भारत हा तरुणांचा देश आहे. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या आपल्या या देशामध्ये तरुणांची संख्या देखील सर्वात जास्त आहे. या युवकांच्या हाताला योग्य काम व डोक्याला योग्य विचार देणे हे प्रामुख्याने शिक्षण व्यवस्थेमध्ये सहभागी असणाऱ्या प्रत्येक घटकाचे कार्य आहे. राज्यामध्ये उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सहकार्या ने सुरू असणाऱ्या करिअर कट्टामार्फत युवकांच्या करिअरला योग्य दिशा देण्यासाठीचे प्रयत्न २५ फेब्रुवारी, २०२१ पासून सुरू आहेत. ऑफलाईन आणि ऑनलाईन पद्धतीने चालणाऱ्या प्रयत्नांना दिशा देण्यासाठी वेळोवेळी आलेल्या सूचनांचे व चांगल्या प्रयोगाचे स्वागत निश्चितच करिअर कट्टाच्या राज्यस्तरीय समितीने केले आहे. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, लोणावळा या ठिकाणी झालेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या वेळी महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा आणि त्यांच्या नेतृत्व विकासाला संधी मिळावी म्हणून राबविण्यात येणारी कौन्सिल ही संकल्पना समजून घेतली. त्यानंतर यासाठीची राज्यस्तरीय समिती निवडून प्रत्येक महाविद्यालयांमध्ये करिअर संसद स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये शासनाकडून अनेक विभागाच्या मार्फत तरुणांसाठी काम केले जातात या कामाची ओळख तरुणांना व्हावी, त्यांच्यामध्ये संघटन कौशल्य वाढीस लागावं, संघटित प्रयत्नांच्या माध्यमातून त्यांनी करिअरला दिशा देण्यासाठी प्रयत्न करावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक महाविद्यालयातील प्राचार्य व समन्वयक यांच्या नियंत्रणाखाली महाविद्यालयातील निवड समितीने पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यां ची निवड या करिअर संसदेचे पदाधिकारी म्हणून करावी हे अपेक्षित आहे. पदवीच्या दुसऱ्या वर्षाला शिकत असणारे विद्यार्थी निवडण्या पाठीमागची महत्त्वाची भूमिका अशी आहे की पाठीमागील एक वर्षामध्ये विद्यार्थ्यांनी आपलं महाविद्यालय अत्यंत चांगल्या पद्धतीने जाणून घेतलेले असतं. त्याचबरोबर या विद्यार्थ्यां चा सहवास महाविद्यालयातील प्राचार्य, समन्वयक आणि प्राध्यापकांना लाभल्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्या विविध गुणांची देखील पारख आपल्याला झालेली असते. यामुळे नेतृत्व गुण असणाऱ्या विद्यार्थ्यां ची निवड या उपक्रमामध्ये करणे अपेक्षित आहे. पदवीच्या पहिल्या किंवा तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना यामध्ये सहभागी केल्यास प्रथम वर्ष विद्यार्थी हा कॉलेजच्या व्यवस्थेपासून बराच अनभिज्ञ असतो तर तृतीय वर्ष विद्यार्थी हा पदवीच्या शेवटच्या वर्षा त असल्यामुळे त्याच्या करिअरच्या दृष्टि कोनातनू इतर बाबींना महत्त्व देणे गरजचे असतं त्यामुळे तो देखील तितका न्याय देऊ शकत नाही असं वाटतं. म्हणूनच करिअर संसदेसाठी विद्यार्थी निवड करत असताना तो पदवीच्या दुसऱ्या वर्षा साठीचा असावा आणि त्याच बरोबर एकदा करिअर संसदेचे पदाधिकारी म्हणून काम केलेल्या विद्यार्थ्याला पुन्हा त्या करिअर संसदेचे पदाधिकरण काम करण्याची संधी दिली जाऊ नये हे देखील महत्त्वाचे आहे. या पाठीमागची भूमिका अशी आहे की जर विद्यार्थी दुसऱ्या वर्षी त्या करिअर संसदेमध्ये काम करत राहील तर तो इतर विद्यार्थ्यांच्यावर त्यांच्या अनुभवाचा प्रभाव टाकत राहील आणि अन्य विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणाला वाव मिळणार नाही. त्यामुळे सदर करिअर संसदेमध्ये एकदा कार्य झाल्यानंतर त्या पदाधिकाऱ्यांना पुन्हा करिअर संसदेचे पदाधिकारी म्हणून काम करण्याची संधी न देता या विद्यार्थ्यांनी करिअर संसदेचेसल्लागार म्हणून काम करावे यासाठी महाविद्यालयीन स्तरावर त्यांची एखादी सल्लागार समिती नियुक्त केली तरीदेखील तो एक उत्तम प्रयोग होऊ शकतो. करिअर संसदेच्या मत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांपासून सर्व पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. या सर्व पदांच्या माध्यमातून आपण आपल्या कर्तव्याची जाणीव करून घ्यावी व त्यासाठी कार्य करावे हे अपेक्षित आहे.