Author
युवकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ताः संधी, समस्या आणि आव्हाने
मा. डॉ. राजीव नंदकर
अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा निबंधक , यशदा, पुणे

बुद्धिमत्ता हा मानवी जीवनाचा असामान्य असा आविष्कार आहे. इतर प्राण्यांपासून मानवाला वेगळं करत असेल तर ती त्याची बुद्धिमत्ता. या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने आकाशालाही गवसणी घातली आहे. मानवी उत्क्रांती आणि त्याची ही झेप त्याच्या या बुद्धिमतेच्या देणगीशिवाय शक्य नव्हती. आज जो काही तो आहे तो फक्त आणि फक्त त्याच्या बुद्धिमतेमुळेच बुद्धिमत्ता महणजे काय तर काही तरी आकलन करून आणि त्याचे विश्लेषण करून त्यावरून निष्कर्ष काढण्याची क्षमता होय. ही काही प्रमाणात प्राण्यांमध्ये अस्तित्वात असली तरी मनुष्याकडे असलेली बुद्धिमत्ता मात्र असाधारण अशी आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर मानवाने विज्ञान व तंत्रज्ञान यात मोठी झेप घेवून त्याने मानवी जीवन सुकर व सुखकर करण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.

मागील काही दशकात भावनिक बुद्धिमत्ता चाबतही खूप चर्चा झाली. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अध्ययन बुद्धिमत्ता सोबतच भावनिक बुद्धिमत्ताही तेवढीच महत्वाची आहे याचे प्रतिपादन केले आहे. यावरही बरेच संशोधन होवून यावर काही अंशी शिक्कामोर्तबही झाले आहे. त्याच सोबत सामाजिक बुद्धिमत्ता याबाबत नेहमी चर्चा होत असते. माणूस हा एक सामाजिक प्राणी असल्याने तो समाजाबरोबर समन्वय आणि संयोजन कसे साधतो यालाच सामाजिक बुद्धिमत्ता म्हणून संबोधले जाते.

मात्र या दशकात सर्वांत चर्चिले जात असलेली बुद्धिमत्ता म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच एआयने या दशकात तर पूर्णतः मानवी जीवन व्यापण्याची तयारी केली आहे. कृत्रिम बुद्धिमतेचा वापर नाही असे आज क्षेत्र शिल्लक नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमतेच्या वापराबाबत अनेक चर्चा आणि परिसंवाद जागोजागी आणि वेळोवेळी होताना दिसत आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे एआय बाबत उसा सकारात्मक सुर आहे तसा नकसात्मक सुरसुध्दा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवाला नष्ट करेल अशीही टोकाची चर्चा होताना दिसत आहेत. एकंदर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर मानय कमा करतो? याकर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. प्रस्तुत लेखात युवकांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेतील संधी, समस्या आणि आव्हाने याबाबत प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मन, बुद्धी आणि अहंकार है मानवी स्कूल देहाचे सुक्ष्म अवयव आहेत असे म्हटले जाते. शरीर, मन आणि आत्मा किंवा चेतन तत्त्व असा अंतर्यामी प्रबास मानवाला साधावा लागतो. या सर्व प्रवासात सर्वात उठून दिसते ती मानवी बुद्धी होय. या बुद्धीनेच मानवी जीवनाला एक वेगळी गती व अस्तित्व प्राप्त करून दिले. मानवी बुद्धीच्या जोरावर त्याने पाताळचा तळ शोधला आणि आकाशाला गवसणी घातली, पंच महाभूतांवरही प्रभुत्व मिळविण्याची आकांक्षा त्याने ठेवली आणि बरही अंशी ती सिद्धही केली. बुद्धीची ही त्याची भूक कधी संपणारी नाही. मानवी ज्ञानाच्या आणि शोधाच्या कक्षा विस्तृत करण्याचे मोठे काम या मानवी बुद्धीने केले. या दशकात मात्र एक नवी बुद्धिमत्ता सर्वाच्या समोर आली आणि ती म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय होय.

