आजच्या आधुनिक युगात करिअरच्या संधी खूप वाढल्या आहेत. पूर्वी विद्यार्थी फक्त सरकारी किंवा खाजगी नोकरीकडेच लक्ष देत होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. इंटरनेट, मोबाइल, सोशल मीडिया आणि जागतिकीकरणामुळे विद्यार्थ्यांना जगभरात काम करण्याच्या संधी मिळत आहेत.
हॉस्पिटॅलिटी, पर्यटन आणि जनसंपर्क (PR) ही तीन क्षेत्रे आजच्या काळात खूप महत्त्वाची बनली आहेत. या क्षेत्रांमध्ये केवळ नोकरीच नाही, तर स्वतःचा व्यवसाय (स्टार्टअप) सुरू करणे आणि फ्रीलान्सिंग करून पैसे कमावणेही शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी 'नोकरीच्या पलीकडे' जाऊन विचार करणे आवश्यक आहे.
१. हॉस्पिटॅलिटी क्षेत्र सेवा, शिस्त आणि संधी -
हॉस्पिटॅलिटी म्हणजे लोकांना आदराने आणि चांगल्या प्रकारे सेवा देणे. जेव्हा आपण हॉटेल, रेस्टॉरंट, रिसॉर्ट किंवा एअरलाईन्समध्ये जातो, तेव्हा आपल्याला मिळणारी सेवा ही या क्षेत्राचा भाग असते.
ज्या उमेदवारांना जगभर फिरण्याची आवड आहे, स्वादिष्ट अन्न तयार करण्याची आवड आहे आणि दररोज नवीन लोकांना भेटायला आवडते, त्यांनी अशा प्रकारच्या करिअरकडे लक्ष केंद्रित करावे.
करिअर संधी
* हॉटेल मॅनेजर
* शेफ (Chef)
* फ्रंट ऑफिस एग्झिक्युटिव
* हाऊसकीपिंग स्टाफ
* एअरलाईन्स केबिन क्रू
काय करावे ? (Step-by-Step Procedure)
१. १२वी नंतर हॉटेल मॅनेजमेंट / हॉस्पिटॅलिटी कोर्स निवडा
२. चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्या (IHM सारखे)
३. इंटर्नशिप करा (हॉटेल्समध्ये प्रत्यक्ष अनुभव घ्या)
४. संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकसित करा
५. प्लेसमेंट किंवा जॉब पोर्टलवर अर्ज करा
६. या क्षेत्रात आधीपासून कार्यरत असलेल्या वरिष्ठांशी भेटा
उपयुक्त वेबसाइट्स
www.nchmct.org
www.ihm.ac.in
www.naukri.com
www.linkedin.com
या क्षेत्रात काम करताना वेळेचे पालन, स्वच्छता, शिस्त आणि ग्राहकांशी नम्र वागणूक खूप महत्त्वाची असते. सुरुवातीला पगार कमी असू शकतो, पण अनुभव वाढला की चांगल्या संधी मिळतात. परदेशातही या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.
२. पर्यटन क्षेत्र अनुभव, प्रवास आणि करिअर
पर्यटन म्हणजे लोकांना नवीन ठिकाणी फिरायला नेणे आणि त्यांना त्या ठिकाणांबद्दल माहिती देणे. भारतात धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन खूप मोठ्या प्रमाणावर आहे. भारत या उद्योगात वेगाने प्रगती करत आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढीची क्षमता आहे.
करिअर संधी
* टूर गाईड
* ट्रॅव्हल एजंट
* टूर ऑपरेटर
* ट्रॅव्हल कन्सल्टंट
* ट्रॅव्हल ब्लॉगर / यूट्यूबर
* आपण स्वतःची कंपनी सुरू करू शकता.
* या उद्योगात फ्रीलान्सिंगच्या संधी उपलब्ध आहेत.
काय करावे ?
१. Travel & Tourism कोर्स करा
२. सरकारकडून टूर गाईड लायसन्स घ्या
३. ट्रॅव्हल कंपनीत काम करून अनुभव घ्या
४. स्वतःचा ब्लॉग, इंस्टाग्राम पेज किंवा यूट्यूब चॅनल सुरू करा
५. शासनाकडून कर्ज घेऊ शकता.
उपयुक्त वेबसाइट्स
www.tourism.gov.in
www.incredibleindia.org
www.irctc.co.in
www.makemytrpi.com
या क्षेत्रात काम करताना सतत प्रवास करावा लागतो. नवीन लोकांना भेटण्याची आणि विविध संस्कृती जाणून घेण्याची संधी मिळते. डिजिटल युगात ट्रॅव्हल व्हिडिओ आणि ब्लॉगिंग करूनही चांगले उत्पन्न मिळवता येते.
३. जनसंपर्क (PR) - संवाद आणि प्रतिमा निर्माण
PR म्हणजे एखाद्या कंपनीची किंवा व्यक्तीची चांगली प्रतिमा तयार करणे. आज प्रत्येक कंपनीला सोशल मीडियावर आणि मीडियामध्ये चांगली ओळख हवी असते. हे प्रत्येक कंपनीसाठी तसेच आपला ब्रँड इमेज सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे.
करिअर संधी
*PR Executive
* Social Media Manager
Content Writer
* Brand Manager
Event Coordinator
*Social media influencer
काय करावे ?
