आहोत.
महाराष्ट्राच्या परभणी येथील ग्रामीण पार्श्वभूमीपासून देशाच्या राजधानीत आणि राष्ट्रीय प्रशासनात महत्त्वाची भूमिका निभावण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास महाराष्ट्रातील तरूणांकरिता एक प्रेरणादायी मार्गदर्शक स्रोत बनला आहे. चेहऱ्यावरील हास्य आणि विविध विषयातील सखोल ज्ञान विद्याथ्यांना त्यांच्याकडे आकर्षित करीत चालले आहे.
सदर मुलाखतीत मा. डॉ. तुषाबा शिंदे सर यांनी महत्वाचा विचार मांडला, की आपण स्वतःभोवताली संकुचित विचारांमुळे जे सीमांचं कवच निर्माण करून ठेवले आहे, त्यामुळे आपला विकास सहज शक्य नाही. जन्मभूमीची सीमा सोडून बाहेर पडल्याशिवाय तरुणांच्या क्षमतांचा खरा विकास होत नाही, त्याकरिता स्थानांतरण अतिशय महत्वाचे आहे. आपल्यात सृजनशीलता घडून यावी, विचारांची आणि ज्ञानाची क्रांती घडून येण्याकरिता सोबतच नवनवीन करिअरच्या संधीच्या शोधात जन्मस्थानापासून बाहेर जगात डोकावून पाहणे आजच्या स्पर्धेच्या युगात अतिशय महत्वाचे आहे. विद्यार्थी जेव्हा स्वतःला अनोळखी जगात झोकून देता. भीती, एकटेपणा आणि आव्हानांचं मिश्रण त्याला खऱ्या अथनि परिपक्क बनवतं.
त्यांनी सांगितले की परभणीसारख्या छोट्या जिल्ह्यातील शाळेतील एका साध्या लायब्ररीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आणि लायब्ररीमुळे त्यांच्या आयुष्यात घडून आलेली क्रांती. ज्या ग्रंथालयात ते पुस्तके वाचत होते तेथे विविध प्रकारचे Newspaper यायचे त्यावेळेस ची Koffee Annan, (सेक्रेटरी जनरल ऑफ युनाइटेड नेशन) बघायचो. आणि त्यातूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरींच्या संधीबाबत दिशा मिळत UPSC ते Foreign सर्विस पर्यंतचा प्रवास गाठला. आपण जर का पाहिले भारतातील लोक जेव्हा बाहेर देशात काम करतात तेव्हा अतिशय मन लावून करतात. कारण सुरुवातीला नाही जमत परंतु, शिकल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर ते सहज शक्य आहे. आज अमेरिका, लंडन आणि त्याही पलीकडे आपल्या लोकांनी तिथे आपलं विश्व निर्माण केले आहे आणि सोबतच आपल्या देशाचे नाव सुद्धा. भारतातील विशेषतः बिहार, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक लोकांनी त्यांच्या कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही उल्लेखनीय योगदान देऊन आपले नाव कमावले आहे. त्याच्या तुलनेत, मराठी लोक अनेकदा स्वतःच्या प्रदेशाबाहेर जाणे टाळतात.
