Author
" करिअर संसदीय पदे "
-
-

१. करिअर संसदेचा मुख्यमंत्री या नात्याने करिअर कट्टाच्या वतीने आयोजित सर्व महाविद्यालयातील उपक्रमाला उपस्थित राहणे.

२. संसदेचा मुख्यमंत्री या नात्याने सर्व मत्रिमंडळातील सदस्य व सहकारी मंत्री यांच्यामध्ये सुसंवाद ठेवणे.

३. आपल्या मंत्रिमंडळातील सर्व पदाधिकारी नेमून दिलेले कार्य दिलेल्या वेळेत पूर्ण करत आहोत की नाही यावर लक्ष ठेवणे.

४. करिअर व कट्टाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची अंमलबजावणी होत असताना गैरवर्तन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांची माहिती समन्वयकांच्या पर्यंत पोहोचवणे.

५. मुख्यमंत्री या नात्याने आपल्या मंत्रिमंडळामधील कोणत्याही महिला पदाधिकारीच्या बाबतीत अन्य सहकाऱ्यांकडून गैरवर्तन होणार नाही याची खबरदारी घेणे.

६. करिअर कट्टाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या करिअर विषयक विधायक उपक्रमाची माहिती महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचेल यासाठी सहकार्य करणे.

७. महाविद्यालयांमध्ये घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या विद्यार्थीभिमुख उपक्रमांचा प्रसार आपल्या समाज माध्यमावरून सर्व पदाधिकारी करतील यासाठी स्वतः कृती करून त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन देणे.

८. करिअर संसदेचा मुख्यमंत्री या नात्यानेआपल्या मंत्रिमंडळातील निष्क्रिय सदस्य किंवा गैरवर्तन करणारे सदस्य निलंबित करणे व त्या जागी दुसऱ्या सदस्यांची निवड करणेयाबाबत समन्वयकांकडे सूचना करणे.

 

नियोजन मंत्री

 

करिअर संसदेचा नियोजन मंत्री म्हणून पुढील कार्यपूर्ती करणे अपेक्षित आहे.

१. करिअर संसदेचा नियोजन मंत्री या नात्याने करिअर कट्टाच्या राज्यस्तरीय समितीकडून आखून दिलेला उपक्रम महाविद्यालयामध्ये राबवणीसाठीचे योग्य नियोजन करणे.

२. मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना करिअर कट्ट्याच्या महाविद्यालयीन तसेच राज्यस्तरावरील उपक्रमाबाबत वेळोवेळी माहिती देणे.

३. करिअर संसदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन घ्यावयाची मुलाखत, औद्योगिक भेट, शासकीय कार्यालयासाठीची भेट किंवा महाविद्यालयातील एखाद्या उपक्रमाचे आयोजन यासाठीच्या नियोजनामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका सर्वांच्या सूचनेचा आदर करून पार पाडणे.

४. कोणताही उपक्रम वेळेत पार पाडण्यासाठी सर्व मंत्रिमंडळाशी समन्वय साधने त्यांच्यामध्ये आदेशामधील एकवाक्यता राहील यासाठी प्रयत्न करणे.

५. नियोजन झाल्यानंतर ते पूर्ण करत असताना ज्या सदस्यांकडून सातत्याने जाणीवपूर्वक विलंब होत असेल किंवा दिलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष होत असेल तर अशी माहिती मंत्रिमंडळाचे मुख्यमंत्री तसेच कायदे व शिस्तपालन मंत्री यांना कळवणे.

६. महावि द्यालयामध्ये विद्यार्थी व महाविद्यालय यांच्या सोयीच्या वेळेनुसार करिअरला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांचे नियोजन करणे बाबत आलेल्या सूचना प्राचार्य व समन्वयक यांच्यापर्यंत पोहोचवणे व नियोजनामध्ये सहकार्य करणे.

 

कायदे व शिस्तपालन मंत्री

 

करीअर संसदेच्या कायदे व शिस्तपालन मंत्री म्हणून पुढील कार्यकारणी अपेक्षित आहे

१. करिअर संसदेचे सर्व पदाधिकारी राज्यस्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमाला नियमित उपस्थित राहतील याची काळजी घेणे.

