दिल्लीसारख्या धावत्या आणि स्पर्धात्मक वातावरणात स्वतःचा ठसा उमटवणाऱ्या महिलांपैकी डिंपल मित्तल हे एक प्रमुख नाव आहे. व्यवसायातील नवनवीन दृष्टिकोन, आधुनिक विचारसरणी आणि सातत्यपूर्ण मेहनत यांच्या जोरावर त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आज डिंपल मित्तल या दिल्लीतील उद्योजिका म्हणून अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्या आहेत. डिंपल मित्तल मॅडम यांना पाहून जाणवले की एक महिला दिल्लीत आपले नेतृत्व गाजवीत आहे आणि हा त्यांच्या सक्षमीकरणाचा उत्तम दाखला आहे. महिलांच्या स्वप्नांना पंख पसरण्याचे स्वातंत्र्य दिल्यास ती उंच भरारी घेतल्याशिवाय राहत नाही. कारण ..........
तिचं काम फक्त जबाबदारी नाही,
ते तिच्या स्वप्नांचा, धैर्याचा आणि सातत्याचा प्रवास आहे.
ती जिथे पाऊल टाकते तिथे शिस्त, समर्पण आणि सकारात्मक ऊर्जा दिसते. दररोज नवीन आव्हाने येतात, पण ती त्यांना अडथळे मानत नाही
तर नवीन संधी म्हणून स्वीकारते.
आणि अशाच Business Women (व्यावसायिक महिला) म्हणून ख्याती असणाऱ्या मा. डिंपल मित्तल मॅडम यांची करिअर कट्टा अंतर्गत 'नजरेसमोर राष्ट्र आणि हृदयात महाराष्ट्र' या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत घेण्यात आलेली मुलाखत आपण शब्दस्वरूपात येथे मांडत आहोत.
भारतामध्ये स्टार्टअप संस्कृती झपाट्याने वाढत आहे. स्टार्टअप इंडिया या उपक्रमांतर्गत आजपर्यंत सुमारे १ लाख ८० हजार ते १ लाख ९० हजार स्टार्टअप्स निर्माण झाले आहेत. यातील अर्ध्याहून अधिक स्टार्टअप्समध्ये महिला संचालकांची उपस्थिती उल्लेखनीय आहे. मात्र, नेतृत्वाच्या सर्वोच्च स्थानांवर म्हणजेच CEO पदांवर महिलांची संख्या अद्याप अपेक्षेइतकी दिसत नाही. कारण अनेक महिला त्यांच्या प्रवासात अत्यंत सक्षम असूनही, विविध कारणांमुळे मध्येच 'ड्रॉप' घेतात,
जबाबदारीच्या ओझ्यामुळे बरेचदा सक्षम असणारी महिला आपल्या स्वप्नांना आणि करिअरला स्थगिती देते. परंतु असे न करता आपल्या स्वप्नांना आपणच पूर्णत्वास नेणे गरजेचे आहे. आपल्या भावनांवर नियंत्रण हे सर्वात मोठं कौशल्य आहे. या उपक्रमांतर्गत इमोशनल क्लब स्थापन होत आहेत आणि कोणी यामध्ये मास्टर्स आणि पी.एच.डी. केली तर तुम्ही आपल्या आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या भावनांवर नियंत्रण हे शिक्षणापेक्षा आणि पैसे कमावण्यापेक्षाही मोठे कौशल्य आहे. भावनांवर नियंत्रण नसल्यामुळे दिवसेंदिवस आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललेलं आपल्या समोर आहेच. महिलांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, त्याकरिता भावनिक समतोल साधणे अत्यंत महत्वाचे आहे.