माझ्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांनी काय बघावं? तर, माझी एवढीच इच्छा आहे की, विद्यार्थ्यांनी स्वप्न मोठी बघावीत. असे म्हणतात की मनात एखादा विचार येणं किंवा एखादं स्वप्न पडणं म्हणजे त्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचे ५०% काम पूर्ण झाले. कारण जेव्हा एखादी गोष्ट मनात येते, तेव्हा ती साध्य करण्याची क्षमता आपल्यात असते; अन्यथा तो विचारच आपल्या मनात आला नसता. त्यानंतर उरतो तो फक्त त्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रवास. तुमच्या सोबतच्या दहा लोकांनी म्हटलं शिक्षक व्हायचं, डॉक्टर व्हायचं, इंजिनीअर व्हायचं तर तुम्ही त्याच्या वरील स्वप्न पहा जसे की कलेक्टर, शास्त्रज्ञ, व्यापारी, राजकारणी, इ. जेव्हा आपण स्वप्न मोठी पाहतो आपली दिशा सुद्धा बदलायला सुरुवात होते आणि जेव्हा तुम्ही स्वप्न मोठी पाहता, मित्रांनो, मी तुम्हाला हक्काने सांगू इच्छितो की मदत करणारे हात सुद्धा तेवढेच समोर येतात. लोकांच्या प्रतिक्रिया आणि टोमण्यांचे नेहमी स्वागत करा, परंतु आपलं स्वतंत्र असं स्वप्न पहा. कोणत्याही किंमतीत तुमचे स्वप्न पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण त्यासाठी अनेक वर्षांचा संघर्ष, कठोर अनुभव आणि सततची मेहनत आवश्यक असते. तरीसुद्धा, तुम्हाला पुढे जात राहणे गरजेचे असते. जर तुम्ही आत्मविश्वास गमावला आणि स्वप्न सोडून दिले, तर केलेला संपूर्ण प्रयत्न व्यर्थ ठरतो. या संपूर्ण प्रवासात एकच गुण सर्वात महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे संयम.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरीच्या संदर्भात आपण ५२ आठवड्यांची शृंखला यामध्ये बघितले आहे की युनाइटेड नॅशन, WHO, वर्ल्ड बँक, एशिअन डेव्हलपमेंट बँक सारख्या आंतरराष्ट्रीय क्षेत्रात नोकरींच्या संधी तर आहेत, परंतु, आता नवनवीन बँक आल्या आहेत जे आता नवीन जिओलॉजिकल कंन्टेस्ट येत आहेत. चायना, यूएसए येथे नवीन डेव्हलपमेंट बँक येत आहेत. एशियन इन्व्हेस्टमेंट इन्फ्रास्ट्रक्चर बैंक येत आहेत. अशा प्रकारच्या संघटनांमध्ये आपल्याला भरपूर संधी आहेत. याकरिता इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनच्या संकेत स्थळावर सतत भेट देत पात्रतेच्या तरतुदी आपल्याकडून करून ठेवणे गरजेचे आहे. सोबतच, योग्य रेफरन्सेसची आवश्यकता. कुणाला यश एकाच प्रयत्नात भेटेल, कुणाला वेळ पण लागू शकते, पण खचून न जाता येणाऱ्या आव्हानांना सामोरे जायचे असते. मिलिंडा गेट्स फाउंडेशन, रेड क्रॉस सोसायटी यांसारख्या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थांमध्येही उत्कृष्ट संधी उपलब्ध आहेत, ज्यामुळे उत्तम संशोधक बनण्याची तसेच उत्कृष्ट करिअर घडवण्याची संधी मिळते.
