करिअर संधीचा महामेळावा
विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वांत महत्त्वाच्या टप्प्यांपैकी एक म्हणजे योग्य करिअरची निवड. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना विद्यार्थ्यांसमोर अनेक प्रश्न असतात. पुढे नेमके काय करायचे ? कोणत्या क्षेत्रात करिअरच्या अधिक संधी आहेत ? उच्च शिक्षण घ्यावे की नोकरी करावी? उद्योजकतेकडे वळावे का? परदेशात शिक्षण किंवा रोजगाराच्या संधी कोणत्या आहेत? आपल्या पदवीसोबत कोणती कौशल्ये आत्मसात करावीत? बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःला रोजगारक्षम कसे बनवावे ?
या प्रश्नांची उत्तरे केवळ पाठ्यपुस्तकांमध्ये मिळत नाहीत. त्यासाठी आवश्यक असते योग्य माहिती, अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन, प्रत्यक्ष क्षेत्राची ओळख आणि उपलब्ध संधींशी थेट संपर्क. हीच गरज लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना विविध करिअर संधींची व्यापक ओळख करून देण्यासाठी 'करिअर संधीचा महामेळावा' या अभिनव उपक्रमाची या महिन्यात सुरुवात करण्यात आली.
हा उपक्रम केवळ करिअर मार्गदर्शनाचा कार्यक्रम नसून विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील संधींशी जोडणारे एक व्यापक व्यासपीठ म्हणून आकार घेत आहे. विविध क्षेत्रांतील अनुभवी व्यक्ती, तज्ज्ञ, व्यावसायिक, उद्योजक, शिक्षणतज्ज्ञ आणि मार्गदर्शक वक्ते विद्यार्थ्यांशी संवाद साधत असून, त्यांच्या अनुभवातून विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध वाटांची प्रत्यक्ष ओळख होत आहे.
संत राऊळ महाराज महाविद्यालयात 'सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळा' उत्साहात संपन्न
युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आणि त्यांना योग्य दिशा देण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळा' आयोजित करण्यात आली होती. दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्षीयस्थानी संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्राचार्या मा. डॉ. स्मिता सुरवसे यांनी भूषवले. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध वाटा आणि योग्य दिशा निवडण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी नामवंत तज्ज्ञ व अधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सिंधुदुर्गचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी मा. तुळशीदास गावडे, स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) मा. भुषण कोळेकर आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रास्ताविकाने झाली सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक मा. प्रा. डॉ. अजित दिघे यांनी केली. महाविद्यालयीन समन्वयक मा. प्रा. अजित कानशिडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमात करिअर कट्टा संसद मुख्यमंत्री तथा संत राऊळ महाराज महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. अनुष्का परब हिने आपले मनोगत व्यक्त केले.आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य करिअरची निवड करता यावी यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात, असे मान्यवरांनी आपल्या वक्तव्यातून अधोरेखित केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करिअर कट्टाचे महाविद्यालयीन समन्वयक मा. प्रा. उमेश कामत यांनी मानले. या कार्यशाळेस महाविद्यालयातील मोठ्या संख्येने विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या करिअरला मिळाली नवी दिशा
अलिबाग येथे महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि जे. एस. एम. कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 'रायगड जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळा' उत्साहात संपन्न झाली.
जनता शिक्षण मंडळ, अलिबागचे अध्यक्ष मा. डॉ. अॅड. गौतमभाई पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या मा. डॉ. सोनाली पाटील मॅडम ह्या होत्या. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे यांनी 'बदलत्या काळातील करिअरच्या संधी आणि कौशल्यविकासाबाबत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले', तर स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) मा. भूषण कोळेकर यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेची (Entrepreneurship) नवी दृष्टी दिली.
'करिअरची योग्य दिशा म्हणजे उज्ज्वल भविष्याची पहिली पायरी' मान्यवरांनी 'आजच्या काळात केवळ पदवी मिळिवणे पुरेसे नसून, पदवीसोबत आवश्यक कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे,' असे प्रतिपादन करीत करिअरच्या योग्य दिशेचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. बबन सिनगारे यांनी, स्वागत प्रा. डॉ. हनुमंतराव जगताप यांनी तर आभार प्रदर्शन आणि आयोजनामागील भूमिका डॉ. प्रशांत अनिल चाटे यांनी स्पष्ट केली. तसेच करिअर कट्टा संसद मुख्यमंत्री कु. संयोगी नाईक हिने मनोगत व्यक्त केले.
करिअरचे मार्गदर्शन, उद्योजकतेची नवी दृष्टी आणि आत्मविश्वासाच्या त्रिसूत्रीमुळे ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर जिल्हास्तरीय 'करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळा' उत्साहात संपन्न
युवकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत त्यांना त्यांच्या आवडी, क्षमता आणि कौशल्यांनुसार योग्य करिअरची निवड करता यावी तसेच भविष्यासाठी स्पष्ट दिशा निश्चित करता यावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळेचे' आयोजन करण्यात आले होते. दि. २९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी २:०० या वेळेत यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई येथील रंगस्वर हॉलमध्ये ही कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे व पालघर जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळा' उत्साहात संपन्न
कार्यशाळेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती मा. श्री. रवींद्र साठे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई प्राचार्य प्रवर्तक करिअर कट्टा मा. प्राचार्या डॉ. प्रज्ञा प्रभू होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, योग्य करिअर निवड, कौशल्य विकास, उद्योजकता आणि व्यक्तिमत्त्व विकासाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व मान्यवर उपस्थित होते.
