Author
संवाद शृंखला मुलाखत क्र. ९
मा. डॉ. योगेश ब्राह्मणकर
Innovation Director - Ministry of Education's Innovation Cell (MoE-IC), AICTE (All India Council for Technical Education)

भारतातील तांत्रिक शिक्षण, नवोन्मेष (Innovation), स्टार्टअप इकोसिस्टम आणि उद्योजकता विकासाला नवी दिशा देणाऱ्या नेतृत्वांमध्ये डॉ. योगेश ब्राह्मणकर हे एक प्रभावशाली आणि दूरदर्शी व्यक्तिमत्त्व मानले जाते. सध्या ते AICTE (AII India Council for Technical Education) अंतर्गत Ministry of Education's Innovation Cell (MoE-IC) येथे Innovation Director म्हणून कार्यरत आहेत. देशभरातील लाखो विद्यार्थी, शिक्षक व उच्च शिक्षण संस्थांना नावीन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता, डिझाईन थिंकिंग आणि उद्योजकतेकडे प्रवृत्त करण्याबरोबरच, ते शिक्षकांसाठी आयोजित करण्यात येणाऱ्या Faculty Development Programmes (FDPs) मार्फत आधुनिक शिक्षणपद्धती, इनोव्हेशन प्रैक्टिसेस आणि उद्योजकता कौशल्ये यांचा प्रसार करण्यामध्येही निर्णायक भूमिका पार पाडत आहेत. तांत्रिक शिक्षण व्यवस्थेचे रूपांतर करण्यासाठी आणि नावीन्यपूर्ण संस्कृती रुजवण्यासाठी त्यांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय व प्रेरणादायी आहे. डॉ. ब्राह्मणकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग (पुणे विद्यापीठ) मधून पदवी प्राप्त केली त्यानंतर मॅनेजमेंट (मुंबई विद्यापीठ) मध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. इंजिनिअरिंगची तांत्रिक भक्कम पायाभरणी आणि मॅनेजमेंटची समज एकत्र येऊन त्यांच्या दृष्टीकोनात तांत्रिक-उद्योजकतेचे उत्तम संतुलन निर्माण झाले. यामुळेच ते शिक्षण, उद्योग, व्यवस्थापन आणि धोरणनिर्मिती या सर्व स्तरावर प्रभावीपणे कार्य करत आहेत.
करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत 'नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र' या नाविन्यपूर्ण संवाद शृंखलेमार्फत आपण मा. योगेश ब्राह्मणकर सर यांची मुलाखत शब्दांच्या स्वरूपात मांडणी करीत आहोत.
मा. यशवंत शितोळे : महाराष्ट्रातील उद्योजकता वाढीसाठी प्रयत्न करीत आपण देशाच्या उद्योजकतेच्या संकल्पना विस्तृत करण्यासाठी दिल्ली मध्ये महत्वाचं काम करीत आहात. आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की या प्रवासाची सुरुवात नेमकी कुठून झाली ?
मा. योगेश ब्राह्मणकर: माझ्या वैयक्तिक बाबतीत पाहता, माझा करिअर ग्राफ अत्यंत वेगळ्या वाटेने विकसित झाला आहे. पर्मनंट डिफेन्स प्रोडक्शनमधील नोकरीचा राजीनामा देऊन मी २०११ साली टीचिंग क्षेत्रात प्रवेश केला. २०११ ते २०२३ या कालावधीत मी अकॅडेमिक इन्स्टिट्यूटमध्ये तसेच सिम्बायोसिसमध्ये अध्यापनासोबत इनोव्हेशन क्षेत्रात कार्य केले. २०१२-१३ पासून मी उद्योजकता विकासावर विविध मॅनेजमेंट कॉलेजेसमध्ये काम करण्यास सुरुवात केली. माझे गुरु विनोद शास्त्री (सिम्बायोसिस) यांच्या मार्गदर्शनाखाली मला त्या काळात Indians First Entrepreneurship Development Training Program या सिम्बायोसिसमधील उपक्रमाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. त्याच अनुभवातून पुढे विविध Sectioned Companies आणि इन्क्युबेशन केंद्रांची स्थापना करण्यात मी सक्रिय सहभाग घेतला. आजपर्यंत मी उद्योजकता विकासाशी संबंधित सुमारे ७०० हून अधिक कल्पनांवर काम केले असून, १५० पेक्षा अधिक स्टार्टअप्सची निर्मिती करण्यात सहाय्य केले आहे. या क्षेत्रातील कामादरम्यान असे जाणवले की, विद्यार्थ्यांकडे अत्यंत नाविन्यपूर्ण कल्पना आहेत आणि येणारी पिढी ही त्याहूनही प्रगल्भ बुद्धिमत्तेची असणार आहे. या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी महाराष्ट्रात काही प्रकल्पांची सुरुवात करता येईल का? यावर माझा सतत भर असतो. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील विद्यार्थीवर्गाचा माईंड अत्यंत सक्रिय असतो, त्याला योग्य असा प्लॅटफॉर्म मिळणे आवश्यक आहे. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांबाबत शिक्षकांशी मोकळेपणाने संवाद साधणे महत्त्वाचे आहे. आजच्या घडीला इनोव्हेशन, कौशल्य विकास आणि स्टार्टअप क्षेत्रात झपाट्याने क्रांती घडत आहे, आणि त्याचा सांख्यिकीय आढावा देखील उपलब्ध आहे.
मा. यशवंत शितोळे: उच्च शिक्षणाविषयी बोलत असताना, त्यातही आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजेस मधील प्राध्यापकांच्या विकासाकरिता आणि Mindset बदलण्याकरिता आपण काही FDP design केलेत का? सोबतच, यामध्ये शिक्षकांचा सहभाग आहे का?
मा. योगेश ब्राह्मणकरः Yes, Ministry of Education's Innovation Cell (MIC) हे AICTE मार्फत देशभरातील उच्च
शिक्षण संस्थांमध्ये नवोन्मेष, उद्योजकता आणि स्टार्टअप संस्कृती वाढवण्यासाठी कार्यरत आहे. २०२४ पर्यंत देशात एकूण 14,269 Institution's Innovation Councils (IICs) स्थापन करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये 707 Universities, 9533 Colleges आणि 2901 Standalone Institutions यांचा समावेश आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या उच्च शिक्षण-नवोन्मेष नेटवर्कपैकी एक मानले जाते. IICs च्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये innovation, design thinking, IPR, incubation, Prototyping आणि entrepreneurship यांना चालना देण्याचे महत्त्वाचे काम सातत्याने केले जाते. सोबतच सेंट्रल आणि स्टेट विद्यापीठांशी जोडल्याने शहरातील आणि ग्रामीण महाविद्यालयांशी जोडता आले आहे. या संपूर्ण उपक्रमात Wadhwani Foundation सारख्या संस्थांचे सहकार्य मिळते, ज्यांच्या मदतीने प्रदेशनिहाय Faculty Capacity Building, Innovation Training आणि Startup Development कार्यक्रम राबवले जातात आणि आम्ही त्यांना सहकार्य करीत असतो.
मा. यशवंत शितोळे: २८ लाख तरुण महाराष्ट्रात उच्च शिक्षण घेत आहेत आणि सर्वांना सरकारी नोकरी मिळणे शक्य नाही आणि अशावेळी या तरुणांच्या हाताला रोजगार निर्माण करून देण्याकरिता आपल्या सेलच काम अत्यंत महत्वाचं आहे. आजच्या तरुणांच्या Efficiency बाबत आपल्याला काय वाटते?
मा. योगेश ब्राह्मणकरः आजच्या तरुणांच्या Efficiency बद्दल बोलायचे झाल्यास महाराष्ट्र हा एक Early Industrialized
State असल्याने याचे फायदे आणि तोटे दोन्ही दिसून येतात. गेल्या १०-१५ वर्षात ज्ञानप्रबोधिनीच्या मार्गदर्शनामुळे राज्यातील अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे वळत आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शहरे आणि गावे आहेत आणि तिथेच रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देता येतील का? यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. याकरिता आमचे Innovation Cell आणि करिअर कट्टा यांसारखे उपक्रम गावागांवात पोहोचणे आवश्यक आहे. कारण प्रत्येकाची क्षमता वेगळी असते, पण राज्यातील तरुणांमध्ये गोंधळ मोठ्या प्रमाणात दिसून येतो. उदाहरण द्यायचे झाल्यास, नातेवाइकातील एखादी व्यक्ती USA मध्ये जाऊन चांगले पॅकेज मिळवते म्हणून आपणही तोच मार्ग निवडावा, ही मानसिकता योग्य नाही. कारण तो X आहे म्हणजे आपणही X आहोत असे नसते. आपल्या तरुणांमध्ये ऊर्जा प्रचंड आहे, पण आपल्या शहरात किंवा गावातच रोजगार निर्माण करू शकतो हा आत्मविश्वास कमी दिसतो. राज्यातील तरुणांचा ओघ स्पर्धा परीक्षेकडे वळावा यासाठी मराठी ऑफिसर्स आपला अमूल्य वेळ देत आहेत, मात्र यातून फारसे Structural परिणाम दिसत नाहीत. त्यामुळे विद्यापीठांनी आणि आमच्यासारख्या संस्थांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. कमवा आणि शिका, फेलोशिप प्रोग्रॅम्स, गरजेनुसार स्किल-बेस्ड उपक्रम अशा मॉडेल्सची गरज आहे. आपला देशही काही प्रमाणात Confused Economy मधून जात आहे. लोकांच्या बदलत्या मानसिकतेमुळे आपण एका प्रकारच्या ट्रॅपमध्ये अडकताना दिसतो. कोणताही कार्यक्रम घेतला की त्याचा प्रभाव सूर्यप्रकाशासारखा असतो, सूर्यास्तापर्यंत तो कमी होत जातो. त्यामुळे स्थलांतराचा ओघ कमी करण्यासाठी राहत्या ठिकाणी रोजगाराच्या संधी, नवोन्मेषाचे कार्यक्रम, स्थानिक कौशल्यविकास उपक्रम सतत आणि योजनाबद्ध स्वरूपात राबविणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज आहे.