मानवाने स्वतःच्या बुद्धीच्या आधारे लर्निंग मशीनला शिकवून शिकवून कृत्रिम बुद्धिमत्ता नावाची संकल्पना निर्माण केली आणि प्रत्यक्षात आणली सुद्धा. आज सर्वत्र या कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला आहे. जिकडे पहाचे तिकडे कृत्रिम बुद्धिमतेच्या जोरावर अवघड अशा गोष्टी सोप्या आणि सुटसुटीत करण्यावर भर देण्यात येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तिचा वापर अगदी लहान मुलांपासून ते बृद्धांपर्यंत सर्वच लोक करत आहेत. प्रत्येक शंका आणि समस्या बाला उत्तर शोधण्यासाठी तर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे हातातील एक खेळणे झाले आहे. अनेक अवघड गोष्टी सोप्या करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाची जबाबदारी पार पाडताना दिसत आहेत. अगदी फरशी पुसण्यापासून तर विमानाचे तिकीट बुक करण्यापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेने झेप घेतली आहे. साहजिकच मानवी जीवन सुसहा करण्यासाठी जेवढी झेप विज्ञान आणि तंत्रज्ञान याने घेतली त्याच्या कित्येकपट झेप कृत्रिम बुद्धिमतेने घेतली आहे याबाबत कोणाचेही दुमत असणार नाही.

कृत्रिम बुद्धिमत्ता आता सर्वच क्षेत्रात येऊ घातली आहे. अगदी शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, मनोरंजन, बाहतूक, पर्यावरण अशा प्रत्येक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होत आहे. युवकांसाठी ही एक मोठी संधी आहे, कारण आजचा युवक हा डिजिटल युगातील आहे आणि त्याला तंत्रज्ञानाची आवड आहे. आपल्या भारत देशात तर जवळपास ४७ कोटी युवक आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता त्यांना नवीन करिअरच्या संधी उपलब्ध करून देऊ शकेल. उदाहरणार्थ, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, रोबोटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेव्हलपमेंट अशा क्षेत्रात युबकांना रोजगार मिळू शकतो. जगातील अनेक कंपन्या जसे की गूगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन यांनी एआय संबंधित नोकच्या उपलब्ध करून दिल्या आहेत. भारतातही आयटी क्षेत्रात एआयचे महत्व बाढले आहे आणि युवकांना स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्सद्वारे प्रशिक्षण मिळण्याच्या संधी निर्माण होत आहेत. मात्र त्यासाठी हवी कठोर मेहनत । युवकांनी नक्की काय करायचे हे आधी ठरवायला हवे आणि त्यावर काम करायला हवे. मात्र असे होते की, युवक पदवीधर होतात तरीही त्यांना काय करायचे व कसे करायचे हे माहीत नसते. त्यामुळे त्यांचा पुढील प्रवास अवघड होऊन जातो. कृत्रिम बुद्धिमत्ता हे एक नवे दालन उपलब्ध होत आहे मात्र त्यासाठी तयारी बोडी लवकर हवी.

युवकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संधी खूप आहेत. शिक्षण क्षेत्रात आज एआय आधारित प्लॅटफॉर्म्स जसे की, कोर्सेरा किंवा उदेमी युवकांना घरबसल्या शिकण्याची संधी देतात. काही एआय ट्यूटर्स विद्यार्थ्यांना वैयक्तिकृत शिक्षण देतात, ज्यामुळे कमजोर असलेल्या विषयांवर फोकस करता येतो. करिअर डेव्हलपमेंटमध्ये युवक एआय टूल्स वापरून आकर्षक चायोडेटा किंवा रेड्र्युमे तयार करू शकतात, जॉब सर्च करू शकतात आणि इंटरव्यू प्रैक्टिस सुद्धा करू शकतात. एआय चॅटबॉट्स जसे की चॅट जीपीटी युवकांना क्रिएटिव्ह रायटिंग, कोडिंग किंवा प्रोजेक्ट आणि सादरीकरण संकल्पना देतात की ज्यामुळे युवकांची सर्जनशीलता बाढते.

उद्योजकतेत युक्क स्टार्टअप्स सुरू करू शकतात त्यात एआयचा वापर करून नवीन प्रॉडक्ट्स विकसित करतात. उदाहरणार्थ, एआय-आधारित हेल्थ अॅप्स किंवा स्मार्ट फार्मिंग सोल्युशन्स. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम एआयला प्रोत्साहन देत आहे, आणि सरकारी योजना जसे को स्टार्टअप इंडिया युवकांना फंडिंग देत आहे. सामाजिक बदलात युवक एआय वापरून पर्यावरण संरक्षण, गरिबी निर्मूलन किंवा शिक्षण सुधारणा करू शकतात. एआय अल्गोरिदम्स डेटा अनालिसिस करून समस्या सोडवतात, ज्यामुळे युवकांना सोशल इम्पैक्ट क्रिएट करण्याची संधी मिळते.