कार्यशाळेस सोलर एनर्जी सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मा. श्री. प्रफुल्ल पाठक, Singhania & Co. Mo Senior Partner & CIO तसेच Bombay Stock Exchange Mo Head - Strategy मा. श्री. शंकर जाधव आणि Audiologist व Voice Therapist मा. सोनाली लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) मा. भूषण कोळेकर आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष मा. यशवंत शितोळे यांनी मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यशाळेची सुरुवात मुंबई जिल्हा समन्वयक मा. प्रा. स्नेहा जगदाळे यांच्या स्वागताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालनमुंबई विभागीय समन्वयक मा. प्राचार्या डॉ. दीपा वर्मा यांनी केले, तर ठाणे जिल्हा समन्वयक मा. प्रा. श्रुती सुनील पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी यशवंत शितोळे सर यांनी करिअर निवडताना स्वतःच्या आवडी, क्षमता आणि कौशल्यांची ओळख करून घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले. भविष्यातील परिस्थितीचा विचार करून मुख्य करिअरसोबत Plan B तयार ठेवणे आणि त्यासाठी योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
मा. श्री. प्रफुल्ल पाठक यांनी सौर ऊर्जा, वीज आणि ग्राहक वस्तू क्षेत्रातील विविध करिअर व व्यवसायाच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मा. श्री. भूषण कोळेकर यांनी वेळेचे व्यवस्थापन, प्राधान्यक्रम निश्चित करणे, कुटुंबीयांशी चर्चा, आर्थिक जागरूकता आणि उद्योजकतेचे महत्त्व विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले. मा. श्री. शंकर जाधव (IIT & IIM) यांनी यशाची व्यापक संकल्पना स्पष्ट करताना 'यश पैसा ज्ञान मानवी मूल्ये कौशल्यातील उत्कृष्टता' असे सांगितले. केवळ पैसा मिळवणे म्हणजे यश नसून ज्ञान, कौशल्य, उत्कृष्टता आणि मानवी मूल्ये यांचा समतोल साधणे हे खरे यश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मा. प्राचार्या डॉ. दीपा वर्मा आणि मा. यशवंत शितोळे यांच्या मार्गदर्शनातून बांधिलकी, नातेसंबंध, चारित्र्य आणि मानवी मूल्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. मा. सोनाली लोहार यांनी स्व-ओळख आणि कौशल्य विकासावर मार्गदर्शन करत विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमतांचा शोध घेण्यासाठी प्रेरित केले. तसेच मा. श्री. रवींद्र साठे यांनी Apiculture अर्थात मधमाशी पालन हा पारंपरिक करिअर पर्यायांपेक्षा वेगळा आणि चांगली उद्योजकीय संधी उपलब्ध करून देणारा व्यवसाय म्हणून विद्यार्थ्यांसमोर मांडला.
कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांची Entrepreneurship Assessment Test घेण्यात आली. या चाचणीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या उद्योजकीय क्षमतेचे मूल्यांकन करण्यात आले. २१ ते २५ गुण मिळवणारे विद्यार्थी उद्योजक होण्यासाठी तयार, १६ ते २० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगली उद्योजकीय क्षमता, तर १५ पेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना उद्योजकीय क्षमता अधिक विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे या चाचणीच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले.
एकूणच, या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधींची माहिती मिळाली. तसेच योग्य करिअर निवडण्यासाठी स्व-ओळख, कौशल्य विकास, आर्थिक जागरूकता, उद्योजकतेची मानसिकता, योग्य नियोजन आणि मानवी मूल्ये यांचे महत्त्व अधोरेखित झाले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडी व क्षमतांचा विचार करून मुख्य करिअरचा मार्ग निश्चित करण्यासोबतच पर्यायी करिअरचा विचार करावा आणि भविष्यासाठी सक्षम नियोजन करावे, असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.
श्रीगोंदा जिल्हास्तरीय 'करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळा' उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणे तसेच त्यांच्या आवडी, क्षमता, AI कौशल्ये आणि भविष्यातील संधींचा विचार करून त्यांना योग्य करिअरची दिशा मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 'श्रीगोंदा जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळेचे' आयोजन दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय, श्रीगोंदा येथे करण्यात आले. सकाळी १०.३० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात या कार्यशाळेचा शुभारंभ झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. प्रा. डॉ. सतीशचंद्रजी सूर्यवंशी, अहिल्यानगर जिल्हा प्राचार्य प्रवर्तक, करिअर कट्टा उपस्थित होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीगोंदा तालुक्याचे युवा नेते मा. दिग्विजय राजेंद्रदादा नागवडे उपस्थित होते. तसेच मा. प्राचार्य डॉ. राजधर टेमकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर मा. प्रा. डॉ. सतीशचंद्रजी सूर्यवंशी, अहिल्यानगर जिल्हा प्रवर्तक, करिअर कट्टा यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी, क्षमता आणि कौशल्यांनुसार योग्य करिअरची निवड करता यावी तसेच भविष्यातील संधींचा प्रभावीपणे उपयोग करता यावा, यासाठी अशा कार्यशाळांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. प्रा. डॉ. विलास सुद्रिक, अहिल्यानगर जिल्हा समन्वयक, करिअर कट्टा यांनी केले.
