सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार.
विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, नुकतेच केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा लेखा परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यात बरेच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि बऱ्याच उमेदवारांना यशाची ही पायरी गाठता आलेली नाही; तर आज आपण अशा सर्वच विद्यार्थ्यांसाठी म्हणजे जे या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत असे आणि भविष्यात या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊ इच्छिणाऱ्या, अशा सर्व उमेदवारांसाठी हा लेख सादर करीत आहोत. या अनुषंगाने मुलाखतीची तयारी कशी करायची किंवा त्यासाठी कोणकोणत्या दृष्टीने अभ्यास करायचा या नानाविध प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून करणार आहोत.
मागील काही लेखन मालिकेमधून मी जसे सांगत आलेलो आहेच की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची मुलाखतीची जी पायरी असते ती म्हणजे क्रिकेटमधील T२० च्या मॅच सारखीच असते ज्याप्रमाणे २० मॅच मध्ये खेळाडूला प्रसंगावधान आणि तत्पर राहणे गरजेचे असते आणि वेळेच्या शर्यतीमध्ये चपखलपणे आपली सर्व कलाकौशल्य दाखवत त्याला आपला खेळ सादर करावयाचा असतो, अगदी तसंच या मुलाखतीच असतं आता या मुलाखतीसाठी तयारी करताना सर्वप्रथम आपण DAF बद्दल बोलू, ज्याला डिटेल अॅप्लिकेशन फॉर्म असे म्हणतात. हा फॉर्म उमेदवार मुख्य परीक्षेच्या वेळेला भरून देत असतात त्यावेळेस जे काही तपशील विद्यार्थ्यांनी नोंदवलेले असतील त्या तपशिलांच्या बद्दल अधिक जागरूक राहणं आणि अधिक अभ्यास करणं हा मुलाखतीच्या अभ्यासाच्या दृष्टीने प्रारंभ बिंदू ठरू शकतो आणि याप्रमाणे अभ्यास असायलाच पाहिजे DAF चा अभ्यास करताना नेमकी सुरुवात कशी करायची? याबद्दल जर सांगायचे झाले तर आपण आपले तपशील आपल्या
DAF मध्ये जे काही लिहिलेले आहे म्हणजे अगदी आपल्या नावापासून तर शेवट आपल्या स्वाक्षरीपर्यंत या DAF मध्ये जे काही आपल्या आवडी-निवडी, छंदाबद्दल लिहिलेले असेल त्या सगळ्या लिहिलेल्या मजकुराला आपण एका वेगळ्या वहीमध्ये प्रत्येक पानावर एक शब्द असे पहिले लिहून घ्यायचे आणि नंतर त्या शब्दावर आपल्याला जे काही आठवत असेल म्हणजेच अगदी बाळबोध प्रश्न उपस्थित होत असेल तर; ते देखील त्यावर लिहून घ्यायचे. उदाहरणार्थ, जर आपलं नाव प्रशांत आहे तर प्रशांत या नावाचा अर्थ काय किंवा या नावाची कोणकोणती प्रसिद्ध व्यक्ती आहेत? या नावामुळे आपल्या आयुष्यामध्ये काही गमतीदार प्रसंग घडले आहे का, की काही अशा गोष्टी घडल्या आहेत का की, ज्या आपल्या लक्षात आहे त्या सगळ्या प्रश्नाच्या स्वरूपात त्या कागदावर लिहून घेतलेल्या पाहिजे म्हणजेच काय तर त्या नावाचा इतर कोणी व्यक्ती आहे का त्या नावाची व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीने काही महत्त्वाच्या सामाजिक कार्यात काही योगदान दिलेले आहे का? तर या सगळ्या नोंदी आपण आधीच करून ठेवायला हव्यात तर अशा प्रश्न उत्तरांचा अभ्यास करताना फार उपयोग होतो हा झाला एक मुद्दा तर; दुसरा मुद्दा जेव्हा आपण असे तपशिलावार हिशोबात या सगळ्या गोष्टी अभ्यासत असतो तेव्हा उमेदवाराच्या मनात नकळतपणे आत्मविश्वास जागा होत असतो ज्यामुळे तो अचानक आलेल्या प्रश्नांची उत्तरं मुलाखतीच्या वेळेस देण्याची ताकद ठेवतो.