UPSC मुलाखती करीता आवश्यक रणनीती यावर त्यांनी सांगितले की, सध्याच UPSC मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर
झाला आणि आता सर्व पात्र विद्यार्थ्यांची धावपळ मुलाखतीच्या तयारीकरिता सुरु झालेली आहे. आपली मुलाखत उत्तमरीत्या
सादरीकृत होण्याकरिता अधिकाधिक मॉक मुलाखतीला सामोरे जा, आपल्या चुका समजून घेऊन त्यावर काम करा. या परीक्षेची
तयारी करणारा विद्यार्थी बाला ज्ञान असतंच परंतु, ऐनवेळी त्याच सादरीकरण पाहिजे त्या प्रमाणे होत नाही. सततचा सराव आणि
आपल्या स्वतःच्या नोट्स अतिशय महत्वाच्या असतात. मुलाखतीकरिता आपला CV महत्वाचा असतो, मुलाखतीदरम्यान
अनेक प्रश्न उद्भवू शकतात, आणि ते तुमच्या तयारीशी संबंधित असणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलाखतीच्या दिवशी तुमचे छंद,
पात्रता, स्वतःची आणि पालकांची माहिती, जिल्ह्यांबद्दलची मूलभूत माहिती, चालू घडामोडी तसेच महत्त्वाची
ऐतिहासिक/प्रचलित प्रवाह यांची नीट तयारी ठेवली पाहिजे. ही बाब लक्षात घेऊनच अभ्यास करावा. आणखी एक महत्त्वाची
गोष्ट म्हणजे, जर एखाद्या प्रश्नाचे उत्तर माहित नसेल, तर नम्रपणे 'नाही माहित' असे स्पष्टपणे सांगा. तेच योग्य आहे. समोरच्या
अधिकाऱ्यांनी पुन्हा विचारले किंवा त्यामुळे नकारात्मक छाप पडेल असे वाटले तरीही, अंदाज लावू नका-शांतपणे 'नाही
माहित' असेच म्हणा. हे अत्यंत महत्त्वाचे आहे.
शिवाय, अनुभवी लोकांशी संवाद साधणे, स्पष्टपणे बोलणे, सोपे आणि प्रभावी संवाद राखणे तसेच त्यांच्यासमोर मॉक
मुलाखती देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे आत्मविश्वास वाढतो आणि मुलाखतीत कोणत्याही प्रन्नाला सामोरे जाण्याची तयारी
होते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यात असा दृष्टिकोन असावा की तुम्ही कोणत्याही दबावाखाली न येता, विचारांचा
गोंधळ न होऊ देता, कोणत्याही प्रश्नाचे शांतपणे उत्तर देऊ शकता. म्हणूनच, आपल्या 'वृत्तीवर' लक्ष केंद्रित करणे आवश्यक
आहे.
"How to prepare for competitive exams while doing graduation" या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, ग्रॅज्युएशनच्या पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षात असताना जर तुम्ही UPSC किंवा MPSC करण्याचा निर्णय घेतला असेल, तर अभ्यासासोबत RRB परीक्षा, Central Forces, Staff Selection Commission (SSC) किंवा बैंकिंग परीक्षा याही देणे आवश्यक आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. ज्यांच्यात मेहनत आणि कटिबद्धता असते -" हे मला करायचंच आहे असे विद्यार्थी या काळात किमान एक तरी परीक्षा निश्चितच पास करतात.
माझा पहिला मुद्दा नेहमी असा असतो की जर तुम्ही वर्षातून एकच परीक्षा दिली, तर मर्यादित अनुभवामुळे तुम्हाला फार कमी गोष्टी शिकायला मिळतात, कारण पुढील परीक्षेसाठी तुमच्याकडे पुन्हा १२ महिन्यांचा मोठा कालावधी असतो. पण जर तुम्ही वर्षाला ८ ते १० परीक्षा दिल्या, तर त्या परीक्षांमधून तुमच्या चुका, सिली मिस्टेक्स, प्रश्नांचा पॅटर्न आणि योग्य पद्धतीने विचार कसा करावा याचे ज्ञान झपाटधाने वाढते. त्यानुसार तुम्ही अभ्यास पद्धती सुधारता, चुका कमी करता आणि निवडीची (selection) शक्यता देखील अधिक वाढते.
या सततच्या परीक्षांमधून झालेल्या चुका आणि अनुभवांमुळे स्वतःला सुधारण्यासाठी भरपूर संधी मिळते, तसेच आत्मविश्वासही मोठ्या प्रमाणात वाढतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम पुढील परीक्षांवर स्पष्ट दिसतो. अतिशय महत्वाचं की तुमचा प्लॅन A हा अगदी मजबूत असायला हवा. UPSC ठरलंय तर तेच करायचं मग आपल्या निर्णयात कुठलीही तफावत नको आणि जर का आपला प्लॅन B आणि प्लॅन C डोक्यात असला तर प्लॅन A वर पाणी फेरल्या शिवाय राहणार नाही.
