पहिल्या लेखात आपण आर्थिक नियोजनाच्या मुख्य पायऱ्या, दुसऱ्या लेखात आरोग्य विमा घेतानाची काळजी तर तिसऱ्या लेखात Policy मिळण्यासाठी लागणाऱ्या वेळे बद्दल पाहिले आता सर्वात महत्वाच्या म्हणजे टर्म इन्शुरन्स बद्दल पाहूया.
याला आर्थिक नियोजनाचा पाया म्हटले जाते.
'तुम मुझे ५ हजार दो, मी तुम्हे १ करोड ढुंगा' माझ्या या वाक्यावर माझा मित्र आधी हसला.
'कसं शक्य आहे?'
मी म्हटलं, 'ही काही जादू नाही. ही आहे योग्य आर्थिक नियोजनाची ताकद आणि त्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे टर्म इन्शुरन्स.
अर्थात, कुटुंबाच्या उत्पन्नाच्या जोखमीपासून संरक्षण देणारे आर्थिक कवच आहे.
अनेक जणांची तक्रार असते की मी गेल्यानंतर घरच्यांना मिळणार तर मग कशाला पैसे भरायचे? असताना पण मिळाले पाहिजेत तर त्या प्रकारचे सुद्धा टर्म इन्शुरन्स आले आहेत ज्यात जिवंत राहिलो तरी चांगले पैसे मिळतात.
२ मिनिटे डोळे बंद करा आणि तुमचे उत्पन्न अचानक बंद झाले, तर पुढील १५-२० वर्षे तुमच्या कुटुंबाचा आर्थिक भार कोणताही मोबदला न मागता उचलतील अशा पाच व्यक्तींची नावे मनात आणा.
'बहुधा अशी २ माणसेही सापडणार नाहीत. पण टर्म इन्शुरन्सची संकल्पना याच ठिकाणी समजते. तुमच्या उत्पन्नाला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न.'
कर्नाटक मध्ये एका भाजी विक्रेत्याने त्याचा असाच मार्केट लिंकड टर्म इन्शुरन्स काढला होता ज्यात तो जगाला तर काही कोटी आणि लवकर गेला तर १ कोटी रुपये मिळणार होते तर ६ महिन्यांनीच त्याचा अपघाती मृत्यू झाला आणि त्याच्या कुटुंबाला १.९० कोटी मिळाले. आमचे काही सहकारी जेव्हा चेक घेऊन त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या घरच्यांच्या डोळ्यात पाणी आले होते. त्याच्या घरचे म्हणाले की इतर सगळे लोक भेटायला, सहानुभूती दाखवायला आले पण पुढे ज्या जबाबदाऱ्या आमच्यावर अचानक येऊन पडल्या होत्या त्याबद्दल कोणी काही बोलत नव्हते की आता हे नाहीत तर उत्पन्नच बंद झाल्यावर त्या कशा पार पडणार, मुलांचे शिक्षण कसे होणार? घरखर्च कसा चालणार? आई वडीलांचे म्हातारपण त्यांचा दवाखान्याचा, आजारपणाचा खर्च कसा भागणार? इतर ही अनेक हप्ते कसे जाणार? पण तुमचा हा १.९० कोटी चा चेक या सगळ्यातून बराच दिलासा देऊ शकेल. 'आपण देवासारखे आलात' अर्थात देवानेच तुम्हाला पाठवले हे ऐकून आमच्या सहकार्यांच्या डोळ्यात पण पाणी आले. तर हा एक प्रसंग नाही असे अनेक प्रसंग पाहिले की काम करायला अजून उर्जा मिळते.