आता हा सराब करताना बऱ्याचदा असं होतं की, आपण थकून जातो समजा जर आपण सकाळी अभ्यासाला सुरुवात केली आणि ही गोष्ट करायला लागलो तर दोन, चार, दहा, बीस पान उलटली की आपलं मन, आपला मेंदू थकून जातो आणि त्यामुळे मग पुढे नवे शब्द नवे प्रश्न आपल्याला मिळू शकत नाही, नैसर्गिकरित्या या प्रक्रियेत आपल्याला थकवा जाणवतो तर अशा वेळेस काय करावं तर; पटकन आपण आपल्या नियमितपणे करणाऱ्या अभ्यासाची सुरुवात करायची म्हणजेच काय तर आता हा सराव केला आहे तर आता उरलेला दिवस आपण चालू घडामोडींसाठी अभ्यास केला किंवा आपल्या वैकल्पिक विषयाचा अभ्यास केला आणि मुलाखतीच्या तयारीसाठीचा अभ्यास केला तर ह्याने होतं असं की ज्यावेळेस आपण पुढच्या प्रश्नांची यादी तयार करायला लागू त्यावेळेस अत्यंत प्रसन्न मनाने विशिष्ट उद्देशाने आपण हे प्रश्न तयार करायला घेत असू जेणेकरून हे सराव करण्यामागचा जो काही उद्देश असतो तो योग्य ठरतो आणि निश्चितच याचा फायदा होतो. मी आधी म्हटल्याप्रमाणे, आता आपल्याकडे एक वही तयार झाली ज्यामध्ये सगळे प्रश्न आपण लिहिलेले आहेत. जे कीवर्ड्स आपण लिहून ठेवलेले आहेत याचा आता विचार करूयात. या प्रश्नांच्या उत्तराचा आपण नंतर विचार करूया. एक उदाहरण या संदर्भातले बघू. समजा आता तुमच्याजवळ १५ मुद्दे आहेत त्यापैकी एक तुमचं जन्मगाव असेल तर ते जन्मगाव कुठे येतं, महाराष्ट्रात येतं, की इतरत्र मग कुठे?, तुमचे शिक्षण बीएससी, बीकॉम, बीए असं कुठल्याही शाखेत झालं असू शकतं, मग आपण जिथे राहतो त्या भागातील पदवी महाविद्यालय किती आहेत? कला, वाणिज्य शाखा अशी महाविद्यालय किती आहेत? नुसतच विज्ञान शाखा असलेले किती महाविद्यालय आहेत? मग आपला आवडता छंद काय आहे? अशी एक मुद्द्यांसकट यादी तयार करायची म्हणजे त्याचे कॉलम बनवायचे आणि याच कॉलमच्यावरती एका खाली एक या सगळ्या माहिती परत लिहायच्या म्हणजे यांनी काय होईल तर; तुमच्याकडे जर १५ गोष्टी तुम्हाला अवगत असेल तर या १५ मुद्द्यांचा १५ × १५ चा आपल्याकडे मॅट्रिक्स तयार होईल.
मग आता यावर प्रश्न तयार करायचे असतील तर ते कसे करायचे. समजा आता आपल्याला महाराष्ट्रातील अकोला जिल्हा याविषयी विचार करायचा असेल तर आधी
अकोला हे महाराष्ट्रातील एक जिल्हा आहे मग या अकोल्याचे महाराष्ट्रातील वैशिष्ट्य काय आहे? ते लोकसंख्येच्या बाचतीत किती आहे? स्टेट जेडीपीमध्ये त्याचं किती योगदान आहे? वनविभाग किती आहे? या सगळ्या गोष्टींचा अत्यंत बारकाईने लक्ष देऊन एक वेगळी यादी तयार करायची. असं प्रत्येक वेळेला करत असताना मग अकोला मध्ये बीएससी चे किती महाविद्यालय आहेत? तिथे सायन्स एज्युकेशनच्या दृष्टिकोनातून आणखी काय पर्याय आहे? काय संधी आहेत ? दुसरं बघायचं झालं तर अकोला आणि केमिस्ट्री असं जर घेतलं तर या विषयांचा नेमका अकोल्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे? या सगळ्यांचा अभ्यास पद्धतीने तपशील बनवला की आपल्याला एक दोन अशा सलग गोष्टींना जोडून जो प्रश्न येतो त्याबद्दल आपण आश्चर्य न करता अशा प्रश्नांना कसं उत्तर द्यायचं, या प्रश्नांना कसे सामोरे जायचे याचा आपण विचार करू शकतो.
