Author
स्वप्न साकार करू पोलीस उपनिरीक्षकाचे (PSI)
मा. प्रा. दिनेश विजया भारत पवार
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त

खाकी वर्दीचे आकर्षण समाजातील सर्व तरुणांना असते, त्यासाठी इयत्ता बारावी उत्तीर्ण पासून पदवीधर शिक्षण घेतलेल्या तरुणांना आपल्या आवडीनुसार खाकी वर्दीतील पदावर नोकरी मिळवता येते, पोलीस शिपाई पदापासून पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदापर्यंत तरुणांचा कौल मोठ्या प्रमाणावर दिसून येतो, यापुढेही राज्यसेवेतून पोलीस उपअधीक्षक (DYSP), केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून IPS या वाटेने जाणारे तरुण देखील बरेच आहेत, परंतु पोलीस शिपाई पदापासून ते पोलीस उपनिरीक्षक या पदापर्यंत तर तयारी करणाऱ्या विद्याथ्यांची संख्या प्रचंड आहे, पोलीस शिपाई या पदाचा अभ्यासक्रम व पोलीस उपनिरीक्षक या पदाचा अभ्यासक्रम यामध्ये बराच फरक दिसून येतो, मागील लेखामध्ये आपण पोलीस भरती पदाविषयी आपण सविस्तर माहिती घेतली आहे, या लेखात आपण पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाविषयी आपण
सविस्तर माहिती घेऊ; या पदावर कार्य करणे, अंगावर खाकी वर्दी नि त्यावर दोन स्टार, डोक्यावर पोलीस अधिकाऱ्याची कॅप असणे हे बहुतांश तरुणांचे स्वप्न असते, यासाठी सर्वजण प्रयत्न करत असतात, म्हणून हा स्वप्नांचा प्रवास सुखकर जाण्यासाठी आज या लेखातून आपण सविस्तर माहिती घेऊ,
पोलीस उपनिरीक्षक हे पद महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून गट-ब मध्ये भरले जाते, याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून केली जाते तर नेमणूक राज्यसरकार च्या माध्यमातून केली जाते.
PSI (पोलीस उपनिरीक्षक) यांचे कार्य खालीलप्रमाणे सविस्तर सांगता येईल -
१) कायदा व सुव्यवस्था राखणेः
आपल्या कार्यक्षेत्रात शांतता व सुव्यवस्था राखणे, जमाव नियंत्रण, बंदोबस्त, मोचे-सभा व्यवस्थापन
२) गुन्हे प्रतिबंध व तपासः
गुन्हे होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय तक्रारी स्वीकारणे व FIR नोंदणी गुन्ह्यांचा तपास करणे, पुरावे गोळा करणे आरोपींचा शोध, अटक व चौकशी
३) गस्त व निरीक्षणः
दिवस-रात्र पोलिस गस्त (Patrolling) संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे संवेदनशील भागांमध्ये विशेष लक्ष
४) कायदेशीर अधिकार व कारवाईः
दंड प्रक्रिया संहिता (CrPC) नुसार कारवाई वॉरंट बजावणे, जप्ती करणे. दंगल, मारामारी, बेकायदेशीर कृत्यांवर त्वरित कारवाई
५) वरिष्ठांचे आदेश अंमलात आणणेः
PI/DySP/SP यांच्या आदेशानुसार काम तपास अहवाल व केस डायरी सादर करणे.
६) अधिनस्त कर्मचाऱ्यांवर नियंत्रणः
पोलीस नाईक, शिपाई यांचे मार्गदर्शन व नियंत्रण ड्युटी बाटप, शिस्त राखणे,
७) जनतेशी समन्वयः
नागरिकांच्या समस्या ऐकणे, जनतेचा पोलीसांवरील विश्वास वाढवणे, कायदेशीर मार्गदर्शन देणे.
८) आपत्ती व विशेष परिस्थितीः
नैसर्गिक आपत्ती, अपघात, दंगल प्रसंगी मदत आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाला सहकार्य
थोडक्यात सांगायचे तर, PSI हा प्रत्यक्ष क्षेत्रात काम करणारा मुख्य अधिकारी असून गुन्हे तपास, कायदा-सुव्यवस्था आणि जनसुरक्षा ही त्याची प्रमुख जबाबदारी असते.
PSI पोलीस उपनिरीक्षक यासाठी पदवी (ग्रॅज्युएशन, कोणत्याही शाखेतील तरुण पात्र असतो.)