२. करिअर संसदेचे पदाधिकारी ऑनलाईन प्रशिक्षण वर्गाला पूर्णवेळ उपस्थित राहतील व दिलेल्या सूचनांचे पालन करतील याकडे लक्ष देणे व सदर बाबीचे पालन न करणाऱ्या व्यक्तींना असे न करणे याबाबत सूचना देणे.

३. कायदे व शिस्तपालन मंत्री म्हणून मुख्यमंत्री वगळता अन्य सर्व मंत्री व सदस्य यांना आपण वारंवार सूचना करून देखील ते उपक्रमांची बाबतची शिस्तपालन करत नसतील तर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सदर सदस्यांची माहिती व झालेल्या चुका कळवणे.

४. करिअर संसदेच्या नियमित बैठका पार पडतील तसेच सर्व सदस्य बैठकांना उपस्थित असतील याची काळजी घेणे.

५. महाविद्यालयांमध्ये कोणताही उपक्रम राबवला जात असताना मंत्रिमंडळातील सदस्याकडून गैरवर्तन होणार नाही, मंत्रिमंडळातील महिला सदस्यांच्या बाबतीमध्ये निष्काळजीपणा होणार नाही याची काळजी घेणे व या ठिकाणी कोणतेही गैरवर्तन आढळल्यास त्याची माहिती तात्काळ मंत्रिमंडळाचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री व महाविद्यालयाचे समन्वयक यांच्यापर्यंत पोहोचवणे.

६. करिअर संसद पदाधिकारी एकत्रित अधिकाऱ्यांची मुलाखत, उद्योजकांची मुलाखत, शासकीय कार्यालयाची भेट किंवा राज्यस्तरीय अधिवेशन या ठिकाणी प्रवास करत असतील किंवा त्यांचा वावर असेल त्यावेळी संपूर्ण पदाधिकाऱ्यांचे वर्तन हे शिस्तबद्ध राहील यासाठी प्रयत्न करणे व यामध्ये पदाधिकाऱ्यांकडून सहकार्य मिळत नसल्यास त्याबाबत मुख्यमंत्री व महाविद्यालयाच्या समन्वयक यांना माहिती देणे.

७. करिअर कट्टाकडून करिअर संसदेसाठी दिलेले टास्क वेळेत पूर्ण होतील यासाठी पाठपुरावा करणे.

८. वारंवार शिस्तभंग करणाऱ्या सदस्यांची निवड रद्द करून नवीन उमेदवार घेणे बाबतची सूचना मुख्यमंत्र्यांच्याद्वारे मंत्रिमंडळाच्या संमतीने समन्वयकांच्याकडे मांडणे.

 

सामान्य प्रशासन मंत्री

 

करिअर संसदेचा सामान्य प्रशासन मंत्री म्हणून सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या बाबतीत पुढील कार्य पूर्ण करणे अपेक्षित आहे.

१. करिअर संसदेचे पदाधिकारी ऑफलाईन बैठक घेत असताना या बैठकीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होतील यासाठी आवश्यकता प्रयत्न करणे.

२. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार किंवा करिअर कट्टाच्या सूचनेनुसार महाविद्यालयांमध्ये विद्यार्थीभिमुख उपक्रम राबवत असणारा आवश्यक सुविधा उपलब्ध होते का यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, समन्वयक, मंत्रिमंडळ यांच्याशी समन्वय साधणे.

३. महाविद्यालयामध्ये करिअर संसदेचे पदाधिकारी बैठकीनिमित्त ज्यावेळी भेटत असतील तर प्रत्येक वेळी झालेल्या चर्चेची नोंद ठेवणे.

४. महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थीहितासाठी घेतलेला निर्णय, करिअर कट्टाकडून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती, उपक्रम किंवा कार्यक्रमाच्या वेळेमध्ये झालेला बदल इत्यादी माहिती तातडीने सर्व पदाधिकाऱ्यांच्या पर्यंत तसेच सर्व विद्यार्थ्यांचे पर्यंत पोहोचेल यासाठी समाज माध्यमांचा वापर करणे.

५. मंत्रिमंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांना नियमित बैठकीची माहिती देणे, या बैठका वेळेत पार पाडाव्यात यासाठी संबंधित पदाधिकाऱ्यांशी सुसंवाद ठेवणे.