अशा पद्धतीने सराव करायला हवा, हेच प्रश्न्न आपल्याला मुलाखतीमध्ये विचारले जातील का? तर याचे उत्तर 'नाही' असं देण्यापेक्षा अशाच पद्धतीने संबंधित प्रश्न विचारले जातात आणि अशा प्रन्नांचा सराव करणे म्हणजेच 'मुलाखतीची तयारी करणे असं होय.' असा अभ्यास करताना आपल्याला आपल्या वैकल्पिक विषयाचा अभ्यास करणे तितकेच गरजेचे असते. जेव्हा आपण असा एक चार्ट बनवतो त्याच्यामध्ये वैकल्पिक विषयाचा सुद्धा बऱ्यापैकी अभ्यास होत असतो. उदाहरणार्थ आपला वैकल्पिक विषय असेल राज्यशास्त्र तर राज्यशास्त्र आणि महाराष्ट्र याचा संबंध काय आहे? असा अभ्यास करायचा झाल्यास या विषयातील अनेक तज्ज्ञ मंडळींचे मत त्यांचे एकूण योगदान काय होतं याची माहिती घेऊन या विषयीचे प्रश्न्न तयार आपण करू शकतो असा अभ्यास करताना विशेषतः वैकल्पिक विषयाचा अभ्यास करीत असताना जो आपल्या अभ्यासक्रमात दिलेला मुख्य विषय असतात किंवा जे महत्त्वाचे मुद्दे असतात त्या मुद्द्यांचा आपण विचार करू शकतो महाराष्ट्रातील विचारतज्ज्ञ, समाज सुधारक, विचार प्रवर्तक आपणच आपल्या प्रश्नांची सूची उपलब्ध माहितीच्या आधारे करू
शकतो. प्रत्येक विद्याथ्यांनी आपापल्या DAF नुसार प्रश्नांची तयारी करावी जर आपल्याला या परीक्षेत यशस्वी व्हायचे आहे तर ही तयारी करणे अत्यंत गरजेचे आहे ही झाली लिखाणाची बाब, आता प्रात्यक्षिक स्वरूप बघता केवळ प्रश्न उत्तरे असाच फॉरमॅट मुलाखतीचा नसतो तर हा एक औपचारिक संवाद असतो मुलाखत ही केवळ तुमच्या ज्ञानाची तपासणी करीत नाही तर सर्व बाबींचा सखोलपणे विचार केला जातो. विद्याथ्यांजवळ ज्ञान आहे हे परीक्षेत पास झाल्यावर सिद्ध होतच पण मग पुढे एक भावी अधिकारी म्हणून हा उमेदवार कसा आहे हे तपासण्यासाठी ही मुलाखत असते यामध्ये केवळ या प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी कसा देतो आहे हे महत्त्वाचे नसून त्याचा आत्मविश्वास, प्रसंगावधान किती आहे, सादरीकरण कसा करतो आहे या सगळ्यांचा विचार केला जातो. आपण जो पोशाख परिधान करतो त्याचेही मुलाखतीमध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मुलांनी शक्यतो स्वच्छ आणि कडक इस्त्रीचे कपडे घालावे याचं कारण असं की, नवीन कपडे घातले की आपला आत्मविश्वास आणखी मजबूत होतो. मुलं जर टाय घालत नसतील तर त्याचा सराव करून घेणे आवश्यक आहे. पण समजा जर का तुम्हाला टाय घालणं जमत नसेल किंवा घातल्यावर आपण Comfortable नसू तर घालू नये, पण इतर उमेदवारांनी तो घातला आहे म्हणून आपला आत्मविश्वास कमी होऊ देण्याचे काहीही कारण नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. मुलींच्या बाबतीत बोलायचं झालं तर या उमेदवारांनी साडी किंवा ड्रेस परिधान करावा. सांगायचं मुद्दा हा आहे की, सगळ्या गोष्टी ज्याप्रमाणे मुलांना लागू पडतात तशा मुलींना देखील लागू पडतात. या सगळ्यांची काळजी आपण आधीच घेतली पाहिजे आणि या अनुषंगाने आपण प्रयत्न केले पाहिजेत.
