विद्यार्थ्यांचे आयुष्य हे केवळ अभ्यासक्रमाच्या चौकटीत मर्यादित नसते. तर, तो एक प्रवास असतो आत्मशोधाचा, स्वप्नांचा आणि समाजाशी संवाद साधण्याचा करिअर कट्टा मासिक हे या प्रवासाचे एक सर्जनशील व्यासपीठ आहे. येथे करिअर म्हणजे केवळ नोकरी नव्हे तर, एक विचारधारा आहे. स्वतःला ओळखण्याची, पडवण्याची आणि समाजात आपले स्थान निर्माण करण्याची, आजच्या विद्यार्थ्यांसमोर संधीचे आकाश विस्तारलेले आहे पण, त्याचवेळी संभ्रमाचे दाही दाटले आहेत कोणता मार्ग नेमका निवडावा? कोणते कौशल्य आत्मसात करावे? स्पर्धा आणि मूल्य यांचा समतोल कसा साधावा? या प्रश्नांची उत्तरं शोधताना करिअर कट्टा मासिक विद्याथ्यांना दिशा देतं ते केबल मार्गदर्शकाच्या भूमिकेतूनच नव्हे तर, पचदर्शक म्हणून सुद्धा.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत जे अभूतपूर्व बदल व्यवस्थेमध्ये होऊ घातलेले आहेत किंवा होत आहेत याचे परिणाम दिसायला अबधी जाऊ द्यावा लागेल हे जरी खरे असले तरी, राज्याच्या उच्ब व तंत्र शिक्षण विभागाने 'सेवाशर्ती कार्यक्रमांतर्गत केलेल्या प्रशासकीय मूल्यांकनात ह्याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय कामकाजाचे मूल्यमापन करून त्यांचा अहवाल मांडण्यात आला. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्झासाठी असणारा गोंडवाना विद्यापीठ हे या अहवालामध्ये ६८ गुणांसह राज्यात अब्बल आलेल आहे. त्यानंतर मुंबई आणि शिवाजी विद्यापीठाला प्रत्येकी ६६ गुण मिळाले आणि पुणे जे विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या क्रमवारी मध्ये खालच्या स्थानावर आहे, अमरावती विद्यापीठाने ६२ गुण तर, यशवंतराव बव्हाण मुक्त विद्यापीठाने ६० गुण मिळवत्त पहिल्या पाच मध्ये स्थान मिळवले आहे मात्र नागपूर विद्यापीठाने ५२ गुण तर मराठवाडा विद्यापीठाने ५० गुण मिळवले असल्याचे आपणास बघायला मिळतं. अशा पद्धतीचे प्रशासकीय कार्यालयाचे शैक्षणिक संस्थांचे विद्यापीठाचे मूल्यमापन वर्षभर होत राहिलं पाहिजे आणि यातून ज्या बाबी दुरुस्त करण्यासाठी आणि सुधारण्यासाठी बाब आहे अशा ठिकाणी संबंधित संस्थांनी बदल करून या विकासाच्या प्रवाहामध्ये सहभागी होणे अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणूनच गोंडवाना विद्यापीठाने मूल्यमापनाच्या अहवालामध्ये राज्यात अवस्थान मिळिवले आहे ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे विद्यापीठाच्या शैक्षणिक संशोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्याचा हा गौरवशाली परिपाक आहे. हे यश विद्यापीठातील प्राध्यापक कर्मचारी विद्यार्थी आणि प्रशासन यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण संशोधनातील नवनवीन उपक्रम तसेच सामाजिक बांधिलकी यामुळे विद्यापीठाने राज्यात अग्रस्थान प्राप्त केले आहे. या अशामुळे गोंडवांना विद्यापीठाने केवळ आपल्या शैक्षणिक सामर्थ्याची प्रचिती दिली नाही तर राज्यातील उच्ब शिक्षण क्षेत्राला नवे आदर्श निर्माण केले आहे असे मला आवर्जून नमूद करावे बाटते आणि म्हणूनच माझ्या आणि करिअर कट्टा परिवारातर्फे गोंडवाना विद्यापीठाचे आणि सन्माननीय डॉ. प्रशांत बोकारे सर (कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली) यांचे खूप खूप अभिनंदन..
