'नजरेत राष्ट्र हृदयात महाराष्ट्र'
उपक्रमासाठी साक्षी शिदुक ची निवड
देवगड तालुक्यातील शिरगाव येथील पुंडलिक अंबाजी कर्ले कला व वाणिज्य महाविद्यालयाची साक्षी शिदुक चे नेत्र दीपक यश.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या विद्यमाने सुरू असणाऱ्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत दिल्ली येथे होणाऱ्या 'नजरेत राष्ट्र हृदयात महाराष्ट्र' उपक्रमात महाराष्ट्र राज्यातून एकूण ११ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यात कोकण विभागातून साक्षी शिद्वक ची निवड करण्यात आली होती.
महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणाऱ्या 'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत 'नजरेसमोर राष्ट्र हृदयात महाराष्ट्र' या विशेष महाराष्ट्र उपक्रमाची सुरुवात डिसेंबर २०२४ मध्ये करण्यात आली. या विशेष उपक्रमात विद्यार्थ्यांना प्रशासकीय, सेवांविषयी प्रेरणा, मार्गदर्शन, आणि प्रत्यक्ष अनुभव देण्याचा हा या उपक्रमाचा उद्देश होता. दिल्लीतील प्रशासकीय अधिकारी आणि विविध शासकीय कार्यालयांना या उपक्रमाच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळाले. या निवडीबद्दल करिअर कट्टा विभागाचे आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो.
'नजरेत राष्ट्र हृदयात महाराष्ट्र'
युगांश कनोजे
महाराष्ट्राच्या मातीतील तरुणांना देशाच्या राजधानीत जाऊन प्रशासकीय आणि धोरणात्मक कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, या उद्देशाने MITSC (महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र) आणि करिअर कट्टा यांनी 'नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र' या संकल्पनेवर आधारित एक विशेष 'दिल्ली अभ्यास दौरा' आयोजित केला होता. महाराष्ट्रातून निवडलेल्या काही मोजक्या प्रतिनिधींपैकी एक म्हणून मला या दौऱ्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी मिळाली. एक तरुण म्हणून माझ्यासाठी हा केवळ दिल्लीतील वास्तू पाहण्याचा प्रवास नव्हता, तर भविष्यातील 'उद्योजक' (Entrepreneur) म्हणून स्वतःला घडवण्याची ही एक कार्यशाळा होती.
या दौऱ्याचा मुख्य गाभा 'उद्योजकता आणि प्रशासन' हा होता. व्यवसाय सुरू करणे म्हणजे केवळ नफा कमावणे नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणे होय, हे या भेटीतून प्रकर्षाने जाणवले.
इनोव्हेशन आणि स्टार्टअप्सचे नवे दालनः
आमच्या दौऱ्याचे एक प्रमुख आकर्षण म्हणजे प्रो. योगेश ब्रह्मनकर (Innovation Director, AICTEMIC) यांच्याशी झालेला संवाद. आजच्या युगात केवळ पदवीधर होऊन चालणार नाही, तर तरुणांनी 'नोकरी मागणारे' न बनता 'नोकरी देणारे' (Job Creators) बनले पाहिजे, हा मंत्र त्यांनी आम्हाला दिला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या कल्पकतेचा वापर करून 'स्मार्ट इंडिया हॅकाथॉन' सारख्या मंचावर कसे यावे आणि सरकारी ग्रँट्सचा (Government Grants) लाभ घेऊन आपले स्टार्टअप कसे उभे करावे, याचे त्यांनी दिलेले मार्गदर्शन माझ्यासारख्या नवउद्योजकांसाठी अत्यंत प्रेरणादायी होते.
प्रशासकीय भीतीचे निराकरण (Ease of Doing Business):
अनेकदा व्यवसाय सुरू करताना तरुणांच्या मनात सरकारी परवानग्या आणि नियमांची भीती असते. ही भीती दूर करण्याचे काम श्रीमती सुप्रिया देवस्थळी (Joint CGA, माजी संचालक DPIIT) यांच्याशी झालेल्या चर्चेने केले. 'ईझ ऑफ डुइंग बिझनेस' (Ease of Doing Business) अंतर्गत केंद्र सरकार करत असलेल्या सुधारणा आणि धोरणात्मक बदल समजून घेतल्यावर मला खात्री पटली की, जर आपली तयारी असेल, तर प्रशासन आपल्याला अडवण्यासाठी नाही, तर मदत करण्यासाठी तत्पर आहे.
