Author
अहवाल २०२५
डॉ. योगिता चौधरी
सहविभागीय समन्वयक, जळगाव विभाग, करिअर कट्टा

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहायता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने चालणारा करिअर कट्टा त्याअंतर्गत "नजरेसमोर राष्ट्र.. हृदयात महाराष्ट्र.." या ब्रीदवाक्यसह विशेष संवाद शृंखला दिल्लीतील मराठी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाखतीचा दौरा दिनांक २५ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उच्चस्तरीय अधिकारी, प्रशासनाची कार्यपद्धती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि राष्ट्रीय वारसा समजून घेण्यासाठी दिल्ली विशेष संवाद शृंखला यावर्षीही आयोजित करण्यात आली. या वेळी विद्यार्थ्यांनी केंद्रीय सेवेत कार्यरत विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या, राष्ट्रीय स्मारके पाहिली आणि प्रशासकीय संस्थांना भेटी दिल्या. या संपूर्ण उपक्रमाचा समारोप ३० नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आला.
सदर दौऱ्यासाठी महाराष्ट्रभरातील विविध महाविद्यालयातून करिअर कट्टा उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांमधून गेल्या वर्षभरापासून सर्व उपक्रमांमध्ये पुढाकार घेणारे, शिस्तप्रिय, नाविन्यपूर्ण विचार करणारे विद्यार्थी यांची ११ विभागातून निरीक्षण करून निवड करण्यात आली होती. त्यात १. नीलम शैलेंद्र पाटील, मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव २. पर्जन्या नील अंजूटकी, करिअर कट्टा, सोलापूर ३. वेदिका संतोष थोरात, विद्या प्रतिष्ठान कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, बारामती, पुणे ४. साक्षी प्रकाश शिद्रुक, पुंडलिक आबाजी करले कला आणि वाणिज्य विद्यालय, शिरगाव ५. शंतनू विलास चिंचाळकर, करिअर कट्टा, नागपूर ६. मिहीर गजानन भेदे, नूतन आदर्श कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय उमरेड, नागपूर ७. युगांश कनोजे, शिवाजी सायन्स कॉलेज, नागपूर ८. भूमिका मंगेश जोशी, अ. र. भा. गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी, तालुका - जामनेर, जिल्हा जळगाव ९. सानिया सादिक शेख, राजश्री शाहू विज्ञान महाविद्यालय, चांदूर रेल्वे १०. धनश्री राजेश मिश्रा, जी. एस. खामगाव कॉलेज, बुलढाणा ११. माधवी रतन बोरसे, कला वाणिज्य व बीसीए महाविद्यालय, महिला महाविद्यालय, धुळे १२. अनिशा अशोक सुरवसे, छत्रपती शिवाजी कॉलेज, उमरगा, धाराशिव या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती.
या सर्वच सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांना दिलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडत निवड समितीचा निर्णय सार्थ ठरविला.
दिनांक २५/११/२०२५ रोजी सदर कार्यक्रमाचे उद्धघाटन सत्र महाराष्ट्र सदन दिल्ली येथे पार पडले. उद्धघाटन सत्रात दिल्लीतील विविध प्रशासकीय पदांवर असणारे मान्यवर उपस्थित होते.
मा. श्री. ज्ञानेश्वर मुळे, माजी परराष्ट्र सचिव, सल्लागार, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते सरांच्या मुलाखतीनेच या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
मा. रेखा रायकर कुमार, (ICAS) Member, Land Port Authority of India
मा. श्री. प्रफुल्ल पाठक, अध्यक्ष, सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडिया.
मा. श्री. यशवंत शितोळे अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र हे व्यासपीठावर उपस्थित होते.
मान्यवरांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारी, अभ्यास पद्धती, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व गुण आणि राष्ट्रीय बांधणी यावर मार्गदर्शन केले. उद्घाटनला मा. सुप्रिया देवस्थळी, इंडियन सिव्हील अकाउंट सर्व्हिस, मा. डॉ. तुषाबा शिंदे, आय आर पी एस (इंडियन रेल्वे पर्सनल सर्विस), मा. श्री. अमित भोळे, संचालक महसूल विभाग, अर्थ मंत्रालय, भारत सरकार, मा. श्री. सतीश जाधव, चीफ कंट्रोलर ऑफ अकाउंट्स सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स, मा. डिंपल मित्तल, तज्ज्ञ मार्गदर्शक, आर्थिक साक्षरता, मा. डॉ. श्री. चेतन शेलोटकर, असिस्टंट कमांडर सीआरपीएफ गुरुग्राम अशा प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. या सर्वच अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले.
पुढील प्रत्येक दिवशी विद्यार्थ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. या मुलाखती YouTube चॅनेलवर उपलब्ध होणार आहेत. यात मा. सुप्रिया देवस्थळी (ICAS) त्यांनी मुलींनी स्पर्धा परीक्षांसाठी पुढाकार घेतला पाहिजे. महिलांसाठी शासकीय सेवेत मोठ्या संधी उपलब्ध आहेत, अशा अनेक गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या. मा. श्री. अमित भोळे, संचालक महसुल विभाग यांनी मंत्रालयाची कार्यप्रणाली समजावून सांगितली. मा. श्री. संतोष चाळके, आयपीएस यांनी त्यांच्या मुलाखतीत प्रामाणिकपणा आणि वाचनाची सवय IAS/IPS पर्दासाठी महत्त्वाची आहे, तसेच पोलिस सेवेत शिस्त आणि नेतृत्व कौशल्य आवश्यक आहे आणि विद्याच्याँनी फिटनेस आणि मानसिक स्थैर्य ठेवणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.
