दोन व्यक्तींमधील बौद्धिक वेगळेपण आणि मानवाची अगम्य बौद्धिक क्षमता हे प्राचीन काळापासून संशोधक आणि तत्त्वज्ञांसाठी कुतूहलाचे विषय राहिले आहेत. या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावरच मानवाने पृथ्वीवर आपले वर्चस्व निर्माण केले असून, आता तो अवकाशाला गवसणी घालत आहे. आज मानवाने जी काही प्रगती केली आहे, त्यामध्ये त्याच्या बुद्धिमत्तेचा सिंहाचा वाटा आहे. युवकांनो बुद्धिमत्ता ही केवळ एक साधी किंवा सोपी गोष्ट नसून, ती अनेक गुणवैशिष्ट्यांचे एक सुंदर संयोजन आणि समायोजन आहे. ती काही अंशी अनुवांशिक असते, तर काही अंशी बाह्य वातावरणातून विकसित होते. म्हणूनच, युवकांनो योग्य कष्ट आणि परिश्रमांच्या साहाय्याने बुद्धिमत्तेला योग्य आकार देता येतो आणि तिला योग्य दिशेने प्रवाहित करता येते. बुद्धिमत्तेचे खरे महत्त्व तेव्हाच अधोरेखित होते, जेव्हा ती समाजासाठी उपयुक्त असे काहीतरी उत्पादन किंवा उत्पादकता घडवून आणते, जी तमाम मानवजातीच्या विकासासाठी सहाय्यभूत ठरते. त्यामुळे बुद्धिमत्ता ही एकसंध नसून ती बहुआयामी आहे. साहजिकच आजच्या युवकांनी त्यांची अध्ययन बुद्धिमत्ता वेळोवेळी तपासली पाहिजे आणि तिच्यावर गांभीर्यपूर्वक कामकाज केले पाहिजे. मानवी बुद्धिमत्तेमध्ये समाविष्ट असणारे प्रमुख १९ घटक आहेत आपण ते खालील प्रमाणे विस्ताराने पाहूया.
१. संकल्पनांचे अमूर्तीकरण (Abstract Reasoning): कल्पनेत असलेल्या मात्र प्रत्यक्षात दृश्य स्वरूपात नसलेल्या गोष्टी समजणे म्हणजे अमूर्तीकरण. उदाहरणार्थ, 'चेंडू गोल आहे' यात चेंडू ही वस्तू दिसते, पण 'गोल' ही एक अमूर्त संकल्पना आहे. ही संकल्पना समजून घेऊन ती पृथ्वी, चंद्र किंवा बांगडीला लागू करणे, ही बुद्धिमत्तेची पहिली पायरी२. तार्किक क्षमता (Reasoning Ability): एखाद्या
घटनेचा किंवा वस्तूचा तर्कशुद्ध विचार करून योग्य निष्कर्ष काढणे म्हणजे तार्किक क्षमता. उदा. नदी जिथे खोल आहे तिथून ती पार करू नये, किंवा रात्री अचानक झोप येऊ शकते म्हणून वाहन चालवू नये, हा तर्क लावणे.
३. ज्ञानग्रहण क्षमता (Knowledge): पंचज्ञानेंद्रियांद्वारे माहिती मिळवणे, तिचे वर्गीकरण करणे, उजळणी करून ती स्मृतीमध्ये साठवणे आणि गरजेनुसार ती पुन्हा वापरणे म्हणजे ज्ञानग्रहण क्षमता. अभ्यास करून ती माहिती दीर्घकालीन स्मृतीत साठवणे व परीक्षेत उत्तरपत्रिकेत ती मांडणे यात ही क्षमता दिसून येते.
सेल्सिअस असते, हे ठाऊक असणे. ४. सामान्यज्ञान क्षमता (General Knowledge): आपल्या आजूबाजूला काय घडत आहे, याचे भान असणे. या घडामोडींचा आपल्यावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. उदा. पाणी उकळते म्हणजे त्याचे तापमान १०० अंश
५. स्मृती क्षमता (Memory): आपल्या मेंदूमध्ये संवेदना
स्मृती, अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती अशा तीन प्रकारच्या स्मृती असतात. प्राप्त झालेली माहिती या स्मृतींमध्ये किती काळ टिकते, यावर बुद्धिमत्ता अवलंबून असते.
६. जुळवून घेण्याची क्षमता (Adaptation): नवीन वातावरण किंवा परिसराशी स्वतःला अनुकूल करून घेण्याची क्षमता. उदा. नोकरीनिमित्त नवीन शहरात गेल्यावर तिथल्या जीवनशैलीशी लवकरात लवकर जुळवून घेणे ही सुद्धा एकबुद्धिमत्ताच आहे.
७. मानसिक गती (Mental Speed): एखादी समस्या
तुम्ही किती सहजतेने आणि जलद गतीने सोडवता, यावरून तुमची मानसिक गती ठरते. उदा. रस्त्यात गाडी बंद पडल्यास ती तातडीने सुरू करून निश्चित स्थळी पोहोचण्यासाठी लागणारी सूचकता.
