Author
" युवकांनी 'स्व' समजून घेणे गरजेचे "
मा. डॉ. राजीव नंदकर
अतिरिक जिल्हाधिकारी तथा निबंधक, वशदा, पुणे

आजचा काळ हा वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा, जागतिक स्पर्धेचा आणि अमर्याद संधींचा काळ आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देशांपैकी एक मानला जातो. आपल्या देशातील मोठा युवकवर्ग हीच भारताची खरी ताकद आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक हे भविष्यातील प्रशासन, उद्योग, विज्ञान, तंत्रज्ञान आणि समाजजीवन घडविणारे घटक आहेत. परंतु या संधींसोबत अनेक आव्हानेही उभी आहेत. माहितीचा प्रचंड साठा, सोशल मीडियाचा प्रभाव, वाढती स्पर्धा, मानसिक ताण आणि करिअरची अनिश्चितता यामुळे युवक संभ्रमित होतात. अशा परिस्थितीत युवकांनी स्व जाणून स्वतःला ओळखणे, घडविणे आणि योग्य दिशेने पुढे जाणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी युवकांनी 'स्व' या संकल्पनेभोवती आपले व्यक्तिमत्त्व विकसित करणे गरजेचे आहे. खालील दहा 'स्व' युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या ठरतील.

१. स्व-जाणीव (Self-Awareness)

स्वतःच्या क्षमता, मर्यादा, आवडी आणि ध्येयांची जाणीव होणे म्हणजे स्व-जाणीव होय. अनेक विद्यार्थी इतरांच्या प्रभावामुळे करिअर निवडतात. परंतु प्रत्येक व्यक्तीची क्षमता वेगळी असते. काहींना प्रशासनात रुची असते, काहींना विज्ञानात तर काहींना कला किंवा उद्योजकतेत त्यामुळे आपल्याला नक्की काय हवे आहे हे विद्यार्थ्यांनी ओळखले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 'मी कोण आहे?', 'माझे ध्येय काय आहे?' आणि 'माझ्यातील बलस्थान कोणते?' हे प्रश्न स्वतःला विचारणे आवश्यक आहे. हीच स्व-जाणीव आयुष्याची योग्य दिशा निवडण्यास मदत करते.

२. स्व-नियंत्रण (Self-Control)

आजच्या डिजिटल युगात मोबाईल, सोशल मीडिया, मनोरंजन यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होते. अनेक प्रलोभने यालायुवक बळी पडत आहेत. साहजिकच वेळेचे नियोजन न केल्यास अभ्यासावर परिणाम होतो. स्व-नियंत्रण म्हणजे आपल्या भावना, विचार. सवयी आणि इच्छांवर योग्य नियंत्रण ठेवणे. यशस्वी विद्यार्थी अभ्यास, विश्रांती आणि मनोरंजन यांचा समतोल राखतात. रोज काही तास एकाग्रतेने अभ्यास करण्याची सवय लावणे हीच स्व-नियंत्रणाची सुरुवात आहे.

३. स्व-मूल्यमापन (Self-Assessment)

युवकांनी आपल्या प्रगतीचा नियमित आढावा घेणे म्हणजे स्व-मूल्यमापन होय. मात्र असे दिसून येते की आपल्या आयुष्याचे योग्य मूल्यमापन युवक करत नाहीत. त्यामुळे नक्की आपण योग्य मार्गावर आहोत की नाही याचे आकलन त्यांना होत नाही. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी फक्त अभ्यास पुरेसा नसतो; अभ्यासाची गुणवत्ता तपासणेही गरजेचे असते. ही गुणवत्ता फक्त स्व-मूल्यांकन यातूनच तपसली जावू शकते. मॉक टेस्ट, लेखन सराव, वेळेचे व्यवस्थापन आणि चुका यांचे विश्लेषण केल्यास स्वतःमधील उणिवा लक्षात येतात. जो विद्यार्थी स्वतःच्या चुका स्वीकारतो आणि सुधारतो तोच पुढे जातो

४. स्व-प्रेरणा (Self-Motivation)

यशाचा प्रवास नेहमी सोपा नसतो. अपयश, टीका आणि अडचणी यांचा सामना प्रत्येक युवकाला करावा लागतो. अशा वेळी बाहेरील प्रेरणेपेक्षा अंतर्गत प्रेरणा अधिक महत्त्वाची असते. स्व-प्रेरित विद्यार्थी अपयशाला शिकण्याची संधी मानतात. 'मी करू शकतो' हा आत्मविश्वास त्यांना पुढे नेत असतो. प्रेरणादायी पुस्तके वाचणे, सकारात्मक विचार ठेवणे आणि लहान उद्दिष्टे पूर्ण करणे यामुळे प्रेरणा टिकून५. स्व-विस्तारीकरण (Self-Exploration)

महाविद्यालयीन काळ हा स्वतःला शोधण्याचा काळ असतो. फक्त पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता युवकांनी विविध क्षेत्रांचा अनुभव घेणे खूप गरजेचे आहे. वाचन, वक्तृत्व, लेखन, क्रीडा, स्वयंसेवा, संशोधन, तंत्रज्ञान, कला अशा विविध उपक्रमांत सहभागी झाल्यास व्यक्तिमत्त्व विकसित होते. स्व-विस्तारीकरणमुळे विद्यार्थ्यांना स्वतःमधील लपलेल्या गुणांची ओळख होते आणि ते अधिक विकास आणि प्रगती साधू शकतात.

