Author
मासिकातील लेखांवर आधारित प्रश्नमंजुषा
-
-

१) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने नुकताच सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला?

अ) सचिन तेंडुलकर

 क) सौरव गांगुली

ब) राहुल द्रविड

ड) व्हि. व्हि. एस. लक्ष्मण

 

२) जगातील सर्वात मोठा नारळ उत्पादक देश कोणता आहे ?

अ) भारत

(ब) श्रीलंका

(क) चीन

ड) रशिया

 

३) खालीलपैकी कोणत्या पुस्तकाचे लेखक राजू बाविस्कर हे आहेत ?

अ) करडे स्ट्रोक्स

ब) उसवण

क) बारोमास

ड) काळयानिळ्या रेषा

 

४) खालीलपैकी कोणत्या दिन मार्च महिन्यामध्ये नसतो ?

अ) जागतिक जल दिन

ब) जागतिक हवामान दिन

क) समता दिन

ड) जागतिक नारळ दिन

 

५) करिअर कट्टा उपक्रमांतर्गत करिअर संसदेचे अधिवेशन दरवर्षी कोठे आयोजित केले जाते ?

अ) नाशिक

ब) मुंबई

क) बारामती

ड) पुणे

 

६) 'राजर्षी शाहू गौरव ग्रंथ' कोणी संपादित केला आहे?

 अ) कॉ. गोविंद पानसरे

क) आप्पासाहेब पवार

ब) जयसिंगराव पवार

ड) इंद्रजीत सावंत

 

७) करिअर कट्टा उपक्रमांतर्गत खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमामध्ये उद्योजक आपले उद्योजकीय अनुभव सांगतात ?

अ) उद्योजक आपल्या दारी

ब) उद्योजक आपल्या भेटीला

क) ऑनलाइन उद्योजक

ड) उद्यमी उद्योजक

 

८) चौथे विश्व मराठी साहित्य संमेलन कोठे संपन्न झाले ?

अ) मुंबई

(ब) सिंगापूर

क) नाशिक

ड) डावोस

 

९) इराणच्या आखाताला ओमानच्या आखाताला जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव काय ?

अ) पाल्क

(ब) होमरूल

क) पलक्कड

ड) होर्मुझ

 

१०) जिष्णू देव वर्मा हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत ?

अ) २० वे

(ब) २१ वे

क) २२ वे

ड) २३ वे

 

११) खालीलपैकी कोणी द इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे ?

अ) एच. के. दुवा

ब) रवीश कुमार

क) अर्णव गोस्वामी

ड) यापैकी एकही नाही

 

१२) Colonialism, Culture and Resistance या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

अ) अमिताव घोष

ब) के. एन. पनिक्कर

क) एस. एल. भैरप्पा

ड) एच. के. झा

 

१३) देशात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे ?

अ) केरळ

ब) गुजरात

क) उत्तर प्रदेश

ड) महाराष्ट्र

 

१४) खालील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.

१) करिअर कट्टा उपक्रम हा फक्त स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी उपयुक्त आहे.

२) करिअर कट्टा हा उपक्रम युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी आहे.

अ) फक्त १ बरोबर

ब) फक्त २ बरोबर

क) १ व २ दोन्हीही बरोबर

ड) १ व २ दोन्हीही चूक

 

१५) खालील विधाने वाचून दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

१) सन २०२२ मध्ये महाराष्ट्र शासनाने राज्यात 'दिव्यांग कल्याण विभाग' स्थापन केला.

२) नुकतेच या विभागाचे नाव बदलून 'दिव्यांग सक्षमीकरण विभाग' असे करण्यात आले आहे.

अ) फक्त १ बरोबर

ब) फक्त २ बरोबर

क) १ व २ दोन्हीही बरोबर

ड) १ व २ दोन्हीही चूक