Author
" उद्दिष्ट "
-
-

करीअर संसदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या समोर त्यांच्यातीलच काही प्रतिनिधी विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांचे रोल मॉडेल उभे करणे हा त्या पाठीमागील उद्देश आहे.

साध्य

करिअर संसदेचे पदाधिकारी म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यां च्या व्यक्तिमत्त्वांमध्ये आमुलाग्र बदल होतात. करिअर संसदेच्या माध्यमातून पदाधिकारी म्हणून काम करत असताना विद्यार्थी कौशल्य विकास विभाग, उद्योजकता विकास विभाग, सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क नियोजन कायदे व शिस्तपालन इत्यादी विभागाची कार्यपद्धती समजून घेतात आणि निश्चितच ही कार्यपद्धती समजून घेतल्यामुळे त्यांच्या कामाला योग्य अशी दिशा मिळते त्याचबरोबर ते स्वयंशिस्त हा गुण देखील या ठिकाणी आत्मसात करतात. त्यामुळे विद्यार्थ्यां च्या व्यक्तिमत्व विकासामध्ये भर पडते. जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर युवा पिढीकडून खर्च केला जातो अशी तक्रार बऱ्याच वेळेला आपणास ऐकायला मिळते पण याच मोबाईलचा उपयोग करिअरसाठी करण्याचा एक अत्यंत चांगला प्रयत्न आपल्यातीलच काही विद्यार्थी करत आहेत हे उदाहरण ज्यावेळेला इतर विद्यार्थ्यांच्या समोर उभं राहील त्यावेळी इतर विद्यार्थी देखील त्यांचे अनुकरण करतील आणि साधारणतः सात ते दहा तास मोबाईलवर मनोरंजनासाठी खर्च करणारी पिढी तंत्रज्ञानाचा, मोबाईलचा योग्य वापर करून करिअरला दिशा देण्याचा प्रयत्न करेल.

सहभागी विद्यार्थ्यांचा शपथविधी

करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती झाल्याची माहिती महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना व्हावी तसेच करिअर संसदेतील पदाधिकाऱ्यांना देखील त्यांच्या जबाबदारी जाणीव व्हावी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा शपथविधी १५ जुलै रोजी जागतिक किंवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने केला जातो. राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या मत्रिमंडळाचा शपथविधी ज्या पद्धतीने पार पाडतो त्याच पद्धतीने विहित नमुन्यांमध्ये विहित वेळेमध्ये हा शपथविधी प्राचार्य व समन्वयक यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला जातो.

सदर शपथविधीच्या वेळी विद्यार्थ्यांना शपथविधी झाल्यानंतर नियुक्तीपत्र देखील विहित मध्ये देणे अपेक्षित आहे.

शपथविधीचा नमुना

मी श्रावणी साधना संदेश कासार, आपल्या सर्वांच्या साक्षीने शपथ घेतो की, देशभक्त रत्नाप्पा कुंभार कॉमर्स कॉलेजमध्ये 'करिअर कट्टा' या उपक्रमांतर्गत स्थापन करण्यात येणाऱ्या करिअर संसदेचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या पदाला योग्य न्याय देईन.

युवकांच्या करिअरला दिशा देण्यासाठी तसेच युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासन, राज्य शासन, विद्यापीठ, महाविद्यालय व वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून जे जे उपक्रम राबविणे आवश्यक आहे, ते सर्व उपक्रम राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. माझ्या वर्तणुकीतून युवकांमध्ये कोणत्याही पद्धतीचे भेद निर्माण होणार नाहीत याची काळजी घेईन. माझ्या कार्यकालामध्ये महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ राहील, माझे सर्व युवा मित्र मैत्रिणी यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राहील व ते धूम्रपान विरोधी मोहिमेमध्ये सहभागी होतील यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. निर्व्यसनी कर्तृत्वसंपन्न भविष्याचा वेध घेऊन पालकांच्या कष्टाची जाणीव ठेवून युवकांना योग्य वयात योग्य दिशा देण्यासाठी आवश्यक ते सर्व उपक्रम युवकांच्या सहकार्याने युवकांपर्यंत पोहचवण्याचा मी प्रयत्न करेन. मी महाविद्यालयाचा गुणवंत विद्यार्थी म्हणून माहाविद्यालयातील चागंल्या बाबींचा समाजमाध्यमांवर प्रचार आणि प्रसार करेन. तसचे समाजामध्ये दुही माजवणाऱ्या, सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्या कोणत्याही संदेशाचे प्रसारण किंवा प्रचार करणार नाही.

माझे महाविद्यालय, माझे कुटुंब व समाज यांना अभिमान वाटेल असे कार्य माझ्या हातनू घडेल यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.

करिअर संसद कार्यकृती आराखडा

करिअर कट्टा या उपक्रमामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची रुची व सहभाग वाढावा तसेच त्यांच्या करिअर विषयी दृष्टिकोनांमध्ये जास्तीत जास्त स्पष्टता यावी या उद्देशाने प्रत्येक महाविद्यालयांमध्ये कमीत कमी नऊ विद्यार्थ्यांचा सहभाग असणारी करिअर संसद बनवण्यात यावी त्याची नियमावली पुढीलप्रमाणेः

१. पदवीच्या दुसऱ्या वर्षा मध्ये सहभागी असणाऱ्या किंवा त्यापुढील कोणत्याही वर्गातील विद्यार्थ्यांचा समावेश करिअर

संसद मध्ये करण्यात यावा.

२. किमान ५० टक्के जागांवर मुलींची निवड करण्यात यावी.

३. कमीत कमी ९ विद्यार्थी करिअर संसद मध्ये असतील.

४. करिअर संसदेमधील विद्यार्थ्यांचा कालावधी हा एक वर्षाचा असेल.

५. प्रतिवर्षी १५ जुलै जागतिक युवा कौशल्य दिना निमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा करिअर संसदेचा पदग्रहण

शपथविधी व स्थापना दिवस असेल.

६. संसदेमध्ये पुढील प्रमाणे पदांचा समावेश असेल.

१. मुख्यमंत्री

२. नियोजन मंत्री

३. कायदेव शिस्त पालन मंत्री

४. सामान्य प्रशासन मंत्री

५. माहिती व प्रसारण मंत्री

६. उद्योजकता विकास

७. रोजगार स्वयंरोजगार मंत्री

८. कौशल्य विकास मंत्री

९. संसदीय कामकाज मंत्री

१०. सदस्य

११. सदस्य

करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांचे पदनिहाय अधिकार, जबाबदारी व कर्तव्य