यावेळी दादा पाटील राजळे महाविद्यालय, आदिनाथ नगर येथील विद्यार्थिनी कु. स्नेहल ताराचंद नेहुल हिने आपलेमनोगत व्यक्त केले. व तसेच आयोजक कॉलेज मुख्यमंत्री सार्थक यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले व कार्यशाळेतून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनी आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींची माहिती मिळण्यासाठी आणि योग्य दिशा निश्चित करण्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा उपयुक्त ठरत असल्याचे तिने सांगितले.
सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या वेळेत विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले. या सत्रात मा. यशवंत शितोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधी, कौशल्य विकास, स्पर्धात्मक परीक्षांचे क्षेत्र तसेच भविष्यातील करिअर नियोजनाबाबत मार्गदर्शन केले. बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांनी आवश्यक कौशल्ये आत्मसात करून उपलब्ध संधींचा योग्य पद्धतीने उपयोग करावा, असे त्यांनी सांगितले.
दुपारी १.०० ते २.०० या वेळेत मा. भूषण कोळेकर, माजी सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM), स्टेट बँक ऑफ इंडिया यांचे मार्गदर्शनपर सत्र झाले. त्यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा, बँकिंग क्षेत्र, व्यवसाय, रोजगाराच्या विविध संधी आणि करिअर नियोजन याबाबत मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेसोबत आवश्यक कौशल्ये विकसित करून भविष्यातील संधींसाठी स्वतःला तयार करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक पात्रता, कौशल्ये, आवडीनिवडी आणि उपलब्ध रोजगाराच्या संधी यांचा विचार करून योग्य करिअरची निवड कशी करावी, याबाबत मार्गदर्शन मिळाले. तसेच बदलत्या रोजगाराच्या संधी, स्पर्धात्मक युगातील आवश्यक कौशल्ये आणि भविष्यातील करिअरच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या विविध बाबींची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
कार्यक्रमाच्या शेवटी अहिल्यानगर जिल्हा समन्वयक, करिअर कट्टा मा. प्रा. डॉ. विलास सुद्रिक यांनी उपस्थित मान्यवर, विद्यार्थी, प्राध्यापक आणि सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य करिअरची दिशा मिळावी, त्यांच्या क्षमतांची ओळख होऊन त्यानुसार करिअरची निवड करता यावी आणि उपलब्ध संधींचा प्रभावीपणे उपयोग करता यावा, या दृष्टीने ही कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरली. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकारात्मक आणि उत्साहपूर्ण वातावरणात कार्यशाळेची सांगता झाली.
लेट जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 'नाशिक जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळा' उत्साहात संपन्न
नाशिक, १ सप्टेंबर २०२६
युवकांना करिअरच्या योग्य संधींची माहिती मिळावी आणि त्यांच्या भविष्यातील वाटचालीला योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि लेट जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने 'नाशिक जिल्हास्तरीय करिअर मॅपिंग एकदिवसीय कार्यशाळे'चे आयोजन करण्यात आले होते. आज दि. १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता महाविद्यालयाच्या सभागृहात या कार्यशाळेचा शुभारंभ झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व सरस्वती गीताने करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली. कार्यशाळेस उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सपकाळ नॉलेज हबचे संस्थापक अध्यक्ष मा. डॉ. रविंद्र सपकाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान लेट जी. एन. सपकाळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नाशिकचे प्राचार्य मा. डॉ. साहेबराव बागल यांनी भूषवले. त्यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण, गुणवत्ता आणि योग्य मार्गदर्शनाचे महत्त्व सांगितले. नाशिक जिल्हा प्राचार्य प्रवर्तक, करिअर कट्टा मा. डॉ. संजय माधव सानप यांनी प्रमुख उपस्थित म्हणून मनोगत व्यक्त केले. तसेच नाशिक जिल्हा समन्वयक (तंत्रशिक्षण विभाग) व अख। ऊड विभाग प्रमुख मा. सीमा बाजी मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन सत्रामध्ये महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष व 'करिअर कट्टा'चे राज्य समन्वयक मा. यशवंत शितोळे यांनी विद्यार्थ्यांना करिअरच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन केले. तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाचे माजी सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM) मा. भूषण कोळेकर यांनी बँकिंग व वित्त क्षेत्रातील करिअरच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली.कार्यशाळेदरम्यान प्राचार्य व समन्वयकांसाठी आढावा बैठक तसेच विद्यार्थ्यांसाठी समांतर मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील करिअरच्या संधी आणि भविष्यातील पर्याय समजून घेण्यास मदत झाली. कार्यक्रमाच्या मनोगत सत्रामध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थी, महाविद्यालयीन प्राचार्य, महाविद्यालयीन समन्वयक तसेच करिअर संसद मुख्यमंत्री यांनी आपले अनुभव व विचार व्यक्त केले. आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना योग्य वेळी योग्य करिअरची निवड करता यावी, तसेच उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करता यावा, यासाठी अशा कार्यशाळा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात, असे मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनातून अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, समन्वयक, विद्यार्थी आणि आयोजकांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या शेवटी जिल्हा समन्वयक डॉ. राजेंद्र झोळेकर यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
सेंट विन्सेट कॉलेज, पुणे येथे एकदिवसीय करिअर मॅपिंग कार्यशाळेचे आयोजन
विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधींची माहिती मिळावी, आवश्यक जीवनकौशल्ये व व्यावसायिक कौशल्ये विकसित करता यावीत तसेच त्यांच्या भविष्यातील करिअरविषयक निर्णय अधिक माहितीपूर्ण पद्धतीने घेता यावेत, या उद्देशाने करिअर कट्टा उपक्रमांतर्गत सेंट व्हिन्सेंट कॉलेज, पुणे येथे एकदिवसीय करिअर मॅपिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.३० वाजता झाली. प्रा. डॉ. संजय खिलारे, पुणे विभागीय समन्वयक, करिअर कट्टा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आपल्या प्रास्ताविकात प्रा. डॉ. खिलारे यांनी विद्यार्थ्यांना करिअर कट्टा उपक्रमाची माहिती करून देत, हजारो विद्यार्थ्यांना विविध करिअरच्या संधींशी जोडण्याचे तसेच त्यांच्या वैयक्तिक व व्यावसायिक विकासासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे कार्य करिअर कट्टाच्या माध्यमातून केले जात असल्याचे सांगितले. तसेच नाशिक व अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या करिअर मॅपिंग कार्यशाळेनंतर आता ही कार्यशाळा सेंट विन्सेट कॉलेज, पुणे येथे आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक दीपप्रज्वलन समारंभाने झाली. सेंट विन्सेट कॉलेज, पुणे येथील कुमारी कोमल कामती, उच, तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाच्या प्रास्ताविककर्त्यांनी उपस्थित मान्यवर, प्राध्यापकवर्ग व विद्यार्थ्यांचे स्वागत करून करिअर मॅपिंग कार्यशाळेची उद्दिष्टे व महत्त्व स्पष्ट केले.
प्रा. डॉ. अनिल अडसूळे, प्राचार्य, सेंट विन्सेट कॉलेज, पुणे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. त्यानंतर श्री. यशवंत शितोळे, अध्यक्ष, करिअर कट्टा यांनी सेंट विन्सेट कॉलेजचे प्राचार्य तसेच कुमारी कोमल कामती यांचा सत्कार केला.
विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रा. संजय खरात, पुणे जिल्हा प्राचार्य समन्वयक / प्रवर्तक, करिअर कट्टा यांनी सेंट विन्सेट कॉलेजच्या प्राचार्यांचे आभार मानत शैक्षणिक संस्थांच्या स्थापनेविषयी व त्यांच्या योगदानाविषयी विचार मांडले. त्यांनी पाऊस आणि करिअर कट्टा यांची सुंदर तुलना करत सांगितले की, ज्या प्रकारे पावसाची सुरुवात कोकणातून होऊन तो हळूहळू संपूर्ण देशभर पोहोचतो, त्याचप्रमाणे करिअर कट्टाची सुरुवात कोकणातून झाली असून भविष्यात हा उपक्रम संपूर्ण देशातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट बाळगतो. या उदाहरणातून विद्यार्थ्यांना व्यापक स्तरावर करिअर मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या करिअर कट्टाच्या ध्येयावर त्यांनी प्रकाश टाकला.
यानंतर प्रा. डॉ. नितीन घोरपडे, पुणे विभागीय प्राचार्य समन्वयक / प्रवर्तक, करिअर कट्टा यांनी कार्यशाळेचे औपचारिक उद्घाटन केले. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी २४ तासांच्या वेळेचे प्रभावी व्यवस्थापन किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. वेळेचा योग्य व कार्यक्षम वापर हा यशस्वी करिअर घडविण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर प्रा. डॉ. प्रभाकर घोडके यांच्या मार्गदर्शनपर भाषणाने कार्यशाळेच्या परिचयात्मक सत्राची सांगता झाली.
