Author
अपयश पचवताना.....
मा. अमित भोळे
संचालक, महसूल विभाग, वित्त मंत्रालय भारत सरकार, पायाभूत सुविधा / प्रकल्प वित्त, SYDENHAM खाते नियंत्रक जनरत.

सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार

स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन. स्पर्धा परीक्षा आता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे एक मानाची नोकरी मिळावी, एक न्याय नोकरी मिळावी आपल्याला चांगल्या ठिकाणी काम करता यावे यासाठी स्पर्धा परीक्षा हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. तर या पर्यायाची ज्या विद्यार्थ्यांनी निवड केली आहे जी एक असामान्य गोष्ट आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन..!

वास्तविक बघता कोणतीही स्पर्धा परीक्षा त्या त्या क्षेत्रातील एक कठीणतम परीक्षा म्हणून ओळखली जाते अशी या परीक्षेची ओळख आहे. अशा विविध स्पर्धा परीक्षा म्हणजे सरकारी, निमसरकारी, बँकेच्या नोकऱ्या या सगळ्यांसाठीची तयारी करणे म्हणजेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणे होय. तर आता कोणतीही परीक्षा म्हटली तर त्यात पास, नापास, यश आणि अपयश हे पैलू आले. जसे की मी या आधी म्हणालो होतो यशस्वी एकाच त-हेने होता येते पण अपयश पचवायचं कसं हा विषय जर समजून घ्यायचा असेल तर आपण अपयशी का होतो हे समजून घेणे सुद्धा तितकच महत्त्वाचं आहे. या शब्दाची गंमत बघा 'अपयश पचवताना' या संज्ञेमध्ये पचवताना हा शब्द मी वापरला आहे हा शब्द मी का वापरला असेल तर, एक निसर्ग नियम आहे निसर्गामध्ये जे प्राणीमात्र आहेत ते आपल्याला हवे ते भोजन घेतात त्या अन्नामध्ये त्यांच्या शरीराला जे काही गरजेचे आहे त्यांचे शरीर केवळ त्याचेच पचन करतं आणि जे कामाचं नाही आहे ते त्याजून देतात म्हणून पचवताना हा शब्द वापरला आहे अपयशाला सामोरे जाताना हा शब्द न वापरता मुद्दामूनच अपयश पचवताना हा शब्द प्रयोग केलेला आहे त्यामागचं कारण असं की अपयशाला सामोरे जाताना ही एक static गोष्ट झाली म्हणजे त्यामधून पुढे काही होणार नाही ती तिथेच थांबेल पण पचनक्रियेमधून आपण जेव्हा अन्न ग्रहण करतो तेव्हा आपल्याला ऊर्जा मिळते तेव्हा या अपयशाने स्पर्धा परीक्षेत दुर्दैवाने आपल्याला अपयश आलं तर त्यातून आपण ऊर्जा कशी मिळवावी हा एक मुख्य असा दृष्टिकोन आपल्याला असायला हवा म्हणून पचवताना हा शब्द वापरला आहे आणि मुळातच अपयश हा जो शब्द आहे यामध्ये यश दडलेला आहे, अयशस्वी हा जो शब्द आहे त्यामागे यशस्वी हा शब्द दडलेला आहे त्यामुळे अपयश हे अपयश नसतं त्यामुळे आपल्याला त्यातून एक ऊर्जा मिळू शकते हा या लेखाचा प्रमुख उद्देश आहे.

तर स्पर्धा परीक्षांमध्ये अपयश तसेच असते. स्पर्धा परीक्षांमध्ये जर आपल्याला अपयश आलं तर ते कसं पचवावं आणि त्यातून काय शिकून पुढे जाव या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत.

