Author
"आरोग्य विमा नावाचा जादुगार"
मा. संकेत मुनोत
MDRT, USA आर्थिक नियोजन तज्ञ आणि विमा सल्लागार संस्थापक, वेल्थब्रिज फायनान्शियल सर्विसेस

'आर्थिक नियोजनातून आर्थिक वृद्धी' या लेखाला आपण जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद !

आता ठरल्याप्रमाणे त्यातील एक-एक मुद्दा दर महिन्याला सविस्तर पणे पाहूया आणि आपली आर्थिक वृद्धीची वाटचाल सुरु करूया.

डोळे बंद करा आणि कल्पना करा तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी कोविड किंवा अन्य कुठल्या आजारामुळे दवाखान्यात भरती आहात आणि डॉक्टरांनी फुफुस्से किंवा अवयव प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करायला सांगितले आहे ज्याला ५०-६० लाख रुपये खर्च सांगितला आहे. तर हे ६० लाख मी भरतो, तू परत देऊ नको मी खर्च करतो अशी जबाबदारी घेणाऱ्या ५ मित्र तुमच्या आयुष्यात आहेत का? नाही ना? पण माझ्याकडे तसा जादुगार आहे जो मी भारतभर कुठल्याही चांगल्या दवाखान्यात Admit झालो तर १ कोटी पर्यंत माझी रक्कम तो जादुगार भरेल. आणि त्या जादुगाराचे नाव आहे हेल्थ इन्शुरन्स म्हणजे आरोग्य विमा.

तर आपल्या आयुष्यात अन्न वस्त्र निवारा आणि विमा या ४ गोष्टी प्रत्येक माणसासाठी आवश्यक आहेत. केंद्रीय आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, ८० टक्के वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत पैशांच्या समस्येमुळे परिस्थिती बिघडते. कोणत्याही अपघातात किंवा आजारात केवळ उपचारावर पैसा (Money) खर्च होत नाही तर उपचारानंतरही भरपूर पैसा खर्च होतो. अशा परिस्थितीत आरोग्य विमा खूप उपयुक्त ठरतो.

सध्या आपली बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण आणि वाढती महागाई या दृष्टीने पण आरोग्य विमा आवश्यक आहे.

एका ३५ वर्षे वयाच्या पुण्यात राहणाऱ्या व्यक्तीचे उदाहरण घेतले तर त्याला ५ लाख कव्हर साठी अवार्षिक प्रीमियम ८ हजार येतो तर ५० लाख साठी किमान ७०-८० हजार यायला हवा पण ५० लाख साठी तो येतो फक्त २० हजार रुपये तर १ कोटी कव्हर साठी २२ हजार रुपये. मग जास्त कव्हर कमी पैश्यात येत असेल तर जास्त घेतलेला काय वाईट ?

माझा ऑफिसचा आहे स्वतःचा घेऊ का? ऑफिसचा विमा तुम्ही जोपर्यंत नोकरीत आहात तोपर्यंतच असतो शिवाय त्यालाही रक्कमेची मर्यादा असते त्यामुळे स्वतःचा वेगळा हेल्थ इन्शुरन्स असायलाच हवा. उदाहरणार्थ अजयला कॅन्सर झाला त्यामुळे सतत उपचाराला द्याव्या लागणाऱ्या वेळेमुळे नोकरी सोडावी लागली आता त्याला नवीन विमाही भेटत नाही आणि जूनही चालू नाही. उपचार करताना येणाऱ्या लाखोंच्या खर्चाने तो आणि त्याचे कुटुंब खचून गेले तेच विजयने हेल्थ इन्शुरन्स काढला होता त्यामुळे त्याला सगळी रक्कम कंपनी कडून मिळाली.