या समवेतच इतर मान्यवरांच्या मुलाखती घेण्यात आल्या त्यात विशेषता मा. अरुणा शर्मा, निवृत्त आयएएस अधिकारी, मा. मोनाली धकाटे यूपीएससी पॅनललिस्ट आणि सहाय्यक संचालक, मा. सुवर्णा तुषाबा ओगले-शिंदे (IAS), उपसंचालक, दिल्ली जल बोर्ड, मा. श्री. मेजर बालाजी सुर्यवंशी, इत्यादी सर्व अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना करिअर दिशा, प्रशासकीय सेवांचे स्वरूप आणि अभ्यास कौशल्य यावर मोलाचे मार्गदर्शन केले. त्यात प्रामुख्याने स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासात सातत्य आणि शिस्त सर्वात महत्वाची.
वेळेचे व्यवस्थापन, नोट्स बनविणे आणि करंट अफेअर्स हा निवडीचा मुख्य घटक.
दिला. ग्रामीण विद्यार्थ्यांना दिल्लीसारख्या संधी केंद्रांमध्ये स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करण्याचा सल्ला या सर्व अधिकाऱ्यांनी
दिनांक ३० नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या समारोप कार्यक्रमात मध्ये मा. कर्नल हर्षवर्धन पाटील सर, मा. प्रियंका जावळे, Law ऑफिसर दिल्ली, मा. कर्नल कौस्तुभ जाधव सर मा. उत्तम गायकवाड, जनरल मॅनेजर ओटीएएस, एच. आर. एन. ए. एक्सेल, यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. दिल्लीत असताना मिळालेल्या वेळात विविध ऐतिहासिक स्थळांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. यामध्ये प्रामुख्याने :
१. राष्ट्रपती भवन
भारताच्या राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान
वास्तुकलेचे जगातील सर्वोत्तम नमुने
मुघल गार्डन आणि ऐतिहासिक विभाग
२. इंडिया गेट
पहिल्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांचे स्मारक
राष्ट्रीय अभिमानाचे प्रतिक
३. प्रधानमंत्री संग्रहालय
सर्व पंतप्रधानांची कार्यकाल व भविष्यदृष्टी दर्शवणारे आधुनिक डिजिटल संग्रहालयः
३६० अनुभव, लाईट अँड साऊंड शो
४. इंडियन पोलिस मेमोरियल
पोलिस शहीदांच्या स्मरणार्थ उभारलेले राष्ट्रीय स्मारक
विद्यार्थ्यांनी पोलिस सेवांचे योगदान जाणून घेतले.
हिंदयान सायकल मोहीम (Hindayan Cycle Expedition) नुकतीच नवी दिल्ली येथील राष्ट्रीय पोलीस स्मारकामध्ये आयोजित करण्यात आली होती. यामध्ये सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांतील पथकांसह दिल्ली वॉरियर्स सहभागी झाले.
५. CRPF Academy, गुरुग्राम
केंद्रीय राखीव पोलिस दलाची प्रशिक्षण अकादमी
विद्यार्थ्यांनी शिस्त, शस्त्र प्रशिक्षण आणि आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्थेची माहिती घेतली.

६. डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन / आंबेडकर म्युझियम
भारताच्या संविधान निर्मात्यांचे जीवन, कार्य आणि स्मरणीय दस्तऐवज
विद्यार्थ्यांना संविधानाचे मूल्य आणि सामाजिक समतेचे महत्त्व समजले.
७. जंतरमंतर
प्राचीन भारतीय खगोलशास्त्रीय वेधशाळा
भारतीय विज्ञान आणि गणिताची परंपरा जाणून घेण्यासाठी भेट
विद्यार्थ्यांची कामगिरी, विशेष स्वरूपाची होती. सर्व विद्याध्यर्थ्यांनी मुलाखतीचे शब्दांकन स्वतः केले. प्रत्येक मुलाखत YouTube वर अपलोड करण्यासाठी संपादित केली जात आहे. मुलाखतींमुळे विद्यार्थ्यांना अभिव्यक्ती कौशल्य, प्रश्न विचारण्याची पद्धती आणि आत्मविश्वास या कौशल्यांचा विकास झाला. समारोप सत्रात विद्यार्थ्यांनी संवाद शृंखलेचा अनुभव मांडला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. अशा पद्धतीने दिल्ली विशेष संवाद शृंखला सहा दिवसीय अध्ययन दौरा २०२५ हा विद्यार्थी जीवनातील अविस्मरणीय घटना ठरली.
या प्रवासामुळे विद्यार्थ्यांना
प्रशासन, पोलिस, संस्कृती, आर्थिक सेवा यांची प्रत्यक्ष ओळख
स्पर्धा परीक्षांचे उद्दिष्ट आणि मार्गदर्शन
राष्ट्रीय वारसा आणि संविधान मूल्यांची जाण
व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व आणि संवाद कौशल्ये यांचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. सलग दुसऱ्या वर्षाची संवाद शृंखला
विद्यार्थ्यांना उज्ज्वल करिअरकडे
मार्गदर्शन करणारी ठरली.
निश्चितच 'नजरेसमोर राष्ट्र असताना हृदयात महाराष्ट्र असल्याचा अभिमान' या संपूर्ण दिल्ली दौऱ्यात जाणवला.