१) 'करिअर कट्टा' उपक्रमाचा वर्धापनदिन कधी असतो ?
अ) १५ फेब्रुवारी
ब) २० फेब्रुवारी
क) २५ फेब्रुवारी
(ड) २८ फेब्रुवारी
२) महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि करिअर कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या मधुमक्षिका पालन प्रशिक्षण संबंधित उपक्रमाचे नाव काय आहे?
अ) मधुर २.०
ब) मधुरक्रांती
क) मधुर प्रकल्प
ड) मधुर विशेष
३) दि. २३ व २४ जानेवारी २०२६ रोजी 'राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस' कोणत्या महाविद्यालयात आयोजित करण्यात आली होती ?
अ) श्री शिवाजी सायन्स कॉलेज, अमरावती
ब) विवा कॉलेज, विरार
क) फर्ग्युसन कॉलेज, पुणे
ड) मॉडर्न कॉलेज, पुणे
४) शारदाबाई पवार महाविद्यालय, शारदानगर, बारामती येथे ३ ते ७ जानेवारी २०२६ दरम्यान संपन्न झालेल्या करिअर संसद अधिवेशनामध्ये राज्यभरातून साधारण किती विद्यार्थी सहभागी झाले होते ?
अ) २००
ब) ४००
क) ७००
ड) १०००
५) 'भावनिक बुद्धिमत्ता' या विषयाशी संबंधित करिअर कट्टा उपक्रमाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमाचे नाव काय आहे?
अ) इक्यू क्लब
ब) आयक्यू क्लब
क) एआय क्लब
ड) आयआय क्लब
६) खालीलपैकी कोणते गाव हे देशातील पहिले 'मधाचे गाव' म्हणून ओळखले जाते ?
अ) माघर
ब) पाटगाव
क) मधगाव
ड) बारामती
७) एखाद्या विशिष्ट सामाजिक, राजकीय किंवा सार्वजनिक प्रश्नाच्या निराकरणासाठी जेव्हा अनेक लोक संघटित होऊन सातत्याने आणि जाणीवपूर्वक प्रयत्न करतात, तेव्हा त्या कृतीला काय म्हणतात ?
अ) क्रांती
ब) चळवळ
क) उत्क्रांती
ड) उपोषण
८) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झाली आहे?
अ) रजनीश सेठ
ब) सतीश गवई
क) किशोर राजे निंबाळकर
ड) विवेक भीमनवार
९) सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने कार्बन डायऑक्साइडचे रूपांतर मिथेनॉल इंधनात करणारा प्रकाश उत्प्रेरक पदार्थ खालीलपैकी कोणत्या संस्थेतील संशोधकांनी तयार केला आहे?
अ) आयआयटी, मुंबई
क) आयआयटी, गुवाहाटी
ब) आयआयटी, रुरकी
ड) आयआयटी, दिल्ली
१०) जागतिक तांदूळ उत्पादनामध्ये सर्वाधिक वाटा कोणत्या देशाचा आहे?
अ) चीन
ब) भारत
क) अमेरिका
ड) फ्रान्स
११) बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ ही स्पर्धा कोणी जिंकली ?
अ) क्लेमेंट अलेनो
ब) यॉर्बन लॉरिसेन
क) कार्टर अॅलन बेटल्स
(ड) ल्यूक मुडग्वे
१२) महाराष्ट्रात सर्वाधिक १३ वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम कोणत्या अर्थमंत्र्यांच्या नावावर आहे ?
अ) अजित पवार
ब) बॅरिस्टर शेषराव वानखेडे
क) जयंत पाटील
ड) सुशीलकुमार शिंदे
१३) यंदाच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात कोणत्या राज्याच्या चित्ररथाला प्रथम क्रमांक मिळाला ?
अ) केरळ
ब) कर्नाटक
क) बिहार
ड) महाराष्ट्र
१४) खालीलपैकी कोणती प्रवेश परीक्षा एमबीए या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी उपयुक्त नाही ?
अ) CAT
ब) MAH MBA CET
क) CMAT
ड) NEET
१५) खालील विधाने वाचून दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
१) २०१९ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांनी परदेशी विद्यापीठांच्या फिसाठी सुमारे ४३ अब्ज डॉलर इतका प्रचंड पैसा खर्च केला होता.
२) २०२५ मध्ये हा खर्च वाढून सुमारे ७० अब्ज डॉलर पर्यंत पोहचला आहे.
अ) फक्त १ बरोबर
ब) फक्त २ बरोबर
क) १ व २ दोन्हीही बरोबर
ड) १ व २ दोन्हीही चूक
प्रा. संदेश दशरथ कासार,
* सहाय्यक प्राध्यापक,
रसायनशास्त्र विभाग, अगस्ति कला,
वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय,
अकोले, जि. अहिल्यानगर ४२२ ६०१
* विभागीय सहसमन्वयक, पुणे विभाग