त्यानंतर कार्यशाळेचे मुख्य सत्र श्री. यशवंत शितोळे, अध्यक्ष, करिअर कट्टा यांनी घेतले. त्यांनी सुरुवातीला आर्थिक व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी पैशांचे प्रभावी व्यवस्थापन करण्याचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी SMART Goals या संकल्पनेची माहिती दिली. प्रभावी उद्दिष्टे ही Specific (विशिष्ट), Measurable (मोजता येण्याजोगी), Achievable (साध्य करण्याजोगी), Relevant (सुसंगत) आणि Time-bound (कालमर्यादित) असावीत, असे त्यांनी स्पष्ट केले.श्री. शितोळे यांनी पुढे व्यक्तिमत्त्व विकास, तणाव व्यवस्थापन आणि वेळेचे व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच भावनिक बुद्धिमत्ता (Emotional Intelligence - EQ) या संकल्पनेची विद्यार्थ्यांना ओळख करून देत वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनातील तिचे महत्त्व स्पष्ट केले. यासोबतच करिअर कट्टाच्या माध्यमातून उपलब्ध असलेल्या विविध स्टार्टअप व उद्योजकतेच्या संधींबद्दल त्यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि पारंपरिक करिअरच्या पर्यायांसोबतच विविध क्षेत्रांतील संधींचा शोध घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. त्यांचे सत्र सुमारे दुपारी १२.३० वाजता संपले.
यानंतर श्री. भूषण कोळेकर, सहाय्यक महाव्यवस्थापक (AGM), स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) तसेच Advisory Board Member यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकता या विषयावर मार्गदर्शन केले. उद्योजकता ही एक सक्षम आणि समाधानकारक करिअरची संधी ठरू शकते, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना विचार करण्यास प्रवृत्त केले. तसेच व्यवसाय क्षेत्रात स्वतःची क्षमता, कल आणि आवड ओळखण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
या सत्राचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी उद्योजकीय क्षमता मूल्यांकन (Entrepreneurial Potential Assessment) घेण्यात आले. उद्योजकांमध्ये आढळणाऱ्या विविध गुणवैशिष्ट्यांच्या आधारे विद्यार्थ्यांची व्यावसायिक प्रवृत्ती व क्षमता यांचा आत्मपरीक्षणात्मक आढावा घेण्यासाठी हे मूल्यांकन तयार करण्यात आले होते. हे मूल्यांकन उद्योजक होण्याच्या क्षमतेचे अंतिम किंवा अचूक मोजमाप नसून, विद्यार्थ्यांना स्वतःच्या सामर्थ्यांचा तसेच विकासाच्या आवश्यक क्षेत्रांचा विचार करण्यासाठी उपयुक्त साधन म्हणून सादर करण्यात आले.
संपूर्ण करिअर मॅपिंग कार्यशाळेचे समन्वयन सेंट विन्सेट कॉलेज, पुणे येथील डॉ. राधाकृष्ण यांनी केले. महाविद्यालय प्रशासन, करिअर कट्टाचे प्रतिनिधी आणि प्राध्यापकवर्ग यांच्या सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले.
या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना करिअर नियोजन, उद्दिष्ट निश्चिती, आर्थिक व्यवस्थापन, व्यक्तिमत्त्व विकास, भावनिक बुद्धिमत्ता, तणाव व वेळ व्यवस्थापन, उद्योजकता तसेच स्टार्टअपच्या संधी यांसारख्या विविध विषयांबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळाले. विविध सत्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वतःच्या क्षमता ओळखण्यास, विविध करिअरच्या वाटांचा शोध घेण्यास आणि आपल्या व्यावसायिक भवितव्याबाबत अधिक माहितीपूर्ण निर्णय घेण्यास सक्षम करण्याचा या कार्यशाळेचा उद्देश साध्य झाला.
करिअर कट्टाः स्टार्टअप्स ओळख आणि दिशा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष ओरिएंटेशन सत्र संपन्न
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र तंत्रज्ञान साहाय्य केंद्र (MITSC) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या लोकप्रिय 'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठी एका विशेष सत्र मालिकेचे आयोजन करण्यात आले. दिनांक १५ ते २० ऑगस्ट दरम्यान महाविद्यालयीन स्तरावर 'बिझनेस क्लब' स्थापन करण्याच्या उद्देशाने हे ओरिएंटेशन सत्र पार पडले. या सत्रात एआयसी-एआयटी खरगपूर फाऊंडेशनच्या इन्क्यूबेशन मॅनेजर कु. सोनाली सस्ते यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
या सत्र व उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप पहिल्या टप्प्यापासून (स्क्रेच) कसा उभा
करावा याचे सखोल मार्गदर्शन करणे हा होता. तसेच, महाविद्यालयांमध्ये 'बिझनेस क्लब'ची स्थापना करून विद्यार्थ्यांना त्यांच्या
नाविन्यपूर्ण कल्पनांचे (Ideas) प्रोटोटाइपमध्ये रूपांतर करण्यास मदत करणे आणि कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी
आणि फार्मसी अशा सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या ओळखून प्रभावी व नाविन्यपूर्ण उपाय
शोधण्यासाठी प्रवृत्त करणे हा यामागील उद्देश होता. स्टार्टअप म्हणजे काय हे स्पष्ट करताना, ही एक तरुण कंपनी असते जी
समाजातील विशिष्ट समस्येवर अत्यंत नाविन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानावर आधारित उपाय शोधते, असे कु. सस्ते यांनी सांगितले.