यासाठी किमान वयोमर्यादा अमागास किंवा मागासवर्गीय तरुणांना १९ वर्षे पूर्ण तर कमाल वयोमर्यादा अमागास तरुणांना ३१ वर्षे तर मागासवर्गीय तरुणांना ३४ वर्षे राहते, प्राविण्यप्राप्त खेळाडूंना अमागास व मागासवर्गीय तरुणांना ३६ वर्षे पुर्ण असावे लागते, दिव्यांग उमेदवार सदर पदासाठी पात्र ठरत नाही, माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा राजादिष्ट अधिकारी यांच्या साठी अमागास व मागासवर्गीय तरुणांना ३६ वर्षे पूर्ण असावे लागते. खेळाडू या वर्गातील अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी त्यांची मान्यता प्राप्त खेळाबाबतची प्रमाणपत्रे संचालक, क्रीडा व युवक संचालनालय यांच्याकडून प्रामाणित करून घेणे अनिवार्य असते. महत्त्वाचे म्हणजे परीक्षेच्या कोणत्याही टप्यावर मागासवर्गीय उमेदवारांसाठी बहीत केलेली वयोमर्यादा, परीक्षा शुल्क तसेच इतर पात्रता विषयक अटी किंवा निकषसंदर्भात कोणतीही सवलत घेतली असल्यास आशा उमेदवारांची अमागास वर्गवारीच्या पदावर शिफारस करण्यात येत नाही.
१) पोलीस उपनिरीक्षक (PSI)
एकूण परीक्षा टप्पे - ४
१) पूर्व परीक्षा - १०० गुण
२) मुख्य परीक्षा ४०० गुण
३) शारीरिक चाचणी - १०० गुण
४) मुलाखत -
४० गुण
पोलीस उपनिरीक्षक (PSI साठी १०० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते, ही चाचणी अर्हताकारी Qualifying करण्यात आली आहे, यामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी एकूण गुणांपैकी किमान ७०% गुण म्हणजे ७० गुण आवश्यक आहे, त्यानंतर पात्र उमेदवारांची ४० गुणांची मुलाखत घेतली जाते) यामध्ये पुरुषासाठी गोळा फेक (७.२६० कि.ग्रॅ) - १५ गुण, पूलअप्स २० गुण, लांब उडी १५ गुण, ८०० मीटर धावणे ५० गुण असे १०० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते. तर महिला उमेदवारांकरीता गोळा फेक (४ कि. ग्रॅ.) २० गुण, घावणे ४०० मीटर - ५० गुण, लांब उडी ३० गुण अशी एकूण १०० गुणांची शारीरिक चाचणी घेतली जाते)
अभ्यासक्रम * -
पूर्व परीक्षा (सामान्य क्षमता चाचणी) १०० प्रश्न, १०० गुण, वेळ - एक तास
माध्यम - मराठी / इंग्रजी
परीक्षा स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
१) इतिहास- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्र इतिहास
२) भूगोल - विशेष महाराष्ट्र भूगोल, पृथ्वी, जगातील
विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी 

३) अर्थव्यवस्था- भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिर्घ व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोष नीती इत्यादी शासकीय अर्थव्यवस्था अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण इत्यादी
४) सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र,
प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, आरोग्यशास्त्र
५) चालू घडामोडी - जागतिक तसेच भारतातील
६) राज्यशास्त्र
७) अंकगणित- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,
दशांश, अपूर्णांक व टक्केवारी इतर
८) बुद्धिमापन चाचणी- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न
या परीक्षेसाठी नकारात्मक गुणदान पध्दत लागू असेल - प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता २५ % (१/४) गुण एकूण गुणांमधून बजा किंवा / कमी करण्यात येतात.
मुख्य परीक्षा स्वरूप व अभ्यासक्रम-
पेपर क्रमांक १- मराठी व इंग्रजी १०० प्रश्न २०० गुण (मराठी- ५० प्रश्न, १०० गुण, इंग्रजी ५० प्रश्र, १०० गुण) वेळ - १ तास, स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी पेपर क्रमांक २- सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी १०० प्रश्न, २०० गुण, वेळ १ तास, मध्यम मराठी व इंग्रजी स्वरूप - वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
विद्यार्थी मित्रांनो पोलीस उपनिरीक्षक PSI पदापर्यंत पोहचण्यासाठी आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी नि संयम असणे गरजेचे आहे, हा टप्पा मेहनत करणाऱ्यांना सोपा आहे, पण यासाठी योग्य नियोजन, वेळ देण्याची तयारी, अभ्यासाची बैठक या सर्व बाबी असतील तर यश आपलेच समजा, आपण कॉलेज मध्ये शिक्षण घेत असतानाच जर यासाठी तयारी सुरू केली तर खूप फायदा होतो, सर्व काही समजून घेऊन तयारी करणे गरजेचे असते, या प्रवासात असंख्य अडचणी, भीती, दडपण निर्माण होत असते पण तेवढ्धाच क्षमतेचे धाडस उभे केल्यास सर्व काही सुरळीत होते, प्रवास
खडतर आहे पण शेवटी मिळणारे यश सुखकर आहे, त्यामुळे आताच नियोजन करा आणि जोरदार सुरुवात करा आणि यशाचे मानकरी बना, करिअर कट्टा टीम तुम्हाला येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी आणि योग्य मार्ग दाखवण्यासाठी सक्षम आहे. सर्व ध्येयवेड्या तरुणांना या प्रवासासाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा !