Author
" करिअर संसद मार्गदर्शिकेच्या लेखिका यांचे मनोगत "
डॉ. सुवर्णा विष्णू तायडे
महात्मा ज्योतिबा फुले वाणिज्य विज्ञान व विठ्ठलराव राऊत कला महाविद्यालय भातकुली

मी डॉ. सुवर्णा विष्णू तायडे, महात्मा ज्योतिबा फुले वाणिज्य विज्ञान व विठ्ठलराव राऊत कला महाविद्यालय भातकुली येथे गृह अर्थशास्त्राची प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे.

मी एक छोटा प्रयत्न म्हणून करिअर कट्टा अंतर्गत येणाऱ्या करिअर संसद मार्गदर्शिका याविषयी विस्तृत माहिती विद्यार्थ्यांकरिता देण्याचे काम मी पुस्तक स्वरूपात सादर करीत आहे या मार्गदर्शकेमध्ये विद्यार्थ्यांची करिअर संसद म्हणजे काय? त्याचे कार्य उद्देश याविषयी तसेच प्रत्येक पदाचा वापर विद्यार्थी संसद कशाप्रकारे करेल व विद्यार्थ्यांना संसदेमधून कशा प्रकारची प्रेरणा घेऊन पण उंच भरारी घेऊ शकू हे बळ देते ते केवळ संघटनामुळे कुठलेही कार्य संघटना शिवाय अपुरे आहे जिथे बंद हाताचे पाचही बोट एकत्र सामावल्यानंतर त्याची जी ताकद असते ती सर्वांवर मात करते त्याचप्रमाणे करिअर संसद ही सर्व गोष्टींना मात करेल यात शंका नाही.

करिअर कट्टा हा हा तरुणांच्या क्रयशक्तीला दिशा देणारा व्यासपीठ आहे महाराष्ट्र राज्य व उच्च शिक्षण तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या विद्यमाने चालविण्यात येणारा उपक्रम हा तळागाळातील विद्यार्थ्यांचे सुप्त गुणांना वाव देऊन गरुड झेप घेण्यास प्रवृत्त करी त आहे आज स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातुन ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थी मोठ्या उच्च पदावर जाऊन बसले आहेत. आणि हा सर्वस्व अमुलाग्र बदल होतोय किंबहुना याचे सातत्य सुद्धा कायम राहील पण केवळ आपले महाराष्ट्र राज्य माहिती सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष माननीय यशवंत शितोळे सर यांच्या अहोरात्र अथक परिश्रमामुळेच ऊन, वारा, पाऊस न पाहता न थांबता महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाऊन विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासारख्या पवित्र कार्याचा वसा घेऊन कशाचीही तमा न बाळगता ते प्रयत्नशील कार्य करीत आहे त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार महाराष्ट्र राज्य आणि केंद्र शासनाच्या कौशल्य विकासावर आधारलेल्या विविध योजना आहेत परंतु त्या योजना राबवणारी यंत्रणा मात्र आपल्याकडे उपलब्ध नव्हती ती यंत्रणा करिअर कट्ट्याच्या निमित्ताने अतिशय उत्तम पद्धतीने महाविद्यालयात राबवल्या गेल्यामुळे अनेक प्रकारच्या संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्या आहेत आज ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशिक्षणासाठी शिक्षणासाठी महाविद्यालयात येतो तेव्हा त्यांच्यासमोर कुठलेहीरोजगाराचे स्वप्न नसते तो फक्त पुस्तकी ज्ञान घेण्यात रमलेला असतो ते पुस्तकी ज्ञान आत्मसात करीत असताना पुढे त्यांच्या भविष्यासाठी त्यांच्या सर्वांगीन विकासासाठी त्याला रोजगाराची आणि व्यावसायिक कार्य कुशल त्याची दृष्टी प्राप्त व्हावी तसेच ज्ञान प्राप्ती बरोबरच कौशल्य विकास साधून स्वतःहून रोजगार निर्माण करण्याची क्षमता त्याच्या अंगी विकसित व्हावी त्या विद्यार्थ्यांच्या स्वतःमधील कला कौशल्याची त्यांना ओळख व्हावी ती कला कौशल्य ओळखल्यानंतर त्याला विशिष्ट आकार प्राप्त करून देण्यासाठी त्या कौशल्याचा संपूर्ण विकास होने आवश्यक असणाऱ्या कौशल्यत्मक आणि रोजगारभीमुख अभ्यासाचे शिक्षण करियर कट्ट्याच्या माध्यमातून अतिशय चांगल्या प्रकारे होते प्रशिक्षणाचे तंत्र करियर कट्टा सहजपणे उपलब्ध करून देत असताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार होण्याचे समाधान प्राप्त झालेले आपणास दिसून येते ज्ञान आणि कौशल्य विकासामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासात त्याचे व्यक्तिमत्त्वातील गुण कौशल्यात सकारात्मक परिवर्तन निश्चितच बदल घडून आणू शकतो. विद्यार्थी संसद मार्गदर्शिका या लिखाणाला मला आपण या सर्वांचा स्नेह व आशिर्वाद असू द्यावा आपल्या सूचना स्वीकार्य राहतील. धन्यवाद !

संपादक समितीचे परत एकदा आभार ज्यांनी मला लिहिण्याची संधी दिली त्यांचे मनापासून आभार