मा. यशवंत शितोळे: आमच्या विद्यार्थ्यांना इनोव्हेशन सेल बाबत समजून घ्यायला आवडेल.
मा. योगेश ब्राह्मणकरः इनोव्हेशन सेलची स्थापना साधारण आठ वर्षांपूर्वी झाली. माझे बॉस डॉ. अभय जेरे यांनी Smart India Hackathon Project सुरु केला आणि त्यांचा अनुभवही त्याच दिशेने होता. त्यांनीच २०१७ मध्ये Smart India Hackathon प्रपोज केला आणि त्यानंतर दिल्लीमध्ये हा विभाग सुरू करण्यात आला. MOU 's Innovation Cells at AICTE असे आमचे कामाचे स्वरूप आहे. डॉ. अभय जेरे हे Chief Innovation Director आहेत. माझ्याकडे तीन Assistant Director Officers आहेत आणि त्यांना वेगवेगळे पोर्टफोलिओ देण्यात आले आहेत. AICTE चे १३ जुने ऑफिसेस पूर्वी कॉलेजेसच्या Approval संबंधी काम पाहत असत, परंतु २०२२ पासून Approval चे काम थांबले आणि ते Innovation संबंधित काम पाहू लागले. माझ्याकडे असे एकूण १३ Class-1 Officers आहेत, त्याशिवाय पाच Innovation Officers आहेत, ज्यांपैकी काही जण PhD आहेत. अशा प्रकारे एकूण अंदाजे १८ ऑफिसर्सची आमची टीम आहे. यासोबतच Juniors आणि Clerical Staff देखील या संपूर्ण यंत्रणेत काम करतात. प्रत्येकाला स्वतंत्र काम दिलेले आहे. IIC साठी एक Officer आणि त्याची स्वतंत्र टीम आहे. त्यांना एक बार्षिक Calendar दिला जातो, ज्यामध्ये १२ महिन्यांच्या सर्व Activities नमूद असतात. हे Tasks आम्ही Institute ला देतो आणि त्यांच्या कामावरून त्यांना Rating दिली जाते. संपूर्ण प्रक्रिया Online आहे, Dashboard आहे, फोनवरून संवाद केला जातो, Institute च्या अडचणी सोडवल्या जातात आणि Activities पूर्ण करून घेतल्या जातात. प्रत्येक झोन प्रत्येकाला दिलेले आहे. हा आमचा सर्वात मोठा उपक्रम आहे. IIC ची YUKTI ही एक महत्त्वाची योजना आहे, ज्यावर विद्यार्थी त्यांचे Innovative Ideas अपलोड करू शकतात आणि ही संपूर्ण प्रक्रिया तीन टप्प्यात असते. या योजनेत १० लाखांपर्यंत Funding मिळू शकते आणि गंमत म्हणजे २००-२५० विद्यार्थ्यांना निधी देण्याची क्षमता असूनही आम्हाला दर्जेदार १०० Ideas सुद्धा क्वचितच मिळतात. अनेक विद्यार्थी चांगल्या Ideas वर काम करत असूनही ते आमच्यापर्यंत आणि आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. मग आम्ही विचार केला की आपला Speed आणि Spread वाढवला पाहिजे म्हणून Social Media ला अधिक महत्त्व दिले.