आर्थिक साक्षरता आणि शिस्तः
कोणत्याही व्यवसायाचा कणा हा 'पैसा' असतो, पण तो कमावण्यापेक्षा त्याचे व्यवस्थापन करणे अधिक महत्त्वाचे असते. श्रीमती डिंपल मित्तल यांनी आम्हाला 'आर्थिक साक्षरता' (Financial Literacy) आणि गुंतवणुकीचे महत्त्व अतिशय सोप्या भाषेत समजावून सांगितले. तसेच, एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी लागणारी शिस्त आणि अचूक निर्णयक्षमता (Decision Making) आम्हाला प्रशासकीय अधिकारी डॉ. तुषाबा शिंदे (IRPS, Director DARPG), श्री. अमित भोळे (Director, Revenue De (1) आणि भारतीय लष्कराचे वीर सुपुत्र लेफ्टनंट कर्नल हर्षवर्धन ढेकणे व मेजर बालाजी सूर्यवंशी यांच्याकडून शिकायला मिळाली. व्यवसायातही युद्धासारखी परिस्थिती येऊ शकते आणि त्यावेळी संयम कसा ठेवावा, हे या मान्यवरांनी आपल्या अनुभवातून सांगितले.
निष्कर्षः
'नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र' या उक्तीप्रमाणे, या दौऱ्याने मला महाराष्ट्राचा वारसा घेऊन दिल्लीत देशाच्या प्रगतीत सहभागी होण्याचे स्वप्न दाखवले. हा अनुभव केवळ माझ्या कॉलेज जीवनापुरता मर्यादित राहणार नाही, तर माझ्या आगामी स्टार्टअप प्रवासात तो एक दीपस्तंभ (Lighthouse) म्हणून काम करेल.
'नजरेत राष्ट्र हृदयात महाराष्ट्र वेदिका संतोष थोरात
नमस्कार, मी वेदिका संतोष थोरात, विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, विद्यानगरी बारामतीची विद्यार्थिनी, 'करिअर कट्टा' या उपक्रमांतर्गत 'नजरेसमोर राष्ट्र, हृदयात महाराष्ट्र' या दिल्ली दौऱ्यासाठी निवड झाली. नाव आलं त्या क्षणी उत्साह, भीती आणि कुतूहल सगळंच मनात एकत्र दाटून आलं.
दिल्ली म्हणजे फक्त राजधानी नाही; ती राष्ट्राची घडघड आहे. तिथे जाणं म्हणजे देश कसा चालतो हे जवळून पाहण्याची अनोखी संधी. पहिल्याच दिवशी सांगण्यात आलं की हा दौरा केवळ पर्यटन नाही, तर प्रशासन, धोरणव्यवस्था आणि राष्ट्रबांधणी समजून घेण्याचा प्रवास आहे.
या प्रवासात IAS, IPS, CRPF, IRPS आणि विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून तीन गोष्टी शिकायला मिळाल्या ध्येय नेहमी मोठं ठेवा, अपयश म्हणजे शेवट नाही तर दिशेची सुरुवात असते, आणि साधेपणा व शिस्त ही खरी उंची आहे.
यानंतर आम्ही दिल्लीतील अनेक महत्त्वाच्या स्थळांना भेट दिली. प्रत्येक ठिकाण काहीतरी नवीन शिकवून गेलं आणि माझ्यातील दृष्टीकोन अधिक रुंदावत गेला.
राष्ट्रपती भवनः इथे उभं राहिल्यावर एकच विचार मनात आला, 'ज्या ठिकाणी देशाचे निर्णय घेतले जातात, तिथे कधीतरी आपणही योगदान देऊ शकतो.'