स्पर्धा परीक्षा आपण जेव्हा म्हणतो मग ती लोकसेवा आयोगाची असू देत केंद्रीय लोकसेवा आयोगाची असू देत किंवा राज्य लोकसेवा आयोगाचे असू दे किंवा IBPS सारखे बँकांची अधिकारी भरतीसाठी जी स्पर्धा परीक्षा होते ती असू देत किंवा अन्य कोणत्याही स्पर्धा परीक्षा असू दे तुम्ही आपापल्या दृष्टीने अशी संलग्न करू शकता. परीक्षेचे स्वरूप ठरलेले असतात एक यामध्ये लेखी परीक्षा असते तदनंतर यामध्ये मुलाखत देखील असते या अशा ठरलेल्या स्वरूपाच्या स्पर्धा परीक्षांमध्ये तीन प्रमुख टप्पे मला दिसतात जे आपल्याला सांगणे मला महत्वाचे वाटते. जेव्हा कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये विद्यार्थी हा अपयशी ठरतो तेव्हा तीन टप्प्यांचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. हे तीन टप्पे कोणते तर, पहिला टप्पा असतो तो परीक्षेच्या आधीचा म्हणजे आपल्या तयारीच्या वेळेचा दुसरा टप्पा असतो ऐन परीक्षेच्या दिवसाचा म्हणा किंवा मुलाखतीची वेळ मुलाखत ज्या दरम्यान होते ती वेळ हा दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा फॉर्मल ज्या वेळेला रिझल्ट येतो तेव्हा ज्या वेळेला निकाल जाहीर होतो त्यावेळेस असे तीन टप्पे साधारणतः मी यामध्ये मांडतो. या प्रत्येक टप्प्यावर आपण विचार करू पहिला टप्पा स्पर्धा परीक्षा द्यायच्या आधीचा ह्याचा एक उदाहरण सांगू इच्छितो, मी अलीकडेच एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला भेटलो. तो यूपीएससीच्या परीक्षेची तयारी करत होता मी त्याला पहिला प्रश्न विचारला की, 'तुझा हा कितवा अटेम्प्ट आहे..?' तर त्याने सांगितलं की, हा माझा चौथा अटेम्प्ट आहे मी परत त्याला दुसरा प्रश्न विचारला की, 'तू मुख्य परीक्षा दिली आहेस का..?' तर तो त्यावर म्हणाला, 'मी पूर्व परीक्षा कधीच पास झालो नाही.'

'तू जर तीन-चार वर्षांपासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी लोकसेवा आयोगासाठी प्रयत्न करतोय तर तुझ्यात एक आत्मविश्वास निश्चितच निर्माण झाला असेल तर या आत्मविश्वासाच्या बळावर तू इतर स्पर्धा परीक्षा दे जेणेकरून तुला एक सन्मानाची नोकरी मिळू शकेल कारण केलेला अभ्यास हा कधीच वाया जात नाही IBPS सारखी काही बँकांच्या परीक्षा दे या तू चांगल्या करू शकशील कारण हा अभ्यास करताना आपण इकॉनॉमिक्स हा विषय शिकत असतो मग यूपीएससीचा अभ्यास करताना आणि इतरही गोष्टी आपल्याला मदतीला येतात आणि आयबीपीएसची परीक्षा देऊन तू एक ऑफिसर म्हणून कोणत्या बँकेत लागू शकशील तिथे लागल्यावर परत तयारी कर' असं मी त्याला सांगितल्यावर तो मला म्हणाला की, सर मी झूलॉजीचा विद्यार्थी आहे मला गणित येत नाही आणि या परीक्षेमध्ये गणित याविषयावर खूप भर दिलेला असतो हे सांगण्याचा तात्पर्य हेच आहे की हे जे त्या मुलाने दिलेलं उत्तर होतं ते परीक्षेच्या आधी फेल होण्याचं म्हणजेच मला त्या मार्गी जाताच येणार नाही कारण तो कठीण मार्ग आहे त्यामुळे मी त्या परीक्षेचा विचारच करणार नाही हे अत्यंत चुकीचे आहे हे झालं पहिलं अपयश त्या विद्यार्थ्यांचं. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षा देण्याआधीच अपयश मानून घेणे अशी चूक करू नका हे यातून मला आपल्याला सांगायचे आहे. आपण प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं यश, अपयश हे आपल्या हातात नसतं. आपल्या प्रत्येक अटेम्प्ट मधून आपल्या प्रयत्नातून गोष्टी शिकायच्या असतात त्यासाठी आपण सजग राहून त्या दृष्टीने वाटचाल नेहमी केली पाहिजे तर असं स्वतःहून अपयश ओढवून घेऊ नये आपल्याला जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर परत मी हे सांगेल की या तीन सुत्रावर काम केलं पाहिजे मग ती जगातली कोणतीही स्पर्धा परीक्षा असू देत पहिलं सूत्र आहे परीक्षेचा जो काही अभ्यासक्रम आहे तो आपल्याला माहिती असला पाहिजे हा कुठे मिळेल तर स्पर्धा परीक्षेच्या नोटिफिकेशन मध्ये किंवा जाहिराती, सूचना पत्रांमध्ये हा सगळा अभ्यासक्रम आपल्याला मिळतो कित्येकांनी स्पर्धा परीक्षेच्या तयारी आधी अभ्यासक्रम बघितलेलाच नसतो ही चूक होऊ नये सर्वात पहिल्यांदा आपला फोकस अभ्यासक्रमावर असला पाहिजे हे झालं पहिलं सूत्र.