८. भाषा आणि संवाद कौशल्ये (Linguistic): भाषेचा परिणामकारक वापर करणे आणि स्वतःला योग्य रीतीने व्यक्त करणे म्हणजे संवाद कौशल्ये. जितकी भाषा सोपी आणि हृदयस्पर्शी असेल, तितके लोक तुमचे नेतृत्व स्वीकारतात.
९. अंतरवैयक्तिक बुद्धिमत्ता (Interpersonal): समोरच्या व्यक्तीचा हेतू, तिची इच्छा आणि प्रेरणा ओळखून तिच्याशी सुसंवाद साधण्याची क्षमता. या बुद्धिमत्तेचे लोक बहिर्मुख, संवेदनशील, सहकार्य करणारे आणि सहानुभूती दाखवणारे असतात. ते समाजकार्यात किंवा व्यवस्थापनात माहीर असतात.
१०. अंतर्गत बुद्धिमत्ता (Intrapersonal): स्वतःचे आत्मपरीक्षण करणे, स्व-चिंतन करणे आणि स्वतःच्या भावनांना समजून घेणे म्हणजे अंतर्गत बुद्धिमत्ता. असे लोक अंतर्मुखी आणि अंतर्ज्ञानी असतात. त्यांना स्वतःच्या क्षमतांची खोलवर ओळख असते आणि ते एकटे काम करणे पसंत करतात.
११. गणितीय आकडेमोड क्षमता (Mathematical Calculation): यामध्ये गणितीय आणि भूमितीय संकल्पना, संख्यांचे आकृतीबंध समजणे आणि योग्य तार्किक पर्याय निवडणे या क्षमतांचा समावेश होतो.
१२. सृजनशीलता (Creativity): आपल्या कल्पकतेचा व कौशल्याचा वापर करून काहीतरी नवीन, आगळेवेगळे आणि मौल्यवान निर्माण करणे म्हणजे सृजनशीलता होय. कामामध्ये कल्पनाशक्तीचा वापर करून नवनिर्मिती करणे यात येते.
१३. संवेदनशीलता (Sensitivity): सभोवतालच्या संवेदना, भावना आणि परिस्थिती जाणून घेण्याची क्षमता. यातसूक्ष्म निरीक्षण आणि चौकसपणाचा समावेश होतो.
१४. स्व-प्रेरणा (Self-Motivation): स्वतःच्या कर्तृत्वातून आणि कामातून स्वतःच प्रेरणा घेणे आणि आपल्या ध्येयाप्रती कायम समर्पित राहणे म्हणजे स्व-प्रेरणा.
१५. कलागुणता (Art Musical): संगीताची आवड असणे, एखादे वाद्य वाजवणे किंवा उत्तम गायन करणे या कलागुणांचाही समावेश बुद्धिमत्तेत होतो.
१६. शारीरिक कौशल्ये (Kinaesthetic): आपल्या शरीराचे अवयव आणि स्नायू वापरून किती कुशलतेने काम केले जाते, ती ही क्षमता होय. उदा. स्वेटर विणणे, नृत्य करणे किंवा उत्कृष्ट चित्र काढणे.
१७. स्थानिक ज्ञान (Spatial): आपल्याला आपल्या अवकाशाची किंवा भौगोलिक स्थानाची किती अचूक माहिती आहे, हे यावरून ठरते. रस्ते किंवा दिशांचे अचूक ज्ञान असणे यात मोडते.
१८. सौंदर्य बुद्धिमत्ता (Aesthetic): निसर्गाचे सौंदर्य समजून घेणे आणि निसर्गाशी एकरूप होण्याची क्षमता असणारे लोक यात येतात.
१९. अस्तित्वात्मक बुद्धिमत्ता (Existential): मानवी जीवन, मृत्यू आणि विश्वाचे अस्तित्व यांसारख्या गंभीर आणि अमर्याद विषयांवर खोलवर विचार करण्याची क्षमता यात समाविष्ट आहे.
आशा प्रकारे बुद्धिमत्ता ही एक एकत्रित, सर्वकष आणि एकात्मिक संकल्पना आहे. याद्वारे व्यक्ती उद्देशपूर्ण, तर्कशुद्ध आणि प्रभावीपणे आपल्या पर्यावरणाशी सांगड घालत असते. सभोवतालच्या मागणीनुसार आपण आपले वर्तन बदलतो, अनुभवातून शिकतो आणि येणाऱ्या समस्या सोडवतो. बुद्धिमत्ता हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पाया आहे, जे मानवी जीवन सुसह्य करण्यासाठी अहोरात्र झटत असते. बुद्धिमत्ता म्हणजे जणू अंधारातील प्रकाश आणि वाळवंटातील ओएसिस आहे, जी संपूर्ण मानवी जीवन प्रकाशमान करते. त्यामुळे युवकांनी आपली स्वतःची बुद्धिमत्ता नक्की कोणत्या प्रकारची आहे, हे आधी समजून घेणे आहे. एकदा का आपण 'काय