आम्ही Atal Innovation Mission सोबतही एक प्रोजेक्ट केला, ज्याद्वारे जवळपास ३० लाख विद्यार्थ्यांना एकत्र आणू शकलो. आपल्या देशातील सुमारे ५ लाख शाळा या उपक्रमात सहभागी झाल्या. त्यानंतर School Innovation सेन्टर सुद्धा आम्ही चालवतो. Smart India Hackathon चे यावर्षी 8th edition आहे आणि PM स्वतः Grand Finale मध्ये विद्यार्थ्यांना online address करतात. आपला देश एवढा प्रचंड असूनही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही आणि लोकांच्या मनात एक गैरसमज आहे की हे उपक्रम फक्त Engineering Colleges साठी असतात तर याची माहिती तळागाळापर्यंत होणे गरजेचे आहे. Hackathon ही एक Intensive, Time-bound स्पर्धा आहे, जिथे Multidiscpilinary Teams Real-world Problems वर Collaboratively काम करून Innovative Solutions आणि Prototypes तयार करतात. कॉलेजमध्ये आयोजित Intemal Hackathons है preliminary round सारखे असतात, जे high-potential teams filter करण्यास आणि विद्यार्थ्यांचे critical thinking, teamwork आणि design thinking कौशल्य वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात. Faculty mentorship आणि structured evaluation द्वारे विद्यार्थी theoretical ideas ना practical, viable solutions मध्ये रूपांतरित करतात, ज्यामुळे पुढील technology-driven research आणि startup ventures साठी मजबूत foundation तयार होते. सोबतच BOOTCAMPS आणि ट्रेनिंग सुद्धा या सेल अंतर्गत आयोजित करण्यात येतात. महत्वाचे म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक असे दोघे सुद्धा या सेल अंतर्गत काही आयोजित ट्रेनिंग मध्ये असतात. आपला महाराष्ट्रातील तरुण कुठेतरी कट्टयावर बसून आपला वेळ वाया घालवत आहे.
मुलाखतीच्या शेवटच्या भागात काही महत्वाच्या विषयांवर बोलूयात. जे लोक Perfection आणि Achievement च्या वेड्यात असतात, त्यांना सर्वप्रथम या सिन्ड्रोममधून बाहेर पडणे आवश्यक आहे, कारण येथे कोणीही परफेक्ट नाही; प्रत्येकात उणिवा असतात आणि त्यावर काम करणे गरजेचे आहे. जेव्हा तुम्हाला वाटते की आपण परफेक्ट आहोत, तेव्हा आपल्या प्रगतीला अडथळा येतो. आयुष्यात येणाऱ्या समस्यांना संधी म्हणून पाहा. Commercial व्हा, यात काहीही चुकीचे नाही. बदलत्या AI च्या युगात नेहमी "keep Learning Everyday' हा फॉर्मुला लक्षात ठेवा; वाचन आणि शिकत राहणे आपली Personal Growth वाढवते. आज Circular Economy आपल्याला युरोपकडून शिकवले जात आहे, पण ही कला आपल्याला चारशे वर्षांपूर्वीपासून माहिती आहे. यावर आधारित स्टार्टअप करता येईल का, याकडे लक्ष द्यावे. ताजमहालच्या बाहेर आपण ताजमहाल विकत घेतोच, तर आपल्या महाराष्ट्रातील Heritage Sites आणि सांस्कृतिक वस्तूंवर आधारित रोजगार निर्माण करता येईल का किंवा आपल्या राहत्या ठिकाणी कोणते उद्योग सुरु करता येऊ शकतात, ह्यावर तरुणांनी लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. आपल्या भारताला प्राचीन संस्कृती लाभली आहे त्यावर काही काम करता येईल का यावर सुद्धा विचार व्हायला पाहिजे. आपण सर्वच Boundariless आहोत, कारण आजकाल कामाकरिता वयाची मर्यादा नाही आहे. अमेरिकेने, चीनने, जपानने एखादे मॉडेल लाँच केले, तर आपला तरुण त्याचे अनुकरण करतो; त्याच्यावर वेळ खर्च करतो, पण आपला आणि आपल्या देशाचा विकास अशा मार्गान होणार नाही. आपलं स्वतःच दररोजच target असायला हवे. स्वतःवर प्रेम करा, आरोग्य जपा त्याचा आपल्या कामावर नक्कीच उपयोग होतो. ऑनलाईन मार्फत संधीचे भरपूर मार्ग उपलब्ध आहेत, त्याचा उपभोग घ्या आणि आपलं आयुष्य घडवा.
करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत उद्योजकीय विकास आणि स्टार्ट अप या क्षेत्रातील प्रचंड कल्पकता असणारा महाराष्ट्रातील हिरा AICTE सारख्या क्षेत्रात दिल्लीत आपलं नेतृत्व गाजवत आहेत. मा. योगेश ब्राह्मणकर सर यांची ओळख या शृंखलेमार्फत झाली आणि त्यांनी आपल्याला आश्वासन दिले आहे की, महाराष्ट्रातील तरुणांना या क्षेत्रातील संधी बाबत मार्गदर्शन करण्यास, आपला अमूल्य वेळ देण्यास ते उत्सुक आहेत आणि अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला भेटण्यास आम्ही सर्व सुद्धा उत्सुक आहोत, आपल्या मार्गदर्शनाने कट्ट्यावर बसणारा आपला तरुण नक्कीच नवीन कल्पनांची क्रांती घडवून आणण्यास सक्षम बनणार आहे. करिअर कट्टा परिवारातर्फे आपले मनःपूर्वक आभार.

 

शब्दांकन
प्रा. ममता पळसपगार
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदुररेल्वे