Author
RBI आणि बँकिंग PO परीक्षा एक उत्कृष्ट करिअर पर्याय
मा. डॉ. तुषाबा शिंदे
(IRPS) (Director, DARPG, Ministry of Personnel, Public Grievances and Pensioners, New Delhi)

 

भारतीय अर्थव्यवस्था आज वेगाने प्रगत होत आहे आणि तिच्या या प्रवासात बँकिंग क्षेत्राची भूमिका अत्यंत निर्णायक आहे. बँका फक्त ठेवी आणि कर्जपुरते मर्यादित राहिलेल्या नाहीत, तर त्या आज आर्थिक समावेशन, डिजिटल पेमेंट्स, सूक्ष्मवित्त, कृषी विकास, उद्योगवृद्धी आणि राष्ट्रीय गुंतवणुकीच्या योजनांचा कणा बनल्या आहेत.
या क्षेत्रात तरुणांसाठी स्थैर्य, प्रतिष्ठा आणि प्रगती या तिन्ही गोष्टींचे संगम असलेली पदे उपलब्ध आहेत. या पार्श्वभूमीवर बँकिंग क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या असून तरुणांसाठी हे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने अत्यंत आकर्षक बनले आहे. 

बँकिंग क्षेत्रामध्ये सहाय्यक महाव्यवस्थापक (RBI ग्रेड B) आणि प्रविक्षाधीन अधिकारी (Probationary Officer PO) यांसारख्या महत्त्वाच्या पदांची भरती विविध स्पर्धा परीक्षांद्वारे केली जाते. या पदांसाठी राष्ट्रीय स्तरावर विविध संस्था स्वतंत्र परीक्षा आयोजित करतात, त्या परीक्षा पुढीलप्रमाणे आहेत :
1. RBI Grade B Posts (Reserve Bank of India)
2. SBI PO (State Bank of India)
3. IBPS PO (Institute of Banking Personnel Selection)
भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India-RBI)
ही भारताची केंद्रीय बँक आहे, जी देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा पाया मानली जाते. ती देशातील चलन व्यवस्था, बँकिंग नियंत्रण, पत धोरण, आणि वित्तीय स्थैर्य राखण्याचे कार्य करते. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात, अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत ठेवण्यासाठी RBI ची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. "RBI हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मेंदू आहे," असे म्हटले जाते, कारण प्रत्येक वित्तीय निर्णयावर तिचा थेट किंवा अप्रत्यक्ष प्रभाव असतो.
RBI ही भारतातील सर्वात प्रतिष्ठित बँकिंग संस्थांपैकी एक आहे.
येथे नोकरी केल्यास तुम्हाला खालील लाभ मिळतात :
उत्तम करिअर प्रगती (Career Progression) - पदोन्नतीच्या अनेक संधी उपलब्ध असतात.
व्यावसायिक प्रगतीची क्षमता (Professional Potential) - तुम्ही तुमच्या कौशल्यांचा विकास सतत करू शकता.
कामातील समाधान (Job Satisfaction)- जबाबदार आणि बौद्धिकदृष्ट्या प्रेरक काम.
नोकरीची हमी (Job Security) सरकारी संस्थेतील स्थिरता.
आकर्षक सुविधा (Perks and Facilities) - उत्तम वेतन, निवास, आरोग्यविमा आणि इतर लाभ.
सामाजिक प्रतिष्ठा (Social Image)- समाजात आदर आणि सन्मान प्राप्त होतो.
ज्ञानवृद्धीसाठी सर्वोत्तम स्थळ (Ideal Place for Knowledge and Growth)