जेव्हा तुम्ही जिद्दीने प्लॅन A चा मागोवा घेता तेव्हा तुमच्या प्लॅन B ची तयारी झालेली असते. तुमची एक तरी परीक्षा निघून जाते मात्र त्यानंतर न थांबता आपला रैंक अपडेट करण्यासाठी प्रयत्न करीत राहा. माझ्या अभ्यासानुसार, PO परीक्षेच्या तयारीकरिता ३० टक्के अभ्यासक्रम हा वेगळा असतो बाकी सर्व परीक्षेकरिता जवळपास सारखाच असतो.
सोबतच प्लॅन B परिस्थिती केव्हा येते, जर ५ वर्षाच्या वरील कालावधी या तयारीकरिता जात आहे, प्रिलिम्सपण निघत नाही आहे मात्र अशावेळी आपला प्लॅन B तयार असणे गरजेचे आहे. याकरिता आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही संधींचा लाभ मिळू शकतो का? किंवा इतर काही पर्याय निवडणे गरजेचे आहे. परंतु, जर आपला प्लॅन A हा स्ट्रांग असला म्हणजे प्रयत्नानंतर यश प्राप्त होऊनच जाते.
व्यावसायिक कौशल्य विकासाबाबत बोलताना मला माझ्या मित्रांना एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे-स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना, आपल्या शिक्षणातील आवडीचा विषय किंवा इतर कोणतेही कौशल्य नक्की जपले पाहिजे. कारण स्पर्धा परीक्षेची तयारी ही दीर्घकालीन प्रक्रिया असते आणि या काळात कधी कधी त्वरित यश मिळत नाही. अशा वेळी आपल्या कौशल्यामुळे करिअरला नवीन दिशा मिळू शकते. यादरम्यान, आपल्या कौशल्यांना चालना देत तुम्ही खाजगी नोकरींच्या मार्केटमध्ये, आंतरराष्ट्रीय नोकऱ्यांमध्ये, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन, PhD, NET, SET अशा पात्रता असल्यास कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून संधी मिळवू शकता. त्यासाठी आपला CV सतत मजबूत करत राहणे अत्यंत आवश्यक आहे.
यासाठी तुम्ही पुढील शिक्षण तेच विषय निवडून करू शकता, जे तुम्ही MPSC/UPSC/NET साठी घेतले आहेत-यामुळे भविष्यात त्या ज्ञानाचा द्विगुणित फायदा होतो. तसेच, याच तयारीदरम्यान GRE चीही तयारी करू शकता. एखादी परीक्षा क्लिअर न झाली तरी, GREच्या आधारे तुम्हाला परदेशात पुढील शिक्षणासाठी उत्तम संधी मिळू शकते. कारण, १० ते १५ वर्ष या तयारीत गेल्यानंतर मानसिक असंतुलन होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे, करिअर कट्टा सारखे उपक्रम तुमच्यात विविध कौशल्यांची रुजवणूक करीत आहे आणि सोबत तुमचे मानसिक संतुलन राखण्याकरिता विशेष सत्र आणि तसे मार्गदर्शक पण घेऊन येत आहे, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढीस लागण्यास मदत होत आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरमधील समस्या, संधी, भविष्यातील ध्येय आणि योजना याबाबत मित्रांशी किंवा क्षेत्रातील तज्ज्ञांशी नेहमी चर्चा केली पाहिजे. अशा चर्चा तुम्हाला योग्य मार्गदर्शन देतात, विचार स्पष्ट करतात आणि भविष्यासाठी योग्य योजना आखण्यास मदत करतात. आमच्या काळात अशा प्रकारचे प्लॅटफॉर्म किंवा मार्गदर्शन सहज उपलब्ध नव्हते. पण तुम्हाला आज अनेक पर्याय आणि संधी उपलब्ध आहेत म्हणून त्याचा नक्कीच योग्य फायदा घ्या.