करिअर कट्टा या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यभर आपल्या सगळ्यांशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संवाद होत असतो. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मधल्या बन्याच घटकांच आपण केलेलं स्वागत असेल किंवा सुचवलेल्या दुरुसत्या असतील किंवा राबवलेले वेगवेगळे उपक्रम असतील ते निश्चितच एक चांगली बाब किंवा कृतिशील व्हायला लावणारे आहेत. करिअर कट्टाच्या वतीने याच महिन्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अभिनवपूर्ण उपक्रम रिल्स मेकिंग कॉम्पिटिशन अर्थातच रिल्स बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि करिअर कट्टाचे उपक्रम, आर्थिक साक्षरता, इमोशनल इंटेलिजन्स, करिअर संसद, उद्योजक आपल्या भेटीला, करिअर कट्टा आणि मासिक अशा वेगवेगळ्या विषयांवर तरुणांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने स्वतःची कल्पनाशक्ती वापरून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त असे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजच्या आधुनिक युगात माध्यमांचे बदललेले स्वरूप आणि सोशल मीडियाला आलेलं महत्त्व याचा विचार करता तरुणांनी हे कौशल्य आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे हा विचार डोळ्यासमोर ठेवून करिअर कड्डाच्या सर्व विद्याथ्यांसाठी याच आठवड्धामध्ये डिजिटल कंटेंट क्रिएशन आणि मुलाखत लेखनाचे तंत्र आणि कौशल्य सांगण्याचा, शिकवण्याचा एक कोर्स देखील नुकताच घेण्यात आला. यालाही अत्यंत चांगला प्रतिसाद राज्यभरातल्या विद्यार्थ्यांनी दिला. त्यांचे देखील स्किल अपडेट करण्याचा यशस्वी प्रयत्न करिअर कट्टाच्या माध्यमातून करण्यात आला. स्पर्धेचे परीक्षण करणारे प्राध्यापक आणि सहभागी होणारे विद्यार्थी त्यांच्या कौशल्यामध्ये देखील थोड्या प्रमाणात तफावत असल्यामुळे प्राध्यापकांसाठी येणाऱ्या कालावधीमध्ये माध्यमांचा वापर चांगल्या पद्धतीने करून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम बनवणे हे गरजेचे असल्यामुळे करिअर कट्टाच्या वतीने राज्यातील प्राध्यापकांसाठी AI टीचर नावाचा FDP घेतला जाणार आहे. करिअर कट्टाच्या वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये राज्यभरातील विद्यार्थी अत्यंत हिरेरिने सहभागी होत असतात त्यातून त्यांना गुणवत्ता पूर्ण कौशल्य प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न आपण या माध्यमातून करत असतो याचाच एक भाग म्हणून या महिन्यांमध्ये २५ ते ३० नोव्हेंबर या कालावधीमध्ये राज्यातल्या प्रत्येक विभागातून एक विद्यार्थी या पद्धतीने १५ विद्यार्थी व शिक्षकांची टीम दिल्ली दौऱ्यासाठी जात आहे. यामध्ये दिल्लीतील उच्चपदस्थ मराठी अधिकारी ज्यांना विद्याथ्यांच्या जडणघडणीमध्ये स्वारस्य आहे त्याचबरोबर ते सातत्याने सहकाऱ्यांच्या भूमिकेमध्ये असतात अशा ३० हून अधिक सनदी अधिकाऱ्यांच्या मुलाखती हे विद्यार्थी घेतील, वेगवेगळ्या संस्थांना भेटी देतील आणि या माध्यमातून त्यांचा आलेला अनुभव शब्दबद्ध करून डिसेंबर महिन्याच्या मासिकाच्या माध्यमातून हा राज्यभर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या दौऱ्यांच्या दरम्यान विद्यार्थ्यांना करिअरच्या वेगवेगळ्या संधी, देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमधील अनेक संस्था, त्यांची कार्यपद्धती याचा अनुभव घेता येतो. देशाची लोकसभा, राज्यसभा, सुप्रीम कोर्ट, कर्तव्य पद यासारख्या स्थळांना देखील भेट देता येते आणि या माध्यमातून या विद्याथ्यांच्या करिअरची दिशा निश्चित करणे त्यांना मार्गदर्शन करणे हा उद्देश ठेवून उपक्रम दरवर्षी राबवला जातो. यामध्ये दिल्लीतील अनेक प्रशासकीय अधिकारी सहभागी होत असतात त्यांचे देखील या निमित्ताने मी आभार मानतो..
या अंकाचे प्रकाशन देखील या सर्व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये केले जाणार आहे याचाही विशेष उल्लेख या निमित्याने मला करावासा वाटतो.