दुसरं सूत्र कोणतीही परीक्षा देताना त्या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्यामध्ये आपल्या अभ्यासाची किती सखोलता महत्त्वाची आहे हे समजून घ्यायचे असेल तर पूर्वी त्या परीक्षेमध्ये काय काय प्रश्न विचारले गेले या दृष्टीने त्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करणे गरजेचे आहे जेणेकरून त्या संकलित प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करून कोणत्या मुद्द्द्यावर आपल्याला भर द्यायचा आहे कुठल्या मुद्द्द्यांवर द्यायचा नाही आहे, एका प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे वर्णनात्मक प्रश्न असतील तर किती शब्द लिहावे लागणार आहे किती वेळ लागणार आहे याचं सगळं नियोजन आपल्याला करता येईल हे झालं दुसरं सूत्र. तर तिसरं सूत्र हे की ज्या स्पर्धा परीक्षांचे आपण तयारी करीत आहोत त्या परीक्षेमध्ये आपल्या आधी ज्यांनी अटेम्प दिला असेल जे त्या स्पर्धा परीक्षेला बसले असतील त्यांचा अनुभव आपल्याला कसा फायद्याचा ठरेल हे आपण बघितलं पाहिजे त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे त्यांच्या अनुभवाचा आपल्याला कसा फायदा होईल हे ठरवता आलं पाहिजे त्यातील कोणाचे या संबंधीचे पुस्तक असतील, ब्लॉग्स असतील किंवा इतर काही माध्यमातून त्यांनी आपले अनुभव व्यक्त केले असतील ते आपण जाणून घेतले पाहिजे हे झालं तिसरं सूत्र. या सूत्रात मी म्हणालो की, या परीक्षेमध्ये जे बसले असतील ते.., जे विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले असतील त्यांच्याशी चर्चा करावी त्यांचा अनुभव घ्यावा; जे अयशस्वी होतात त्यांना देखील एक अनुभव आलेला असतो त्या अनुभवांची शिदोरी आपल्याला कसा फायदा पोहोचवेल हे जाणून घेण्यासाठी आपण जे यशस्वी झालेले आहे त्यांचा देखील एक अनुभव जाणून घेणे आपल्याला गरजेचे आहे ते हे तीन सूत्र परीक्षेच्या आधी लक्षात ठेवणे गरजेचे आहे आता दुसरा टप्पा बघू या पहिला टप्पा झाला तो परीक्षेच्या आधी आता दुसरा टप्पा बघूया तो असतो ऐन परीक्षेच्या दिवशी म्हणजेनेमकं काय करायचं आणि परीक्षेच्या दिवशी आपण काय करतो तेव्हा आपला माईडसेट कसा असतो याबद्दल आपण किती सजग आहोत आपण त्यावर किती प्रयत्न केलेत किती मेहनत घेतली आहे याबद्दल आपण प्रयत्नपूर्वक कष्ट घेतले पाहिजे परीक्षेच्या तयारी संबंधी आपल्याला ज्या अत्यंत छोट्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत या जरी छोट्या आणि मूलभूत स्वरूपाच्या वाटत असल्या तरी देखील परीक्षेला यशस्वी होण्याच्या दृष्टीने फार मोलाचे कामगिरी बजावत असतात. आपल्याला अभ्यास करतांना कायम वाटत असतं की अमुक एका विषयाचा माझा खूप चांगला अभ्यास आहे तर दुसरा एखादा विषय माझा कमजोर विषय आहे आणि मग परीक्षेमध्ये आपल्याला कमजोर वाटणाऱ्या त्याच विषयावर नेमका प्रश्न विचारला गेला तर प्रसंगी आपल्यातला आत्मविश्वास डगमगू शकतो असं