पण अनेकदा असेही प्रसंग येतात ज्याने स्वतः ला पश्चाताप होतो की मी यांच्या मागे लागून हे का करून घेतले नाही. माझे एक नगर मधील सामाजिक चळवळीतील मित्र एका रिक्षा अपघातात गंभीर जखमी झाले त्यांनतर सरकारी दवखान्यात भरती झाले आणि त्यांच्या निधनाचीच बातमी आली, धक्काच बसला. घरी एक मुलगी १० वी ला तर मुलगा ७ वी ला. ते खूप मोठेआणि महत्वाचे सामजिक कार्यकर्ते असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी मिळून काही लाख रुपये रक्कम जमा केली पण ती किती दिवस पुरणार? मला राहून राहून वाटू लागले की मी त्यांना टर्म इन्शुरन्स किंवा हेल्थ इन्शुरन्स चा आग्रह का नाही केला ? त्या घटनेनंतर माझ्यासाठी टर्म इन्शुरन्स हा फक्त विम्याचा विषय राहिला नाही; तो आर्थिक नियोजनामागची एक सामाजिक जबाबदारी बनला शिवाय आपल्यासारखे अनेक प्रामाणिक आर्थिक नियोजन सल्लागार तयार करायचेही ठरले आणि त्यानंतर क्लिनिकल रीसर्च सारखे चांगले प्रोफेशन सोडून पूर्ण वेळ यात आलो अर्थात इकडे आल्यावर MDRT सारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काम करण्याची संधीही मिळाली.
काही जण म्हणतात 'माझ्याकडे घर आहे, जमीन आहे, सोने आहे; मग मला टर्म इन्शुरन्सची गरज काय? 'उत्तर साधे आहे' तुमच्या कुटुंबाला तुमच्या मालमत्ता विकण्याची वेळ येऊ नये म्हणून टर्म इन्शुरन्स आवश्यक आहे. तुमच्या मृत्यूनंतर घर विकून मुलांचे शिक्षण, कर्जाचे हप्ते किंवा घरखर्च भागवण्यापेक्षा, त्यासाठी स्वतंत्र liquidity उपलब्ध असणे अधिक योग्य ठरू शकते.. मध्यंतरी सांगली/सातारा येथील एका उद्योजकाने स्वतःचा ६५ कोटींचा टर्म काढल्याचे ऐकळे आणि कोरोनात त्यांचा मृत्यू झाल्यावर ते पैसे मिळाले आणि त्यांची कंपनी जी लॉस मध्ये गेली होती ती पुन्हा त्यातून सुरु करता आली.
प्रत्येक जबाबदार व्यक्तीने स्वतःचा टर्म इन्शुरन्स काढायलाच हवा, ज्यांचा टर्म नसेल त्या व्यक्ती कुटुंबांबाबत बेजबाबदार आहेत असे म्हणायला पण हरकत नाही. यात काही लोक फक्त घरातील कर्ता पुरुष याचा टर्म इन्शुरन्स काढतात पण स्त्रीयाही आज बरोबरीने काम करू लागल्यात त्यामुळे त्यांचाही तो असायलाच हवा शिवाय ज्या गृहिणी आहेत त्यांचाही असायलाच हवा कारण गृहिणींच्या कौटुंबिक आणि घरगुती श्रमाचे मूल्य अतुलनीय आहे आणि सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अलीकडेच एका ऐतिहासिक निर्णयात गृहिणींचे काल्पनिक मासिक उत्पन्न ₹३०,००० गृहीत धरण्याचे निर्देश दिले आहेत.
टर्म इन्शुरन्स घेताना काय पात्रता असावी.
१. वय १८- ५५ या वयोगटातील व्यक्तींचा सहसा टर्म काढता येतो. यात वय जितके कमी तितका प्रीमियम कमी लागतो विशेष म्हणजे यात एकच हप्ता कायम राहतो तो हेल्थ इन्शुरन्स सारखा दरवर्षी वाढत नाही त्यामुळे जितक्या लवकर घेता येईल तो घ्यावा.
२. शिक्षण पदवीधर असणे आवश्यक असते पण डिप्लोमा /१२ वी / १० वी असेल आणि उत्पन्न जास्त असेल तरी घेता येते.
३. चांगले आरोग्य आरोग्य चांगले असणे आवश्यक असते. अर्थात काही आजारपण असल्यास कंपनी त्या रिस्क चा अधिक प्रीमियम घेते पण कव्हर देते. अर्थात कव्हर मिळणे आवश्यक आहे अनेकांना तर आजारपणामुळे कव्हरच मिळतच नाही. तर तुमचा हप्ता भले दुप्पट आला पण कव्हर मिळाला तर घ्या कारण जो कव्हर मिळणार आहे तो तुमच्या वार्षिक हप्त्याच्या किमान २०-१०० पट असणार आहे जे दुसरे कोणीच देणार नाही.