RBI ही केवळ एक नोकरी नसून वित्त (Finance) आणि अर्थशास्त्र (Economics) या क्षेत्रातील ज्ञान वाढवण्यासाठी आणि स्वतःची क्षमता विकसित करण्यासाठी सर्वोत्तम व्यासपीठ आहे.
येथे कार्य करताना तुम्हाला देशाच्या आर्थिक धोरणांशी संबंधित महत्वाच्या निर्णयांमध्ये अप्रत्यक्ष सहभाग मिळतो.
RBI मध्ये करिअर म्हणजे "आकाशच मर्यादा आहे." वाचा अर्थ असा की भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मध्ये करिअर केल्यास तुमच्या ज्ञान, बुद्धिमत्ता आणि प्रगतीच्या संधींना मर्यादा नाहीत. येथे तुम्ही आर्थिक धोरण, वित्तीय व्यवस्थापन, संशोधन आणि देशाच्या अर्थव्यवस्थेच्या गाभ्यातील कार्य यात थेट योगदान देता.
RBI Grade B परीक्षा (Reserve Bank of India Grade B Examination)
ही परीक्षा थेट अधिकाऱ्यांच्या भरतीसाठी (Direct Recruitment of Officers) घेतली जाते.
म्हणजेच, यशस्वी उमेदवार थेट RBI मध्ये Grade B Officer पदावर कार्यरत होतात.
परीक्षा आयोजक संस्था (Conducted By): भारतीय रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India -RBI)
भरतीसाठी पदे (Posts):
RBI ही परीक्षा पुढील Grade 'B' अधिकारी पदांसाठी घेतली जाते -
१. Grade 'B' (DR)-General (सामान्य अधिकारी)
२. Grade 'B' (DR)-DEPR (Department of Economic and Policy Research) - अर्थशास्त्र विभागासाठी
३. Grade 'B' (DR) DSIM (Department of Statistics and Information Management) सांख्यिकी विभागासाठी
परीक्षा टप्पे (Exam Stages):
RBI Grade B परीक्षा तीन मुख्य टप्प्यांत पार पडते -
टप्पा १: प्राथमिक परीक्षा (Phase | - Objective Test)
टप्पा २: मुख्य परीक्षा (Phase II-Descrpitive + Objective)
टप्पा ३ः मुलाखत (Interview)
फेज || मध्ये यशस्वी उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.
मुलाखतीत उमेदवाराचे व्यक्तिमत्त्व, वित्तीय समज, विश्लेषण कौशल्य आणि संवादकौशल्य तपासले जाते.
RBI Grade B प्राथमिक परीक्षा (Phase I-Prelims Exam)
१. परीक्षा स्वरूप (Exam Pattern):
RBI Grade B ची प्राथमिक परीक्षा ही Objective Type (बहुपर्यायी प्रश्न स्वरूपात) घेतली जाते. परीक्षेचा एकूण कालावधी १२० मिनिटे (२ तास) असून चार मुख्य विषयांचा समावेश असतो.
२. विषयवार गुण आणि वेळेचे वाटप (Section-wise Distribution):

क्र.विषय (Areas)प्रश्नसंख्यागुणवेळ (मिनिटे)पेपरनिहाय अभ्यास विषय
सामान्य ज्ञान (General Awareness)८०८०२५चालू घडामोडी, आर्थिक व बँकिंग घडामोडी, RBI संबंधित माहिती, सरकारी योजना, अहवाल इ
संख्यात्मक योग्यता (Quantitative Aptitude)३०३०२५गणितीय तर्क, डेटा इंटरप्रिटेशन, टक्केवारी, प्रमाण, साधारण गणित
इंग्रजी भाषा (English Language)३०३०२५व्याकरण, वाचन आकलन, शब्दसंग्रह, वाक्यरचना व त्रुटी शोध
तर्कशक्ती (Reasoning Ability)६०६०४५व्याकरण, वाचन आकलन, शब्दसंग्रह, वाक्यरचना व त्रुटी शोध
एकूण २००२००१२० मिनिटे 

