Author
"हरखणं, भारावून जाणं आणि बरंच काही."
मा. मिथिला दळवी
भावनिक बुद्धिमत्ता ट्रेनर

या सत्राची आखणी मॅडमनी अगदी विचारपूर्वक केली होती, पन्नास हून अधिक काळ इमोशनल इण्टेलिजन्स सोबत

मा. मिथिला दळवी भावनिक बुद्धिमत्ता ट्रेनर

mithila.dalvi@gmail.com

हा लेख लिहिते आहे, तेव्हा आपला पहिला EQ क्लब आता एकोणचाळीस आठवड्यांचा झाला आहे. आणि आपल्या साठी विशेष आनंदाची गोष्ट घडून आली आहे. सिक्स सेकंदूस च्या प्रेसिडेण्ट डॉ. अॅनबेल जेनसेन यांनी आपलं रविवार २ ऑगस्टचं सत्र घेतलं. भावनिक बुद्धिमत्ता या क्षेत्रातलं आजच्या घडीचं हे सर्वात ज्येष्ठ व्यक्तिमत्व असावं. अॅनबेल मॅडम आता ८६ वर्षांच्या आहेत. त्यांनी शिक्षणक्षेत्रात पन्नास वर्षांपूर्वी केलेले काही प्रयोग आज ही या क्षेत्रात आधारभूत मानले जातात.

घालवल्यावर त्यातून त्यांना जे कळलं, जे महत्वाचं वाटलं ते त्यांनी नेटकेपणाने या सत्रात मांडलं होतं. अॅनबेल मॅडमनी या सत्रात 'ऑ वॉक' (awe walk) ही संकल्पना मांडली. आजच्या लेखातून मला तुमच्याशी ती शेअर

करायची आहे.

'ऑ' म्हणजे विस्मयचकित होणं, अचंबित होणं, भारावून जाणं, हरखून जाणं. काहीतरी विशेष आगळं वेगळं पाहायला मिळतं आणि आपल्या आतच काहीतरी होतं, आपली समज बदलवून टाकणारा अनुभव असतो तो म्हणजे 'ऑ!' आपण त्याला सोयीसाठी भारावून जाणं म्हणूया.

मॅडमनी दिलेलं साधं उदाहरण.. त्यांच्या रोजच्या येण्याजाण्याच्या वाटेवर कुठेतरी एका झुडपात एक अळी दिसली, ती बदाबदा पानं खात जात होती, मग काही दिवसांनी ती अळी स्वतःभोवती एक कोष विणताना दिसली आणि मग त्यांनी जरा पाठपुरावा केला, लक्ष ठेवलं आणि एक दिवस तिच्या कोषातून एक फुलपाखरू हळूहळू बाहेर, पडताना दिसलं. त्यांना निसर्गाचा एक सुंदर भारावून टाकणारा आविष्कार पहायला मिळाला आणि दिवस छान होऊन गेला.

असे अनुभव आपल्याला अनेकदा येतात. कधी ते निसर्गाच्या स्वरुपांमधून आणि ऋतुमानांनुसार बदलत्या रुपांमधून येतात. माणसाच्या हातांनी घडवलेली भव्य दिव्य चित्र शिल्प कलांचे आविष्कार यातून येतात. संगीताचा नाद कधीतरी आपल्याला खुळावून टाकतो, खिळवून टाकतो आणि आपल्याच आत काही तरी छेडलं जातं.

कधी मनुष्य स्वभावातलं काहीतरी उत्तुंग पाहायला मिळतं, आभाळाएवढी माणसं भेटतात तर कधी लहान मोठ्या माणसांनी एकत्र येऊन केलेली आभाळाएवढी कामं पाहायला मिळतात. आपण भारावून जातो.

कधी जन्म मृत्यूच्या सीमारेषेवरचा खेळ पाहायला अनुभवायला मिळतो आणि आपण बदलूनच जातो. कधी पारलौकिक काहीतरी जाणवून जातं, एखाद्या क्षणी त्या अलौकिक शक्तीचा अनुभव येतो आणि आपण थरारून जातो.

अचंबित करणारे भारावून टाकणारे हे अनुभव. आपल्या पैकी प्रत्येकाच्या वाट्याला ते कधी ना कधी आलेले असतात, आपल्याला अर्थातच त्याने छान वाटतं, पण बऱ्याचदा आपली गाडी तिथेच थांबते. आणि मग तो अनुभव आपल्या कामाच्या धबडग्यात मागे पडतो. पण हरखून जाणं, भारावून जाणं ही भावना आपण जाणीवपूर्वक धरून ठेवली की काय होतं, यावर आता खूप संशोधन झालं आहे.