टर्म इन्शुरन्स कधीही Online किंवा बँकेतून घेऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे कारण मला दर आठवड्याला १-२ तरी फोन अशा लोकांचे येतात ज्यांनी येथून किंवा कुणा अभ्यासू नसलेल्या सल्लागाराकडून टर्म विमा घेतलेला आहे आणि काही चुकांमुळे क्लेम रिजेक्ट झालेला असतो. तुम्हाला जर हृदयाचा कुठला विकार झाला तर तुम्ही हृदयरोग तज्ञाकडे जाल की जवळपास एक कोणी बंगाली बाबा 'सगळ्यांवर उपाय' असे लिहले आहे त्याकडे जाल? जर तसे केले तर काय हाल होतील? ते तुम्हाला माहित आहे तर त्याचप्रमाणे ती ती गोष्ट त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीकडून करावी असे माझे मत आहे. बँकेत आपण कर्ज काढावे, FD करावी पण इन्शुरन्स किंवा म्युत्युअल फंड हे त्या त्या विषयातील तज्ञाकडूनच घ्यावेत. कारण क्लेम मध्ये मिळणारी रक्कम छोटी मोठी नव्हे कोट्यावधी रुपये असते आणि ते करायला आपल्या कुटुंबाला कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागु नयेत. माझ्या एका वकील मित्राकडे एक नातेवाईक आले ज्यांच्या भावाने टर्म इन्शुरन्स एका नामांकित बँकेतून काढलेला होता पण Claim Rejct झाला होता कारण होते Uric Acid चा आजार लपवणे तर त्याबद्दल ज्यांनी काढला त्यांना भेटायला जावे तर त्या बँक कर्मचाऱ्याची बदली झाली होती आणि ज्यांनी काढला त्यांचा तर मृत्यू झालेला होता.आम्ही जेव्हा १० लोकांचा अर्ज भरतो तेव्हा त्यातील ३ लोकांना आम्हाला नाही म्हणावे लागते, आरोग्याच्या, शिक्षणाच्या किंवा उत्पन्नाच्या स्थितीमुळे टर्म इन्शुरन्स त्यांना टर्म मिळत नाही 'असे सांगावे लागते. यात खोटे काही भरून आम्हीही तो फॉर्म पुढे नेऊ शकतो पण ते करत नाही कारण क्लेम आला तर कुणाचा तळतळाट नको असतो पण काही जण याची पर्वा का करत नाहीत हे समजत नाही. तुम्ही घेताना पण समोरचा गोड बोलणारा किंवा बोलबच्चन आहे की प्रामाणिक आहे हे पहा, त्याच्या बोलण्यातील तळमळ पहा मग घ्या.
Payment टर्म किती घ्यावी ?
Payment टर्म जेवढी कमी घेता येईल तेवढी कमी घ्या -
१२/१५/२० या वर Payment टर्म घेऊ नये कारण त्याच्यानंतर बहतेक जण पैसे भारत नाहीत आणि टर्म बंद होतो आणि त्यानंतर पुन्हा नवीन सुरु करायला गेलात तर वयानुसार खूप जास्त प्रीमियम येतो.
Premium Payment Term निवडताना केवळ कमी कालावधी म्हणजे चांगला पर्याय असे मानू नये. Regular Pay, Limited Pay किंवा Single Pay यापैकी कोणता पर्याय योग्य आहे हे तुमच्या Cash Flow, उत्पन्नाची स्थिरता आणि Policy किती काळ टिकवायची आहे यावर अवलंबून असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे Premium इतका असावा की पुढील वर्षांत Policy lapse होण्याची शक्यता कमी राहील.
Policy टर्म किती घ्यावी - Policy Term निवडताना तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक जबाबदाऱ्या कधीपर्यंत आहेत, कर्जे कधी संपणार आहेत, मुलांचे शिक्षण आणि विवाहासाठी निधी कधी लागेल आणि Retirement Corpus कधीपर्यंत तयार होईल याचा विचार करा.
किती पट असावा - तुमच्या उत्पन्नाच्या २० पट तरी असावा. एखाद्याचे उत्पन्न १० लाख आहे आणि त्याने त्याच्या १० पट म्हणजे १ कोटीचा टर्म काढला आहे असे गृहीत धरले आणि काही कारणाने त्याला अपंगत्व आले आणि त्याला १ कोटी रुपये मिळाले आणि त्याने त्याने ते बँकेत ठेवून ६% वार्षिक व्याजदराने RETURN घेतले तर त्याला फक्त ६ लाख मिळतील जे त्याच्या मुल उत्पन्नापेक्षा कमी असतील आणि त्यामुळे जीवनशैली आणि अनेक जबाबदाऱ्या ज्या पहिल्या उत्पन्नात मॅनेज करत होतो ते करणे शक्य होणार नाही. तेच २० पट म्हणजे २ कोटीचा कव्हर असला तर ते बँकेत ठेवेले तरी ५-६% नी १०-१२ लाख वार्षिक येतील ज्यात सर्व भागवता येईल.
रायडर कुठले घ्यावेत -
अपघाती विमा रायडर आपल्या भारतात दर दिवसाला जवाळपास ४८० लोक अपघातात मरतात त्यामुळे हा रायडर घेतल्यास आपल्याला दुप्पट पैसे मिळतात.
अपघाती अपंगत्व रायडर मृत झालेल्या लोकांचे फोटो आपण पाहतो पण अपंगत्व आलेल्या व्यक्तीचे काय ? त्यांचे तर उत्पन्न पण बंद होते आणि कोणावर तरी अवलंबून राहावे लागते पण हा रायडर असल्यास समजा १/२ कोटी मिळाले तर त्याचे ६% जरी वर्षाला मिळाले तर त्यात घरही चालवता येते आणि मदत करण्यासाठी एखादा / एखादी मदतनीस ही ठेवता येते.
प्रकार कोणते
१. नो रिटर्न - यात जर मृत्यू झाला तर पैसे मिळतात नाही झाला तर काही मिळत नाही. याचा हप्ता बर्यापैकी कमी असतो २. रिटर्न टर्म - यात मृत्यू झाला तर पैसे मिळतातच पण नाही मृत्यू झाला तर भरलेले पैसे रिटर्न मिळतात.
३. टर्म विथ वेल्थ / एस आय पी / मार्केट लिंक टर्म यात तुम्ही गुंतवता तेव्हा जवळपास निम्मी रक्कम टर्म मध्ये आणि निम्मी रक्कम ULIP FUNDS मध्ये गुंतवली जाते जे तुम्ही ५ वर्षानंतर कधीही काढू शकता. यात विशेष बाब ही की तुम्हाला मिळणारी रक्कम सगळी TAX फ्री असते. तुमचा टर्म चा वार्षिक हप्ता २.५ लाख च्या खाली असेल तर मिळणारी सगळी रक्कम TAX फ्री असते म्हणजे त्याला LONG TERM CAPITAL GAIN TAX लागत नाही. यात एक उदाहरण पहायचे
समजा २ कोटी काढायचे आहेत तर आपल्याला त्यासाठी १२.५ % प्रमाणे २५ लाख TAX CUT होऊन FAKT मिळतील पण या प्रकरचा प्लान असल्यास पूर्ण पैसे मिळतील.शिवाय नॉर्मल म्युचअल फंड्स आणि ULIP Funds मध्ये फरक हा की नॉर्मल ला कधीही पैसे काढता येतात तर ULIP ला ५ वर्षे लॉक असते यात जिथे लोकक नाही तिथे ५ व्या वर्षी १०० पैकी फक्त १७ तर ५ व्या वर्षी फक्त २-३ लोक राहतात तर ULIP मध्ये लॉक असल्याने काढताच न आल्याने खरी कंपाऊंडिंगची जादू अनुभवायला मिळते. (म्युच्युअल फंड गुंतवणुकींना बाजारातील जोखमी लागू होतात. कृपया योजना-संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा.)
