Author
" बारावीनंतर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या नव्या संधी "
मा. डॉ. तुषाबा शिंदे (IRPS
(Director, DARPG, Ministry of Personnel, Public Grievances and Pensioners, New Delhi)

आजच्या वेगाने बदलणाऱ्या आणि स्पर्धात्मक युगात बारावीनंतर योग्य करिअरची निवड करणे हे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरते. पूर्वी डॉक्टर किंवा इंजिनिअर होणे हेच यशाचे प्रतीक मानले जात होते; परंतु आज शिक्षण, तंत्रज्ञान, डिजिटल क्रांती आणि जागतिकीकरणामुळे करिअरच्या अनेक नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता, बुद्धिमत्ता आणि कौशल्ये आहेत. योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास यांच्या आधारावर विद्यार्थी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश संपादन करू शकतात.

आज विद्यार्थ्यांसमोर केवळ पारंपरिक करिअर पर्याय नसून कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा सायन्स, डिजिटल मीडिया, उद्योजकता, संशोधन, संरक्षण सेवा, आंतरराष्ट्रीय शिक्षण आणि प्रशासकीय सेवा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये उज्ज्वल संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता ओळखून योग्य दिशेने वाटचाल करणे आवश्यक आहे.

करिअर निवडताना आवश्यक बाबीः-

करिअर निवड ही आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा असतो. योग्य करिअर निवडल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक यशस्वी आणि आनंदी होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खालील बाबींचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे :

:

स्वतःच्या आवडी, कौशल्ये आणि क्षमतांची ओळख.

योग्य मार्गदर्शन आणि माहिती मिळवणे.

करिअरच्या विविध संधींचा अभ्यास करणे.

पालक, शिक्षक आणि तज्ज्ञांशी चर्चा करणे.

केवळ मित्रांचे अनुकरण किंवा समाजातील ट्रेंड पाहून निर्णय न घेणे.

स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करणे.

ज्या क्षेत्रात आयुष्यभर आनंदाने काम करता येईल आणि समाधान मिळेल, त्या क्षेत्राची निवड करणे.कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे (AI) करिअरचे स्वरूप वेगाने बदलत असल्याने दीर्घकालीन संधी असलेल्या क्षेत्रांचा विचार करणे.

परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची आणि नवीन गोष्टी स्वीकारण्याची तयारी ठेवणे.

दररोज नवीन गोष्टी शिकण्याची सवय लावणे; कारण AI आधारित जगात सतत शिकणे अत्यावश्यक आहे.

यशासाठी दररोज चांगली पुस्तके वाचण्याची सवय लावणे.

विद्यार्थ्यांनी "मला काय आवडते?" आणि "मी कोणत्या क्षेत्रात चांगले काम करू शकतो?" याचा विचार करून करिअरची दिशा ठरवणे आवश्यक आहे.

शाखेनुसार करिअरच्या संधी

१. विज्ञान शाखेतील करिअर संधी

विज्ञान शाखा विद्यार्थ्यांसाठी सर्वाधिक व्यापक संधी उपलब्ध करून देते. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी क्षेत्राबरोबरच अनेक आधुनिक तंत्रज्ञानाधारित क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

प्रमुख अभ्यासक्रम

अभियांत्रिकी (Engineering)

वैद्यकीय शिक्षण (MBBS, BDS, BAMS, BHMS)

फार्मसी

बायोटेक्नॉलॉजी

संगणक विज्ञान

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI)

मशीन लर्निंग

डेटा सायन्स

पर्यावरण विज्ञाननर्सिंग आणि फिजिओथेरपी

पॅरामेडिकल सायन्स (DMLT, रेडिओलॉजी इ.)

संभाव्य करिअर

. सॉफ्टवेअर इंजिनिअर

डॉक्टर

डेटा विश्लेषक

संशोधक

बायोटेक्नॉलॉजिस्ट

पर्यावरण तज्ज्ञ

फार्मासिस्ट

आजच्या काळात AI, कोडिंग आणि डिजिटल कौशल्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान शिकण्यावर भर देणे गरजेचे आहे.

२. वाणिज्य शाखेतील करिअर संधी

वाणिज्य शाखा विद्यार्थ्यांना आर्थिक, व्यवस्थापन आणि व्यवसाय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून देते. भारतातील वाढत्या उद्योग आणि बँकिंग क्षेत्रामुळे या शाखेचे महत्त्व अधिक वाढले आहे.

प्रमुख अभ्यासक्रम

B.Com

BBA

MBA

Chartered Accountancy (CA)

Company Secretary (CS)

Cost Accounting (ICWA)

CFA (Chartered Financial Advisor)

Cost & Management Accountant (CMA)

Investment Banker

Financial Analyst

Auditor

Tax Consultant

Stock Market Analyst

संभाव्य करिअर

चार्टर्ड अकाउंटंट

बँक अधिकारी

फायनान्स मॅनेजर

गुंतवणूक सल्लागार

कर सल्लागार

व्यवसाय व्यवस्थापक

उद्योजक

शेअर मार्केट, डिजिटल बँकिंग आणि फायनान्शियल टेक्नॉलॉजी (FinTech) यांसारख्या क्षेत्रांमध्येही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत आहेत.

३. कला शाखेतील करिअर संधी

कला शाखा विद्यार्थ्यांना सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय आणि सर्जनशील क्षेत्रांमध्ये करिअर घडवण्याची संधी देते. या शाखेमध्ये अनेक वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध आहेत.

प्रमुख अभ्यासक्रम

पत्रकारिता

मानसशास्त्र

समाजकार्य

राज्यशास्त्र

अर्थशास्त्र

पर्यटन व्यवस्थापन

साहित्य आणि भाषा अभ्यास

संभाव्य करिअर

पत्रकार

प्राध्यापक

सामाजिक कार्यकर्ता

पर्यटन अधिकारी

समुपदेशक

मीडिया तज्ज्ञ

लेखक आणि संपादक

आजच्या माहिती आणि माध्यमांच्या युगात मीडिया आणि कम्युनिकेशन क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत.

आधुनिक आणि उदयोन्मुख करिअर क्षेत्रे :-डिजिटल आणि सोशल मीडिया क्षेत्र

डिजिटल युगात सोशल मीडिया हे मोठे करिअर प्लॅटफॉर्म बनले आहे. अनेक युवक यूट्यूब, इंस्टाग्राम, ब्लॉगिंग आणि डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करत आहेत.

प्रमुख क्षेत्रे

कंटेंट क्रिएटर

यूट्यूबर

डिजिटल मार्केटिंग

ग्राफिक डिझाईन

सोशल मीडिया व्यवस्थापन

व्हिडिओ एडिटिंग

या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सर्जनशीलता, सातत्य, तांत्रिक कौशल्ये आणि संयम आवश्यक असतो.

स्टार्टअप आणि उद्योजकताः -

आज अनेक युवक नोकरी शोधण्याऐवजी स्वतःचा व्यवसायसुरू करण्याकडे वळत आहेत. "स्टार्टअप इंडिया" आणि विविध सरकारी योजनांमुळे उद्योजकतेला मोठे प्रोत्साहन मिळत आहे.

या संदर्भात विद्यार्थ्यांनी संबंधित क्षेत्रातील सखोल ज्ञान मिळवून दीर्घकालीन नियोजन करणे आवश्यक आहे. आर्थिक गुंतवणूक, व्यवसाय नियोजन आणि पर्यायी योजना तयार ठेवणे गरजेचे आहे.

सुरुवातीला संघर्ष करावा लागू शकतो; परंतु सातत्य आणि योग्य नियोजनाच्या जोरावर मोठे यश मिळवता येते.