रमेश आणि गणेश एकाच कंपनीत काम करत त्यांना प्रत्येकी २० हजार पगार होता. दोघांनाही दुर्धर आजाराशी सामना करावा लागला. उपचारांचा खर्च ६० लाख येणार होता. कंपनीच्या कामगार आरोग्य विमा योजनेतून त्यांना फक्त तीन लाखांपर्यंतचाच खर्च मिळू शकणार होता. बाकीची रक्कम जमवणं दोघांच्याही कुवतीबाहेरचं होतं. गणेशचं कुटुंब हवालदिल झालं. गणेशला घर, जमीन, दागिने विकावे लागले शिवाय कर्जही घ्यावं लागलं, नातेवाईकांकडे हात पसरावे लागले, रमेश मात्र यातून बचावला. कारण रमेशने वर्षाचे फक्त २० हजार रुपये भरून पूर्ण कुटुंबाचा १ कोटी रक्कमेचा आरोग्य विमा उतरवलेला होता.आसपास पाहिलं तर कुटुंबातील आजारपणामुळे कर्जबाजारी झालेले गणेशसारखे अनेकजण आपल्याला दिसतील. पण रमेशसारखे सुदैवी कमी दिसतात. कारण 'मी धडधाकट आहे. मला काही होणार नाही. मग कशाला हवा आरोग्य विम्याचा खर्च' असं बहुतेकांना वाटतं. पण असा विचार करत असताना आपण मोठ्या आजारपणात होणाऱ्या दवाखान्यांच्या बिलांची कल्पना केलेली नसते. पण नीट विचार केला, तर आरोग्य विमा ही शहाणपणाने केलेली गुंतवणूक असते. रमेशच्या उदाहरणावरून तेच लक्षात येतं.

अभिनेता सैफ आली खान वर मध्यंतरी अज्ञात चोराने हल्ला केला ज्यात तो गंभीर जखमी झाला आणि हॉस्पिटल मध्ये जवळपास ३९ लाख रुपये खर्च आला तर तो त्याला त्याच्या आरोग्य विम्यातून मिळाला. तो मोठा अभिनेता आहे शिवाय नवाब ही आहे त्यामुळे हजारो कोटींची संपत्ती असताना पण त्याने काही हजार रुपये भरून आरोग्य विमा का काढला ? कारण त्याला आर्थिक नियोजन समजते आणि आपल्याकडे एवढी संपत्ती नसतानाही आपल्याला हे समजत नाही.

आरोग्य विमा म्हणजे काय ?

आरोग्य विमा म्हणजे मोठ्या आजारपणांवरील खर्चाची आपणच केलेली तरतूद. त्यासाठी विमा कंपनीकडून पॉलिसी घ्यावी लागते. या पॉलिसीसाठी वर्षाला ठराविक हफ्ता भरायचा असतो. वार्षिक हफ्त्याच्या प्रमाणात किती रक्कमेपर्यंत संरक्षण मिळेल, ते ठरत असतं. आपल्या वयानुसार विम्याची रक्कम ठरते. आता तुम्हाला वाटत असेल की, मी फक्त काही हजार रुपये भरतोय त्याबदल्यात मला कंपनी लाखो रुपये पण कोट्यावधी रुपये कसे देते तर तुमच्यासारखे हजारो लोक जेव्हा हे पैसे भरतात तेव्हा ती रक्कम कोट्यावधी रुपयांची तयार होते आणि मग जो कोणी आजारी पडेल त्याला देणे कंपनीला सोपे जाते. आपण जेव्हा आजारी पडतो तेव्हा आपल्याला इतरांची रक्कम वापरायला मिळते तर ते आजारी पडले तर त्यांना इतरांची आणि आपली रक्कम वापरायला मिळते.

आपली आणि कुटुंबाची गरज लक्षात घेऊन अधिकाधिक कव्हरचा आरोग्य विमा काढला पाहिजे. विशेष म्हणजे तो ऑनलाईन किंवा बँकेतून न घेता चांगल्या आर्थिक नियोजन सल्लागाराकडून घ्यायला हवा कारण क्लेम आल्यावर ऑनलाईन किंवा बँक उपयोगी पडत नाही तेव्हा चांगला सल्लागारच उपयोगी पडतो.

