१. महाविद्यालयामध्ये द्वितीय वर्षा मध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड एक वर्षासाठी करिअर संसदेचे पदाधिकारी म्हणून करण्यात येते.
२. करिअर संसदेचे नऊ सदस्य निवडल्यानंतर त्यांच्या मधून महाविद्यालयाचे प्राचार्य व करिअर कट्टा समन्वयक यांच्या देखरेखीखाली नियुक्त समिती सर्व करिअर कट्टा पदाधिकाऱ्यांच्या मंत्रिपदाचे वाटप करते.
३. करिअर संसदेचे पदाधिकारी नियुक्त करत असताना मंत्रिमंडळाची संख्या जरी निश्चित असली तरी महाविद्यालयाचा विस्तार विचारात घेऊन यामध्ये सदस्य संख्येमध्ये वाढ केली जाऊ शकते.
४. प्रतिवर्षी १ जुलै ते ७ जुलै या कालावधीमध्ये करिअर संसदेमध्ये काम करण्यास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कडून अर्ज मागवले जावेत.
५. १ ते ९ जुलै पर्यंत आलेल्या अर्जाची पडताळणी करून निवड समिती कडून करिअर संसदेची निवड प्रक्रिया पूर्ण करावी व विहित नमुन्यांमध्ये निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची माहिती करिअर कट्टाकडे १० जुलै रोजी सायंकाळी ५.०० पूर्वी पाठवावी.
६. १० जुलै रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत प्राप्त होणाऱ्या सर्व करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांना करिअर कट्टाकडून प्रमाणपत्र, करिअर डायरी व करिअर कट्टाचे बॅचेस देण्यात येतील.
७. १० जुलै नंतर करिअर कट्टाकडे माहिती पाठवणाऱ्या करिअर संसदेसाठी प्रमाणपत्र व करिअर डायरी हे सॉफ्ट कॉपी मध्ये मिळतील पण करिअर कट्टाचे बॅचेस मात्र पोस्टाने पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल.
८. १५ जुलै हा जागतिक युवा कौशल्य दिन आहे या निमित्ताने राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये जागतिक युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधून करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांचा शपथविधी सोहळा प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला जाईल.
९. करिअर संसदेचे सर्व पदाधिकारी करिअर कट्टाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या राज्यस्तरीय व्हॉट्सअॅप व टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून एका प्लॅटफॉर्मवर येतील.
१०. करिअर कट्टाच्या वतीने सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्याची माहिती देण्यासाठी तसेच व्यक्तिमत्व विकासासाठी २० जुलै ते ३१ जुलै या कालावधीमध्ये सलग १० दिवसांचेऑनलाईन प्रशिक्षण आयोजित केले जाते.
११. करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांच्या कर्तव्याची माहिती दिल्यानंतर व व्यक्तिमत्व विकासाचे ऑनलाइन शिबिर पार पडल्यानंतर प्रत्येक आठवड्याला रविवारी सकाळी १०.०० वाजता करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण पार पडते.
१२. करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांनी करिअर डायरी मध्ये लिखाण करणे आणि यातील सूचनांचे पालन करणे हे अत्यावश्यक आहे.
१३. करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या महाविद्यालयाच्या सहकार्याने दर महिन्याला एक यशस्वी 'अ श्रेणी' तील अधिकाऱ्याची मुलाखत घेणे तसेच यशस्वी उद्योजकांची मुलाखत घेणे अपेक्षित आहे.
१४. करिअर संसदेतील पदाधिकाऱ्यांनी आपल्या अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त दर महिन्याला किमान एक पुस्तकाचे वाचन करून त्याची नोंद करिअर डायरीमध्ये करणे अपेक्षित आहे.
१५. करिअर संसदेतील पदाधिकाऱ्यांनी दर महिन्याला किमान एक कौशल्य आत्मसात करून त्याची नोंद करिअर डायरीमध्ये करणे अपेक्षित आहे.
१६. करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांनी महिन्यातून एका वेळेस आपल्या करिअर डायरीची तपासणी महाविद्यालयाचे समन्वयक कि वा महाविद्यालयाने नेमून दिलेल्या प्राध्यापकांकडून करून घेणे अपेक्षित आहे.१७. करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांना तीन वर्षाच्या करिअर डायरीतील दरवर्षी बारा महिन्याच्या नोंदी तपासून अ, ब, क, ड या श्रेणीमध्ये सॉफ्ट कॉपीमध्ये प्रमाणपत्र वितरित करण्यात येते.
१८. तिन्ही वर्ष यशस्वीरित्या डायरीची नोंद करणारे विद्यार्थी विशेष प्रमाणपत्रांनी गौरवण्यात यते.
१९. १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान करिअर कट्टा अंतर्गत होत असलेल्या 'करिअरच्या संधीचा महामेळावा' या उपक्रमामध्ये करिअर संसदेचे सर्व पदाधिकारी सहभागी असतील व ती माहिती आपल्या अन्य विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सहकार्य करतील.
करिअर संसदेतील पदाधिकाऱ्यांना करिअर कट्टाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशा देण्यासाठी चाललेले सर्व प्रयत्न स्वतः समजून घेणे व विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवणे यासाठी समाज माध्यमांचा चांगल्या पद्धतीने वापर करावा यासाठी समाज माध्यमांचा विधायक वापर यावर आयोजित कार्यशाळा देखील घेण्यात येते. करिअर संसदेचा पदाधिकारी हा समाजातील एक उत्कृष्ट नागरिक बनून देशाच्या विकासासाठी पर्यायाने कुटुंबाच्या उन्नतीसाठी कार्यरत राहील असा विश्वास वाटतो.