यशासाठी आवश्यक गुण

नवीन कल्पना

ज्या क्षेत्रात स्टार्टअप करायचे आहे त्या क्षेत्रातील

अनुभव

आर्थिक गुंतवणुकीचे नियोजन

. पर्यायी योजना

मोजून जोखीम घेण्याची क्षमता

योग्य मार्गदर्शक आणि मेंटर

यशाबद्दल शंभर टक्के आत्मविश्वास

. नियोजन क्षमता

आत्मविश्वास

जोखीम स्वीकारण्याची तयारी

तांत्रिक आणि आर्थिक ज्ञान

विद्यार्थ्यांनी अनुभव, कौशल्ये आणि योग्य मार्गदर्शन यांच्या साहाय्याने स्वतःचे उद्योग उभारण्याचा विचार करावा.

सरकारी आणि प्रशासकीय सेवांमधील संधीः-

UPSC आणि MPSC

भारतातील प्रतिष्ठित सेवांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी UPSC आणि MPSC या परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत.

प्रमुख पदे

IAS

IPS

IFS

IRS

उपजिल्हाधिकारी

तहसीलदार

पोलिस उपअधीक्षक

या क्षेत्रात यश मिळवण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन अत्यंत आवश्यक असतो. महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी या परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश मिळवत आहेत.संरक्षण क्षेत्रातील करिअर

भारतीय सैन्यदल विद्यार्थ्यांना सन्मान, शिस्त, साहस आणि देशसेवेची संधी उपलब्ध करून देते.

प्रमुख परीक्षा

NDA (National Defence Academy)

CDS (Combined Defence Service)

AFCAT

(Air Force Common Admission Test)

संरक्षण क्षेत्रातील फायदे

शिस्तबद्ध जीवन

समाजात प्रतिष्ठा

उत्तम वेतन आणि सुविधा

देशसेवेचा अभिमान

कुटुंबासाठी विविध सुविधा

हे क्षेत्र विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि राष्ट्रप्रेम विकसित करते.

परदेशी शिक्षण आणि शिष्यवृत्तीः -

आज अनेक विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश घेत आहेत. विविध शिष्यवृत्ती योजनांमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक मदत मिळते.

आवश्यक परीक्षा

GRE

TOEFL

IELTS

प्रमुख देश

अमेरिका

जर्मनी

ऑस्ट्रेलिया

जपान

युरोपियन देश

15/44

विद्यार्थ्यांसाठी Commonwealth Scholarship, Fulbright Fellowship, Erasmus Mundus यांसारख्या शिष्यवृत्ती अत्यंत उपयुक्त ठरत आहेत.

आज अनेक देशांमध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी होत असल्याने कुशल मनुष्यबळाची मागणी वाढत आहे. त्यामुळे परदेशात चांगल्या नोकऱ्या आणि उच्च वेतनाच्या संधी उपलब्ध होत आहेत.

ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील कौशल्य विकास अभ्यासक्रम पूर्ण करून परदेशातील नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी इच्छाशक्ती, मेहनत आणि सातत्यपूर्णप्रयत्नांची आवश्यकता असते.

आंतरराष्ट्रीय करिअरच्या संधी :-

संयुक्त राष्ट्र संघटना (UN), UNESCO, WHO, World Bank यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्येही भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध आहेत.

अर्ज करण्याचे प्रमुख मार्ग

Young Professional Program

International Civil Service Commission

Deputation Opportunities

Consultant पदे

अर्जासाठी उपयुक्त संकेतस्थळे

www.inspira.org

www.unitednations.org

www.worldbank.org

www.adb.org

www.who.orgआवश्यक कौशल्ये

इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान

नेतृत्व क्षमता

संवाद कौशल्य

जागतिक दृष्टिकोन

विषयातील प्राविण्य

योग्य शिक्षण आणि अनुभव यांच्या जोरावर विद्यार्थी जागतिक स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतात.

आजच्या काळात करिअरच्या संधी अमर्याद आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही विशेष गुण आणि क्षमता असते. योग्य दिशा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक विचार यांच्या आधारावर विद्यार्थी स्वतःचे भविष्य उज्ज्वल करू शकतात. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी नवीन तंत्रज्ञान, आधुनिक कौशल्ये आणि जागतिक संधी यांचा स्वीकार करून आत्मविश्वासाने पुढे जाणे आवश्यक आहे.