आता तो घेताना काय काय पाहावे हे सविस्तर पाहूया

१. नेटवर्क हॉस्पिटल्स विमा कंपन्या काही हॉस्पिटत्सशी संलग्न असतात. पॉलिसी निवडताना अधिकाधिक दवाखाने त्या कंपनीच्या यादीत आहेत ना? याची खात्री करावी. अशा संलग्न हॉस्पिटलमध्ये कॅशलेस सेवा मिळते. ('कॅशलेस' म्हणजे दाखल होण्याआधी पैसे भरण्याची गरज नसणं.)

२. को- पेमेंट काही पॉलिसीत को-पेमेंटची अट असते. को पेमेंट म्हणजे हॉस्पिटलचा काही खर्च पॉसिलीधारकाने उचलणं अपेक्षित असतं. पॉलिसी घेतानाच ही रक्कम निश्चित असते. हॉस्पिटलच्या सर्व खर्चाचा भार विमा कंपनी उचलत नाही. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या बहुतांश पॉलिसीमध्ये को-पेमेंटची अट असते. अशावेळी ज्या पॉलिसीत कमीत कमी को-पेमेंट द्यावं लागेल किंवा को-पेमेंट द्यावंच लागणार नाही, अशा आरोग्यविमा पॉलिसीची निवड करावी.

३. उप-मर्यादा (Sub-limits): काही विशिष्ट आजारांवर किंवा शस्त्रक्रियांवर कंपनी खर्चाची मर्यादा ठरवून देते. हे तपासून घ्या

४. क्लेम सेटलमेंट रेशो (Claim Settlement Ratio)- कंपनीने आलेले क्लेम किती टक्के मंजूर केले, हे यावरून समजते.

ज्या कंपनीचा क्लेम सेटलमेंट रेशो ९० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, ती कंपनी विश्वासू मानली जाते. हॉस्पिटलच्या विमा विभागाला पॉलिसी नंबर दिला, की इतर सर्व बाबी कंपनी बघून घेते. ज्या कंपनीकडून आपण पॉलिसी घेत आहोत, तिचं दावे निकाली काढण्याचं प्रमाण किती आहे.

५. नो क्लेम बोनस (No Claim Bonus - NCB)

जर तुम्ही वर्षभरात कोणताही क्लेम केला नाही, तर नूतनीकरणाच्या वेळी (Renewal) कंपनी विम्याची रक्कम वाढवून देते (उदा. १०% ते ५०%). यामुळे विनाखर्च तुमचे कव्हर वाढते.आता Cumulative Bonus नावाची नवीन संकल्पना पण आली आहे ज्यात तुम्ही क्लेम घ्या किंवा नका घेऊ तो दरवर्षी मिळतोच.

६. अमर्यादित रिस्टोरेशन आपली Policy समजा १० लाखांची आहे आणि एका व्यक्तीला admit केल्यावर ती रक्कम पूर्ण वापरली गेली आणि पुन्हा कुटुंबातील तिला किंवा दुसऱ्या कुणाला क्लेम आला तर पुन्हा १० लाख दरवेळी वापरता येतात.

७. नॉन मेडिकल वस्तूचा कव्हर - समजा Admit केल्यावर या नॉन मेडीकल वस्तूंचा खर्च भरायचा म्हटला तर तोच १० - २० % असतो त्यामुळे त्याचा कव्हर असला तर आपल्याला ते पैसे भरावे लागत नाहीत.

यात आरोग्य विमा काढल्यावर हेही लक्षात घ्यावे की पहिल्याच दिवसापासून सगळे आजार कव्हर होत नसतात त्याला वेटिंग पिरियड असतो तो कशाला किती ते थोडक्यात पाहूया.

१. १ दिवस - अपघाती कव्हर पुढच्या दिवसापासून लगेच सुरु होतो.