पारंपारिक व्यवसायांच्या तुलनेत स्टार्टअप्स खूप कमी वेळेत आणि वेगाने संपूर्ण देशात किंवा जगात आपले जाळे पसरवू
शकतात. यामध्ये उच्च जोखीम आणि अनिश्चितता असली, तरी योग्य पद्धतीमुळे मोठे यश मिळण्याची दाट शक्यता असते.
सत्रादरम्यान पारंपारिक व्यवसाय आणि स्टार्टअप यांमधील फरक स्पष्ट करण्यात आला. पारंपारिक व्यवसायांचे मॉडेल जुने, ठरलेले व स्थानिक पातळीवर सिद्ध झालेले असते, तर स्टार्टअप्सचे मॉडेल पूर्णपणे नवीन आणि आधी कधीही न वापरलेले असते. पारंपारिक व्यवसायाची वाढ ही हळू आणि रेषीय (Linear) असते, तर स्टार्टअपची वाढ अत्यंत वेगाने आणि प्रचंड पटीने (Exponential) होते. पारंपारिक व्यवसायासाठी स्वतःचे पैसे किंवा बँक कर्जाचा वापर केला जातो, तर स्टार्टअप्ससाठीएंजेल इन्व्हेस्टर्स, व्हीसी (Venture Capitalists) किंवा शासकीय ग्रँड्सचा आधार घेतला जातो.
भारतातील स्टार्टअप इकोसिस्टमचा आढावा घेताना, २०१६ मध्ये भारत सरकारने सुरू केलेल्या 'स्टार्टअप इंडिया, स्टैंडअप इंडिया' या उपक्रमामुळे आज देशात क्रांती झाल्याचे सांगण्यात आले. आज डीपीआयटी (DPIIT) प्लॅटफॉर्मवर २४ लाखांहून अधिक स्टार्टअप्स नोंदणीकृत असून, अमेरिका आणि चीननंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप देश बनला आहे. तसेच, भारतात सध्या १३० हून अधिक 'युनिकॉर्न' कंपन्या कार्यरत आहेत. भारतातील स्टार्टअप्सचे उत्पादन आधारित (उदा. BoAt ऑडिओ), सेवा आधारित (उदा. Urban Company), मार्केटप्लेस प्लॅटफॉर्म्स (उदा. Flpikart, Ola, Swiggy, Zomato), डीप टेक (उदा. Skyroot), फिनटेक (उदा. PhonePe, Razorpay, Zerodha) आणि सोशल इमपॅक्ट अशा विविध प्रकारांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. फ्लिपकार्ट आणि ओला यांसारख्या यशस्वी कंपन्यांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यात आले.
सत्राच्या शेवटी, विद्यार्थ्यांनी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्या छोट्या कल्पनांवर प्रत्यक्ष काम करून त्यांचे रूपांतर यशस्वी स्टार्टअप प्रोटोटाइपमध्ये करावे, असे आवाहन करण्यात आले. 'करिअर कट्टा'च्या या उपक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची नवी ऊर्जा निर्माण केली आहे.
करिअर कट्टा कोल्हापूर ऑफलाइन प्रशिक्षणः एक सविस्तर अहवाल
स्वातंत्र्यदिनाच्या मंगलमय वातावरणात, दिनांक १५ आणि १६ ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे 'करिअर कट्टा'च्या वतीने एका विशेष ऑफलाइन प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासासाठी आणि त्यांना व्यावसायिक व प्रशासकीय प्रवाहात सक्षम बनवण्यासाठी पार पडलेले हे दोन दिवसीय प्रशिक्षण अत्यंत प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरले.
पहिला दिवसः स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आणि कार्यशाळेचा शुभारंभ
प्रशिक्षणाची सुरुवात १५ ऑगस्ट रोजी ध्वजारोहणाच्या राष्ट्रप्रेमाने भारलेल्या कार्यक्रमानंतर झाली. देशभक्तीच्या उत्साहातच उपस्थितांनी थेट ज्ञानाच्या आणि कौशल्याच्या आदानप्रदानास सुरुवात केली. पहिल्या दिवशीच्या सत्रात खालील प्रमुख मुद्द्द्यांवर सखोल चर्चा आणि मार्गदर्शन झालेः
इव्हेंट मॅनेजमेंट आणि समन्वयः प्रत्यक्ष कार्यक्रमांचे आयोजन कसे करावे, विविध घटकांमध्ये सुसंवाद कसा साधला जावा
याविषयी मार्गदर्शन मिळाले. लोकांशी जोडण्याचे कौशल्य (How to Connect People): संवाद कौशल्य आणि जनसंपर्क वाढवण्याचे महत्त्व उपस्थितांना समजून सांगण्यात आले.
संवादात्मक चर्चासत्रः प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर पुढील ध्येय (क्रेरश्र) कसे ठरवावे आणि तिथपर्यंत पोहोचण्यासाठी स्वतःच्या बलस्थानांचा (डौपस झेळपणी) वापर कसा करावा, यावर सविस्तर मंथन झाले.