'इंडियन रेल्वेमधील करिअरच्या संधींबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मा. डॉ. तुषाबा शिंदे सर यांनी स्पष्ट केले की', माझे मूळ क्षेत्र म्हणजे इंडियन रेल्वे आणि हे नोकरीच्या संधींचे सर्वात मोठे साम्राज्य आहे. इंडियन रेल्वेमध्ये तरुणांसाठी असंख्य सुवर्णसंधी उपलब्ध आहेत, परंतु या संधींबद्दल मराठी विद्यार्थ्यांना पुरेशी माहिती नसते. त्यामुळे ते मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या परीक्षांना बसत नाहीत. मी जेव्हा या क्षेत्रात आलो, तेव्हा मलादेखील फक्त स्टेशन मास्टर किंवा तिकीट निरीक्षक (TC) हीच दोन पदे माहित होती. तुम्हाला हे ऐकताना आश्चर्य बाटेल, पण प्रत्यक्षात रेल्वेचे साम्राज्य किती विशाल आहे हे मला येथे आल्यानंतरच कळले. या संपूर्ण व्यवस्थेमागे असलेले प्रशासन आणि प्रचंड मनुष्यबळ याचा व्याप्ती अफाट आहे.
या विषयावर मी माझ्या '५२ आठवड्यांच्या संवाद शृंखलेत 'ही सविस्तर व्याख्यान घेतले आहे. नंतर, जेव्हा मी Indian Railway Personnel Service (IRPS) मध्ये सामील झालो आणि करिअरच्या शेवटच्या वर्षांत मुंबई विभागात कार्यरत होतो, तेव्हा त्या एका विभागात जवळपास ४५,००० कर्मचारी कार्यरत होते. त्या विशाल व्यवस्थेचा मी प्रत्यक्ष अनुभव घेतला.
तुम्ही विचार करू शकता या क्षेत्रातील मनुष्यबळ, चांगल्या पदावर रुजू झालात तर चांगल्या सुविधा सुद्धा उपलब्ध होतात. पूर्वी महाराष्ट्रातील तरुणांना या क्षेत्रात खूप कमी प्रमाणात पाहायला मिळत होते. परंतु, आता चित्र थोर्ड बदलत चालले आहे. आज रोजी चांगल्या पदावर सुद्धा आपला मराठी तरुण पाहायला मिळत आहे. मी पाहिले की मागच्या वर्षभरात ५८ लाख विद्यार्थ्यांनी रेल्वे भरती करिता फॉर्म भरून परीक्षा दिल्या असताना जवळपास १ लाख विद्यार्थ्यांना या विभागात नोकऱ्या प्राप्त झाल्या आहेत. म्हणजेच नोकरी मिळण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात आहे. सोबतच, याला प्लॅन B म्हणून सुद्धा तुम्ही ठेवू शकता. बांगल्या प्रकारच्या बढती आणि आकर्षक वेतन या विभागात आहे.
रेल्वे नोकरीचा एक उत्तम पैलू म्हणजे येथे Non-Gazetted पासून Gazetted पदांपर्यंत उत्कृष्ट करिअर प्रगतीची संधी मिळते. चांगले भत्ते, उत्तम कौटुंबिक जीवन, नोकरीची सुरक्षितता आणि एकंदर उच्च दर्जाचे काम समाधान हे रेल्वे सेवांचे मोठे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे, मी सर्वांना RRB/RRC च्या परीक्षा देण्याची ठाम शिफारस करतो.
