करिअर कट्टा उपक्रमांतर्गत पहिली राज्यस्तरीय स्टार्ट-अप समिट दि. १३ डिसेंबर २०२५
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या 'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत तसेच श्री. बिंझाणी सिटी कॉलेज (स्वायत्त), नागपूर यांच्या संयुक्तविद्यमाने दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी पहिली राज्यस्तरीय स्टार्ट-अप समिट-२०२५ उत्साहात पार पडली. या समिटमधून नवउद्योजकांना मार्गदर्शन, नेटवर्किंग व नवकल्पनांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. प्रमुख पाहुणे डॉ. अभय देशमुख, संचालक, इन्क्युबेशन सेंटर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर यांनी स्टार्ट-अप म्हणजे नवकल्पनांवर आधारित व्यवसाय असून तो उभ्या स्वरूपात वाढीस मदत करतो, असे प्रतिपादन केले. बाजार संशोधन, ग्राहक मानसशास्त्र आणि FOMO (Fear of Missing Out) समजून घेऊन प्रभावी जाहिरात धोरण आखण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. डॉ. जयप्रकाश पालिवाल, संचालक, स्किल डेव्हलपमेंट सेंटर, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी यांनी व्यवसाय वृद्धीसाठी यासंवाद कौशल्य आवश्यक असल्याचे नमूद केले. अध्यक्षीय भाषणात श्री. तन्वीर मिर्झा, अध्यक्ष, यशोधरा छऋज यांनी व्यक्तिमत्त्व विकास व सुप्त प्रतिभा ओळखण्याचे आवाहन केले.
या स्टार्ट-अप स्पर्धेत निवडक १६ नवकल्पनांचा समावेश होता. त्यापैकी MGK Food and Naturals Pvt. Ltd. (सौ. पूनम मुंधडा) यांनी नैसर्गिक फळे व भाज्यांपासून तयार केलेल्या स्प्रे-ड्राइड पावडर्ससाठी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक प्रफुल सरोदे (गव्हाच्या काडीतून मूल्यवर्धित उत्पादने) यांनी मिळवला. तृतीय क्रमांक इ.डल. सेमिस्टर ख चे विद्यार्थी अचल गुप्ता, शिवानी नेरल व गौरी बांगडे यांनी हर्बल साबण व शॅम्पू या अभिनव संकल्पनेसाठी
पटकावला.
या कार्यक्रमास श्री. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र, डॉ. शरयू तायवाडे, नागपूर विभागीय प्राचार्या प्रवर्तक, डॉ. सुजित मेत्रे प्राचार्य, श्री बिंझाणी सिटी कॉलेज (स्वायत्त), नागपूर डॉ. नरेंद्र रगटाटे, नागपूर विभागीय समन्वयक, डॉ. वर्षा वैद्य, नागपूर विभागीय सह-समन्वयक, डॉ. प्रवीण लामखाडे, नागपूर जिल्हा समन्वयक, एकूण १२० करीअर संसदेचे पदाधिकारी २५ महाविद्यालयीन समन्वयक उपस्थित होते. या समिटमुळे युवकांमध्ये उद्योजकतेविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला असून नवकल्पनांना चालना मिळाली.
'AWS Career Tour' उपक्रम २२ डिसेंबर २०२५
'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत 'AWS Career Tour' या उपक्रमाचा शुभारंभ दिनांक २२ डिसेंबर २०२५रोजी एक महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा उद्घाटन सोहळा यशस्वीरीत्या पार पडला. गमतीदार अभ्यासक्रम, प्रश्नमंजुषा आणि प्रश्स्तीपत्रासह तुमच्या भाषेत करिअरला चालना देणारा कौशल्य शिकण्यासाठीचा हा उपक्रम राबविण्यात आला. २,२२,२२२ विद्यार्थ्यांनी एकाच वेळी हा अभ्यासक्रम पूर्ण करून भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना ही मानवंदना दिली.
आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजाला दिशा देवून स्त्री शिक्षण आणि महिला सबलीकरणाचा दीपस्तंभआपल्यासमोर उभा केलेला आहे. त्यांच्या विचारांचा वसा आणि बारसा आजच्या युगात अविरतपणे चालवून आधुनिक काळातील बदलत्या शैक्षणिक, सामाजिक उद्योजकीय आणि सांस्कृतिक प्रवाहाला अनुसरून समाजाच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये भरीव कामगिरी करून आपल्या क्षेत्रामध्ये अत्यंत चांगले योगदान दिल्याबद्दल 'आधुनिक सावित्री पुरस्कार २०२६', साठी निवड झालेल्या आजच्या आधुनिक सावित्री
मा. मीनल भोसले (IRS) Additional commissioner central board of indirect taxes & custom दिल्ली *अधीकारी
मा. सुप्रिया सुरेंद्र देवस्थळी (ICAS) Indian Civil Accounts Service दिल्ली अधिकारी
मा. स्मिता वंजारी Senate Member, Rashtrasant Tukadoji Maharaj Nagpur University, Nagpur नागपूर *संस्थापिका
मा. डॉ. वृषालीताई माधवराव किन्हाळकर जेष्ठ साहित्यिक, कवयित्री नांदेड साहित्यिक
मा. सुवर्णरहा जाधव Visual Artist, Colourist and Design Thinker मुंबई कला क्षेत्र
मा. संध्या शेषराव येलेकर राणी दुर्गावती कनिष्ठ कन्या महाविद्यालय, गडचिरोली
मा. अश्विनी देवस्थळी आर. पी. गोगटे कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स अँड आर. व्ही. जोगळेकर कॉलेज ऑफ कॉमर्स, रत्नागिरी
मा. डिंपल मित्तल तज्ज्ञ मार्गदर्शक, आर्थिक साक्षरता दिल्ली *आर्थिक क्षेत्र
मा. मिथिला दळवी संस्थापिका, संवाद 'अ' डायलॉग मुंबई
मा. डॉ. प्रज्ञा प्रभू प्राचार्या, क. जे. सोमैया कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मुंबई प्राचार्य प्रवर्तक
मा. डॉ. पूजा नरवाडकर प्राचार्या, भारती विद्यापीठ लॉ कॉलेज सांगली सांगली प्राचार्य प्रवर्तक*
मा. डॉ. करुणा गोकर्ण प्राचार्यों, सेंट झेवियर्स कॉलेज, मुंबई महाविद्यालयीन प्राचार्य
मा. डॉ. रजनी शिखरे प्राचार्या, र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई बीड प्राचार्य प्रवर्तक
मा. वर्षा वैद्य तायवाडे महाविद्यालय, महदुला-कोराडी
नागपूर विभागीय समन्वयक
मा. डॉ. रेखा मग्गीरवार शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती जिल्हा समन्वयक
मा. डॉ. ज्योती जोशी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स, गणेशखिंड पुणे जिल्हा समन्वयक
मा. ममता पळसपगार राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदुर रेल्वे अमरावती जिल्हा समन्वयक
मा. अक्षता मोंडकर पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय, शिरगाव सिंधुदुर्ग महाविद्यालयीन समन्वयक
मा. स्नेहल चौधरी कदम संस्थापिका, क्षितिज सामाजिक संस्था वाशिम
बारामती अधिवेशन- फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी)
विद्यार्थ्यांचे निकाल सुधारण्यासाठी एआय साधनांचा वापर करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आणि व्यावहारिक कौशल्ये शिक्षकांना सुसज्ज करण्यासाठी एआय आणि शैक्षणिक कामगिरीवर ५ दिवसांचा फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) दिनांक ३ ते ७ जानेवारीला शारदाबाई पवार महिला महाविद्यालय बारामती येथे प्राध्यापकांसाठी राबविण्यात येत आहे या FDP अभ्यासक्रम सैद्धांतिक पाया आणि प्रत्यक्ष अनुप्रयोगांचे संतुलन साधू शकतो, ज्यामध्ये अध्यापन, मूल्यांकन आणि संशोधन यासारख्या प्रमुख क्षेत्रांचा समावेश आहे.
फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम (एफडीपी) उद्दिष्टे
जनरेटिव्ह एआय आणि मशीन लर्निंगच्या मूलभूत गोष्टींचा परिचय करून देणे.
अध्यापन पद्धतीत बदल अध्यापन पद्धतींमध्ये नावीन्य आणण्यासाठी प्राध्यापकांना एआय साधनांनी सुसज्ज करणे.
मूल्यांकन धोरणांमध्ये सुधारणाः स्वयंचलित ग्रेडिंग, अभिप्राय आणि साहित्यिक चोरी शोधण्यासाठी एआय-संचालित मूल्यांकन साधनांवर शिक्षकांना प्रशिक्षित करणे.
शैक्षणिक संशोधन सुलभता : साहित्य पुनरावलोकने, डेटा विश्लेषण आणि शैक्षणिक लेखनासाठी एआय वापरण्यासाठी प्राध्यापकांना सक्षम करणे.
जबाबदारीने एआय वापर : एआय वापरताना नैतिक विचार, संभाव्य पूर्वग्रह आणि शैक्षणिक सचोटीचे महत्त्व यावर सुलभ चर्चा घडवून आणणे.