२. १ महिना अचानक होणारे आजार १ महिन्यानंतर लगेच कव्हर होतात मलेरिया, कोविड आणि असंख्य आजार यात येतात.

३. २ वर्षे - हळूहळू होणारे आजार जसे की गुडघ्याची वाटी बदलणे, मोतीबिंदू, पाइल्स, मुतखडा, शरीरातील गाठ काढणे असे अनेक आजार २ वर्षानंतर कव्हर होतात.

४. ३ / ४ वर्षे - एखाद्या व्यक्तीला पूर्वीपासून असलेले आजार जसे की रक्तदाब, मधुमेह वगैरे ३ किंवा ४ वर्षानंतर कव्हर होतात पण काही पॉलिसी मध्ये अतिरिक्त पैसे देऊन ते लगेच पण कव्हर करता येतात.

५. कधीच कव्हर न होणारे आजार डोळे, दात, त्वचा यांचे आजार आणि सौंदर्य वाढवण्यासाठी केलेले उपचार कधीच कव्हर होत नाहीत.

6. Pregnancy - ही काही Policy मध्ये १/२ वर्षानंतर तर काही मध्ये कव्हरच होत नाही. त्यामुळे Policy घेताना हेही पहावे.

पॉलिसी काढतानाच प्रामाणिकपणे आपल्या सर्व आजारांची माहिती द्यायला हवी. ही माहिती लपवल्याचं नंतर लक्षात आल्यास दावा नाकारला जातो आणि पॉलिसीही रद्द होते. उलट आजारांची माहिती आधीच सांगितल्यास काही वर्षांनी अधिक रक्कम भरून या आजारांचंही कव्हरेज सुद्धा मिळू शकतं.

कॅन्सर किंवा अन्य मोठा आजार असल्यास Policy मिळते का? मोठा आजार असल्यास Policy मिळत नाही त्यामुळे काही आजार नसतानाच Policy घ्यायला हवी पण आजार थोडा Minor असल्यास तो सोडून इतर आजारांच्या साठी Policy मिळते तर ती घ्यायला हवी कारण तो आजार सोडून इतरही अनेक आजार होऊ शकतात.

आता क्लेम सेटलमेंटच्या काही प्रत्यक्ष घटना सांगतो

आम्ही गरीब विद्यार्थ्यासाठी शिक्षणसाठी मदत करण्यासाठी योजना चालवत होतो तेव्हा सोलापूर मधील एका एकल पालक असलेल्या काकुंशी ओळख झाली परिस्थिती गरीब असताना आपल्या मुलीला कष्टाने त्यांनी इंजिनियर बनवले या दरम्यान त्यांनी लेख वाचून संपर्क केला आणि ११ हजार रुपये भरून ५ लाखांचा आरोग्य विमा काढला काढल्यावर त्यांनी ४ महिन्यांनी आरोग्य तपसणी केली तर त्यांना मधुमेह झालेला होता तर दिड वर्षाने BP जास्त लो झाल्याने Admit झाल्यावर त्यांची अँजिओप्लास्टी करावी लागली ज्याला ४.५ लाख खर्च आला परत इतर खर्च पकडून ५.५ लाख खर्च आला शिवाय २ दिवसात त्यांचा तेथेच मृत्यू झाला तर त्यांचा क्लेम सुरवातीला नाकारला गेला या कारणाने की तुम्ही मधुमेह असल्याचे सांगितले नाही म्हणून. हॉस्पिटल बिल भरल्याशिवाय अंत्यविधी साठी पण BODY देत नव्हते. यादरम्यान त्यांना मधुमेह नंतर झाल्याचे मला माहित होते आणि मी ते हॉस्पिटलला REPORTS देऊन पटवून दिले आणि क्लेम लगेच पास झाला. त्यांच्या घरचे बोलले की ती होती तेव्हाही कोणाला त्रास दिला नाही आणि गेल्यावर पण कोणाला त्रास दिला नाही जातानाही सर्व जबाबदाऱ्या पार पडून गेली.सातारा येथील एका २२ वर्षाच्या युवकाची वार्षिक ८ हजार रुपये हप्ता भरून १० लाखाची Policy काढली Policy काढल्यावर काही महिन्यांनी त्याचा अपघात झाला आणि २.५ लाख खर्च आला आणि पुन्हा ती शस्त्रक्रिया अयशस्वी झाल्याने ३ लाख खर्च आला तर हे सर्व त्याला विम्यातून मिळाले आणि अजूनही Policy सुरु आहे फक्त अडचण एवढीच आहे की आता विमा कव्हर १० लाख च्या वर वाढवता येत नाही. अजूनही अनेक घटना आहेत ज्यात सगळे मिळून जवळपास सगळे मिळून रुपये १०-१५ कोटी चे क्लेम आत्तापर्यंत दिले आहेत. सामाजिक कार्यात कितीही आवाहन केले तरी मला एवढी रक्कम गोळा करणे शक्य नव्हते जे आरोग्य विमा नावाच्या जादुगारामुळे शक्य झाले.