१. Mass Communication / Journalism कोर्स करा
२. लेखन आणि संवाद कौशल्य विकसित करा
३. PR एजन्सीमध्ये इंटर्नशिप करा
४. सोशल मीडिया हँडल्स व्यवस्थापित करण्याचा
अनुभव घ्या
उपयुक्त वेबसाइट्स
www.linkedin.com
www.internshala.com
www.upwork.com
www.fiverr.com
PR क्षेत्रात सर्जनशील विचार, चांगले लेखन, आणि लोकांशी प्रभावी संवाद साधण्याची क्षमता आवश्यक असते. या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना नेहमी अपडेट राहावे लागते.
४. स्टार्टअप्स - स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी
आजचा तरुण वर्ग स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडे अधिक वळत आहे. कमी पैशातही व्यवसाय सुरू करता येतो. आजचा काळ स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठी सर्वोत्तम आहे. तसेच, सरकारकडून आर्थिक मदत व इतर विविध सवलतींचेही समर्थन मिळत आहे.
काय करू शकता ?
* होमस्टे व्यवसाय
* ट्रॅव्हल एजन्सी
* इव्हेंट मॅनेजमेंट
PR/Digital Marketing एजन्सी
प्रक्रिया (Step-by-Step)
व्यवसायाची कल्पना ठरवा १.
२. बाजाराचा अभ्यास करा (Market Research)
३. संबंधित क्षेत्रात नोकरी सुरू करा.
४. त्या क्षेत्रात अनुभव मिळवा.
५. व्यवसायाची नोंदणी करा
६. बँक खाते आणि GST नोंदणी करा
७. सोशल मीडियावर प्रचार सुरू करा
८. स्वतःची सोशल मीडियावर उपस्थिती तयार करा.
९. उत्पादनाच्या गुणवत्तेच्या विकासावर लक्ष केंद्रित करा.
उपयुक्त वेबसाइट्स
www.startupindia.gov.in
www.msme.gov.in
udyamregistration.gov.in
स्टार्टअप सुरू करताना सुरुवातीला अडचणी येऊ शकतात, पण योग्य नियोजन आणि मेहनतीने यश मिळवता येते. सरकारकडून आर्थिक मदत आणि मार्गदर्शन मिळू शकते.
-५. फ्रीलान्सिंग स्वतंत्र करिअर सोशल मीडिया आणि इतर क्षेत्रे
फ्रीलान्सिंग म्हणजे स्वतःच्या वेळेनुसार आणि कौशल्यानुसार काम करणे. विद्यार्थी शिक्षण घेत असतानाच फ्रीलान्सिंग सुरू करू शकतात. यामध्ये आपल्या कामाच्या क्षेत्रावर चांगले प्रभुत्व असणे आणि कामाबद्दल प्रचंड आवड असणे आवश्यक आहे. सोशल मीडिया, सल्लागार सेवा (कन्सल्टन्सी), भरती (रिक्रूटमेंट) इत्यादी क्षेत्रांमध्ये आपण फ्रीलान्सिंग करू शकता.
काय करू शकता ?
* कंटेंट रायटिंग
* सोशल मीडिया मॅनेजमेंट
* फोटोग्राफी / व्हिडिओ एडिटिंग
* ब्लॉगिंग / PR कन्सल्टिंग
* पुस्तक लेखन
* घोस्ट रायटिंग (इतरांच्या नावाने लेखन)कसे सुरू करावे ?
१. तुमचे कौशल्य ओळखा
२.तुमचे काम दाखवण्यासाठी पोर्टफोलिओ तयार करा
३. आपल्या क्षेत्राबद्दल प्रचंड आवड आणि रुची असणे आवश्यक आहे.
४. Fiverr, Upwork वर अकाउंट तयार करा
५. छोटे प्रोजेक्ट्स घेऊन अनुभव वाढवाwww.fiverr.com
उपयुक्त वेबसाइट्स
www.fiverr.com
www.upwork.com
www.freelancer.com
www.peopleperhour.com
फ्री लान्सिंगमध्ये सुरुवातीला कमी पैसे मिळू शकतात, पण अनुभव वाढल्यावर चांगले उत्पन्न मिळते. यामध्ये तुम्हाला वेळेचे स्वातंत्र्य मिळते.
६. यशासाठी आवश्यक कौशल्ये
या सर्व क्षेत्रांमध्ये यश मिळवण्यासाठी खालील कौशल्ये खूप महत्त्वाची आहेतः
* चांगले संवाद कौशल्य
सतत शिकत राहा आणि आपल्या कौशल्यांचा विकास (स्किल अपग्रेडेशन) करा
* आपल्या क्षेत्राबद्दल दृढ आवड (पॅशन) ठेवा
* तज्ज्ञ लोकांच्या समूहात राहा
इंग्रजी आणि इतर भाषा
* डिजिटल आणि संगणक कौशल्ये
* सर्जनशील विचार
* वेळेचे व्यवस्थापन
* आत्मविश्वास
हॉस्पिटॅलिटी, पर्यटन आणि PR ही क्षेत्रे आजच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठ्या संधी देतात. या क्षेत्रांमध्ये नोकरी, स्टार्टअप आणि फ्रीलान्सिंग या तिन्ही मार्गांनी करिअर करता येते.
आजच्या विद्यार्थ्यांनी फक्त नोकरीवर अवलंबून न राहता नवीन संधी शोधल्या पाहिजेत. 'नोकरीच्या पलीकडे' विचार करून योग्य दिशा निवडली तर प्रत्येक विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो.