Author
" उच्च शिक्षण विभागामध्ये करिअर कट्टाकडून संपन्न झालेले उपक्रम "
मा. डॉ. शरयू व. तायवाडे
प्राचार्य तायवाडे कॉलेज महादुला, कोराडी

नागपूर विभागीय कार्यशाळा-२२ एप्रिल २०२६

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा या युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत उपक्रमांतर्गत विभागीय एकदिवसीय कार्यशाळा दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी धनवटे नॅशनल कॉलेज येथे उत्साहात आणि यशस्वीरित्या संपत्र झाली. या कार्यशाळेत शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर, प्राचार्य, समन्वयक तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला मा. श्री. यशवंत शितोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत कोठे, विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. शरयू तायवाडे, प्राचार्य प्रवर्तक डॉ. सुजित मेत्रे, विभागीय समन्वयक श्री. नरेंद्र रघटाटे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहविभागीय समन्वयक डॉ. वर्षा वैद्य यांनी केले.

कार्यशाळेमध्ये करिअर कट्टा संकल्पना, त्याची स्थापना, राज्यभर झालेला विस्तार, विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध विविध कोर्सेस, प्रशासकीय मान्यता, महाविद्यालय नोंदणी प्रक्रिया, सेंटर ऑफ एक्सलन्स, कॉलेज ऑफ एक्सलन्स विथ पोटेन्शिअल, CSR प्रकल्प, विविध क्लब, स्पर्धा, करिअर फड़ा अॅप, मासिक आणि युवकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. विशेषतः "IAS आपल्या भेटीला" आणि "उद्योजक आपल्या भेटीला" या उपक्रमांचा विद्यार्थ्यांच्या करिअर घडविण्यातील प्रभाव अधोरेखित करण्यात आला. मार्गदर्शन करताना डॉ. सुजित मेत्रे यांनी प्रत्येक महाविद्यालयाने करिअर कट्ट्याशी जोडले जावे, नवीन संकल्पनांना स्वीकारावे आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयोगशील दृष्टीकोन ठेवावा असे सांगितले. मा. श्री. यशवंत शितोळे यांनी करिअर कट्ट्याचा प्रवास, युवकांसाठी निर्माण झालेल्या संधी आणि शिक्षकांची भूमिका यावर सखोल मार्गदर्शन केले. डॉ. शरयू तायवाडे यांनी

कोविडनंतर बदललेल्या विद्यार्थी मानसिकतेच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी करिअर कट्टा महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांशी नाते निर्माण करून त्यांना सकारात्मक उपक्रमांमध्ये सहभागी करून घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान नवनियुक्त विभागीय समन्वयक म्हणून विनोद हजारे, नियोजन समिती जिल्हा समन्वयक अक्षय बाहिले आणि तन्जा गव्हाळे यांचे सत्कार करण्यात आले. शेवटी श्री. नरेंद्र रघटाटे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि कार्यशाळेची सांगता झाली. युवकांना करिअर, कौशल्य विकास आणि व्यक्तिमत्व घडविण्याची नवी दिशा देणारा करिअर कद्रा हा राज्यातील प्रभावी परिवर्तनाचा मंच ठरत असल्याचे या कार्यशाळेतून पुन्हा अधोरेखित झाले. अमरावती विभागीय कार्यशाळा-२३ एप्रिल २०२६

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'करिअर कड़ा" या उपक्रमाच्या विभागीय कार्यशाळेचा शुभारंभ आणि संपूर्ण कार्यशाळा अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी बातावरणात २३ एप्रिल २०२६ संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ अमरावती येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र), उद्घाटक मान. डॉ. मिलिंद बारहाते (कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ), मार्गदर्शक मा. डॉ. राजीव बोरकर (विद्यार्थी विकास संचालक, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती), प्रमुख उपस्थिती डॉ. धनंजय तळवणकर (अमरावती, विभागीय प्राचार्य प्रवर्तक), तसेच मा. डॉ. दिनेशखेडकर आणि डॉ. रंजना जीवने (अमरावती विभागीय समन्वयक) उपस्थित होते. याच सत्रात नवनियुक्त प्राचार्य प्रवर्तक, जिल्हा समन्वयक आणि विद्यार्थी नियोजन समितीचे विद्यार्थी यांचे मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

डॉ. दिनेश खेडकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि NAAC मूल्यांकनाच्या संदर्भात करिअर कट्ठाचे महत्व स्पष्ट केले. डॉ. उमेश कनेरकर यांनी "AI आणि MoU" या आधुनिक विषयावर सखोल माहिती दिली. प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर बांनी करिअर कट्टा अंतर्गत उपलब्ध कोर्सेस, शिष्यवृत्ती व करिअर संसद याबाबत माहिती दिली. प्रा. ममता पळसपगार यांनी विविध क्लब्सद्वारे विद्याध्यांच्या कौशल्यविकासाची दिशा स्पष्ट केली. याच सत्रात मा. यशवंत शितोळे यांनी "सेंटर ऑफ एक्सेलंस" व "कॉलेज विथ पोटेन्शियल ऑफ एक्सेलंस" या संकल्पनांवर सविस्तर मार्गदर्शन केले. समारोप सत्राला संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथील प्र कुलगुरू मान. डॉ. महेंद्र ढोरे सर हे अध्यक्षस्थानी उपस्थित असून त्यांनी करिअर कट्टा उपक्रमाची महती सर्वांसमोर सादर केली. संपूर्ण कार्यशाळेचे संचालन डॉ. रेखा मगिरवार यांनी केले तर आभार डॉ. रंजना जीवने यांनी मानले.

छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यशाळा-२४ एप्रिल

२०२६

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणारा करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागाची एक दिवसीय कार्यशाळा दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील सेंट्रल फॅसिलिटी फॉर अॅडव्हान्स रिसर्च अँड ट्रेनिंग ऑडिटोरियम येथे (CFART) उत्साहपूर्ण बातावरणात पार पडली. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कौशल्य संवर्धन, सामाजिक जाणीव आणि नवोन्मेषपूर्ण शैक्षणिक बातावरण आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकासासह उज्वल करिअर घडविणे शक्य होईल, असे त्यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र), तसेच विभागीय प्राचार्य प्रवर्तक डॉ. भारत खंदारे, प्राचार्य प्रवर्तक बीड, डॉ. हरिदास विधाते, प्राचार्य प्रवर्तक जालना, डॉ. मिलिंद पंडित, प्राचार्य प्रवर्तक धाराशिव, डॉ.संजय अस्वले, विभागीय समन्वयक, डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार, सह विभागीय समन्वयक, डॉ. वैशाली पेरके यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. अध्यक्षीय भाषणात मा. यशवंत शितोळे यांनी करिअर

कट्टा उपक्रमाचा प्रवास, स्थापना, मागील पाच वर्षांतील यशस्वी वाटचाल आणि राज्यभरातील उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला. दर्जेदार शिक्षणासोबत संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता, स्टार्टअप आणि स्पर्धा परीक्षांद्वारे विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समारोप सत्रात अधिष्ठाता डॉ. महेंद्र शिरसाठ अध्यक्षस्थानी होते. त्यांनी आपल्या भाषणात करिअर कट्टा हा विद्यार्थ्यांचे करिअर घडविणारा दिशादर्शक उपक्रम असल्याचे सांगत सर्व महाविद्यालये आणि विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आव्हान केले. या कार्यशाळेत विविध मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच नवनियुक्त जिल्हा समन्वयक, प्राचार्य प्रवर्तक आणि विविध पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा समन्वयक डॉ. डी. आर. पानझाडे आणि डॉ. वायचळ यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. दत्ता नरसाळे व डॉ. वैशाली पेरके यांनी केले. छत्रपती संभाजीनगर विभागातील धाराशिव, जालना, बीड, नगर आदी जिल्ह्यांतील प्राचार्य, जिल्हा समन्वयक, तालुका समन्वयक, महाविद्यालयीन समन्वयक, ठाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या उपस्थितीमुळे कार्यशाळेला विशेष उत्साह लाभला.

मुंबई विभागीय कार्यशाळा-२८ एप्रिल २०२६

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'करिअर कट्टा' अंतर्गत आयोजित विभागीय एकदिवसीय कार्यशाळा दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी मुंबई विद्यापीठाच्या नॅशनल सेंटर ऑफ नॅनो सायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजीच्या सेमिनार हॉलमध्ये उत्साहात पार पडली. विद्याथ्याँच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून आयोजित या कार्यशाळेला मुंबई विभागांतर्गत असणाऱ्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राचार्य प्रवर्तक, जिल्हा समन्वयक तसेच प्राध्यापकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यशाळेमध्ये मार्गदर्शन सत्र मध्ये जिल्हा समन्वयक, सिंधुदुर्ग डॉ. अजित दिघे यांनी मधुर समन्वय आणि प्रकल्प आणि FDP या विषयावर तसेच जिल्हा समन्वयक, रत्नागिरी डॉ. सुनील भादुले यांनी करिअर कट्टाचा नॅक मूल्यांकनामध्ये होणारा फायदा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तसेच मुंबई विभागीय सहसमन्वयक डॉ. बबन शिनगारे यांनी करिअर संसद पदाधिकाऱ्यांचे बारामती अधिवेशन या विषयावर विचार मांडले. तसेच मुंबई विभागीय समन्वयक डॉ. दीपा वर्मा यांनी सेंटर ऑफ एक्सलन्स कॉलेज ऑफ एक्सलन्स आणि COE-P करिअर कट्टा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई विभागीय समन्वयक मा. प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांनी केले. प्रास्ताविक करताना करिअर कट्टा उपक्रमाची भूमिका, उद्दिष्टे आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा नेमका आढावा त्यांनी उपस्थितांसमोर मांडला. त्यानंतर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेले मा. श्री. यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र) यांनी करिअर कट्टाच्या

आगामी वाटचालीवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा उपक्रम किती प्रभावी ठरत आहे, याबाबत ठाम विश्वास व्यक्त केला. दर्जेदार शिक्षणासोबत संशोधन, नवोपक्रम, उद्योजकता, स्टार्टअप आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची स्वप्ने साकार करण्यासाठी करिअर कट्टा सक्षम व्यासपीठ निर्माण करत असल्याचे त्यांनी नमूद केले. तर जिल्हा समन्वयक मुंबई प्रा. स्नेहा जगदाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी आगामी कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यशाळा, उपक्रम आणि नियोजनाबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. शिक्षण, कौशल्य आणि संधी यांचा प्रभावी संगम साधत विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्याचे काम करिअर कट्टा सातत्याने करत असल्याचे या कार्यशाळेतून अधोरेखित झाले.