 

माहिती व प्रसारण मंत्री

 

करिअर संसदेचा माहिती व प्रसारण मंत्री म्हणून पुढील कार्य पार पाडणे आवश्यक आहे.

१. महाविद्यालयामध्ये घडणाऱ्या प्रत्येक विद्यार्थीभिमुख उपक्रमाचे समाज माध्यमावर प्रचार व प्रसार करणे.

२. विद्यार्थी संसदेने ज्या ज्या वेळेस अधिकारी उद्योजक यांच्या मुलाखतीचे नियोजन केले असेल ती माहिती व मुलाखत पूर्ण झाल्यानंतर त्याबाबतची माहिती मुख्यमंत्री व समन्वयक यांच्या मान्यतेनंतर समाज माध्यमावर प्रसारित करणे.

३. महाविद्यालयामध्ये झालेल्या प्रत्येक उपक्रमाबाबत तसेच करिअर कट्टाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय विशेष उपक्रमाबाबत ची माहिती स्थानिक वर्तमानपत्रांमध्ये येण्यासाठी आवश्यक तो मसुदा तयार करणे व महाविद्यालयाच्या समन्वयक व प्राचार्य यांच्या संमतीने प्रसारमाध्यमांकडे पाठवणे.

४. प्रसारमाध्यमांमध्ये करिअर कट्टाशी संबंधित तसेच महाविद्यालयातील उपक्रमांच्या संबंधित आलेल्या बातम्यांचे कात्रण एकत्रित

करून ते संग्रहित करणे तसेच समाज माध्यमावर प्रसारित करणे. ५. करिअर कट्टाच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम अत्यंत कल्पकतेने आपल्या सहकारी विद्यार्थीवर्गा पर्यंत पोहोचतील यासाठी

रिल्स, व्हिडिओ, पोस्टर हे तयार करणे आणि समन्वयक व प्राचार्य यांच्या परवानगीने ते प्रसारित करणे.

६. करिअर संसदेच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाचे फोटो व वृत्तांत करिअर कट्टाच्या राज्यस्तरीय ग्रुपमध्ये प्रसारित करणे तसेच आपल्या समाज माध्यमावर प्रसारित करणे.

७. मत्रिमंडळातील कोणत्याही पदाधिकाऱ्यांनी अथवा सदस्यांनी विशेष प्राविण्य मिळवल्यास त्याबाबतची माहिती समाज माध्यमावर प्रसारित करणे.

८. करिअर संसदेचा माहिती व प्रसारण मंत्री हा महाविद्यालयाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून चेहरा आहे त्यामुळे त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक महाविद्यालयाच्या करिअर कट्टाच्या प्रतिष्ठेला बाधा येणार नाही याची काळजी घेऊन समाजात आपला वावर ठेवावा व आपली वर्तणूक चांगली ठेवणे.

 

उद्योजकता विकास मंत्री

 

महाविद्यालयाच्या करिअर संसदेचा उद्योजकीय विकास मंत्री म्हणून पुढील कार्य करणे अपेक्षित आहे.

१. करिअर संसदेच्या वतीने दर महिन्याला यशस्वी उद्योजकांच्या मुलाखतीचे आयोजन करणे.

२. करिअर संसदेच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मध्ये उद्योजकता विकासाचे कौशल्य वाढीस लागावे यासाठी समाज माध्यमावर असणाऱ्या विविध माहितीचे संकलन करून ती माहिती विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवणे.

३. केंद्रशासन तसेच राज्य शासनाच्या उद्योजकता विकास विभागाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती घेणे व ही माहिती प्राचार्य व समन्वयक यांच्या परवानगीने आपल्या समाज माध्यमावरून तसेच कॉलेजच्या नोटीस बोर्डचा उपयोग करून आपल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचेल यासाठी मदत करणे.

४. महाविद्यालयांमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या स्टुडंट स्टार्टअप कंपनीचे नियंत्रक म्हणून काम करणे.

५. उद्योजकता विकास मंत्री म्हणून महाविद्यालयामध्ये वर्षभर उद्योजकीय कौशल्य वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रासंगिक उपक्रमासाठी नियोजन करणे व या उपक्रमाच्या वेळी प्रत्यक्ष हजर राहणे.

६. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे व्यावसायिक कौशल्य वाढीस लागावी यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांकडे लक्ष देणे व विद्यार्थ्यांच्या सूचनेनुसार सदर उपक्रम अधिकाधिक सक्षम बनतील यासाठी सूचना करणे.

७. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या उद्योजकता विकास विभागामार्फत चालणाऱ्या योजनांची माहिती विद्यार्थ्यां पर्यंत पोहोचवणे.

८. केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, वेगवेगळी महामंडळी यांच्या वतीने तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या सहकार्याने ज्या वेगळ्या वेगळ्या योजना राबवल्या जातात त्याची माहि ती एकत्रित करून त्याचा अहवाल प्राचार्यांकडे सादर करणे

 

रोजगार व स्वयंरोजगार मंत्री

 

करिअर संसदेचा रोजगार व स्वयंरोजगार मंत्री म्हणून पुढील कार्यपद्धती पार पाडणे अपेक्षित आहे.

१. महाविद्यालयातील करिअर संसदेच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अपेक्षित OJT आणि इंटर्नशिपसाठी करिअर कट्टाच्या वतीने देण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या पर्यायाची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे.

२. रोजगार स्वयंरोजगार मंत्री या नात्याने आपल्या भागामध्ये कोणकोणते व्यवसाय किंवा स्वयंरोजगार सुरू होऊ शकतात याबाबत अभ्यास करून विद्यार्थ्यांच्या सूचना घेऊन त्याची माहिती राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये मांडणे.

३. शासनाकडून स्वयंरोजगारासाठी राबवण्यात येणारी वेगवेगळे प्रशिक्षण उपक्रम समजून घेणे आणि ती माहिती मंत्रिमंडळासमोर मांडून समन्वयकांच्या परवानगीने दर महिन्यातून एकदा आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोचण्यासाठी समाज माध्यमे तसेच विविध उपक्रमांचे आयोजन करणे.

४. महाविद्यालयातील प्रत्यके विद्यार्थ्यांची नोदंणी शासनाच्या रोजगार व रोजगार कार्यालयाच्या पोर्टलवर होईल यासाठी प्रयत्न करणे.

५. शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या रोजगार मिळवून देण्याबाबत तसेच वेगवेगळ्या माध्यमातून मिळणाऱ्या नोकरी विषयक स्वयंरोजगार विषयक बातम्यांचे संकलन करणे व ही माहिती रोजगार स्वयंरोजगार मंत्री या नात्याने आपल्या सोशल मीडियावरून इतर विद्यार्थ्यां पर्यंत प्रसारित करणे.

 

कौशल्य विकास मंत्री

 

महाविद्यालयाच्या करिअर संसदेचा कौशल्य विकास मंत्री म्हणून पुढील कार्य करणे अपेक्षित आहे.

१. करिअर संसदेच्या वतीने दर महिन्याला यशस्वी कौशल्य विकास अधिकाऱ्यांच्या मुलाखतीचे आयोजन करणे.

२. करिअर संसदेच्या वतीने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मध्ये कौशल्य विकासाचे कौशल्य वाढीस लागावे यासाठी समाजमाध्यमावर असणाऱ्या विविध माहितीचे संकलन करून ती माहिती विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचवणे.

३. केंद्रशासन तसेच राज्य शासनाच्या कौशल्य विकास विभागाकडून वेळोवेळी राबवण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती घेणे व ही माहिती प्राचार्य व समन्वयक यांच्या परवानगीने आपल्या समाज माध्यमावरून तसेच कॉलेजच्या नोटीस बोर्डचा उपयोग करून आपल्या विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचेल यासाठी मदत करणे.

४. महाविद्यालयांमध्ये स्थापन करण्यात येणाऱ्या स्टुडंट स्टार्टअप कंपनीचे नियंत्रक म्हणून काम करणे.

५. कौशल्य विकास मंत्री म्हणून महाविद्यालयामध्ये वर्षभर उद्योजकीय कौशल्य वाढीसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रासंगिक उपक्रमासाठी नियोजन करणे व या उपक्रमाच्या वेळी प्रत्यक्ष हजर राहणे.

६. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांचे व्यावसायिक कौशल्य वाढीस लागावी यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांकडे लक्ष देणे व विद्यार्थ्यांच्या सूचनेनुसार सदर उपक्रम अधिकाधिक सक्षम बनतील यासाठी सूचना करणे.

७. प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कौशल्य विकास विभागा मार्फत चालणाऱ्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे.

८. केंद्र शासन, राज्य शासन, जिल्हाधिकारी कार्यालय, वेगवेगळी महामंडळी यांच्यावतीने तसेच राष्ट्रीयकृत बँकांच्या सहकार्याने या वेगळ्या वेगळ्या योजना राबवल्या जातात त्याची माहिती एकत्रित करून त्याचा अहवाल प्राचार्यांकडे सादर करणे.

९. कौशल्य विकास अभ्यासक्रम शिकवणारे प्रशिक्षण केंद्र आपल्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या ठिकाणी आहेत याची माहिती घेणे व त्याची माहिती आपल्या समाज माध्यमातून विद्यार्थ्यांचे पर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करणे.

 

संसदीय कामकाज मंत्री

 

करिअर संसदेचा संसदीय कामकाज मंत्री म्हणून पुढील बाबी करणे आवश्यक आहे.

१. करिअर संसदेच्या पदाधिकाऱ्यांच्या सर्व बठैकींचे इतिवृत्त लिहिणे.

२. करिअर संसदंच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या प्रत्यके उपक्रमाची नोंद ठेवणे.

३. करिअर संसदेच्या राज्यस्तरीय प्रशिक्षण वर्गामध्ये झालेल्या चर्चा व निर्णय तसेच दिलेले टास्क याची नियमित नोंद ठेवणे.

४. बैठकीस उपस्थित प्रत्येक सदस्यांच्या सह्या असलेले इतिवृत्त पुस्तक स्वतःच्या ताब्यात ठेवणे.

५. दर महिन्याला सदर इतिवृत्त पुस्तक समन्वयक आणि प्राचार्य यांना दाखवून त्यांच्याकडून तपासून घेणे.

६. जिल्हा समन्वयक, प्राचार्य प्रवर्तक किंवा करिअर कट्टाचे अन्य पदाधिकारी महाविद्यालयाच्या भेटीस येतील तेव्हा इतिवृत्त तपासणीसाठी हजर ठेवणे.

७. कायदे व शिस्त पालन मंत्री व मख्युमंत्री यांच्या शिफारशीने शिस्तभंगाची केलेली कारवाई याबाबत नोंद ठेवणे.

८. कोणत्याही सदस्याकडून करण्यात आलेल्या विशेष सूचना तसेच सदस्यांवर करण्यात आलेली कारवाई किंवा कारवाई करण्यापूर्वी देण्यात आलेल्या सूचना याची नोंद ठेवणे.

९. अधिकारी, उद्योजक यांच्या बैठकीसाठी पूर्वपरवानगी मागणीचे पत्र त्यांचे आभार पत्र याची प्रत जपून ठेवणे.

१०. संसदीय कामकाज मंत्री या नात्याने पदाधिकाऱ्यांच्या बाबतचे सर्व रेकॉर्ड महाविद्यालयीन समन्वयक करिअर कट्टा यांच्या सूचनेनुसार ते सांगतील त्या पद्धतीने जतन करून ठेवणे.

 

सदस्य

 

करिअर संसदेचा सदस्य या नात्यानेपुढील जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे.

१. करिअर संसदेचा पदाधिकाऱ्यांच्या नियमित बैठकीस उपस्थित राहणे.

२. करिअर संसदेचा पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहणे.

३. करिअर संसदेचा सदस्य या नात्याने महाविद्यालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक उपक्रमांमध्ये उपस्थित असणे.

४. माहिती व प्रसारण मंत्री, नियोजन मंत्री तसेच मुख्यमंत्री यांच्याकडून येणाऱ्या सूचनांचे पालन करणे तसचे महाविद्यालयामध्ये घडणाऱ्या सर्व सकारात्मक बाबींचे प्रसारण आपल्या समाज माध्यमावरून करणे.

५. महाविद्यालयातील विद्यार्थी व महाविद्यालयाच्या मध्ये समन्वय साधण्यासाठी दुवा म्हणून कार्यरत राहणे.