यानंतर, दिल्लीतील वातावरण आणि तरुणांनी त्याला कशी सांगड घालावी याबाबत चर्चा करताना विद्याथ्र्यांनी काही प्रश्न विचारले. 'दिल्लीला यावं का?' तर माझं उत्तर नेहमीच एकच असतं हो, नक्की यावं. कारण आपण जोपर्यंत घराच्या बाहेर पडत नाही, तोपर्यंत बाहेरच्या जगात काय चाललं आहे, किती मोठी स्पर्धा आहे, किती संधी आहेत, हे आपल्याला कळतच नाही. जसे मंदिरात गेल्यावर आपल्याला एक वेगळाच प्रसन्न भाव येतो, तसेच दिल्लीला आल्यावर स्पर्धा परीक्षेचे तिथले वातावरण, अभ्यासाची संस्कृती, मेहनती विद्यार्थ्यांचा उत्साह हे सर्व अनुभवताना आपल्याला प्रेरणा मिळते. इथलं बाताबरण मनाला ऊर्जित करतं आणि तुम्ही इथून नव्या जोमाने कामाला लागता.
सध्या पुढचं पाऊल सारख्या संस्था दिल्लीमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या विद्याथ्यांना सर्व प्रकारे मदत करण्याचे उत्कृष्ट कार्य करतात. मा. ज्ञानेश्वर मुळे सर (IFS), मा. आनंद पाटील सर (IAS), मा. सुशील गायकवाड सर (IRTS) आणि असे अनेक वरिष्ठ अधिकारी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहाय्य करतात. त्यांच्या या योगदानामुळे अनेक उमेदवारांना योग्य दिशादर्शन मिळते आणि ते भावी अधिकारी म्हणून विकसित होण्यास मोठी मदत होते.
मराठी विद्यार्थी जेव्हा येथे पाऊल टाकतो तेव्हा काही प्रमाणात त्याला त्रास होतो, परंतु काही दिवसाचा कालावधी जाऊ देता आपण या वातावरणाशी समरस होऊन जातो. जेवढे लवकर शक्य होईल तेवढे लवकर येथील वातावरणाशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करावा. ही परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी तुमच्याकडे प्रबळ इच्छाशक्ती आणि दृढ निश्चय असणे अत्यावश्यक आहे. हे दोन गुण असल्यास पुढील सर्व गोष्टी सहज होत जातात आणि तुम्ही यशाच्या मार्गावर स्थिरपणे पुढे सरकता.
विद्यार्थ्याकडून आलेल्या संबंधीत प्रश्नांवर,
१) स्पर्धा परीक्षेची किंवा कोणत्याही मोठ्या तयारीची सुरुवात करताना संयम हा सर्वात महत्त्वाचा गुण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तयारीदरम्यान कुटुंबीयांचा दबाव, मित्रांचा दबाव, अपेक्षा-निराशा अशी चढउतारांची परिस्थिती सतत येते. अशावेळी आत्मविश्वास कमी-जास्त होतो, पण संयम आणि सातत्यपूर्ण मेहनत हेच तुम्हाला टिकवून ठेवतात. त्यांनी पुढे सांगितले की, नोकरी मिळेपर्यंतचा आपला एक प्रवास आणि नोकरी मिळाल्यानंतरचा आपला दुसरा प्रवास दोन्ही वेगळे आहेत. नोकरी मिळिवणे जेवढे कठीण आहे त्याहून त्याला टिकवून ठेवणे कठीण आहे. याकरिता संयम अतिशय महत्वाचा असतो.
२) आंतरराष्ट्रीय नोकरीच्या संधींबाबत ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी स्वतःहून योग्य आणि पूर्ण माहिती घेणे अत्यंत गरजेचे आहे. ऑनलाइन प्लॅटफॉर्म, अधिकृत वेबसाइट्स, मित्र, परिचित आणि विश्वसनीय संस्था या माध्यमांद्वारे संपूर्ण माहिती घेऊनच अर्ज करावा. ते म्हणाले: "Without full information" आपण फसू शकतो. त्यामुळे दीर्घकालीन करिअर लक्षात ठेवून स्पष्ट योजना करा, सर्व बाबी नौट समजून घ्या आणि मगच पुढे जा. काही संस्थाही विद्यार्थ्यांना याबाबत खूप चांगले मार्गदर्शन करतात, त्याचा लाभ घ्या.