पीएम म्युझियमः भारताचा संघर्ष, सशक्तता आणि नेतृत्वाचा प्रवास इथे जिवंत भासतो. ही जागा म्हणजे प्रेरणेचं पॉवरहाऊस.
बाबासाहेब आंबेडकर मेमोरियलः येथे जाणवलं कष्ट, शिक्षण आणि धाडस हीच कोणालाही मोठे बनवणारी तीन शस्त्रं,
संसद भवनः हे ठिकाण म्हणजे भारताच्या भविष्याचे धागे विणण्याची कार्यशाळा.
या सगळ्या भेटींनी माझ्यातील पाहण्याची दृष्टी बदलली. आधी गोष्टी दूरून दिसायच्या; आता त्यामागचं तत्त्व समजतं.
हा अनुभव शक्य झाला तो महाराष्ट्र राज्य उच्छ व तंत्र शिक्षण विभाग आणि करिअर कट्टा यांच्या दूरदृष्टीमुळे.
या उपक्रमाने मला तीन अमूल्य गोष्टी दिल्या-
१. मंच: एका साध्या विद्यार्थिनीला दिल्लीतील सर्वोच्च संस्थांपर्यंत पोहोचण्याची मंच दिला.
२. भेटः देश चालवणाऱ्या प्रणालीला जवळून पाहण्याची आणि समजून घेण्याची संधी मिळाली.
३. दिशाः जीवनात कुठे जायचं, का जायचं आणि कसं जायचं हे आता अधिक स्पष्ट झालं.
या पाच दिवसांनी माझ्यात तीन मोठे बदल केले, आत्मविश्वास दहापट वाढला, दृष्टीकोन अधिक व्यापक झाला आणि ध्येय अगदी स्पष्ट झालं. आधी वाटायचं, 'मला जमेल का?' आता वाटतं, 'अगदीच जमणार, फक्त सुरुवात हवी." हा दिल्ली दौरा प्रवास नव्हता, तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट होता. आणि मला खात्री आहे की अशा संधी कोणाच्याही आयुष्याला नवी दिशा देऊ शकतात. संधीची बाट पाहू नका; स्वतः संधी तयार करा. कदाचित छोटीशी संधीही आयुष्य बदलून टाकू शकते.
शेवटी, मनःपूर्वक आभार-
सर्व मान्यवर अधिकारी, ज्यांनी आम्हाला वेळ दिला, मार्गदर्शन केलं आणि प्रेरणा दिली. तसेच, ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माझ्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे सर, महाविद्यालयीन समन्वयक डॉ. सुनील ओगले सर, जिल्हा समन्वयक डॉ. संजय खिलारे सर, आणि अन्न तंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा. सुजाता पाटील मॅडम यांचे मनःपूर्वक आभार. मला या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल करिअर कट्टाचे अध्यक्ष माननीय यशवंत शितोळे सर यांचे आभार तसेच डॉ. योगिता चौधरी मॅडम व किरण पाटील मॅडम यांचे खूप खूप आभार.
नजरेसमोर राष्ट्र ठेवून, हृदयात महाराष्ट्र घेऊन,
दिल्लीच्या वाटेवर निघाले ते काही स्वप्नांचे सोबती होऊन.
प्रेरणेची प्रत्येक भेट, शिकवण झाली आयुष्याची,
अधिकाऱ्यांच्या शब्दांत दडला होता प्रवास जिद्दीचा,
या पाच दिवसांनी दिली उंच भरारी, दिली नवी ओळख स्वतःची, आता स्वप्न पूर्ण करायची वेळ जबाबदारी आहे वाट माझी निवडायची. हा दिल्ली प्रवास नाही फक्त माझ्या भविष्यातल्या यशाचं पहिलं पाऊल ठरलाय.
संधी देणाऱ्यांप्रती मन कृतज्ञतेने भरून आलंय,
हा अनुभव मला पुढील वाटचालीसाठी नवी दृष्टी, नवी ऊर्जा आणि नवं ध्येय देऊन गेला आहे.
धन्यवाद !