३. इतर तपशील (Other Details):
प्रत्येक प्रश्नाला १ गुण.
चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking) लागू - प्रत्येकी % गुण वजा.
सर्व विभाग ऑनलाइन मोडमध्ये (Computer-Based Test) असतात.
कट-ऑफ दरवर्षी बदलतो.
परीक्षा इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध असते.
इंग्रजी विषय (English Section) मात्र फक्त इंग्रजी भाषेतच विचारला जातो.
गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड Phase II (मुख्य परीक्षा) साठी केली जाते.
RBI Grade B मुख्य परीक्षा (Phase II-Mains Examination)
१. परीक्षा स्वरूप (Exam Pattern):
मुख्य परीक्षा (Mains) ही तीन स्वतंत्र पेपरमध्ये (Paper I, II, III) घेतली जाते.
यात वर्णनात्मक (Descrpitive) आणि वस्तुनिष्ठ (Objective) दोन्ही प्रकारचे प्रश्न असतात.
सर्व पेपर फक्त इंग्रजी भाषेत (English Only) घेतले जातात.
२. विषयवार परीक्षा तपशील (Section-wise Exam Details):

क्र.पेपरविषय (Subjects)प्रकार (Type)गुण (Marks)कालावधी (Minutes)पेपरनिहाय अभ्यास विषय
पेपर Iअर्थशास्त्र व सामाजिक विषय (Economic & Social Issues -ESI)वस्तुनिष्ठ (Objective)१००९०भारतीय अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, दारिद्र्य, बेरोजगारी, सामाजिक रचना, शासनाच्या योजना व धोरणे, शाश्वत विकास आणि आर्थिक सुधारणा.
पेपर IIइंग्रजी लेखन कौशल्य (English Writing Skills)वर्णनात्मक (Descrpitive)१००९०निबंध लेखन, अचूक लेखन /संक्षेप लेखन, वाचन व समज, उद्देश उमेदवाराचे विश्लेषणात्मक आणि लेखन कौशल्य तपासणे.
पेपर IIIवित्तीय सेवा व व्यवस्थापन (Finance and Management -FM)वस्तुनिष्ठ (Objective)१००९०वित्तीय प्रणाली, व्यवस्थापनाचे तत्त्व, नैतिकता व प्रशासन, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, वित्तीय बाजार, जोखीम व्यवस्थापन आणि बँकिंग ऑपरेशन्सशी संबंधित विषय.
एकूण (Total) --३००२७० मिनिटे (४ तास ३० मिनिटे)-

३. नकारात्मक गुणपद्धती (Negative Marking):
फक्त वस्तुनिष्ठ पेपरसाठी (Paper | आणि Paper III) लागू आहे.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा (¼ Negative Marking) केली जाते.