या भारावून टाकणाऱ्या अलौकिक अनुभवांनी आपल्याला छान वाटतं. म्हणजे नेमकं काय होतं! तर आपल्या शरीरातऑक्सिटोसिन अणि डोपामाइन स्त्रवतात. हे आनंद देणारे हॉरमोन्स. त्यामुळे एक वेगळा शांततेचा शीतलतेचा अनुभव मिळतो.

त्यातून शरीराला ताणतणावाशी लढायची शक्ती मिळते, आपल्या आत अखंड चाललेल्या विचाराच्या चक्रांना त्याने थोडी खीळ बसते. आपण रिलॅक्स होतो त्याच्या जवळ जाणारा हा अनुभव असतो.

एकदा शरीर रिलॅक्स झालं की रोगप्रतिकार शक्ती वाढण्याला त्याचा थेट फायदा मिळतो, स्वास्थ्य वाढतं, हे आता आपल्या सगळ्यांना माहितच आहे. त्यामुळे असे अनुभव पूर्णपणे घेणं, ते धरून ठेवणं, त्यांच्या सोबत राहणं, मनात घोळवणं, ते अनुभव आठवणं, त्या बद्दल बोलणं, या सगळ्याचे शरीर मनाला खूप फायदे होतात.

खूपदा असे अनुभव आपल्याला माणसातलं काहीतरी उत्तुंग भव्य दिव्य दाखवून जातात. त्याने मनुष्य आणि समाज म्हणून आपण सगळे जोडले जाण्याची भावना येते. अशी अनेक उदाहरणं आपल्या आजूबाजूला आपण पाहतोय, अगदी प्रकाश आमटे, अभय बंग यांच्या सारखी मोठं सामाजिक काम करणारी माणसं ते आपल्याच नात्या गोत्यातली एखादी शहाणपणाचे दोन बोल सांगणारी त्यानुसार वागणारी एखादी व्यक्ती... त्यातून त्यांचा आदर तर वाटतोच पण एखाद्या कामाशी-विचाराशी जोडून घ्याची प्रेरणा ही मिळते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला मीपणा अहंकार झडायला मदत होते. आपले पाय जमिनीवर राहतात आणि पाय जमिनीवर राहतात तेव्हाच आपली मुळं घट्ट होतात.

अॅनबेल मॅडमनी सुचवलं की कधीतरी थोडं आजूबाजूला फिरलं आणि थोडं डोळसपणे पाहिलं की निसर्गाचेच छोटे छोटे अनेक आविष्कार दिसतात. त्यातून खूप काहीतरी युनिक आगळं वेगळं पाहायला मिळतं. आपल्याकडे ऐन पावसात उगवणारी हिरवळ. तिचा रंग, मखमली स्पर्श, तकाकी, आणि त्या सगळ्या वातावरणाला येणारा ताजातवाना सुगंध.. वाऱ्यावर डुलणारी त्या हिरवळीची लय... हरखून टाकणारा ताजं तवानं करणारा अनुभव असतो हा. आणि मग जरा पाऊस कमी झाल्यावर उगवणारी गवतफुलं. त्यासाठी अगदी कासच्या पठारावर जायची गरज नसते, आपल्या गावात, आपल्या जवळच्या मैदानात कुठे ही हे दृश्य पाहायला मिळतं. काही दिवस ते एक दोन महिन्यांचं आयुष्य असलेले गवत फुलांचे बहर!. कुठे ही असतातच. आपण पाहायचे, अनुभवायचे आणि आपल्या आत काय होतं या बद्दल थोडं सजग राहायच.

आपण स्वतः स्वतःला दिलेला हा एक बूस्टर डोस असू शकतो. केवळ डोळसपणे आजू बाजूला निरखून पाहण्यासाठी केलेला छोटा मोठा फेरफटका.. अॅनबेल मॅडम च्या भाषेत 'ऑ वॉक'.

करून पाहायचा ना हा मग! पावसाळी सहलींच्या गोंधळ धांगडधिंग्या पलिकडचा हा अनुभव. आताचा ऋतू ही छान आणि नेमका आहे त्यासाठी. थोडंफार सातत्य लागेल त्यासाठी, पण त्यातून पदरी ही खूप काही पडेल. अॅनबेल मॅडमनी त्याचं सेशन म्हणजे आम्हाला दिलेला एक 'ऑ वॉक' च होता. आपण ही करुन पाहूया ना हे 'ऑ वॉक्स' !!