हा असला तर आपण आजारी जरी पडलो तर आपल्याला हॉस्पिटलला किंवा कोणाला बिल कमी करण्यसाठी याचना करावी लागत नाही, हॉस्पिटल बदलावे लागत नाही शिवाय रक्कम गोळा करण्यासाठी इकडे तिकडे मदतीचे आवाहन करतही बसावे लागत नाही. मस्त पाहिजे तेथे Admit व्हायचे आणि फक्त येणाऱ्या जाणाऱ्या आप्तेष्टांना भेटायचे बाकी बिल वगैरे सर्व

विमा कंपनी आणि हॉस्पिटल बघून घेईल.

आरोग्य विमा घेण्याची योग्य वेळ कोणती -

अन्न वस्त्र निवारा एवढेच हे आवश्यक असल्याने लवकरात लवकर घेणे अत्यावश्यक आहे. गरज नसताना तो घ्यावा म्हणजे गरज असताना तो उपयोगी पडतो.

अनेकदा हॉस्पिटल मध्ये गेल्यावर मला फोन येतो की आता आमचा आरोग्य विमा करून द्या आम्ही दुप्पट तिप्पट हप्ता भरायला तयार आहोत तर तुम्ही दुप्पटच नव्हे १० पट जरी भरायला तयार असाल तरी तो मिळत नाही.

सध्या तर आरोग्य विमा सोबत जिम पण वर्षभराचे जिमची सदस्यता पण फ्री मिळते आणि तुम्ही रोज व्यायाम केला किंवा चाललात तर त्यामुळे पुढच्या वर्षी ३० % पर्यंत रक्कम परत मिळते. यामुळे आरोग्य ही चांगले होते आणि आर्थिक फायदाही होतो.

विकसित देशात १००% लोकांचा आरोग्य आणि जीवन विमा असतो आपल्याकडे ते प्रमाण फक्त १४% आहे म्हणजे ८६% लोक हे असे काही संकट आल्यावर कर्जबाजारी होतात. सध्या केंद्र सरकार ने १८% GST ही माफ केला आहे त्यामुळे याचा आपण अधिकाधिक लाभ घ्यायला हवा.

तर आपल्याला याबद्दल कुठलेही प्रश्न, शंका आणि अधिक माहिती हवी असल्यास कॉल, मेसेज किंवा इमेल द्वारे त्या विंचरू शकता.

पुढच्या महिन्याच्या लेखात आपण टर्म इन्शुरन्स बद्दल सविस्तर पाहूया

संकेत मुनोत, (MDRT, USA)

आर्थिक नियोजन तज्ञ आणि विमा सल्लागार

संस्थापक - Wealthbridge Financial Services

प्रामाणिकपणे आर्थिक साक्षरता आणि आर्थिक समृद्धी करणारी सामाजिक चळवळ

संपर्क - ८६६८९७५१७८, Wealthbridge.planning@gmail.com