माझे सध्या पुस्तक आले आहे 'SPEAK LIKE A UNICORN.' सुमारे एक वर्षापूर्वी आम्ही कुटुंब Shark Tank पाहत होतो. त्यावेळी या पुस्तकाची कल्पना आली. माझे मिस्टर हे उत्तम प्रकारचे व्यावसायिक आहेत. कामाची व्यस्तता असल्यामुळे जमेल त्याप्रमाणे कन्टेन्ट तयार करून ठेवले होते आणि जेव्हा माझी ट्रान्सफर झाली त्यावेळी मला सुमारे एक महिन्याचा कालावधी मिळाला होता, त्यावेळी मी या पुस्तकाचे काम झपाट्याने केले आणि आज माझ्या कल्पनेतील पुस्तक आपल्या सर्वांच्या हातात आहे. आयुष्यात प्रश्न पडणे अत्यंत महत्वाचे आहे कारण त्याशिवाय दिशा आणि ऊर्जा मिळत नाही. कोणत्याही क्षेत्रात जात असताना यशाचा एकच कानमंत्र आहे, तो म्हणजे SFL-SPEAK GOOD, FEEL GOOD AND LOOK GOOD.
कोणत्याही क्षेत्रात उडी घेत असताना आपला हेतू नेमका काय आहे? हे माहिती असणे गरजेचे आहे. आपला हेतू स्पष्ट असला म्हणजे कोणताही दिवस सुरुवात करण्यासाठी योग्य असतो. व्यावसायिक क्षेत्रात माझी सुरुवात २००६ साली झाली आणि आज तब्बल १९ वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु या दरम्यान मी माझ्या करिअरमध्ये कुठेच ब्रेक घेतला नाही आणि कोणतंही काम लहान किंवा मोठे समजायचे नाही, तर सुरुवात महत्वाची असते. यादरम्यान, शिस्त अतिशय महत्वाची असते. ठरलेलं काम वेळेत पूर्ण केल्यास त्याचा होणारा परिणाम आपण स्वतःच अनुभबू शकतो. काम टाळणं किंवा ऑफिसला न जाण्याची कारणे शोधणे आणि टाळाटाळ याचा होणारा वाईट परिणाम आपल्या यशात अडथळा बनतो म्हणून आपल्या कामात सातत्यता असणे अत्यंत गरजेचे असते. सोबतच स्वप्नेसुद्धा पाहता यायला हवीत. आपल्या डोळ्यासमोर लक्ष्य असलं म्हणजे आपला प्रवास बरोबर त्याच दिशेने आपल्याला घेऊन जाणार.
गुंतवणूकीचा कालावधी हा आपल्या लक्ष्यावर ठरविला जातो. आपण ठरविले की आपल्याला घर घ्यायचे आहे त्याकरिता इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आपल्याला करावी लागेल. आपले लक्ष्य ज्याप्रमाणे ठरले असेल त्यानुसार इन्व्हेस्टमेंट करीत असताना काहींना ५ वर्षाकरिता करावी लागेल तर काहींना १० वर्षाकरिता आणि म्हणूनच आपण याला GOAL BASED FINANCIAL PLANING म्हणतो. यावरूनच आपले शॉर्ट आणि लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग ठरते. AI तंत्रज्ञान विकसित होत असताना त्याचे स्वागत करणे योग्यच आहे. कारण विकसित तंत्रज्ञान आपले Efforts कमी करतात याचा अर्थ असा नव्हे की, AI मनुष्यजातीला रिप्लेस करेल. ज्या गोष्टी मनुष्य करू शकतो त्या गोष्टी तंत्रज्ञान करू शकत नाही. आरोग्य आणि संपत्ती यांचा समतोल साधण्याकरिता आपण तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. म्हणून, विकसित तंत्रज्ञानाचा स्वीकार करून स्वतःला त्याप्रमाणे अपडेट करा.
या मुलाखतीच्या माध्यमातून माझी ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर होणार असून सर्व तरुण वर्गाला मला सांगायचे आहे की, Goal, Consistency, Hard Work and Discipline Together Give Success, Achievement And Personal Growth.
सरतेशेवटी या उपक्रमांतर्गत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याकरिता मनःपूर्वक शुभेच्छा, धन्यबाद !
शब्दांकन
प्रा. ममता पळसपगार
राजर्षी शाहू सायन्स कॉलेज, चांदुररेल्वे