Author
आर्थिक वृद्धी प्रामाणिक मार्गाने कशी करावी ?
मा. संकेत मुनोत, MDRT, USA
आर्थिक नियोजन तज्ञ आणि विमा सल्लागार संस्थापक, वेल्थब्रिज फायनान्शियल सर्विसेस

मी हा लेख लिहायला घेतला आहे तो एका आनंदाच्या, समाधानाच्या भावनेतून. आपल्या करिअर कट्टाच्या इक्यू क्लबने (EQ Club) मे महिन्यात एक अतिशय आगळा वेगळा उपक्रम केला. १ मे ते ३१ मे असे ३१ दिवस आपण दररोज अनुभवलेल्या तीन भावना नोंदवणं असा तो उपक्रम होता. आजवर असं एखाद्या गटाने मिळून आणि इतक्या सलग दिवसांसाठी करणं असा उपक्रम झाल्याचं आम्हाला तरी माहित नाहीय, अशी नोंद कुठं झाली नाहीय, त्यामुळे असं काही करणं हेच मुळात कदाचित जगाच्या पाठीवरचा पहिला प्रयोग आहे. सिक्स सेकंस (6) Seconds: www.6seconds.org) या इमोशनल इण्टेलिजन्समधल्या जागतिक स्तराच्या व्यासपीठाकडे आपण तो सादर ही केला.

७५ जण यात सहभागी झाले. त्यापैकी ५७ जणांनी २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस भावना नोंदवल्या. आता तुम्हाला वाटेल की एवढं काय त्यात, दिवसभरात काय काय भावना मनात आल्या ते लिहायचं. हे इतकं सोपं साधं असेल तर कुणी का करत नाही हे? भावना नोंदवण्याचं महत्व आणि त्यातली गंमत सांगते तुम्हाला.

आपल्यापैकी प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी प्रिय-अप्रिय अशा बऱ्याच भावनांची रेंज अनुभवत असतो. चांगल्या भावना आपल्याला सगळ्यांना हव्याहव्याशा वाटतात आणि अप्रिय भावना सर्वांनाच नकोशा असतात. त्यांच्यापासून होता होईल तितकं दूर जाण्याकडे आपला कल असतो. त्या भावनेकडे दुर्लक्ष करणं, तिला दूर लोटून देणं, स्वतःला दुस-या कशात तरी गुंतवणं, छान वाटेल अशा गोष्टी करणं, असं करून तात्पुरता उपाय मिळाल्यासारखं वाटतं, पण मूळ समस्या काही सुटत नाही काही याची एक जाणीव आपल्या सगळ्यांना आतूनच असते. पण या भावनांचं नेमकं काय करायचं हे नाही उमगत.

भावनांच्या व्यवस्थापनाची खरी गरज त्या नकारात्मक भावनांनाच जास्त असते. दुःख, राग, द्वेष, भीती, असूया मत्सर अशा कितीतरी भावना कधी आपण दीर्घकाळापासून अनुभवत असतो. त्या असतातच आपल्याला आयुष्याचा भाग. कधी आपल्याला त्यांच्याशी जुळवून घ्यायला वेळ मिळतो, तर कधी त्या आपल्यावर येऊन अचानक आदळतातच. मग सोबतीने धक्का ही बसलेला असतो, आणि हे सगळं पचवणं जड जातं.

भावनांच्या विश्वाचीच एक गंमत असते. जी काही भावना असेल ती ओळखता आली की थोडा त्या भावनेच्या तीव्रतेपासून थोडा दिलासा मिळतो. या मागचं विज्ञान थोडं समजून घेऊया. आपल्या मेंदूचा एक भाग विचार करणारा मेंदू असतो. त्याला कॉर्टेक्स म्हणतात. आणि आपल्या मेंदूचा एक भाग भावनिक मेंदू असतो, त्याला अॅमॅग्डेला म्हणतात. भावना उत्पन्न होण्याची क्रिया अॅमॅग्डेला मध्ये होते, पण ती भावना ओळखणं आणि त्या भावनेला नाव देणं ही क्रिया कॉर्टेक्सश संबंधित असते. या छोट्याशा क्रियेने मेंदूच्या या दोन्ही भागात एक प्रकारचा समन्वय निर्माण होतो, अॅमॅग्डेला थोडा शांत होतो, निवतो.