६. स्व-शिस्त (Self-Discpiline)

युवकांच्या यशामागील सर्वात मोठे रहस्य म्हणजे शिस्त होय. अनेक विद्यार्थी मोठी स्वप्ने पाहतात; पण सातत्य नसल्यामुळे मध्येच थांबतात आणि भरकटतात. स्व-शिस्त म्हणजे नियमित प्रयत्नांची सवय होय. दररोज निश्चित वेळेला अभ्यास करणे, आरोग्याची काळजी घेणे, वेळेचे नियोजन करणे आणि उद्दिष्टावर लक्ष केंद्रित ठेवणे ही यशाची गुरुकिल्ली आहे. स्पर्धा थेतील यश हे एका दिवसाचे नसून दीर्घकालीन शिस्तबद्ध चेि फलित असते हे सर्व युवकांनी लक्षात ठेवणे गरजेचे K आहे.

७. स्व-समाधान (Self-Satisfaction)

आज अनेक युवक इतरांशी तुलना करून स्वतःला कमी समजतात. सोशल मीडियावर दिसणारे एकांगी यश पाहून निराशा होतात. कारण जग तसेच आहे असा त्यांचा गैरसमज निर्माण होतो. स्व-समाधान म्हणजे स्वतःच्या प्रगतीबद्दल आनंदी राहणे. प्रत्येकाची वाट वेगळी असते. स्वतःची तुलना स्वतःशी करावी, इतरांशी नाही. मनःशांती आणि समाधान यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते.

८. स्व-समर्पण (Self-Dedication)

ध्येयासाठी पूर्णपणे समर्पित होणे आवश्यक आहे. अर्धवट प्रयत्न कधीच मोठे यश देत नाहीत. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी संयम, मेहनत आणि सातत्य यांनाजीवनाचा भाग बनवले पाहिजे. समर्पणामुळे कठीण परिस्थितीतही टिकून राहण्याची ताकद मिळते. गुणवत्ता महत्वाची आहे परंतु त्यापेक्षा समर्पण महत्वाचे आहे हे लक्षात ठेवा.

९. स्व-संपूर्णता (Self-Wholeness)

फक्त शैक्षणिक यश म्हणजे संपूर्ण विकास नाही. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि सामाजिक विकास यांचा समतोल असणे आवश्यक आहे. अनेक वेळा स्मरणशक्ती हीच बुद्धिमत्ता आहे असा गैरसमज केल्याने अनेक लोक आयुष्यात मागे राहून जातात. योग, व्यायाम, वाचन, संवादकौशल्य, सामाजिक संवेदनशीलता आणि नैतिक मूल्ये यामुळे व्यक्तिमत्त्व परिपूर्ण बनते. युवकांनी केवळ करिअरकडेच नव्हे तर चांगला नागरिक बनण्याकडेही लक्ष दिले पाहिजे.

१०. स्व-आत्मसाक्षात्कार (Self-Realization)

स्वतःच्या अस्तित्वाचा आणि जीवनाच्या उद्देशाचा शोध घेणे म्हणजे स्व-आत्मसाक्षात्कार. शिक्षण हे फक्त नोकरीसाठी नसून समाजासाठी उपयोगी माणूस घडविण्यासाठी आहे. जे युवक आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी करतात तेच खऱ्या अर्थाने यशस्वी ठरतात. प्रशासन, विज्ञान, शेती, उद्योग किंवा सामाजिक क्षेत्र कोणतेही असो, समाजहिताची भावना महत्त्वाची आहे.

आजच्या युवकांसमोर संधींचे विशाल आकाश खुले आहे. डिजिटल क्रांती, नवीन करिअर क्षेत्रे, स्पर्धा परीक्षा आणि जागतिक स्तरावरील संधी यामुळे युवक मोठी स्वप्ने पाहू शकतात. परंतु या संधींचा योग्य उपयोग करण्यासाठी आत्मविश्वास, शिस्त, संयम आणि सकारात्मक दृष्टिकोन आवश्यक आहे. 'स्व' ची जाणीव असलेला युवकच खऱ्या अर्थाने सक्षम नागरिक बनतो. स्व-जाणीव ते स्व-आत्मसाक्षात्कार हा प्रवास प्रत्येक युवकाने केला तर तो केवळ स्वतःचे जीवन घडवणार नाही तर समाज आणि राष्ट्राच्या विकासातही महत्त्वपूर्ण योगदान देईल. आजचा युवक हा उद्याच्या भारताचा शिल्पकार आहे; त्यामुळे त्याने स्वतःला घडविण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.