मुलाखतीच्या बाबतीतही घडू शकते आपल्याला ज्या विषयाचा फार अभ्यास नसेल तर मुलाखतीच्या सुरुवातीलाच अगदी त्याच विषयावर प्रश्न विचारला गेला तर आपला आत्मविश्वास अपुरा पडतो आणि असं होण्यामागचं काय कारण असू शकेल तर ते असतं व्यवस्थित नियोजन नसल्यामुळे. ते म्हणतात ना, 'If you fail to plan, You actually plan to fail.' हे स्पर्धा परीक्षांमध्ये अगदी तंतोतंत लागू होत त्यामुळे आपलं जे अभ्यासाचं नियोजन आहे ते व्यवस्थितच असलं पाहिजे नियोजन हे केवळ अभ्यासाचं नसतं तर ते कॉम्प्रहेसिव्ह प्लॅन असलं पाहिजे त्यामध्ये परीक्षेच्या अभ्यासक्रमापासून ते परीक्षेला जाताना काय साहित्य लागत इथपर्यंतच नियोजन असलं पाहिजे इथे अपयश आपल्याला येऊ द्यायचं नसेल तर; अपयशापासून काय शिकता येईल काय शिकायचं असेल तर नियोजन करणे हे एकमेव असा पर्याय आहे आणि त्या नियोजनाचा सराव सुद्धा आधी व्हायला पाहिजे त्यामुळे स्पर्धा परीक्षेचे मॉक टेस्ट हे वारंवार देत राहिले पाहिजे हा केळ प्रश्नाचा सराव नसतो तर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी संबंधित जोडलेल्या अनेक बाबींचा तो अभ्यास असतो नियोजन असतं आता तिसरा टप्पा बघूया तो म्हणजे निकाल जाहीर झाल्यावर म्हणजेच औपचारिक पद्धतीने जेव्हा स्पर्धा परीक्षेचा निकाल लागतो तेव्हा आपल्याला समजतं की आपण या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झालो आहोत की अनुत्तीर्ण झालो आहोत परत एकदा हेच सांगू इच्छितो की, स्पर्धा परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झालो आहे की नाही यापेक्षा स्पर्धा परीक्षेमध्ये आपण यशस्वी झालो आहे की नाही हे ठरवणे महत्त्वाचे अपयश आलं म्हणून थांबून न जाता पुन्हा सराव करणे महत्त्वाचे असते. अपयशी न होता यशस्वी होणारे लोक हे सामान्य असतात पण आपल्याला असामान्य व्हायचं आहे कोणत्याही परीक्षेमध्ये आपण यशस्वी झालो आहे ही भावना मनी न बाळगता आपल्या ध्येयाकडे जाण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे हा प्रयत्न करण्यासाठी जर रणनीती बदलावी लागली किंवा ती बदलावी का याचं सुद्धा एक आत्मपरीक्षण करणं महत्त्वाचं आहे आणि अपयश आलं तर आपली रणनीती जरूर बदलावी यूपीएससीची तयारी करताना आपण जे स्वप्न बघितलेलं असतं की नागरी सेवेमध्ये आपला ठसा उमटवू ते पूर्ण करायचं अपयश आलं म्हणून थांबून न जाता परत पुढे चालत राहायचं आपण समाजाला पर्यायाने देशाला काही देणं लागतो या दृष्टीतून नागरी सेवेमध्ये कार्य करीत असताना आपण पर्यायाने देशाचीच सेवा करीत असतो ही भावना आपल्या मनी बाळगावी. आणि अपयश आलं तरी, ते पचवून पुढे जात त्याच अपयशातून सकारात्मक ऊर्जा घेऊन पुढच पाऊल टाकत जायचं..

'अपयशाने खचू नको, धैर्य धरून चाल,

संघर्षातूनच उमलते, यशाची नवी भाल,

परीक्षेत पडली हार, हीच शिकवण ठरावी,

धीर, प्रयत्न, आत्मविश्वासानेच विजयाची फुले फुलावी..!'

धन्यवाद !