४. एकूण गुणांकन (Overall Weightage):
मुख्य परीक्षा : ३०० गुण
मुलाखत (Interview): ७५ गुण
अंतिम निवड एकूण गुणांच्या (३७५) आधारे मेरिट लिस्टनुसार केली जाते.
बँकिंग पी.ओ. (Probationary Officer) करिअरचे महत्त्व (Importance of Banking PO Career)
RBI प्रमाणेच, बँकिंग पी.ओ. (Probationary Officer) हे बँकिंग क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे आणि संधीपूर्ण करिअर आहे. बँकेच्या शाखा संचालन, कर्ज वितरण, ग्राहक सेवा, आणि वित्तीय नियोजन या सर्व जबाबदाऱ्यांचा पाया हे अधिकारीच असतात.
हे पद म्हणजे बँकेत व्यवस्थापन श्रेणीतील प्रवेशद्वार (Entry Point) असून, पुढील उच्च पदांपर्यंत प्रगतीची संधी मिळते
सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)
शाखा व्यवस्थापक (Branch Manager)
महाव्यवस्थापक (General Manager)
मुख्य महाव्यवस्थापक (Chief General Manager-CGM)
कार्यकारी संचालक (Executive Director)
मुख्य व्यवस्थापकीय संचालक (Managing Director/CMD)
म्हणजेच, PO पदावरून सुरुवात करून बँकेतील सर्वोच्च नेतृत्वाच्या पदापर्यंत पोहोचणे शक्य आहे.
दरवर्षी भारतीय स्टेट बँक (SBI) आणि IBPS (Institute of Banking Personnel Selection) या संस्थांमार्फत देशभरात हजारो PO पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते.
SBI परीक्षा (State Bank of India Examinations)
SBI ही भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक असून, देशभर तिच्या हजारो शाखा आहेत. SBI स्वतःच्या भरती परीक्षा स्वतंत्रपणे आयोजित करते. परीक्षा प्रकारः
Probationary Officer (PO) अधिकारी पदासाठी १.
२. Clerk (लिपिक) - ग्राहक सेवा व दैनंदिन बँकिंग व्यवहारांसाठी
३. Specialist Officer (SO)-IT, HR, कायदा, मार्केटिंग इत्यादी शाखांसाठी
SBI PO परीक्षा (State Bank of India Probationary Officer Exam)
परीक्षा आयोजित संस्था (Conducted By): भारतीय स्टेट बैंक (State Bank of India)
उद्देश (Purpose): SBI च्या विविध शाखांमध्ये प्रविक्षाधीन अधिकारी (PO) पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करणे. पदाचे स्वरूप (Nature of Post): PO म्हणजेच बँकेतील अधिकारी प्रशिक्षणार्थी. प्रशिक्षणानंतर उमेदवारांना व्यवस्थापकीय जबाबदाऱ्या दिल्या जातात.
परीक्षा रचना (Exam Structure):
SBI PO परीक्षा तीन टप्प्यांत घेतली जाते
१. प्राथमिक परीक्षा (Preliminary Exam)
२. मुख्य परीक्षा (Mains Exam)
३. गटचर्चा व मुलाखत (Group Discussion & Interview)

१. प्राथमिक परीक्षा (Prelims Exam):

विषयप्रश्नसंख्यागुणवेळ
इंग्रजी भाषा (English Language)३०३०२० मिनिटे
तर्कशक्ती (Reasoning Ability)३५३५२० मिनिटे
संख्यात्मक योग्यता(Quantitative Aptitude)३५३५२० मिनिटे
एकूण१००१००६० मिनिटे

वैशिष्ट्येः
सर्व प्रश्न Objective (MCQ) स्वरूपात असतात.
Negative Marking: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा.
फक्त पात्र उमेदवारांना Mains साठी बोलावले जाते.
२. मुख्य परीक्षा (Mains Exam):
मुख्य परीक्षा दोन भागांमध्ये विभागली असते
(i) वस्तुनिष्ठ परीक्षा (Objective Test) आणि
(ii) वर्णनात्मक परीक्षा (Descrpitive Test)

विषयप्रकारगुणवेळ
तर्कशक्ती व संगणक ज्ञानObjective६०६० मिनिटे
सामान्य/आर्थिक जागरूकताObjective६०४५ मिनिटे
डेटा विश्लेषण व व्याख्याObjective४०३५ मिनिटे
इंग्रजी भाषाObjective३५४० मिनिटे
वर्णनात्मक परीक्षा (निबंध व पत्रलेखन)Descriptive५०३० मिनिटे
एकूण २५०३ तास ३० मिनिटे

३. गटचर्चा व मुलाखत (GD & Interview):
Group Discussion (GD): २० गुण
Interview: ३० गुण
अंतिम निवड गुणांच्या एकत्रित निकालावर आधारित केली जाते.
SBI PO वेतन व सुविधा (Salary & Perks):
प्रारंभिक वेतनः अंदाजे १६५,००० प्रति महिना (भत्तेसह)
घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता, वैद्यकीय सुविधा, परदेश प्रशिक्षण संधी.

करिअर वाढ जलदगतीने होते PO Manager→AGM GMCGMDMDMD.
IBPS परीक्षा (Institute of Banking Personnel Selection)
IBPS संस्था दरवर्षी विविध सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये भरतीसाठी परीक्षा घेत असते. ही निवड प्रक्रिया पारदर्शक व राष्ट्रीय स्तरावर होते.
परीक्षा प्रकारः
Probationary Officer (PO) अधिकारी पदासाठी १.
Clerk (लिपिक) - ग्राहक सेवा आणि प्रशासनिक कामकाजासाठी २.
३. Specialist Officer (SO) आयटी, मार्केटिंग, कठ, कायदा, इत्यादी विशेष शाखांसाठी
४. RRB (Regional Rural Banks) - ग्रामीण भागातील बँकांसाठी आणि लिपिक पदे
IBPS PO परीक्षा (Institute of Banking Personnel Selection Probationary Officer Exam)
परीक्षा आयोजित संस्था (Conducted By): Institute of Banking Personnel Selection (IBPS)
पदाचे स्वरूप (Nature of Post):
देशातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये (PNB, Bank of Baroda, Union Bank, Canara Bank इत्यादी) प्रविक्षाधीन अधिकारी भरती.
परीक्षा रचना (Exam Structure):
IBPS PO परीक्षाही तीन टप्प्यांत घेतली जाते
१. प्राथमिक परीक्षा (Preliminary Exam)
२. मुख्य परीक्षा Main Exam
३. मुलाखत Interview


१. प्राथमिक परीक्षा (Prellims Exam):

विषयप्रश्नसंख्यागुणवेळ
इंग्रजी भाषा (English Language)३०३०२० मिनिटे
तर्कशक्ती (Reasoning Ability)३५३५२० मिनिटे
संख्यात्मक योग्यता (Quantitative Aptitude)३५३५२० मिनिटे
एकूण१००१००६० मिनिटे

वैशिष्ट्येः
 Online परीक्षा, MCQ स्वरूपात.
 Negative Marking: ०.२५ गुण वजा.

२. मुख्य परीक्षा (Mains Exam):

विषयप्रश्नसंख्यागुणवेळ
तर्कशक्ती व संगणक ज्ञान४५६०६० मिनिटे
सामान्य/आर्थिक जागरूकता४०६०४५ मिनिटे
डेटा विश्लेषण व व्याख्या३५४०३५ मिनिटे
इंग्रजी भाषा३५३५४० मिनिटे
वर्णनात्मक परीक्षा (निबंध व पत्रलेखन)५०३० मिनिटे
एकूण१५७२५०३ तास ३० मिनिटे

३. मुलाखत (Interview):
मुख्य परीक्षेत पात्र उमेदवारांना १०० गुणांच्या मुलाखतीसाठी बोलावले जाते.
अंतिम निकाल ८० : २० (Mains: Interview) प्रमाणात एकत्र करून तयार केला जातो.
IBPS PO वेतन व सुविधा (Salary & Perks):
प्रारंभिक वेतनः अंदाजे ₹५५,००० प्रति महिना (भत्तेसह)
विविध सरकारी सुविधा PF, ग्रॅच्युइटी, वैद्यकीय विमा, लोन सुविधा.
देशभरातील कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत कार्य करण्याची संधी.
सहभागी बँका : IBPS द्वारे सुमारे १२ राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये भरती केली जाते.
वार्षिक भरती : दरवर्षी सुमारे ५०,००० पेक्षा अधिक जागा या प्रक्रियेद्वारे भरल्या जातात.
RRB परीक्षा (Regional Rural Banks Examinations)
RRB बँका ग्रामीण आणि अर्धशहरी भागांमध्ये कार्यरत असतात. या बँकांमधील भरती IBPS द्वारेच केली जाते.
परीक्षा वैशिष्ट्येः
सुमारे ५६ प्रादेशिक ग्रामीण बँका सहभागी असतात.
परीक्षा तुलनेने सोपी असते.
ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी असते.