एवढे आशादायक चित्र जरी असले तरी कृत्रिम बुद्धिमत्तेने आव्हाने निर्माण केली आहेत. युवकांसाठी मुख्य समस्या म्हणजे नोकऱ्यांच्या संधी कमी होणे. एआय ऑटोमेशनमुळे अनेक रुटीन जॉब्स जसे की डेटा एंट्री, मॅन्युफॅक्चरिंग किंवा कस्टमर सर्व्हिसमध्ये रोचोट्स किंवा सॉफ्टवेअर घेत आहेत, जागतिक अहवालानुसार, २०३० पर्यंत लाखो जॉब्स गमावले जाऊ शकतात त्यामुळे युवकांना नवीन स्किल्स शिकावे लागतील. दुसरी समस्या म्हणजे प्रायव्हसी आणि डेटा सिक्युरिटी ही होय. यामध्ये युवक सोशल मीडिया आणि जे अप्लिकेशन बापरतात ज्यात आपल्याला माहीत न होता एआय डेटा कलेक्ट करत राहतो. हा डेटा मिसयूज झाल्यास आयडेंटिटी बेफ्ट किंवा सायबर अॅटॅक्स होऊ शकतात.

कृत्रिम बुद्धिमत्ता वापर चुकीच्या पद्धतीने केल्यास मानसिक आरोग्य विषयक समस्या बाडू शकतात. एआय आधारित सोशल मीडिया अल्गोरिदम्स युवकांना विविध विषयांवर ऍडिक्ट करतात, ज्यामुळे युवकांमध्ये नैराश्य व उदासीनता वाढीस लागते. फिल्टर बबल्समुळे युवक एकाच प्रकारची माहिती पाहतात ज्यामुळे युवकांचा दृष्टिकोन मर्यादित होतो आणि जग असेच आणि एवढेच आहे अशी भावना वाढीस लागते. एथिकल इश्यूज यामध्ये बायस असल्यास, जसे की धर्म, जात, चंश किंवा लिंग बायस याचा काही प्रमाणात युवकांवर अन्याय होऊ शकतो, विशेषतः जॉब अप्लिकेशन किंवा लोन अप्रूवल्समध्ये ही समस्या दिसून येऊ शकते.

कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा एआय मधील आव्हानेही कमी नाहीत, एआय मुळे स्किल गॅप मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत. युवकांना एआय शिकण्यासाठी प्रॉम्प्ट, प्रोग्रामिंग, मॅथेमॅटिक्स आणि डेटा सायन्सची गरज आहे, पण ग्रामीण भागातील युवकांना असे शिक्षण मिळत नाही आणि बदलल्या जगापासून ते दूर राहतात. तसेच एक्सेसिबिलिटीचे असंख्य इश्यू आहेत, त्यावरही काम करावे लागणार आहे. इंटरनेट आणि डिव्हायसेसची कमतरता युवकांना एआयचा फायदा घेण्यापासून वंचित करू शकते. कृत्रिम बुद्धीमत्ता वापरात रेगुलेशन उपलब्ध नसल्याने अनेक परिणाम भविष्यात होऊ शकतात. एआयचे नियम नसल्याने त्याचा मिसयूज होऊ शकतो आणि युवकांना याबाबत जागरूक राहावे लागेल. नाही म्हटले तरी भविष्याची अनिश्चितता आहेच ज्याला आपण फ्यूचर अनसर्टन्टी असे म्हणतो, एआय सुपरइंटेलिजेंट झाल्यास मानव आपला कंट्रोल गमावण्याचा धोका काही अंशी आहे. ज्यामुळे पुढे जासून युवकांना एबिकल ए‌आय डेवलपमेंटमध्ये सहभाग घ्यावा लागेल.

या सर्व संधी, समस्या आणि आव्हानांचा विचार करता, युवकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेत्ता एक टूल म्हणून वापरणं आवश्यक आहे. त्यासाठी युवकांनी एआय बाबत शिक्षण घेऊन विविध स्किल्स विकसित करावे लागणार आहेत. त्यांनी एआयच्या एथिकल वापरावर फोकस करावे आणि सोसायटीमध्ये पॉझिटिव्ह चेंज आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी त्यांच्याकडून अपेक्षा आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे युवकांच्या हातात असलेले एक शक्तिशाली शस्त्र आहे, की जे योग्य पध्दतीने वापरले तर जग बदलू शकते आणि मानवी जीवनहीं अधिक सुखकर होऊ शकते.