कार्यालयीन कार्यपद्धती (Office Work): संपूर्ण ऑफिसचे कामकाज प्रत्यक्षात कसे चालते, कामाची पद्धत आणि शिस्त कशी पाळावी याचे प्रात्यक्षिकांसारखे मार्गदर्शन मिळाले.
याच दिवशी सन्माननीय राजू राऊत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना करिअर आणि कामाच्या स्वरूपाविषयी एक नवी दिशा मिळाली.
दुसरा दिवसः कार्यसंस्कृती, कौशल्य विकास आणि मनोगत
दुसऱ्या दिवशी (१६ ऑगस्ट) कामाच्या सूक्ष्म आणि महत्त्वाच्या अंगांवर प्रकाश टाकण्यात आला. या सत्राची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे होतीः
कामाचे स्ट्रक्चर आणि शिस्तः कार्यालयीन कामकाज करत असताना पाळावयाची शिस्त, कामाचे योग्य नियोजन आणि चुका टाळण्याच्या पद्धतींवर सविस्तर चर्चा झाली.
आवश्यक कौशल्ये (Skill Development): वर्तमान काळात उद्योग आणि कार्यक्षेत्रात टिकून राहण्यासाठी व प्रगती करण्यासाठी कोणती कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे, यावर मार्गदर्शन करण्यात आले.इंटर्नशिपचा बदल आणि मनोगतः इंटरनेट इंटर्नशिप (Internet Internship) जॉईन केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कार्यपद्धतीत आणि दृष्टिकोनात झालेला सकारात्मक बदल सर्वांनी आपापल्या मनोगतातून व्यक्त केला.
समृद्ध अनुभवः कोल्हापूरच्या या दोन दिवसीय प्रवासात विद्यार्थ्यांना समृद्ध असा अनुभव घ्यायला मिळाला, ज्याने सर्वांच्या ज्ञानात भर घातली.
सहजता आणि प्रेरणादायी सांगता
दोन दिवस चाललेले हे प्रशिक्षण अत्यंत उत्साही, शिस्तबद्ध आणि संवादात्मक वातावरणात पार पडले. या प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांना केवळ तांत्रिक बाबींचे ज्ञान मिळाले नाही, तर संघभावना, कामाची शिस्त आणि स्वतःच्या ध्येयाशी पक्के राहण्याची प्रेरणाही मिळाली. करिअर कट्टाचे हे ऑफलाइन प्रशिक्षण उपस्थितांच्या व्यावसायिक व वैयक्तिक विकासासाठी एक मैलाचा दगड ठरले.
करिअर कट्टा अंतर्गत महाविद्यालयांमध्ये 'प्री-अविष्कार वर्कशॉप' चे यशस्वी आयोजन
विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्ये विकसित करणे, स्टार्टअपविषयी जनजागृती निर्माण करणे आणि त्यांच्या सृजनशीलतेला चालना देणे या उद्देशाने, महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या उपक्रमांतर्गत दिनांक २१ ते ३१ ऑगस्ट दरम्यान राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये 'प्री-अविष्कार वर्कशॉप'चे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयीन पातळीवर राबवण्यात आलेल्या या कार्यशाळांना विद्यार्थ्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून,
खालील महाविद्यालयांमध्ये हे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झालेः
तायवाडे कॉलेज, कोराडी, नागपूर (ग्रामीण) दिनांक २२ ऑगस्ट
अंजुमन इस्लाम जंजिरा डिग्री कॉलेज ऑफ सायन्सः दिनांक २४ ऑगस्ट
बजाज कॉलेज ऑफ सायन्स, वर्धाः दिनांक २५ ऑगस्ट
शंकरराव पाटील महाविद्यालय, भूमः दिनांक २५ ऑगस्ट
श्री छत्रपती शिवाजी कॉलेज, उमरगाः दिनांक २९ ऑगस्ट
जी. एस. कॉलेज ऑफ कॉमर्स, वर्धा: दिनांक ३१ ऑगस्ट
ए. आर. बी. गरुड कॉलेज, शेंदुर्णी: दिनांक ३१ ऑगस्ट
द. ग. तटकरे महाविद्यालय माणगाव रायगड : दिनांक ३१ ऑगस्ट
१५ ते २० ऑगस्ट यादरम्यान स्थापन करण्यात येणाऱ्या बिझनेस क्लब साठी ओरिएंटेशन सत्राचे चे आयोजन करण्यात आले होते.
करिअर कट्टाः स्टार्टअप्स ओळख आणि दिशा (ऑरिएंटेशन सेशन)
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्रशिक्षण विभाग आणि महाराष्ट्र तंत्रज्ञान साहाय्यता केंद्र (MITSC) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या 'करिअर कट्टा' उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता आणि स्टार्टअप संस्कृती रुजवण्यासाठी एका विशेष सत्र मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या सत्रात एआयसी-एआयटी खरगपूर फाऊंडेशनच्या इन्क्यूबेशन मॅनेजर कु. सोनाली सस्ते यांनी मार्गदर्शन केले.