त्यामुळे भावना जाणणं, तिला नावं देणं आणि तिची तीव्रता ओळखणं ही भावनिक बुद्धीमत्तेच्या जगातली फार कळीची गोष्ट आहे. झाडं, प्राणी, कीटक ओळखण्यासाठी त्यांचं वर्गीकरण (क्लासिफिकेशन) केलं की गोष्टी सोप्या होतात, तसंच भावनांचं ही आहे. रॉबर्ट प्लुटचिक या मानसशास्त्रज्ञाने भावनांचं आठ प्रकारांमध्ये वर्गीकरण केलं आहे. हे संशोधन त्याने १९८० मध्ये मांडलं. आज ही हे वर्गीकरण पायाभूत वर्गीकरण मानलं जातं. आनंद (Joy), दुःख (Sadness), विश्वास (Trust), तिरस्कार (Disgust), भीती (Fear), राग (Anger), आश्चर्य (Surprise) आणि वेध लागणं (Anticpiation) अशा आठ गटात प्लुटचिकने भावनांचं मुख्यतः वर्गीकरण केलं आहे. आणि या पैकी प्रत्येक भावनेच्या तीन इण्टेन्सिटीज (तीव्रता) त्याने मांडल्या आहेत, सौम्य, मध्यम आणि उच्च अशा त्या तीव्रता आहेत.७५ जण या मोशन लॉग प्रकल्पात सहभागी झाले. त्यापैकी ५७ जणांनी २१ दिवसांपेक्षा जास्त दिवस भावना नोंदवल्या. आता तुम्हाला वाटेल की एवढं काय त्यात, दिवसाभरात काय काय भावना मनात आल्या ते लिहायचं. हे इतकं सोपं साधं असेल तर कुणी का करत नाही हे ?! भावना नोंदवण्याचं महत्व आणि त्यातली गंमत सांगते तुम्हाला.

मुळात आपल्या मेंदूला विचार करायची सवय असते, पण एखाद्या परिस्थितीत आपल्याला भावना काय जाणवली असं हे आपण शोधत बसत नाही. बऱ्याचदा आपली भावना आपल्या टोन आणि बॉडी लँग्वेजवरून इतर जणच जास्त ओळखत असतात.

इमोशनल इण्टेलिजन्स शिकताना पहिली पायरी स्वतःच्या भावना ओळखणं ही असते, आणि त्याची सवय करावी लागते. ही पायरी एकदा पार करता आली की गोष्टी तितक्या कठीण राहत नाहीत. पण ही सवय कशी करायची ? त्यासाठी आपल्या इक्यू क्लब चे आम्ही काही सदस्य एकत्र आलो, आपल्या अॅपमध्ये हवे ते फीचर्स अॅड करुन घेतले आणि चक्क सुरुच केलं. एकट्याने वाटचाल कठीण वाटते तेव्हा सोबतीने करावी असं म्हणतात ते किती खरं आहे !! रात्रीचे नऊ वाजले की त्या त्या दिवसातल्या भावना लॉग करण्यासाठी अॅप ओपन व्हायचं. पाठोपाठ आपल्या अॅपवर आठवण करुन द्यायला पोल मेसेज यायचा. म्हणजे आपण विसरलो, ही सबबच निघून गेली. सुरुवातीचे काही दिवस जरा भावना शोधायला प्लुटचिकचं मॉडेल घेऊन बसावं लागायचं पण साधारण दहा एक दिवसांनी हे आपोआप व्हायला लागलं, नंतर तर दिवसभरात काही बाही कामं करताना, एखादा नवा अनुभव समोर येत असताना आपली भावना कोणती हे आपोआप मनोमन नोंदवलं जायचं. अशा प्रकारचा अनुभव नियमित असणाऱ्या जवळजवळ प्रत्येकाने सांगितला. हे मुळात या प्रकल्पांच पहिलं मोठं यश. असं करता करता महिना कसा पटकन संपला हेही कळलं नाही. हे अंगवळणी पडून गेलं इतकं की मी स्वतः मे महिनासंपला तरी रोजच्या रोज माझ्या भावना तपासून पाहतेच आहे.

६ जून हा दिवस जागतिक 'इक्यू दिवस' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी आपण आपल्या या प्रकल्पाचं स्टॅटिस्टिक्स जाहिर केलं. आपल्या गटातून सर्वाधिक नोंदवलेली भावना आनंद (जॉय) ही होती. आणि दुसऱ्या क्रमांकावर आपण सगळ्यांनी नोंदवलेली भावना शांतता (सेरेनिटी.. ही जॉय या गटातली सौम्य स्वरुपाची भावना आहे.) होती. म्हणजे ५७लोकांना सरासरी मे महिना आनंदाचा शांततेचा गेला हे निष्कर्ष निघते ना यातून !! विश्वास नाही ना बसत !! हीच खरी गंमत आहे. तुम्ही एकदा भावना ओळखून या वस्तुनिष्ठपणे मांडायला बसलात की आपोआपच इतका काही वाईट नव्हता हा अनुभव, असा एक सूर मनात उमटतो, आणि दुसरं म्हणजे दिवसभरात अनेक वेगवेगळ्या भावना आपण अनुभवतो. कधी कधी त्या पूर्णपणे परस्पर विरोधी असू शकतात. म्हणजे दिवसाभरात एखाद्या घटनेने खूप आनंद होऊ शकतो आणि त्याच दिवशी दुसऱ्या एखाद्या घटनेने खूप राग ही यऊ शकतो, कमालीचा तिटकारा ही वाटू शकतो. थोडक्यात सर्वसाधारणपणे भावना येतात, त्यांची तीव्रता कमी होते, कधी त्या पूर्ण मागे पडतात, अगदी विरून जातात असंही होऊ शकतं. ही महत्वाची गोष्ट सगळ्यांनी या काळात अनुभवली. अर्थात भावना तीव्र स्वरुपाच्या असतील तर त्या घर करुन राहतात, असं ही होतं. पण तीव्र स्वरुपाच्या भावना आपण अनुभवतोय असं कमी वेळा होतं. खूप थिअरी शिकवून जे झालं नसतं ते प्रत्यक्ष अनुभवांमधून आम्ही शिकलो.

आता आणखी एक आनंदाची बातमी. ६ जूनला जागतिक इक्यू दिनानिमित्त सिक्स सेकंट्सनी इक्यू बद्दल लिहायला इक्यू वॉल ओपन केली होती. त्यावर जाऊन या संदर्भातला तुमचा अनुभव, प्रतिज्ञा त्यावर लिहायचे होते. छप्पन्न वेगवेगळ्या देशातून एक लाख एकोणतीस हजार लोकांपर्यंत इक्यू ही संकल्पना पोहोचली. आपल्यापैकी एकतीस लोकांनी त्यावर लिहिलं. आणि सिक्स सेकंदने त्याचा सारांश पाठवताना जे तीन प्रातिनिधिक विचार निवडले, त्यातला एक आपल्या जान्हवी सोनकरचा आहे, आणि त्यात तिने आपल्या इक्यू क्लब चा खास उल्लेख केला आहे. आपला मे महिना समाधानाचा आनंदमयी ठरला होताच, आता या बातमीने तो आणखी सुफळ संपूर्ण झाला आहे.