१. सदर करिअर डायरी हा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणारा विषय आहे.
२. सदर करिअर डायरीची डिजीटल प्रत मोफत उपलब्ध करुन दिली जाईल.
३. महाविद्यालय किंवा विद्यार्थ्यांनी मागणी केल्यास ना नफा ना तोटा तत्त्वावर सदर करिअर डायरीचे प्रिंटींग उपलब्ध करुन देण्यात येईल.
४. सदर डायरी नियमितपणे नोंदवली जाणे विद्यार्थी, पालक व प्राध्यापक यांना एकूणच करिअरच्या दिशेने चाललेल्या प्रयत्नांचे मुल्यमापन करण्यासाठी आवश्यक आहे.
५. दर महिन्याला निवडलेल्या उद्दिष्टानुसार कोणते स्किल आत्मसात करावे, याची माहिती विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जाईल.
६. करिअरला अनुसरुन कोणती इतर पुस्तके वाचली पाहिजेत याचीदेखील यादी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिली जाईल.
७. दर महिन्याला करिअरशी निगडीत कोणत्या यशस्वी व्यक्तींची भेट घेता येईल, यासाठी तयारी कशी करावी याचेदेखील मार्गदर्शन करण्यात येईल.