'करिअर कट्टा' पाचवा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व 'विकसित भारत २०४७' मध्ये उच्च शिक्षणाची भूमिका महत्त्वाची विषयावरील कार्यशाळा यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे संपन्न -
तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या 'करिअर कट्टा' या उपक्रमाचा पाचवा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २५ फेब्रुवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि सेंट झेवियर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राज्याचे उद्योग मंत्री मा. नाम. श्री. उदयजी सामंत (उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांनी भूषविले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी बदलत्या काळातील उद्योजकता आणि तरुणांना मिळणाऱ्या संधींवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती (राज्यमंत्री दर्जा) मा. रवींद्रजी साठे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी मा. डॉ. नामदेव भोसले (सहसचिव मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासन ), मा श्री प्रफुल्ल पाठक (अध्यक्ष, सोलार एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया), मा. सोनाली लोहार (Audiologist voice), Therapist), मा. श्री. सचिन इटकर (क्षेत्रीय संचालक, महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ), मा. डिंपल मित्तल (तज्ञ मार्गदर्शक, आर्थिक साक्षरता) आणि मा. मिथिला दळवी ( संस्थापिका, संवाद अ- डायलॉग) प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच, मा. प्राचार्य डॉ. अतुल साळुंखे (प्राचार्य प्रवर्तक, मुंबई विभाग), मा. डॉ. दीपा वर्मा, मा. डॉ. बबन सिनगारे, मा. स्नेहा जगदाळे, मा. करुणा गोकर्ण, डॉ. रिमा खन्ना (डीन ऑफ अकॅडमिकस, के.जे. सोमय्या कॉलेज सायन्स अँड कॉमर्स) या मान्यवरांची महत्त्वपूर्ण उपस्थिती होती. विकसित भारत २०४७' महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका', या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजनही करण्यात आले होते. याअंतर्गत नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांचे कौशल्य कसे वृद्धिंगत होईल यावर सविस्तर विवेचन केले गेले. या सोहळ्यात महाराष्ट्राच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आणि संस्थांचा राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरव करण्यात आला. तसेच मुंबई विभागाचा पुरस्कार वितरण सोहळा सुद्धा यशवंतराव चव्हाण सेंटर येथेच पार पडला. कार्यक्रमाला महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे, सेंट झेवियर्स कॉलेजच्या प्राचार्य मा. करुणा गोकर्ण, तसेच विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ मंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागीय प्राचार्य प्रवर्तक, विभागीय समन्वयक आणि जिल्हा समन्वयकांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला राज्यभरातून मोठ्या संख्येने प्राध्यापक (करिअर कट्टा महाविद्यालीन सामन्यवक विद्यार्थी, मुंबई विभागातील करिअर संसद आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुणे विभागीय पुरस्कार वितरण सोहळा व 'विकसित भारत २०४७' मध्ये महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये उच्च शिक्षणाची भूमिका महत्त्वाची विषयावरील कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्र आणि हरिभाई व्ही. देसाई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'करिअर कट्टा' अंतर्गत पुणे विभागीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक २६ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी 'विकसित भारत २०४७ : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका 'या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाराष्ट्र राज्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी मा. श्री. राजीव नंदकर यांनी भूषवले. त्यांनी आपल्या भाषणात बदलत्या शैक्षणिक धोरणाचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे उद्घाटन श्री पुणे गुजराती केळवणी मंडळाचे चेअरमन मा. डॉ. राजेशभाई शहा यांच्या हस्ते करण्यात आले. बी.एम.सी.सी. महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा. डॉ. प्रशांत साठे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विकसित भारताच्या संकल्पनेत युवकांचे योगदान आणि नवीन शैक्षणिक धोरण यांवर सविस्तर प्रकाश टाकला.
या सोहळ्याला करिअर कट्टाचे पुणे विभागीय प्राचार्य प्रवर्तक मा. डॉ. नितिन घोरपडे आणि प्राचार्य प्रवर्तक मा. डॉ. संजय खरात यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन मा. यशवंत शितोळे (अध्यक्ष, MITSC), प्राचार्य डॉ. राजेंद्र जी. गुरव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते. कार्यक्रमात पुणे, अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांना आणि प्राध्यापकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या अंतर्गत एकूण ४३ पुरस्कारांचे वितरण झाले. तसेच करिअर कट्टा अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रम आणि स्पर्धांमधील विजेत्यांनाही गौरविण्यात आले जसे, रील्स स्पर्धाः ९ पुरस्कार, AWS करिअर टूरः ७ पुरस्कार आणि सोलार एनर्जी अवेअरनेसः ६ पुरस्कार असे एकूण स्पर्धेमधील २२ पुरस्कार वितरित करण्यात आले. त्याचबरोबर मान्यवरांच्या हस्ते विद्या प्रतिष्ठान बारामती या कॉलेजला फूड व्हॅन हस्तांतरित करण्यात आली.
'युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 'करिअर कट्टा' हे एक प्रभावी व्यासपीठ ठरत असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत अशा कार्यशाळा दिशादर्शक ठरतील, असा सूर मान्यवरांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुणे विभागीय प्राचार्य प्रवर्तक विभागीय समन्वयक आणि जिल्हा समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला संपूर्ण विभागातून मोठ्या संख्येने करिअर कट्टा महाविद्यालयीन प्राचार्य, समन्वयक करिअर संसद पदाधिकारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
जळगाव विभागीय पुरस्कार वितरण सोहळा व 'विकसित भारत २०४७' मध्ये उच्च शिक्षणाची भूमिका महत्त्वाची विषयावरील कार्यशाळा संपन्न
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्र आणि सिताराम गोविंद पाटील कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, साक्री यांच्या संयुक्त विद्यमाने 'करिअर कट्टा' अंतर्गत जळगाव विभागीय पुरस्कार वितरण सोहळा २८ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी 'विकसित भारत २०४७ : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका' या विषयावर आधारित एक दिवसीय कार्यशाळेचेही यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. श्री. यशवंत शितोळे यांनी भूषवले. त्यांनी आपल्या भाषणात विकसित भारताच्या वाटचालीत तंत्रज्ञान आणि शिक्षणाची सांगड घालण्यावर भर दिला. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्या विकास मंडळ, साक्रीचे उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब चंद्रजीत सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. धुळे जिल्हा ग्रामीणचे प्राचार्य प्रवर्तक प्राचार्य डॉ. आर. आर. अहिरे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बारकावे आणि उच्च शिक्षणातील संधींवार सविस्तर मार्गदर्शन केले.
या सोहळ्याला धुळे जिल्ह्याचे प्राचार्य प्रवर्तक प्राचार्य डॉ. एम. व्ही. पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या आयोजनात विभागीय प्राचार्य प्रवर्तक प्राचार्य डॉ. स. ना. भारंबे, उपप्राचार्य डॉ. अनंत पाटील, विभागीय समन्वयक (जळगाव) प्रा. डॉ. जयेंद्र लेखरवाळे, सहविभागीय समन्वयक प्रा. डॉ. योगिता चौधरी, धुळे जिल्हा समन्वयक डॉ. संभाजी पाटील, समन्वयक डॉ. धनंजय पाटील, डॉ. अनुप मोरे आणि करिअर कट्टा संसद मुख्यमंत्री कु. रिया ठाकरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
'युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी 'करिअर कट्टा' हे एक प्रभावी व्यासपीठ असून, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अशा कार्यशाळा मैलाचा दगड ठरतील, 'असा विश्वास मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केला. कार्यक्रमांतर्गत जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाविद्यालयांना आणि प्राचार्य व समन्वयक यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या अंतर्गत एकूण २५ पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. तसेच करिअर कट्टा अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध उपक्रम आणि स्पर्धा मधील विजेत्यांनाही गौरवण्यात आले जसे, रिल्स स्पर्धा ४ पुरस्कार, AWS करिअर टूर ७पुरस्कार आणि सोलार एनर्जी अवेअरनेस ३ पुरस्कार असे एकूण स्पर्धेमधील १४ पुरस्कार वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जळगाव विभागीय प्राचार्य प्रवर्तक विभागीय समन्वयक आणि जिल्हा समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्याला संपूर्ण विभागातून मोठ्या संख्येने करिअर कट्टा महाविद्यालयीन प्राचार्य, समन्वयक, करियर संसद पदाधिकारी आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
अमरावती विभागीय पुरस्कार वितरण सोहळा व विकसित भारत २०४७ विषयावरील कार्यशाळा उत्साहात संपन्न -
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि श्री शिवाजी कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा अमरावती विभागीय पुरस्कार वितरण सोहळा व 'विकसित भारत २०४७ : महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व उच्च शिक्षणाची भूमिका' या विषयावर आधारित एकदिवसीय कार्यशाळेचे ४ मार्च २०२६ रोजी आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. प्राचार्य डॉ. आर. एम. भिसे (प्राचार्य प्रवर्तक, अकोला) हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र) यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. दिनेश खेडकर (विभागीय समन्वयक, अमरावती) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून मा. प्रा. सुरेश राऊत (सदस्य, महाविद्यालयीन विकास समिती), मा. डॉ. डी. एस. तळवणकर (विभागीय प्राचार्य प्रवर्तक, अमरावती विभाग), मा. प्रा. डॉ. रंजना जीवन (सह विभागीय समन्वयक, अमरावती विभाग) आणि मा. डॉ. मिलिंद शिरभाते (जिल्हा समन्वयक, अकोला) यांची उपस्थिती लाभली.
या कार्यशाळेमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) आणि उच्च शिक्षणाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या आर्थिक विकासामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका या विषयावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच करिअर कट्टा उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना अमरावती विभागीय पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी, प्राध्यापक व मान्यवर उपस्थित होते आणि कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना करिअर कट्टा अमरावती विभागीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.