MWP Act : टर्म इन्शुरन्समधील एक महत्त्वाचे संरक्षण
समजा एखाद्या उद्योजकावर मोठे कर्ज आहे. त्याच्याकडे घर, जमीन, Shares आणि इतर मालमत्ता आहे. अशा वेळी त्याच्या मृत्यूनंतर Creditors किंवा कायदेशीर प्रक्रियेमुळे कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत Married Women's Property Act, १८७४ च्या Section ६ अंतर्गत घेतलेली पात्र Life Insurance Policy पत्नी आणि/किंवा मुलांच्या फायद्यासाठी Trust स्वरूपात ठेवली जाऊ शकते. कायद्यानुसार अशी Policy पतीच्या Creditors च्या Control पासून आणि त्याच्या Estate पासून वेगळी ठेवण्याचे संरक्षण मिळते. त्यामुळे विवाहित व्यक्तीने मोठा Life Cover घेताना 'MWP Act अंतर्गत Policy घेणे माझ्या कुटुंबासाठी योग्य आहे का?' हा प्रश्न आपल्या Insurance Advisor आणि आवश्यक असल्यास Legal/Tax Professional ला विचारावा.
Businessmen साठी Key Person Insurance कंपनीचा Founder/Partner/Director हा व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाचा असेल तर त्याच्या मृत्यूमुळे कंपनीला आर्थिक धक्का बसू शकतो. अशा वेळी योग्य परिस्थितीत Key Person Insurance ही संकल्पना उपयोगी ठरू शकते.
टर्म घेताना स्वस्तात मिळतो म्हणून कुठल्याही कंपनीचा घेऊ नये शक्यतो चांगली कंपनी पहावी ज्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो चांगला आहे. मला याबाबत TATA आणि LIC या २ कंपन्या आवडतात. कोविड मुळे ज्या Policy धारकांचे मृत्यू झाले त्यांना TATAAIA ने ५-५ लाख अतिरिक्त दिले. तेच जेव्हा जिथे कुठे भूकंप, पूर किंवा नैसर्गिक आपत्ती येते तिथे LIC स्वतः हून Stall लावते. कंपनी निवडताना Claim Settlement Performance, Solvency, Policy Terms, Exclusions, Service Quality, Premium Affordability आणि तुमच्या गरजेला योग्य Product यांचा विचार करा.
तर आपण आपला आणि आपल्या कुटुंबातील सर्वांचा टर्म काढलाय का? काढला नसल्यास आजच आपले नाव आणि जन्मतारीख पाठवा आपल्याला आपल्या जन्मतारखेनुसार काय काय करता येईल ते पाहूया आणि आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करूया.
टर्म इन्शुरन्स घेताना या १० चुका टाळा
फक्त कमी Premium पाहून Policy घेणे.
उत्पन्न / आरोग्याची माहिती लपवणे.
Existing Policies न सांगणे.
आवश्यकतेपेक्षा कमी Cover घेणे.
Policy term खूप कमी ठेवणे.
Premium Affordability न पाहता Policy घेणे. Riders न समजता Add करणे.
Nominee/Update न करणे.
Policy Document न वाचणे
Policy घेतल्यानंतर कुटुंबाला Policy ची माहिती न देणे.आपल्याला माहित आहे का विकसित देशात हा विमा १००% लोकांचा असतो त्यामुळे अचानक जरी घरातील आई /वडील / पती / पत्नी कोणी गेले किंवा मुलगा / मुलगी गेले तर त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबाचे हाल होत नाहीत, कारण २-४ कोटीचा कव्हर असतोच असतो पण आपल्या इथे मात्र याबद्दल म्हणावी तशी जागरूकता नसल्याने जवळपास ८६% लोकांचा हा विमाच नाही. तर आपण स्वतःचा तर हा कराच पण जवळपासच्या सर्व व्यक्तींना पण हा घेण्यास सांगा.
संकेत मुनोत MDRT, USA Founder, Wealthbridge Financial Services आर्थिक साक्षरता पसरवणारी सामाजिक चळवळ
८६६८९७५१७८
wealthbridge.planning@gmail.com