३) त्यांच्या ADB मधील अनुभवाबद्दल बोलताना त्यांनी सांगितलेः "एशियन डेव्हलपमेंट बँकेत काम करताना मला अत्यंत उत्कृष्ट अनुभव मिळाला. तिथे मी 'कामाशी काम' ही संस्कृती शिकली. प्रत्येकाला आपले काम दिले जायचे आणि प्रत्येक जण आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडायचा."
ते पुढे म्हणालेः एखाद्या संस्थेमध्ये टिकून राहण्यासाठी तुमच्या कामाची छाप निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे असते. अन्यथा स्पर्धा इतकी तीव्र असते की तुम्ही मागे पडता आणि तुमची जागा क्षणात दुसरा कोणी घेतो. तिथे नेटवर्किंग, संबंध निर्माण करणे आणि स्वतःची प्रतिमा मजबूत ठेवणे खूप आवश्यक असते कारण यावरच भविष्यातील संधी अवलंबून असतात.
४) मुलींसाठी रेल्वे विभागातील संधींबद्दल विचारल्यावर त्यांनी सांगितलेः इंडियन रेल्वेमध्ये मुलींना सर्वाधिक संधी उपलब्ध आहेत. मुलाखतींमध्येही मुलींना प्राधान्य दिले जाते. Civil Services मध्येही मुलींचे सिलेक्शन रेट मुलांच्या तुलनेत अधिक असतो. आज रेल्वेमध्ये लोको पायलट, स्टेशन मास्टर, ऑपरेशन्स, प्रशासन, तांत्रिक विभाग अशा अनेक पदांवर मुली सक्षमपणे कार्यरत आहेत. त्यांच्या सुरक्षेसाठीही कडक नियम लागू केले गेले आहेत. त्यांनी पुढे मुलींना संदेश दिलाः 'मनात कोणताही न्यूनगंड ठेवू नका. Don't be afraid of anything. तुम्ही कोणतेही आव्हान स्वीकारू शकता, आणि ते उत्तमरित्या पारही पाडू शकता. तुमच्यात ते सामर्थ्य आहे फक्त स्वतः वर विश्वास ठेवा.'
मा. डॉ. तुषाबा शिंदे सर यांची घेतलेली मुलाखत खरोखरच दुतर्फा प्रकारची होती. करिअर कट्टा उपक्रमाने जेव्हाही आपल्याकडे विद्यार्थ्यांकरिता मार्गदर्शनाकरिता हात सामोरे केला, तेव्हा आपण सढळ हाताने ते दान केलं आहे. जगात जर्मनी आणि भारतात परभणी असे म्हटलं जात. महाराष्ट्रातील परभणी येथील व्यक्तिमत्त्व आज दिल्लीत अधिकारी होऊन कर्तृत्व गाजवत आहे ही आमच्या सर्वांकरिता अतिशय अभिमानास्पद बाब आहे. सध्या सर यांचे संपूर्ण कुटुंब दिल्लीमध्ये स्थायिक आहे. त्यांच्या पत्नी दिल्ली सरकारमध्ये कार्यरत आहेत आणि दोन्ही कन्या राष्ट्रपती भवन येथील केन्द्रीय विद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्यांच्या स्वप्नांचा उंच झोका किती दूरवर जाणार आहे, याची कल्पना यावरून सहज करता येते.
हे सर्व शक्य झाले-मोठे स्वप्न बाळगण्याची तयारी, अखंड मेहनत, प्रामाणिक वृत्ती आणि सतत प्रयत्नशील राहण्याच्या गुणांमुळे.
करिअर कट्टा परिवारातर्फे आपले मनःपूर्वक आभार.
धन्यवाद !
शब्दांकन
प्रा. ममता पळसपगार
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदुररेल्वे