मुलाखतीच्या वेळेस जाताना आपले कागदपत्र अद्ययावत आहेत का? याची तपासणी करून घेतली पाहिजे. कारण तिथे या सगळ्या कागदपत्रांची फेरतपासणी होणार आहे, याचा एक संच पहिलेच बनवून ठेवलेला आहे का या सगळ्यांची उजळणी केली पाहिजे. हे सगळं गरजेचे यासाठी आहे की, तिथे आयत्या वेळेत आपली धावपळ होता कामा नये. आता महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, सराव किती करायचा, आपल्या मुलाखतीच्या सराव प्रक्रियेसाठी किती
Mock Test द्यायच्या? तर माझ्या मते, आपण जितके अधिक Mock Test द्याल तितकी अधिक चांगली तयारी आपली या माध्यमातून होऊ शकते पण या सगळ्यात ही सुद्धा काळजी घेतली पाहिजे की Mock चांगल्या पॅनल कडूनच घेतला पाहिजे. कारण बाजारात जर आपण गेलो तर बरेचसे कामचलाऊपणा करणारे Mock घेणारेपण काही इन्स्टिट्यूट आहेत तर यापासून स्वतःला जरा दूर ठेवले पाहिजे. चांगल्या ठिकाणीच आपण आपला Mock दिला पाहिजे अशा ठिकाणी तुम्हाला फीडबॅक चांगला येईल. बऱ्याचदा असं पण होतं की आपण दोन ठिकाणी Mock दिलेत तर एकाने जो फीडबॅक दिला अगदी तसेच दुसऱ्या बाजूने आपल्याला येणारा अभिप्राय हा वेगळा असू शकतो तर अशा वेळेस घाबरून जायचं नसतं कारण आपण एके दिवशी जसे प्रेझेंट केले तसेच दुसऱ्या दिवशी करूच असे नाही; प्रश्नसंच वेगवेगळे असतात आपला माईंडसेटही वेगळा असतो. आपण Mock च्या फीडबॅक मधून सरावामुळे काय सकारात्मक बदल होणार आहे तेवढेच आपण घेतलं पाहिजे. आपल्याला अभिप्राय दिला तर आपण आपल्या ध्येयाकडे मुख्यत्वे मुलाखतीकडे आपलं लक्ष केंद्रित करू शकतो आणि आपण व्यवस्थितरित्या मुलाखत देऊ शकू. मुलाखतीकरिता जे वेगवेगळे विषय आहेत त्याच्यावर कसे प्रश्न येतात किंवा काही आधी विचारले गेलेले प्रश्न किंवा या प्रश्नांना कसे सामोरे गेलेले उमेदवार आणि त्यांना कसा अनुभव आलेला आहे याबद्दल आपण पुढील लेखांमधून सविस्तर चर्चा करणार आहोतच.
मुलाखतीची तयारी ही केवळ प्रश्न उत्तरांचा सराव नसून आत्मविश्वास, प्रसंगावधान, सादरीकरण आणि व्यक्तिमत्व यांचा सर्वांगीण विचार केला जातो. योग्य पद्धतीने केलेली तयारी उमेदवाराला यशाच्या दिशेने घेऊन जाते. ज्ञान, आत्मविश्वास आणि सादरीकरणाचे कौशल्य असल्यास मुलाखतीत उमटतो यशाचा प्रकाशपथ !