१. सत्र व उपक्रमाचा उद्देशः
कौशल्य विकासः विद्यार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय किंवा स्टार्टअप पहिल्या टप्प्यापासून (स्क्रेच) कसा उभा करावा याचे मार्गदर्शन करणे.
हँडहोल्डिंग सपोर्टः महाविद्यालयांमध्ये 'बिजनेस क्लब'ची स्थापना करून विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पनांचे (Ideas)
प्रोटोटाइपपर्यंत रूपांतर करण्यास मदत करणे.
सर्व शाखांसाठी संधीः कला, विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी आणि फार्मसी अशा सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रातील समस्या ओळखून नाविन्यपूर्ण उपाय शोधणे.
२. स्टार्टअप म्हणजे काय? (What is a Startup?)
नवीन आणि नाविन्यपूर्ण संकल्पनाः स्टार्टअप ही एक तरुण कंपनी असते, जी समाजातील विशिष्ट समस्येवर अत्यंतनाविन्यपूर्ण (Innovative) आणि तंत्रज्ञानावर आधारित उपाय शोधते.
वेगाने वाढ (Scalability): पारंपारिक व्यवसायांच्या तुलनेत स्टार्टअप्स खूप कमी वेळेत आणि वेगाने संपूर्ण देशात किंवा जगात आपले जाळे पसरवतात (Scale-up).
उच्च जोखीमः यामध्ये अनिश्चितता आणि जोखीम जास्त असते, परंतु योग्य पद्धतीमुळे मोठे यश मिळण्याची शक्यता असते.
३. पारंपारिक व्यवसाय विरुद्ध स्टार्टअप (Traditional Business vs. Startup)
वैशिष्ट्यः
पारंपारिक व्यवसाय (Traditional Business) स्टार्टअप (Startup)
व्यवसाय मॉडेलजुने, ठरलेले व स्थानिक पातळीवर सिद्ध झालेले मॉडेल. पूर्णपणे नवीन आणि आधी कधीही न वापरलेले मॉडेल.
वाढ (Growth) हळू आणि रेषीय (Linear Growth). अत्यंत वेगाने आणि प्रचंड पटीने (Exponential Growth).
भांडवल/फंडिंगस्वतःचे पैसे किंवा बँक कर्ज (Self-funded). एंजेल इन्व्हेस्टर्स, व्हीसी (Venture Capitalists) किंवा शासकीय ग्रँड्स.
जोखीम (Risk) कमी जोखीम. उच्च जोखीम आणि अनिश्चितता.
४. भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम (Startup Ecosystem in India)
सुरुवातः २०१६ मध्ये भारत सरकारने 'स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया' हा उपक्रम सुरू केला.
आढावाः आज भारतामध्ये डीपीआयटी (DPIIT) प्लॅटफॉर्मवर २४ लाखांहून अधिक स्टार्टअप्स नोंदणीकृत आहेत. अमेरिका आणि चीननंतर भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा स्टार्टअप देश आहे.
युनिकॉर्न स्टार्टअप्सः भारतात सध्या १३० हून अधिक 'युनिकॉर्न' (१ अब्ज डॉलरहून अधिक मूल्य असलेल्या कंपन्या) आहेत.
५. भारतातील स्टार्टअप्सचे प्रमुख प्रकारः
१. उत्पादन आधारित (Product Startups): स्वतःचे भौतिक किंवा डिजिटल उत्पादन तयार करणे (उदा. BoAt ऑडिओ).
२. सेवा आधारित (Service Startups): लोकांच्या माध्यमातून थेट सेवा देणे (उदा. Urban Company).
३. मार्केटप्लेस प्लॅटफफॉर्म्स (Marketplaces): ग्राहक आणि विक्रेत्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर जोडणे (उदा. Flipkart, Ola, Swiggy, Zomato).
४. डीप टेक (Deep Tech Startups): उच्च तंत्रज्ञान आणि एरोस्पेस संशोधनावर आधारित (उदा. Skyroot).
५. फिनटेक (Fintech Startups): आर्थिक व्यवहार आणि पेमेंट गेटवे (उदा. PhonePe, Razorpay, Zerod
६. सोशल इमपॅक्ट (Social Impact Startups): सामाजिक किंवा पर्यावरणीय समस्या सोडवणारे स्टार्टअप्स.
६. यशस्वी स्टार्टअप्सची काही उदाहरणेः
Flipkart: सचिन बंसल आणि बिनी बंसल यांनी २०१७ मध्ये पुस्तकांच्या विक्रीपासून सुरू केलेला व्यवसाय पुढे एक मोठा ई-कॉमर्स जायंट बनला.
Ola: भावेश अग्रवाल आणि अंकित भाटी यांनी मोबाईल अॅपच्या माध्यमातून स्थानिक वाहतूक आणि ऑटो-टॅक्सी प्रवासाची पद्धत पारदर्शक आणि सुलभ केली.
सत्राचा शेवटः विद्यार्थ्यांनी ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत आपल्या छोट्या कल्पनांवर काम करून त्यांचे रूपांतर यशस्वी स्टार्टअप प्रोटोटाइपमध्ये करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.