करिअर कट्टा मासिकाच्या यंदाच्या अंकात सन्माननीय डॉ. तुषाबा शिदि सर यांनी निमंत्रित संपादक या नात्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले आहे की जोपर्यंत आपण आपला कम्फर्ट झोन सोडत नाही तोपर्यंत आपला विकास होऊ शकत नाही तेव्हा आपले पंख पसरा आणि आकाशाला गवसणी घाला. राज्याचे उच्च शिक्षण संचालक सन्माननीय डॉ. शैलेंद्र देवळाणकर सर यांनी विद्याथ्यांसाठी 'बँकिंग क्षेत्र सुधारणाः संधी व आव्हाने' या लेखाच्या माध्यमातून बँकिंग या क्षेत्राचे महत्त्व विशद केलेले आहे. मा. डॉ. राजीव नंदकर सर (अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निबंधक यशदा, पुणे) यांनी 'यशस्वी जीवनासाठी अकरा व्यवस्थापन विषयक कौशल्ये' या लेखाच्या माध्यमातून अत्यंत मौलिक शब्दात मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना सांगितले आहे की केवळ शिक्षण हे पुरेसे नाही जीवन कौशल्य यशाची खरी गुरुकिल्ली आहे हे कौशल्य आत्मसात केल्याने व्यक्ती केवळ शहाणीच नव्हे तर व्यवहारात यशस्वी स्पर्धात्मक आणि समाजासाठी उपयुक्त ठरते सतत शिकत राहणे आणि स्वतःला सुधारत राहणे हे यशस्वी जीवनाचे रहस्य आहे. मा. अमित भोळे सर (संचालक, महसूल विभाग वित्त मंत्रालय, भारत सरकार) यांनी 'स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात ऊर्जा टिकवण्याचे महत्त्व' विद्यार्थ्यांना पटवून दिले आहे. तसेच गर्जे मराठी ग्लोबल अमेरिका या उपक्रमाचे अध्यक्ष मा. आनंद गाणु सर 'करिअर कट्टाः तुमचे ग्राहक आणि स्पर्धक ओळखा' यांनी लेखाच्या साह्याने स्टार्ट अप इकोसिस्टीम या लेखाच्या साह्याने विद्याथ्यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःच्या कल्पनांवर आधारित उद्योजकतेकडे वळावे धोका पत्करावा आणि समाजातील समस्यांना उपाय शोधणारे स्टार्टअप उभारावेत असे मार्गदर्शन केलेले आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित सन्माननीय मिलिंद कांचळे यांच्या दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (DICCI) या संस्थेचा यशस्वी प्रवास मुलाखतीच्या माध्यमातून उलगडला आहे. प्राचार्य डॉ. शरयू तायवाडे मॅडम यांचा उच्च शिक्षण विभागामध्ये करिअर कट्टा कडून संपन्न झालेले उपक्रम यासंबंधीचा सखोलपणे आढावा घेणारा लेख आहे. तर मा प्रा. दिनेश पवार सर यांचा 'ओळख महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची' हा माहिती पूर्ण लेख आहे. अधिकारी मुलाखत या दृष्टिकोनातून मा. तेजस्वी देशपांडे (IPS) यांच्या मुलाखतीवर आधारित शब्दांकन केलेला लेख प्रा. ममता पळसपगार यांनी लिहिलेला आहे. मा. मिथिला दळवी यांचा 'ताण आणि समाधान' लेख आहे या लेखाच्या माध्यमातून ताण हा जीवनाचा भाग आहे पण तो आपला शत्रू नाही योग्य दृष्टिकोनातून पाहिल्यास ताण आपल्याला अधिक सजग, सक्षम आणि समाधानाकडे नेणारा मार्ग दाखवतो हे विशद केलेले आहे. तसेच डॉ. श्रीकांत इंगळे यांचा चालू घडामोडी हा लेख तर प्रा. संदेश कासार यांनी तयार केलेली प्रश्नमंजुषा या अंकात घेण्यात आलेली आहे.
या अंकासाठी ज्या ज्या मान्यवरांनी आपला अमूल्य असा वेळ देऊन लेख लिहिला त्या सगळ्यांचे मी याप्रसंगी आभार मानतो त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो.
अशाप्रकारे संपादकीय मंडळाच्या साह्याने या नोव्हेंबर महिन्याचे करिअर कट्टा मासिक विद्यार्थ्यांसाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहे असे वाटते.
करिअर कट्टा हे फक्त मासिक नाही तर, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारं त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणारं आणि त्यांच्या आत्मविश्वासाला बळ देणारे एक व्यासपीठ आहे आपण सर्वजण या प्रवासाचे सहप्रवासी आहोतच जिज्ञासेपासून ज्ञानापर्यंत आणि ज्ञानापासून कृतीपर्यंत..
करिअर कट्ठाच्या पुढील अंकातही नव्या संकल्पना, नव्या संधी आणि नव्या प्रेरणा घेऊन आपण पुन्हा भेटूच.
आपल्या स्वप्नांना उंच भरारी मिळो हीच सदिच्छा व्यक्त करत थांबतो..
जय हिंद, जय महाराष्ट्र..!